✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

विठू सांगे...

प — प्राजु, Fri, 07/18/2008 - 20:05

प्रतिक्रिया द्या
15069 वाचन

💬 प्रतिसाद (49)

प्राजुताई,

इनोबा म्हणे
Fri, 07/18/2008 - 21:11 नवीन
अप्रतिम रचना... नामयाचा घास । घेऊनिया खास । जागवली आस । भक्तीयोगे । । घेऊनी वळण । दळितो दळण । करितो राखण । जनाईचे । । तुकोबाचा भार । घेई शिरावर । परि गुन्हेगार । आवलीचा । । काय त्या म्हणावं ? देव की मानव । कोणाला कळाव ? गारूड ते । । या ओळी तर खासच... कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments

+१

आनंदयात्री
Sun, 07/20/2008 - 03:10 नवीन
सुंदर अभंग तायडे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे

संत प्राजुबाई!

प्रमोद देव
Fri, 07/18/2008 - 21:03 नवीन
धन्य आहे तुझी! अतिशय प्रासादिक रचना! मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments

+१

धनंजय
Fri, 07/18/2008 - 23:19 नवीन
सुरेख प्रासादिक रचना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव

+१

प्रियाली
Sat, 07/19/2008 - 03:18 नवीन
मस्तच आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

नव्या युगातल्या ओव्या.

मुक्तसुनीत
Sat, 07/19/2008 - 00:28 नवीन
नव्या युगातल्या , नव्या जगातल्या ओव्या आवडल्या. भक्तियोगाचा धागा आजच्या जगण्याशी जोडण्याचा प्रयत्न वाटला. शब्दांमधे सहजपणा असूनही रचनेत निर्दोष वाटल्या हे विशेष.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव

सुरेखच

वरदा
Fri, 07/18/2008 - 21:07 नवीन
सगळ्याच ओव्या आवडल्या.... श्रद्धा अंधश्रद्धा । फरक तो करा । परी कास धरा । प्रयत्नांची । । हे सगळ्यात छान.... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
  • Log in or register to post comments

मस्त !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 07/18/2008 - 21:08 नवीन
काळा नि सावळा । प्रेमाचा पुतळा । मनाचा निर्मळा । पांडुरंग । । आणि प्राजू म्हणे ऐसे । विश्वाला जपावे । प्रयत्न करावे । ध्येयासाठी । । स्सही !!! प्राजुची अभंग रचना आवडली. अवांतर : वृत्त- मात्रावाले आल्यावर अभंगाचे वृत्त तपासले जाईल तो पर्यंत मार्क देत नाही. ;)
  • Log in or register to post comments

फारच

मदनबाण
Fri, 07/18/2008 - 21:33 नवीन
फारच सुंदर..... (जाता पंढरीसी सुख वाटे जिवा...) मदनबाण.....
  • Log in or register to post comments

सुंदर ते

विद्याधर३१
Fri, 07/18/2008 - 22:03 नवीन
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी | कर कटावरी ठेवोनीया| याचीच आठवण झाली. विद्याधर
  • Log in or register to post comments

एकदम अभंग !

संदीप चित्रे
Fri, 07/18/2008 - 22:04 नवीन
क्या बात है प्राजु ! काय त्या म्हणावं ? देव की मानव । कोणाला कळाव ? गारूड ते । । श्रद्धा अंधश्रद्धा । फरक तो करा । परी कास धरा । प्रयत्नांची । । हे तर खूपच आवडलं :) कुणी तरी ह्याला छान चाल द्यावी. -------------------------- www.atakmatak.blogspot.com
  • Log in or register to post comments

सह्ही...

शितल
Fri, 07/18/2008 - 22:12 नवीन
प्राजु, मस्तच सह्ही वाचना प्रत्येक शब्द अन शब्द भावला मनाला.:)
  • Log in or register to post comments

प्राजू,

यशोधरा
Fri, 07/18/2008 - 22:14 नवीन
प्राजू, तुला दंडवत गं बाई :) काय सुरेख लिहिले आहेस :)
  • Log in or register to post comments

खुप छान..

मनीषा
Fri, 07/18/2008 - 22:28 नवीन
श्रद्धा अंधश्रद्धा । फरक तो करा । परी कास धरा । प्रयत्नांची । । प्राजू म्हणे ऐसे । विश्वाला जपावे । प्रयत्न करावे । ध्येयासाठी । ।.... वा!!
  • Log in or register to post comments

वा!

केशवसुमार
Fri, 07/18/2008 - 22:34 नवीन
प्राजूताई, अतिशय उत्तम रचना.. आवडली (वारकरी)केशवसुमार स्वगतः अता ह्याचे विडंबन करणे आले.. :B काय काय पाप घडवणार आहे हा पांडुरंग त्यालाच माहित :W
  • Log in or register to post comments

आपल्याला याचे विडंबन करावे वाटले...

प्राजु
Fri, 07/18/2008 - 22:37 नवीन
यातच आपली प्रतिक्रिया मिळाली.. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार

पाप की दुनिया | आवलीचा गुन्हेगार

बेसनलाडू
Fri, 07/18/2008 - 23:07 नवीन
तू सनी देओल तर मी चंकी पांडे :) 'पाप की दुनिया' होणार इकडे ;) (पापी)बेसनलाडू प्राजुताई, अभंगवाणी पर्फेक्ट अभंगवाणीच झालीये.साचा,रचना,गेयता ... सगळं सांभाळलंय. तुका घेई डोक्यावरी पण आवलीचा गुन्हेगार ही कल्पना फार आवडली. स्त्री मुक्तीवादी चळवळीच्या एखाद्या कार्यकर्तीने लिहिल्यासारखी :) (ह. घ्या.) (गुन्हेगार)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार

वाचता वाचता ..

चकली
Fri, 07/18/2008 - 22:44 नवीन
वाचता वाचता पटकन स्वतःशी अभंगासारखी म्हणून पाहिली. छान! चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments

उत्तम रचना

सहज
Fri, 07/18/2008 - 23:10 नवीन
छानच लिहले आहे. आवडले.
  • Log in or register to post comments

सुरेख

नंदन
Fri, 07/18/2008 - 23:15 नवीन
अभंग आवडले. तुकोबाचा भार । घेई शिरावर । परि गुन्हेगार । आवलीचा । । काय त्या म्हणावं ? देव की मानव । कोणाला कळाव ? गारूड ते । । -- या अभंगांवरून 'तुकयाची आवली' कादंबरी आठवली :) शेवटचा प्रयत्नवादाचा संदेशही खासच.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

पूर्ण १० गुण

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Sat, 07/19/2008 - 00:22 नवीन
अत्यंत सुंदर ओव्या. छान ! (तुमच्या घरी "जाते" आहे का ? त्यावर दळताना अशा सुंदर ओव्या होतात असे ऐकले आहे. ह्या मिक्सर-ग्राइण्डर च्या ओव्या नव्हेत, एवढे नक्की.) - (भाविक) सर्किट
  • Log in or register to post comments

केवळ सुरेख...!

विसोबा खेचर
Sat, 07/19/2008 - 00:32 नवीन
संपूर्ण अभंगच सुरेख व अत्यंत गेय...! आषाढाचा मास, दर्शनाची आस होती तुझे भास, पांडुरंगा! या पहिल्याच ओळी वाचल्या आणि लगेच याची 'पिलू' रागावर अधारीत चाल मला सुचली! आता याहून अधिक कोणता प्रतिसद देऊ? :) प्राजू, आत्ताच खास फोन करून मी तुला ही चाल ऐकवली. आवडली का ते सांग हो! :) आपला, (बाबूजींचा शिष्य) तात्या.
  • Log in or register to post comments

हो तात्या..

प्राजु
Sat, 07/19/2008 - 00:41 नवीन
तुम्ही लावलेली चाल अतिशय सुंदर आहे. तुम्ही मला ताबडतोब फोन करून चाल ऐकवलीत... यापेक्षा चांगली प्रतिक्रिया काय असेल आणखी.. ?? खूप खूप धन्यवाद. आपल्या सगळ्यांची मनापासून आभारी आहे.. सर्किटशेठ, मार्कांबद्दल धन्यवाद. माझ्याकडे जाते नाही हो :( - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

केशवसुमारांवर कडी!

आपला अभिजित
Sat, 07/19/2008 - 01:15 नवीन
आषाढाचा मास। दर्शनाची आस।। होती तुझे भास। वरुणराजा।। आठवावे नेत्री। भिजलेल्या गात्री चिंब ओल्या रात्री।। रूप तुझे।। भरल्या ताटावरी। उठोनि सत्वरी खरकट्यावरी। जेवोनिया।। मुठेच्या तीरी। होई तिरीमिरी।। कधी येणार तू तरी। पाऊसराया।। सप्तरंगांचा सोहळा। इंद्रधनुचा लळा।। याचि देही याचि डोळा। का न अनुभवणे।। कांदाभज्यांचा वास। वा मिसळ सुग्रास।। संपणार कधी आस। तुझ्या शिंपण्याने।। हळुवार पुळण। कधी रानाचे गान।। कधी रूप भीषण। दाव तरी तुझे।। चातकाची हार। पापाचा साक्षीदार।। होऊ नको गुन्हेगार। समस्तांचा।। काय तुला म्हणावं? देव की दानव। घे भूवरी धाव। सर्व सोडुनी।। श्रद्धेचा महापूर। प्रार्थनांचा कहर।। भावनांचा बहर। त्याचसाठी।। प्रयत्नांच्या अंती। ध्येयाची होईल पूर्ती। कोसळेल अंती। बदाबदा तो।। जाणा हेचि कर्म। पावसाचे मर्म। गाळुनिया घर्म। झाडे लावा।। अभिजित म्हणे ऐसे। निसर्गास जपावे। चुलीत न घालावे। नियम सारे।। -----------------------
  • Log in or register to post comments

जाणा हेचि

प्राजु
Sat, 07/19/2008 - 01:19 नवीन
जाणा हेचि कर्म। पावसाचे मर्म। गाळुनिया घर्म। झाडे लावा।। हे मस्त. पण अभंग किंवा ओवी लिहिताना ६ -६-६-४ हे बंधन पाळावे लागते . काही ठिकाणी हे नाही झाले.. एकूण कवितेतला भाव सुंदर आहे.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आपला अभिजित

बोंबला!

आपला अभिजित
Sat, 07/19/2008 - 01:25 नवीन
अहो, हापिसातली खर्डेघाशी झाल्यानंतर रात्री एक वाजता आमच्या प्रतिभेने भांगडा करावा, अशी तुमची अपेक्षा आहे काय? काहीतरी खरडले, झाले! चुभूद्याघ्या.
  • Log in or register to post comments

चातकाची

मदनबाण
Sat, 07/19/2008 - 01:27 नवीन
चातकाची हार। पापाचा साक्षीदार।। होऊ नको गुन्हेगार। समस्तांचा।। हे फारच आवडले.. मदनबाण.....
  • Log in or register to post comments

असो.

आपला अभिजित
Sat, 07/19/2008 - 01:31 नवीन
बायकोच्या पहिल्या डोहाळजेवणाच्या वेळीही असेच एक भोचक काव्य प्रसवले होते. ते उद्या टाकीन.
  • Log in or register to post comments

सुंदर

सुचेल तसं
Sat, 07/19/2008 - 08:16 नवीन
सर्व ओव्यांमधे यमक छान जुळले आहे. कुठेही यमक जुळवण्यासाठी मुद्दाम खटाटोप केला आहे असं वाटत नाही. माझं मुळ गाव पंढरपूर असल्याने मला फारच आवडला हा अभंग. वाचताना विठोबाची प्रसन्न मुर्ती डोळ्यांसमोर उभी राहिली. http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments

धन्यवाद..

प्राजु
Sat, 07/19/2008 - 09:12 नवीन
आपणा सर्वांचे मनापासून धन्यवाद... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

फारच छान

विकास
Sat, 07/19/2008 - 09:47 नवीन
एकदम आवडली! आणि तितकीच केशवसुमारांचीपण!
  • Log in or register to post comments

बेष्ट!

ऋषिकेश
Sat, 07/19/2008 - 10:10 नवीन
कविता चिक्कार आवडली एकदम बेष्ट! अजून येऊ दे -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

प्राजु..

स्वाती दिनेश
Sat, 07/19/2008 - 12:08 नवीन
सुरेख रचना! श्रद्धा अंधश्रद्धा । फरक तो करा । परी कास धरा । प्रयत्नांची । । आणि प्राजू म्हणे ऐसे । विश्वाला जपावे । प्रयत्न करावे । ध्येयासाठी । । हे विशेष आवडले. स्वाती
  • Log in or register to post comments

मस्त

सुवर्णमयी
Sat, 07/19/2008 - 18:02 नवीन
मस्त! अशाप्रकारची तुझी मी वाचलेली पहिली रचना. मस्त. आवडली
  • Log in or register to post comments

HI

ANIRUDDHA JOSHI
Sat, 07/19/2008 - 18:06 नवीन
PRAJUTAI NAMSKAR, TUMACHI HA ABHANG FARCH CHAN AAHE, KHUP CHAN LIHITA TUMHI KEEP IT UP. ANIRUDDHA KOLHAPUR.
  • Log in or register to post comments

कल्लोळ, कल्लोळ काव्याचा कल्लोळ!

चतुरंग
Sat, 07/19/2008 - 18:27 नवीन
प्राजू, सुरेख, अर्थपूर्ण, प्रासादिक ओव्या! तुक्याची-आवलीची ओवी विशेष भावली, फारच छान! (स्वगत - प्राजूसारखी 'आवली' असेल तर 'जगदीशा'चा तुका झाला ह्यात काय नवल! (ह.घे.) ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments

विकास,

प्राजु
Sat, 07/19/2008 - 19:29 नवीन
विकास, हृषिकेश, सुचेलतसं, अनिरूद्ध, सुवर्णमयी, स्वाती आणि चतुरंग.. आपले सर्वांना मनापासून धन्यवाद.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

सुंदर

चित्रा
Sun, 07/20/2008 - 06:11 नवीन
छान लिहीले आहेस प्राजू, खूपच आवडले.
  • Log in or register to post comments

अप्रतिम

धोंडोपंत
Sun, 07/20/2008 - 06:37 नवीन
अप्रतिम, सुंदर, प्रासादिक, छंदबध्द, अर्थपूर्ण रचना..... एकदम रिफाईन्ड पोएट्री. क्या बात है! खासच. पुढील लेखनासाठी शुभेच्छा. आपला, (हरिभक्त) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments

सुरेख गाताहेत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 08/03/2008 - 15:56 नवीन
प्राजु मॅम आणि मिपा दोस्त हो, वरील अभंग सुरेख गाताहेत प्रमोद देव, इथे जरुर ऐका !!!
  • Log in or register to post comments

वाह!

सहज
Sun, 08/03/2008 - 17:16 नवीन
सुंदर चाल. कुठलेही वाद्य /पार्श्वसंगीत नसताना गुंतवुन ठेवणारी चाल. सोप्पे काम नाही. प्राजू व प्रमोदकाका, सह्ही!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

असेच

ऋषिकेश
Sun, 08/03/2008 - 18:31 नवीन
असेच म्हणतो सुंदर चाल, ऐकून मनाला शांत वाटलं.. प्रमोदकाका व प्राजू अभिनंदन! -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

वा वा प्रमोदकाका आणि प्राजू!

चतुरंग
Sun, 08/03/2008 - 21:55 नवीन
'प्राजू'चे अभंग । 'प्रमोदा'चे संग। सर्व होती दंग । मिपाकर || चाल हीच खास | काही ना साथीस| सुरातच खास | सर्व ओळी || (स्वगत - प्रा.डॉ. दुवा देण्याची अशी काही सुरेल कामेही करतात तर! (ह.घ्या.);) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माझा

पंचम
Sun, 08/03/2008 - 16:15 नवीन
माझा पांडुरंग । ओठाओठावरी फुले । सद्गुणांची सुमने । चरणावरी । । प्राजुचा अभंग । जणू गाभा-यातील नादब्रह्म । घुमतो अखंड । पंढरीत । । अभंग आवडला । -पंचम
  • Log in or register to post comments

वा..

प्राजु
Sun, 08/03/2008 - 18:46 नवीन
प्रमोदकाका, ह्याला चाल लावू माझ्या अभंगाला तुम्ही एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे... धन्यवाद. बिरूटे सर, आपलेही धन्यवाद. प्रमोदकाकांची चाल इथे दिल्याबद्दल. सर्व वाचकांचे आणि रसिकांचे मनापासून आभार. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

सुंदर

श्रीकृष्ण सामंत
Sun, 08/03/2008 - 20:30 नवीन
प्राजूजी, खूप सुंदर अभंग आहे. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments

प्राजूजी,

प्राजु
Sun, 08/03/2008 - 20:43 नवीन
प्राजूजी, प्राजूजी.............. झालं.. मेलीस प्राजु आता तू. सामंत काका, मला "जी' लावू नको हो.. तसंही मी कोणापुढे जी जी नाही करत :) प्राजु च म्हणा.. खूप सुंदर अभंग आहे. धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीकृष्ण सामंत

मस्त

मनस्वी
Mon, 08/04/2008 - 10:15 नवीन
अप्रतिम रचना. खूपच आवडली. मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments

अतिशय सुरेख!

राघव
Fri, 03/13/2009 - 11:09 नवीन
आता याहून म्या पामर काय बोलणार? संपूर्ण अभिव्यक्ती आहे ही.. आमची बुद्धी त्यापुढे तोकडीच. :) खूप आवडली अभंगवाणी! राघव
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा