Book traversal links for माझे खाद्य-पेय जीवन-२
प्रतिक्रिया
लै भारी लेख!
म्हणुनच आम्ही म्हणतो की संजोपरावसारखा लेखक गेल्या दहा हजार वर्षात झाला नाही! :)
लै भारी लेख!
म्हणुनच आम्हीही म्हणतो की संजोपरावसारखा लेखक गेल्या दहा हजार वर्षात झाला नाही!
हा ही भाग मस्त... :)
सकाळी सकाळी एव्हढ सर्व खाद्यमय वाचुन आता खरचं भुक लागली...
(१ नंबरी खादाड)
मदनबाण.....
अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.
क्या बात है!!
हा भागही दृष्ट लागण्यासारखा उत्तम जमून आला आहे.
बर्याच ठिकाणी खुदकन हसू आले.. अतिशय खुसखुशीत आणि मिसळी इतकाच चमचमीत झाला आहे.
:)
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
- प्राजक्ता
http://praaju.blogspot.com/
क्या बात है...
वाकई क्या बात है....
हा भागही दृष्ट लागण्यासारखा उत्तम जमून आला आहे.
अगदी सहमत ....:-)
बर्याच ठिकाणी खुदकन हसू आले.. अतिशय खुसखुशीत आणि मिसळी इतकाच चमचमीत झाला आहे.
बिल्कूल.....
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
आम्हीही........पू भा प्र.......
:-)
बैलोबा चायनीजकर !!!
Drink Beer,
Save Water !!
;-)
छान लेख. मिसळीचे खरे यश मात्र शँपल मधेच आहे असे मी मानतो. शँपल छप्परतोड असेल सेंपलखाली पोहे, बटाटे, चिवडा काहीही चालून जाते.
रावांचा लेख अपेक्षेप्रमाणे खुसखुशीत.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
रावसाहेब, दिल खुश केलंत! वाचताना सगळी नेहमीची ठिकाणं आठवली अन वाटलं, लेका दे सोडुन हे सारं अन जा परत कर मजा! जाउद्या शब्दात का सांगता येणार हे. येउद्या राव, सगळ्याची तहान वाचुन भागवावी लागणार.
खूपच चविष्ट! आणखी येऊ देत.
(हावरट)बेसनलाडू
उपमा जाति मधे "सांजा" हा प्रकार विसरलात का वगळलात?
असेच म्हणतो. उपमा आणि सान्जा ह्यातील फरक काय?
सांज्या चा ओझरता का होईना पण उल्लेख हवा होता असे वाटले. त्या शिवाय उपमा हि 'जात' पुर्ण वाटत नाहि. असो.
पुर्वी सांजा हा प्रकार एखाद्या लग्नात पहाटे /सकाळी अगदि हमखास असायचा. त्यावरुन लग्नातल्या आचारी लोकांचा अंदाज येयचा. हमखास हा सांजा लवकर संपायचा. आता बहुदा अशी लग्न होत नसावीत ! जुन्या लोकांना अशा लग्नांची आठवण जरुर असेल.
मिसळीत सांबार ? #:S :O ऑ !
मिसळीवर झणझणीत रस्सा असतो.
श्री ची मिसळ खाल्ली नाही वाटते कधी
बापरे
उद्या रसगुल्ल्यावर चहा ओतून प्याल :SS
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
मिसळीत सांबर म्हणाले, नशिब आपलं ! गरमागरम भोकं पाडलेले थालपीठ चहात बूडून खाण्याच्या आनंदाचे वर्णन नाही आले, आले तरी म्हणायचं, क्या बात है ! तसेही अजून ठरावीक पट्टीतले लेखन आले नाही. जसे, हिवाळ्यातली उबदार गोधडीतील सकाळ असावी. आपल्याच परसातल्या जाईच्या फुलांचा सुगंध दरवळलेला असावा. वाफाळत्या उपम्याची प्लेट हातात घेऊन घरभर फिरण्याचा मूड व्हावा. खय्याम साहेबांनी बांधलेली चाल आणि आशाताईंचा थेट हृदयाला भिडणा-या 'दिल चीझ क्या है...च्या आलापात सकाळ मोहरुन जावी. बायडीनं लाडात येऊन उपम्यावर खोबरं पेरावं. नाजूक हातातल्या बांगड्यांच्या किणकिणण्याचा आवाज मनभर गुंजत राहावा. आता पुरे, आता पुरे, असे म्हणत असतांना हात तसाच गळून पडावा......इ.इ.
-दिलीप बिरुटे
हिवाळ्यातली उबदार गोधडीतील सकाळ असावी
यावरून आठवले. संक्रांतीच्या आधी धनुर्मास येत असे. त्या दिवसात निदान भोगीच्या सकाळी तरी गरमागरम आनि नरम मुगाची खिचडी, त्यावर खोवलेले खोबरे, बाजरीच्या भाकरीवर लोण्याचा गोळा, सोबतीला भरली वांगी असा मस्त बेत असायचा.
डॉक्टरसाहेबांनी सुचवलेल्या इतर गोष्टी माझ्या लहानपणी एकत्र कुटुंबात शक्य नव्हत्या, आता त्या जोडायला हरकत नाही.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/
च्यायला, काय भारी प्रतिसाद लिहायचो राव मी. :)
-दिलीप बिरुटे
च्च..पूर्वीचे प्राडॉ राहिले नाहीत ;)
:D
असेच म्हणतो.
अवांतर : लेख फक्कड जमलाय.
>>पण नाश्ता कोणताही असो, त्याने 'अन्नादाता सुखी भवः' असे म्हणावेसे वाटले पाहिजे.
एकदम पटले ..एकुणच लेख चमचमीत झाला आहे :)
रावसाहेब मस्त लेख झालाय.
चेतन
अवांतरः हे नक्की बल्लवाचार्य आहेत कि खवय्ये ( की नुसतेच कवी जे न देखे रवी)
आहाहा! तोंडाला पाणी आणलंत! इथे बेंगळूरात रोज इडली-डोसा खाऊन कंटाळा आलाय! पोहे हा प्रकार इथे अस्तित्वातच नाही हे कळल्यावर कीव वाटली इथल्या पामरांची!
// उप्पीटावर भडंग घालून खाणे हा कशाबरोबरही काहीही खाणार्या देशस्थांचा खास शोध आहे. //
याची मात्र काही गरज नव्हती! ;)
पोहे अस्तिवात आहेत साहेब इकडे.पोहे पाहिजे असतील तर 'अवलक्की भात' म्हणून सांगा.पोह्यांत शेंगदाणे घालतात.बटाटे घालत नाहीत.कुठच्याही शांतिसागरमध्ये मिळतील.
लेख मस्तच.
क्ष्^न + य्^न = झ्^न
फर्मास! येऊ द्या.
पणशीकर-घाणेकर ,भट, दुभाषी, लागू, गोखले-हा,हा. रंगमंच म्हणजे एक थाळी आहे. आम्ही "एक पणशीकर घे रे","दोन लागू पाठव जरा" ऑर्डर सोडतो आहोत. काऊंटरचा टकल्या शेट्टी "साहेब, भक्ती बर्वे एकदम गरमागरम आहे बघा."असा आग्रह करतो आहे. पोर्या काऊंटरला "तीन नंबर टेबल... दोन भट, तीन तोरडमल,दोन आगाशे" असे बिल ओरडून सांगतो आहे. असे दृश्य दिसले.
पण विज्ञान सांगते म्हणून नाश्ता घेणे म्हणजे घशातले जंतू मरावेत म्हणून व्हिस्की पिण्यासारखे आहे.-आम्ही तर बुवा पोटातलेही जंतू मारण्यासाठी घेतो. तुम्ही कशासाठी घेता? ;)
लेख चांगला, खमंग झाला आहे.
पण खरे पोहे दोनच
असहमत! तुम्ही कोळाचे पोहे चाखले नाहीत, हे उघड आहे!
बाकी इडली-सांबार जोडी ही तात्या-अनुष्का जोडीसारखीच अविलगनीय! पण इडलीचा चुरा करून, त्यावर आले-हिरवी मिरची-मीठ यांचे मिश्रण कुस्करून खाण्याची मजा काही औरच!
सकाळी भरपेट नाश्ता केला की दिवसभर शरीर उत्साही राहाते, असे विज्ञान सांगते. मला वाटते, हे शरीरापेक्षा मनाला अधिक लागू आहे. मनाजोगता नाश्ता झाला की मनच 'बनके पंछी गाये प्यारका तराना' म्हणू लागते. आणि असले उत्साही मन असल्यावर काय बिशाद आहे त्या शरीराला थकवा येण्याची!
१०१% सहमत.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
फक्त दोसे- उत्तप्प्यांसाठी 'उठाव लुंगी-बजाव पुंगी' म्हणणारी शिवसेना सोडावी आणि कोपर्यावरच्या शेट्टीकडे जाऊन मसाला दोसा खावा =D> =D>
रवा दोसा काट्याचमच्याने खाता आला तर त्याला नापास जाहीर करुन तो उडुपी सोडून द्यावा. =D> =D> =D>
(डोसा प्रिय ) अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
सुंदर लेख. =D>
'नाश्ता' या नावाखाली कालच्या भाताला तेल्-तिखटाची फोडणी देऊन नुसता खाण्यात किंवा शिळ्या चपात्यांचा काला मोडून त्यात तिखट- कांदे-शेंगदाणे घालून गरम तेलाची फोडणी देऊन खाण्यातली मजा.. हा पण एक वेगळाच अनुभव असतो.
या 'डिशेस' सुट्टीच्या दिवशी उशीरा उठून खाल्ल्या तर अधिक चवदार लागतात, हा स्वानुभव आहे! ;)
"Great Power Comes With Great Responsibilities"
लेख खुपच छान आहे...काही वाक्य तर एकदम झक्कासच...जसे :-))
उप्पीटावर भडंग घालून खाणे हा कशाबरोबरही काहीही खाणार्या देशस्थांचा खास शोध आहे.
हे खासच...स्पेशल टाळ्या =D> या वाक्यासाठी... :-) :P 8-}
ओsssssब!!!
यापलीकडे ढेकरीचा उच्चार लिहिता येत नाही... जिज्ञासूंनी दुर्लक्ष करावे.
या लेखात 'पु.ल. प्रभाव' अधिक जाणवला.
उप्पीटावर भडंग घालून खाणे हा कशाबरोबरही काहीही खाणार्या देशस्थांचा खास शोध आहे.
- हे खरं असावं. पण खमंग आणि खुशखशीत (कि खुटखुटकीत ?)ओरिजिनल थालिपीठ हा त्यांचाच शोध, नाहीतर कोकणात एवढं तेल कुठुन मिळायला ?
छान आवडला लेख...
सुट्टीच्या दिवशी शिळ्या भाताला फोडणी देऊन समोर येणारी "फोडणीच्या भाताची प्लेट " आठवली.
वाक्या वाक्याला दाद द्यावी असा सुरेख लेख. मजा आली.
हावरटपणा: चहा झाला, नाष्टा झाला. जेवणाची वाट पहातो आहे.
हापिसात आलो तेव्हा ब्रेकफास्ट करुन आलेलो.
लेख वाचला आणी क्यांटीन मधे नाश्ता करायला गेलो.
एक नंबर मिसळ जमली आहे. अजुन येउद्यात तर्री....
__/\__
भन्नाट लेखण शैली. !!
-- खाद्योप राव
बकासुरांच्या ताटातलं आपल्या कर्तुत्वाने स्वत: खाणारा भिम हा आमचा नवीन आदर्श आहे!
रावसाहेब एकदम रवाडोश्या सारखा कुरकुरीत लेख.
मस्तच.
मनाजोगता नाश्ता झाला की मनच 'बनके पंछी गाये प्यारका तराना' म्हणू लागते. आणि असले उत्साही मन असल्यावर काय बिशाद आहे त्या शरीराला थकवा येण्याची!सोळा आणे पटलं हा लेख वाचून तृप्तीचा (कि ची?) ढेकर देत आहोत.. चहा झाला, नाश्ता झाला. आता मुख्य जेवणाकडे वळाल त्याची वाट पाहतोय (खवय्या)ऋषिकेश
वा! शिंगणापुरला खाल्लेल्या मिसळीची आठवण झाली. चेंबूरच्या गीताभवनची उगाच आठवण काढलीत आता परत तिकडं जाऊन डोसा हाणावा लागल. एकुण फर्मास लेख.
मस्त!!! मजा आली... :)
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
आयला! आमचा संजोप हल्ली फुल्ल फॉर्मात आहे.. :)
खाद्ययात्रा झकासच चालली आहे. भाईकाकांच्या माझे खाद्यजीवनची आठवण झाली...:)
संजोप, डिसेंबरात पिरंगुटात मिसळपावचा जोरदार कट्टा करू रे. दारूबिरू पिऊ, मटणबिटण खाऊ! :)
तात्या.
डिसेंबरात पिरंगुटात मिसळपावचा जोरदार कट्टा करू रे. दारूबिरू पिऊ, मटणबिटण खाऊआणखी काही सुविधा असतील का तात्या ? :) :) :) आवडीनुसार ? आपला, टारझन_पार्टीत_दंगा
पिरंगुटला मिपाकरांचा फक्त खाण्यापिण्याचा, गाणी गोष्टी गप्पांचा कट्टा होईल..
आणखी काही सुविधा असतील का तात्या ? आवडीनुसार ?नाही! त्या दिवशी स्त्री पासून दूर रहावे लागेल. कारण बंगला संजोपचा नसून त्याच्या बहिणीचा आहे. तिथे काही अन्य चाळे केल्यास तुला मला तर हाकलून दिले जाईलच, शिवाय संजोपकरताही त्या बंगल्याची दारे कयमची बंद होतील! आपला, (सावध) तात्या.
खुलाशाबद्दल धन्यवाद तात्या.
चला, अशा काही जागा आहेत जिथे तात्या सज्जन आहे असे समजले जाते.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
नान्या अजून एक.. चंची एक्सचेंजसाठी चंची घेऊन येणे.
आगाऊ खुलाशासाठी स्वतःलाच धन्यवाद.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
मस्त!
वाचतो आहे. साबुदाण्याच्या खिचडीवर अजून लिहायला हवे होते. बाकी कोळाचे पोहे आणि खापरोळ्या हा अस्सल तळकोकणी नाश्तासुद्धा 'ऑल्ज राईट विथ द वर्ल्ड' प्रकारातला :)
लेख अगदी फर्मास झालाय...
वाचुन झाल्यावर नरकचतुर्दशीच्या दिवशी सकाळी ७ वाजता दही पोहे हाणल्यासारखे वाटले.
आंबोळी
=D>
सुरेख लेख..... :)
अप्रतिम लेख.
अलिकडे मझ्या वाचनात आलेला एक सर्वोत्तम लेख.
अजुन येउद्या.
नंदू
:D सुरेख
चुचु
लेखात व्यक्त केलेली काही मते पटली नाहीत, पण ते जाऊ दे. एकंदरीत झक्कास लेख.
तुमची इमेजरी इतकी फॅब्युलस आहे की कुणालातरी तातू सामंताचे डोके उघडून आत काय आहे असे बघावेसे वाटले होते, तसे आता मला तुमच्याबद्दद्ल वाटत आहे.
अजून येऊ दे.
झकास!! >>इडली