Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by तर्री on गुरुवार, 08/16/2012 - 20:49
लेखनविषय (Tags)
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
सद्भावना
माझ्या प्रोफाइल मध्ये कालावधी ४ वर्षे ४७ आठवडे दाखवतो आहे. म्हणजे मिपाला पाच वर्षे होत आली किंवा झाली ! हे म्हणजे एखाद्या जिंदादिल मित्राचे अचानक साठीशान्तीचे निमंत्रण यावे तसे आहे. मस्ती करता करता ५ वर्षे लोटली पण ! मधल्या काळात मिपाची भावंडे निघाली हे समजले पण आपला जीव येथेच रमतो. दोन द्याव्या दोन घ्याव्या आणि मज्जेत राहावे तर मिपा वर! मिपा बाल्यावस्थेतून शैशवात पाउल ठेवते होते आहे. हे शैशव सदा सर्वकाळ राहावे. भांडणे भरपूर होवू देत पण ती परत एक होण्यासाठी! वैदिक पुरोगामी भांडणे , रामायण महाभारतात सेक्सी कोण , इंच इंचाचे हिंदुत्व आणि मोकल्या हया दिशा सारखे सदा बहार , नेहमीचे यशस्वी लेख तर कधीही वाचून मनाचा ताण हलका करावा असे अभिजात! तर ५ वर्षाबद्दल आपल्या सर्वांचे अभिनंदन ! चला सुरु करा ५ वर्षाचा “पंच”नामा !
  • Log in or register to post comments
  • 6105 views

प्रतिक्रिया

Submitted by विकास on गुरुवार, 08/16/2012 - 20:52

Permalink

अजून चार आठवडे

अजून चार आठवड्यांनी पाच वर्षे पूर्ण होतील!
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on गुरुवार, 08/16/2012 - 21:11

Permalink

अरे वा!

मिपासोबत तुमचंही अभिनंदन! मिपाचा वाढदिवस १महिना आधीच सुरू झाला की!
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on गुरुवार, 08/16/2012 - 21:12

Permalink

संपादकपदासाठी इच्छुकांनी

संपादकपदासाठी इच्छुकांनी त्वरीत नावनोंदणी करावी अशी झायरात द्यावी काय? आधीच्या संपादकांनी पाठ मार खाऊन अगदी मऊ झालिये आता. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on गुरुवार, 08/16/2012 - 21:13

In reply to संपादकपदासाठी इच्छुकांनी by रेवती

Permalink

ह्या:

नाव नको! ज्यांना ज्यांना मी विचारलं ते त्या दिवसापासून गायब होतात!
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on गुरुवार, 08/16/2012 - 21:26

In reply to ह्या: by पैसा

Permalink

शंका...

संपादक होण्यासाठी नक्की कुठली अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट वगैरे द्यावी लागते का ह्याची विचारपूस करावी म्हणतो. एझ्कॅक्टली संपादक कुणाला करतात?
  • Log in or register to post comments

Submitted by दादा कोंडके on गुरुवार, 08/16/2012 - 23:54

In reply to शंका... by मन१

Permalink

हा हा...

अ‍ॅप्टीट्यूड च्या ऐवजी चुकून अ‍ॅटीट्यूड वाचलं. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 08/16/2012 - 21:27

In reply to संपादकपदासाठी इच्छुकांनी by रेवती

Permalink

सहमत.

आधीच्या संपादकांनी पाठ मार खाऊन अगदी मऊ झालिये आता. काय डोळ्यात पाणी आणनारा विषय काढला. पाचव्या वर्षात पदार्पण करतांना नव नव्या भिडुंना संधी मिळालीच पाहिजे. नीलकांत, कर बाबा मोकळं आता. फक्त मला चावडीत यायचे अधिकार तेवढे राहु दे. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Fri, 08/17/2012 - 12:38

In reply to संपादकपदासाठी इच्छुकांनी by रेवती

Permalink

वांड

लहानपणी वर्गातल्या सर्वात वांड आणि धटिंगण मुलास मॉनिटर बनवायचे त्याची आठवण झाली
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on गुरुवार, 08/16/2012 - 21:21

Permalink

मिपाला पुढील वाटचालीला शुभेच्छा.

च्यायला, चक्क पाच वर्ष पूर्ण होतील. श्री गणेश चतुर्थीला आमच्या मित्रानं निरोप टाकला बिरुटेशेठ आपलं मिसळपाव सुरु होतंय, चला घ्या सदस्यत्व आणि मजा करा. आता पाचव्या वर्षात पदार्पण करतांना नीलकांत , प्रशांत, आणि त्यांच्या टीमने सालं आपल्याला या मिपाचं लै वेड लावलं आहे. असो, जसं आठवेल तसं लिहीन. मिपावर सालं आपलं लै म्हणजे लै प्रेम आहे, बस्स इतकंच. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Fri, 08/17/2012 - 05:49

In reply to मिपाला पुढील वाटचालीला शुभेच्छा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

मिपावर सालं आपलं लै म्हणजे लै प्रेम आहे, बस्स इतकंच.

मिपावर सालं आपलं लै म्हणजे लै प्रेम आहे, बस्स इतकंच. व्हय! व्हय!! व्हय!!!
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on गुरुवार, 08/16/2012 - 21:31

Permalink

माझ्या माहिती नुसार गणेश

माझ्या माहिती नुसार गणेश चतुर्थीला मिपाची सुरुवात झाली ! ( चूक असेल तर क्षमस्व !) सध्या माझ्या प्रोफाईल मधे 4 वर्षे 25 आठवडे असा कालावधी दिसत आहे. इतक सुंदर संखेस्थळ स्थापन करणार्‍या तात्यांना आणि ते इतके सुंदरपणे सांभाळणार्‍या निलकांतला धन्यवाद. :) जमल्यास इथेही टिचकी मारुन पहा :- मराठी संकेतस्थळे (बिल्ला क्रमांक ५७४) :)
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on गुरुवार, 08/16/2012 - 22:27

Permalink

स्वागतलेख

http://www.misalpav.com/node/11 १४-१५ सप्टेंबरच्या मध्यरात्री..
  • Log in or register to post comments
Profile picture for user डावखुरा

Submitted by डावखुरा on गुरुवार, 08/16/2012 - 23:02

Permalink

खरंच मिपाला तोड नाहीय..अनेक

खरंच मिपाला तोड नाहीय..अनेक मित्र मिळालेत..
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 08/16/2012 - 23:24

Permalink

(No subject)

Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Fri, 08/17/2012 - 00:42

Permalink

जीव जडला आहे मिपावर

मी नवीन आहे पण जीव जडला आहे मिपावर. मनापासून शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

Submitted by मी_आहे_ना on Fri, 08/17/2012 - 09:45

Permalink

अरे वा

अरे वा! मिपाची अशीच भरभराट होत राहो...आणि आम्हाला असेच वाचन-खाद्य मिळत राहो!
  • Log in or register to post comments

Submitted by पुण्याचे वटवाघूळ on Fri, 08/17/2012 - 09:55

Permalink

शुभेच्छा

मिसळपाव लवकरच पाचवा वाढदिवस साजरा करणार हे वाचून खूप बरे वाटले. गेल्या जवळपास अडीच वर्षांपासून मी सदस्य आहे पण मला पहिल्यांदा संगणकावर मराठी लिहिता येत नसल्याने आणि अजूनही मुद्दे तितकेसे नीट मांडता येत नसल्यामुळे मी जास्त वाचायचेच काम केले. गेल्या अडीच वर्षांत अनेक चांगल्या लेखकांचे लेखन वाचायला मिळाले आणि त्यातून माझेही जीवन समृध्द झाले. एखाद्या दिवशी मलाही त्यांच्याप्रमाणेच लिहिता येईल अशी स्वप्ने मी नेहमीच बघतो. मिसळपावला वाढदिवसाच्या शुभेच्छा. अशीच वाटचाल चालू राहो ही सदिच्छा.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Fri, 08/17/2012 - 10:10

Permalink

अभिनंदन

अरे वा.. या "पंचमी" निमित्त एक महा कट्टा गम्पतीत भरवावा असे सुचवतो :)
  • Log in or register to post comments

Submitted by नाना चेंगट on Fri, 08/17/2012 - 10:32

Permalink

चिअर्स !!

चिअर्स !!
  • Log in or register to post comments

Submitted by धनुअमिता on Fri, 08/17/2012 - 11:24

Permalink

मिपाला पुढील वाटचालीला

मिपाला पुढील वाटचालीला अनेकोनेक शुभेच्छा. HAPPY BIRTHDAY MISALPAV IN ADVANCE
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर on Fri, 08/17/2012 - 12:33

Permalink

५ वर्षाच्या शुभेच्छा!

पुढील वाटचालीस शुभेच्छा! (गणेश चतुर्थी हाच मिपाचा वाढदिवस समजतो, कारण ती तारीख आठवत नाही).
  • Log in or register to post comments

Submitted by आदिजोशी on Fri, 08/17/2012 - 12:58

Permalink

अभिनंदन

आमच्या वेळी हे असं नव्हतं. च्यक च्यक... सालं पूर्वीचं मिसळपाव नाही राहिलं.
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Fri, 08/17/2012 - 13:55

Permalink

क्या बात है!

क्या बात है! पाच वर्ष होत आली सुद्धा!! (माझ्यासकट) सर्व मिपाकरांचे अभिनंदन! :) मराठी आंतरजालावर मैलाचा दगड ठरलेलं हे संस्थळ असेच बहरत राहो ही सदिच्छा!
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक on Fri, 08/17/2012 - 14:19

Permalink

अभिनंदन

सर्वांना शुभेच्छा. मिपाची भरभराट अशीच होऊदे :) बिल्ला नं Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by मनीषा on Fri, 08/17/2012 - 14:50

Permalink

अभिनंदन मिपा .. आणि Thank

अभिनंदन मिपा .. आणि Thank you very much !!
  • Log in or register to post comments

Submitted by विदेश on Fri, 08/17/2012 - 17:24

Permalink

आगाऊ अ भि नं द न !

"मिसळपाव"ने बर-वाईट लिहिण्याची , चांगल-चुंगल वाचण्याची , उत्तमोत्तम प्रतिसाद मिळवण्याची - संधी दिल्याबद्दल मिपाचे आभार मानणे, हे कर्तव्य आहे .. मिपाचे येणा-या वाढदिवसानिमित्त अभिनंदन करणे हा हक्क आहे -- अ भि नं द न !!!
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com