मित्र हो खुप दिवसांनी तुम्हा सगळ्यांना परत भेटतांना खुप आनंद होतोय :-)
आजच्या शुभमुहुर्तावर म्यान केलेला केमेरा परत बाहेर काढला आणि श्रीगणेशाला सुरुवात केली
घरच्या गणरायाच्या ह्या काही भाव मुद्रा
१.
२.
३.
४.
५.
६.
७.
८.
९.
आपणा सर्वांवर त्या विघ्नहर्त्याची क्रुपाद्रुष्टी व वरदहस्त सदैव राहो हीच त्यास प्रार्थना.
१०.
११.
केमेरा निकॉन डी९०
लेन्स निकॉन १०५
प्रतिक्रिया
1 Sep 2011 - 11:18 pm | प्रभो
वेलकम ब्याक दाद्या...
2 Sep 2011 - 12:52 am | सोत्रि
फोटो क्र. १० अतिशय सुंदर.
- (गण) सोकाजी
3 Sep 2011 - 10:09 pm | पल्लवी
आणि ११वा सुद्धा.आशीर्वादाचा हात ! :)
सुंदरच !
2 Sep 2011 - 12:59 am | पाषाणभेद
रेखीव डोळ्यांमुळे मुर्ती जिवंत वाटते
2 Sep 2011 - 1:19 am | गणपा
सुरेख.
कॅमेरे बर्याच जणांकडे असतात पण तुझ्या बोटांत कला आहे.
वेल्कम बॅक भावड्या. :)
2 Sep 2011 - 9:30 am | किसन शिंदे
हेच म्हणतो.
बाप्पा एकच, पण त्याचे वेगवेगळ्या अँगलने काढलेले फोटो अप्रतिम आहेत.
3 Sep 2011 - 8:29 am | निवेदिता-ताई
:)
2 Sep 2011 - 1:39 am | सुहास झेले
वाह.. सुंदर बाप्पा !!
क्र.१० खूप आवडला, डोळे एकदम जिवंत वाटत आहेत ... __/\__
2 Sep 2011 - 2:17 am | पक्या
मस्त हो भाऊ.
फोटो क्र. ४ मधे बाप्पा स्माईल देत आहेत असे वाटतयं . छान आला आहे तो फोटो,
फोटो क्र. ८ पण खूप आवडला.
2 Sep 2011 - 2:24 am | चतुरंग
कर्पूरारतीचा फोटू भन्नाट आलाय!
बाप्पाची मूर्ती फारच सुंदर आहे, डोळे कमालीचे रेखीव आहेत आणि चेहेरा सात्विक आहे.
(बाप्पाप्रमी) रंगाप्पा
2 Sep 2011 - 6:43 am | स्पंदना
आलात परत? बर झाल, आता स्माय्लई अन फोटोंची मेजवाणी.
किती सुरेख रंगवलाय्(रेखलाय) गणेश! अप्रतिम , त्या रेखणार्या कलाकाराला माझा सलाम सांगा.
अर्थात हे सार पोहोचल तुमच्या मुळे तेंव्हा तुमच्या कॅमेर्याला ही सलाम.
2 Sep 2011 - 8:49 am | मदनबाण
छानच... :)
2 Sep 2011 - 5:52 pm | अभिजीत राजवाडे
मस्तच. बाप्पांचे डोळे खुपच बोलके आहेत.
2 Sep 2011 - 10:44 pm | रमताराम
आपल्याला फटू क्र. १ नि ६ आवल्डा.
2 Sep 2011 - 10:58 pm | स्मिता.
एकाच बाप्पाचे वेगवेगळ्या अँगल्सने काढलेले फोटो आवडले.
2 Sep 2011 - 11:19 pm | जाई.
फोटो छान आलेत
3 Sep 2011 - 9:00 am | सूड
बाप्पाचे डोळे सुंदर आहेत.
3 Sep 2011 - 10:01 am | अर्धवट
दंडवत देवा,,