शिल्लकेला जीव जर का आणखी
शिल्लकेला जीव जर का आणखी
- - - - -
शिल्लकेला जीव जर का आणखी
ढंग जगण्याचा ठरवला आणखी
-
उष्णता नरकामध्ये ती काय-शी
जाळ दुखर्या अंतरीचा आणखी
-
रागरुसवे खूप त्यांचे पाहिले
आज त्यावर कळस झाला आणखी
-
का निरोप्या पत्र देता निरखतो?
तोंडचा संदेश का बा आणखी?
-
जीवघेण्या ग्रहदशा कित्येकशा
कोसळे आकाश तेव्हा आणखी
-
शायरावर गुदरल्या सार्या बला
एक मृत्यू राहिलेला आणखी
- - - - -
(ग़ालिबाच्या ज्या गझलेचा हा सैलसर अनुवाद आहे, ती खाली दिलेली आहे.)
-
कोई दिन गर ज़िंदगानी और है
अपनें जी में हमने ठानी और है
-
आतश-ए-दोज़ख में, यह गर्मी कहाँ
सोज़-ए-ग़महा-ए-निहानी और है
-
बारहा देखी हैं उनकी रंजिशें
पर कुछ अबके सरगिरानी और है
-
दे के ख़त, मुँह देखता है नामःबर
कुछ तो पैग़ाम-ए-ज़बानी और है
-
क़ाते-ए-आमार, हैं अक्सर नुजूम
वह बला-ए-आसमानी और है
-
हो चुकीं 'ग़ालिब' बलाएँ सब तमाम
एक मर्ग-ए-नागहानी और है
- - - - -
काही शब्दार्थ :
आतश-ए-दोज़ख - नरकाचा अग्नी
सोज़-ए-ग़महा-ए-निहानी - आंतरिक दु:खाची आग
बारहा - बहुधा
सरगिरानी - अतिशय क्रोध
नामःबर - पत्रवाहक
क़ाते-ए-आमार - आयुष्य कातरणारे
नुजूम - तारे/नक्षत्रे
मर्ग-ए-नागहानी - शेवटी (एकदाचा) मृत्यू
ग़ालिब...
जाळे
अनुवाद आवडला
ह्म्म
बापरे!!
भावार्थ
अपेक्षाभंग ! :(
छान
बरीच ओढाताण झालेली आहे.
अनुवाद वाचून काही समजले
हम्म
"उष्णता", निरोप्या, "शिल्लकेला"
"शिल्लकेला" = शिलकीत असे आहे ना ?