मानसिक आणि शारिरीक स्वास्थ्याची काळजी घ्या!!
नमस्कार मंडळी,
डिस्क्लेमरः प्रेषक किंवा त्याचे कुटुंब स्वतः कोणत्याही आजाराचा बळी नाही, उगाच कल्पनाविस्तार नको.
आजकालच्या धकाधकीच्या आणि व्यस्त जीवनमानात आपले शरीर आणि मन सुदृढ रहाण्यासाठी आपण पुरेसे प्रयत्न करणे गरजेचे आहे असे वाटते. शरीरस्वास्थ्यासाठी हजारो औषधे असली तरी त्यापासून दूर कसे रहाता येईल हे जास्त महत्वाचे. मानसिक विकारांसाठी ईतरांची गरज लागते, आपल्या आजुबाजुच्या लोकांची काळजी घ्या. फार कमी संख्येने लोक हे करतात म्हणून हा प्रपंच.
सुरुवात म्हणजे "मला काय होणार?, मला काहीही होणार नाही, मी निर्व्यसनी आहे किंवा मी जास्त घेत नाही/मी रोज जीमला जातो/१० किमी पळतो त्यामुळे मला काही होणार नाही" हा विचार मनातून काढून टाका.
हजारो प्रकारची माणसे, आचार-विचार, राहणी, खाण्यापिण्याच्या पद्धती यामुळे कुणालाही कधीही कोणतीही व्याधी जडु शकते. रोग, अॅलर्जी तुम्ही कोण आहात हे पाहुन हल्ला करत नाहीत. आजकाल डॉक्टरांवर विश्वास ठेवणे अवघड असले तरी डॉक्टरच तुमचे निदान करु शकतो. काही लोक भितीपोटी डॉक्टरकडे जाण्याचे टाळतात किंवा आजार अंगावर काढतात. आपले सुद्रुढ शरीर आणि मन हीच आपली खरी संपत्ती आहे हे विसरु नका.
थोडक्यात मांडायचा प्रयत्न करीत आहे तरी अनुभवी/जाणत्या लोकांनी चुकांना दुरुस्त करावे.
तपासण्या:
१. स्त्रियांनी नेहमी थायरॉईड्/ब्रेस्ट कँसर यांच्या टेस्ट करुन घ्याव्यात.
२. भरपूर गोड खाणार्यांनी रक्त व लघवी यांची साखर तपासणी करुन घ्यावी.
३. रेग्युलर पिणार्यांनी फॅटी लीवर, रक्त, लघवी यांची तपासणी करावी.
४. वेश्यागमन्/किंवा अनेक स्त्रियांशी संग ठेवणार्या पुरुषांनी लिंगसंबंधी आजाराशी निगडित तपासण्या वेळोवेळी कराव्यात.
५. सर्वांनीच "कंप्लीट बॉडी चेकअप वर्षा दोन वर्षामधुन करावे.
६. खुप जास्त मांसाहार्/तेलकट तुपकट खाणार्यांनी कोलेस्ट्रॉल तपासण्या कराव्या.
आणखीन बरंच आहे, जाणते लोक्स, डॉक्टर (मिपाकर) सांगतीलच.
रोजची काळजी.
डॉ़क्टर किंवा आहारशास्त्र सांगते ते रोज पाळणे अवघड असले तरी काही गोष्टी करुच शकतो.
१. भरपूर पाणी प्या (अतिरेक नको). हापिसात एखादी बाटली (पाण्याची ;) ) जवळ ठेवल्यास पाणी पिणे वाढते.
२. दात, डोळे, कान यांची निगा राखा, घरात/शरीराची स्वच्छता ठेवा.
३. एखादं दुसरं फळ जवळ ठेवा, भुक लागल्यावर ते खा चिप्स नको.
४. शक्यतो चाला. लिफ्ट्/रिक्शा गाडी टाळा (हामेरीकन लोकांसाठी पेश्शल)
५. जमल्यास जॉगिंग्/योगा/ तत्सम व्यायाम करा.
अगदीच काही नाही तर जेवणावर नियंत्रण ठेवा. वेळेत जेवण, झोप, आनंदी मन देखील रोगांना दूर ठेवू शकते.
मानसिक रोगांविषयी जास्त माहिती नाही, पण चीडचीड, रागराग न करणे आपल्या हातात आहे. हापिसचे टेंशन शक्यतो हापिसातच ठेवा. सकाळी, संध्याकाळी एखादं भजन्/आवडतं गाणं ऐका. कुटुंबीयांबरोबर अधुन मधुन बाहेर फिरायला जा. वाचनाची आवड असेल तर कधी एकटेच ग्रंथायलात जाउन वाचन करा.
सर्वांनी भरपूर हसा, आनंदी रहा सुदृढ रहा :) हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
आपला,
मराठमोळा.
वाचने
15286
वाचनखूण
प्रतिक्रिया
45
आनंदी रहा.
छान.
In reply to छान. by परिकथेतील राजकुमार
>>हितोपदेशकांच्या गर्दीत
In reply to छान. by परिकथेतील राजकुमार
हाण्ण तेज्यायला.....
ऐकावे ते नवलच!
In reply to ऐकावे ते नवलच! by सर्वसाक्षी
>> गोड खाऊन मधुमेह होतो हे
उपयुक्त माहिती
In reply to उपयुक्त माहिती by अमितसांगली
>>हे विचार अन्यत्र प्रकाशित
चांगली माहिती
आयला, शरीरस्वास्थ्य हितोपदेशकाची >`तुझी एक बाटली
वा वा
चांगली कल्पना!
धन्यवाद ममो...!
In reply to धन्यवाद ममो...! by श्रीरंग_जोशी
>>फारच उपयुक्त माहिती
In reply to >>फारच उपयुक्त माहिती by मराठमोळा
खरच उपयुक्त आहे!
चांगला सल्ला. येत्या काही
In reply to चांगला सल्ला. येत्या काही by नाना चेंगट
कुछ भी हो सकता है..........कुछ भी
च्यायला!!!! हे आणी अशा
In reply to च्यायला!!!! हे आणी अशा by शैलेन्द्र
मानवी देह जगायसाठीच बनवलाय..
In reply to मानवी देह जगायसाठीच बनवलाय.. by मराठमोळा
जर्रा जोरात लिहील्याबद्दल
In reply to जर्रा जोरात लिहील्याबद्दल by शैलेन्द्र
जानकारी हि बचाव!!
In reply to च्यायला!!!! हे आणी अशा by शैलेन्द्र
शैलेंद्र,>शरिर तुम्हाला सगळ सांगत असत, तुम्ही फक्त ते ऐकल पाहीजे
In reply to च्यायला!!!! हे आणी अशा by शैलेन्द्र
अच्छा ???
In reply to च्यायला!!!! हे आणी अशा by शैलेन्द्र
सजीवांची शरीर ही
वैद्यकिय सल्ला. (फुकट)
In reply to वैद्यकिय सल्ला. (फुकट) by आनंदी गोपाळ
प्रतिसादक सल्ला - फुकट
In reply to प्रतिसादक सल्ला - फुकट by मराठमोळा
महोदय,माझी डिग्री
In reply to महोदय,माझी डिग्री by आनंदी गोपाळ
+१
In reply to महोदय,माझी डिग्री by आनंदी गोपाळ
>>माझी डिग्री सर्टीफिकिटे
In reply to >>माझी डिग्री सर्टीफिकिटे by मराठमोळा
म्हणजे तुम्ही फार फार मोठे
In reply to म्हणजे तुम्ही फार फार मोठे by आनंदी गोपाळ
तुम्ही मोठे डॉक्टर आहात हे
In reply to >>माझी डिग्री सर्टीफिकिटे by मराठमोळा
त्रासदायक वाक्य.
In reply to >>माझी डिग्री सर्टीफिकिटे by मराठमोळा
त्रासदायक वाक्य.
In reply to त्रासदायक वाक्य. by आनंदी गोपाळ
मूळ लेखात मी तपासण्यांची नावे
In reply to मूळ लेखात मी तपासण्यांची नावे by मराठमोळा
गंमत नाही हो.
In reply to प्रतिसादक सल्ला - फुकट by मराठमोळा
विनोदी वाटले.
In reply to विनोदी वाटले. by आनंदी गोपाळ
>>डॉक्टर उपचार करतो म्हणजे हे
In reply to >>डॉक्टर उपचार करतो म्हणजे हे by मराठमोळा
वरच उत्तर आहे.
सहा महिन्यांनी एकदा अन ते
In reply to सहा महिन्यांनी एकदा अन ते by शिल्पा ब
हे आमच्या डाक्टरनी आम्हाला सांगितलंय.
धाग्याचा उद्देश चांगला आहे.
आजकाल मोठमोठ्या लॅबचे ईमेल्स
धन्यवाद!
१० ऑक्टोबर
In reply to १० ऑक्टोबर by vcdatrange
भविष्यात सायकियाट्रिस्ट