✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

शहरांची तुलना

म
मराठमोळा यांनी
Wed, 04/06/2011 - 22:59  ·  लेख
लेख
नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, माझ्या चेन्नई धाग्यावर काही प्रतिसदांमधे प्रवासी भाडे किंवा ईतर खर्च यासंबंधात पुणे व ईतर शहरांची तुलना केली आहे. तो धागा चर्चेसाठी नसून विरंगुळा या सदरात असल्याने तिथे प्रतिसाद न देता हा नविन धागा सुरु करत आहे. गेल्या काही वर्षात बरंच फिराफिर झाली.. मुंबई, बेंगलोर, हैदराबाद, चेन्नई. पुणे तर घरच. प्रत्येक ठिकाणी गप्पा मारताना हा विषय निघतोच. तुम्हालाही हा अनुभव आलाच असेल. प्रत्येक जण स्वतःचे शहर किती चांगले आहे हे पटवण्याचा प्रयत्न करतो आणि मग शहरांची तुलना सुरु होते. कित्येकदा ही तुलना मनात ठेवुनच त्या शहरामधे जाण्याचा योग जरी आला तरी मग दृष्टीकोन संकुचितच राहतो किंवा तुसडेपणा केला जातो. अर्थात हे सर्व बर्‍याचदा ईतर गोष्टींचे फ्रस्टेशन काढण्याचे प्रकार जरी असले तरी खरच ही तुलना योग्य आहे का? पुणे हे सर्वांचे हल्ला करण्यासाठी आवडते शहर आहे. पुणे म्हंटल तरी जळजळ सुरु होते काहींना. पुण्याचे उदाहरण घेण्याचे कारण मी पुणेकर आहे हे नसुन वेगळे आहे. बंगलुरु, मुंबई, हैदराबाद, चेन्नई, दिल्ली, कोलकाता आणि पुणे या शहरामधे पुणे ऑड सिटी आउट आहे.. कशी? तर पुणे हे शहर कोणत्याही राज्याची राजधानी नाही. आर्थिक गणित बघितले तर सर्वात जास्त बजेट हे नेहमी राजधान्यांना दिले जाते, ईतर शहरांना त्या मानाने काहीच पैसा मिळत नाही विकासासाठी, मग अशा शहरांना लोकांकडून पैसा जमा करावा लागतो विकास साधण्यासाठी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही सर्वात श्रीमंत होती कधी काळी कारण कारखान्यांवर जबरदस्त लादलेला कर. त्यामुळे बर्‍याच कंपन्या पुण्याबाहेर गेल्या हे नुकसान..परंतु पिंपरी चिंचवडचा विकास पाहण्याजोगा आहे आज. राजधान्यांमधे पब्लीक ट्रान्स्पोर्ट साठी सरकारी सपोर्ट असतो. मग चेन्नई असो वा बंगलोर. मग चेन्नै मधे सहाजिकच तिकेट ७ रुपये असेल ते पुण्यात १५-१८ रुपये असणार. या सर्वाला जबाबदार सरकारी धोरणे आहेत असे मला वाटते. महाराष्ट्र राज्य सोडले तर किती राज्यांनी राजधानी सोडून ईतर शहरांच्या विकासाकडे लक्ष दिले आहे? कर्नाटकात बंगलुरु सोडुन ईतर कोणत्या शहराचे तुम्ही नाव घ्याल? किंवा तामिळनाडु मधे चेन्नै शिवाय एक शहर? पुणे हे अशा ईतर शहरांसाठी उदाहरण आहे कारण ते स्वत:च स्वतःच्या पायावर उभे राहिले आहे. मला बर्‍याचदा पुण्याची तुलना मुंबई किंवा बंगलुरु शी करणारे लोकं भेटले की मी हेच उत्तर देतो. महाराष्ट्र हे एकच राज्य अहे जिथे कित्येक शहरे विकास साधत आहेत उदा. नागपूर, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर.. गुजरात काही दिवसात मागे टाकेल अशी शंका आहे म्हणा.. ;) जाणकारांनी आणखीन प्रकाश टाकावा ही विनंती.. :) एवढे बोलुन मी माझे दोन शब्द संपवतो.. जय हिंद जय महाराष्ट्र!!!! आपला मराठमोळा
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
16150 वाचन

💬 प्रतिसाद (76)

प्रतिक्रिया

जय पुणे!

यशोधरा
Wed, 04/06/2011 - 23:08 नवीन
जय पुणे! :)
  • Log in or register to post comments

+१२

टारझन
गुरुवार, 04/07/2011 - 10:52 नवीन
मला ही पुण्याचा अभिमाण आहे . अरे गर्व हय हमे के हम पुणे मे पले - बढे .. मरेंगे भी यैच्च ! ( त्या आधी बाकी सगळी कडे फिरुन येऊ ) :) बाकी काथ्याकुटाचा मायना कसा असावा ह्याचे उत्तम उदाहरण मराठमोळा काकांनी सुरेख पद्धतीने दाखवुन दिले आहे. ह्याला लिडिंग फ्रॉम द फ्रंट असे ही म्हणतात . अवांतर : आपल्याला हैदराबाद बी लै आवडतं :) हलिम सारखा एक्स्क्लुझिव पदार्थ खावा तो हैदराबादेत :० आहाहा .. नुसत्या आठवणींनी भुक खवळली . -(शन्वारवाडा प्रेमी) टारोबा पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

लय भारी.

पांथस्थ
Wed, 04/06/2011 - 23:17 नवीन
शासकिय कामाची विशेष माहिती नाही तरीपण सहमत. जय पुणे, जय महाराष्ट्र, जय हिंद!
  • Log in or register to post comments

जागा रारून ठेवतो.

चिंतामणी
गुरुवार, 04/07/2011 - 07:47 नवीन
आणि आगाउ (Advance) शुभेच्छा. Image removed.Image removed.From Drop Box" alt="" /> हे सोबतीला आहेच.
  • Log in or register to post comments

नेहमीप्रमाणे ..

टारझन
गुरुवार, 04/07/2011 - 10:55 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

नेहमी प्रमाणे

गेंडा
गुरुवार, 04/07/2011 - 16:02 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

हे जास्त योग्य वाटतय ;)

गणपा
गुरुवार, 04/07/2011 - 16:18 नवीन
Image removed. हे जास्त योग्य वाटतय. ;) पळा पळा येतोय आता टारु. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गेंडा

गड्या शेवटी आपला गाव बरा

विनायक बेलापुरे
गुरुवार, 04/07/2011 - 00:34 नवीन
गड्या शेवटी आपला गाव बरा
  • Log in or register to post comments

विकास

चिरोटा
गुरुवार, 04/07/2011 - 07:28 नवीन
महाराष्ट्र राज्य सोडले तर किती राज्यांनी राजधानी सोडून ईतर शहरांच्या विकासाकडे लक्ष दिले आहे?
स्थानिक लोकांना न जुमानता बेसुमार प्रमाणात केलेले शहरीकरण म्हणजे विकास अशी व्याख्या असेल तर सहमत! असो. पुण्याच्या विकासाचे मूळ कारण ब्रिटिशांनी घडवलेल्या पूनामध्ये आहे. मुंबईला जवळ्,दक्षिणेकडे जाण्यासाठी मुख्य रेल्वे जंक्शन आणि शैक्षणिक संस्था ही विकासाची मूळ कारणे आहेत.(५०/६० च्या दशकात झालेल्या औद्योगिकीकरणाचा वाटा आहेच) ह्या 'विकासा'बरोबर जीवनाचा दर्जा(quality of life) सुधारला का हा महत्वाचा प्रश्न आहे. २५ वर्षापूर्वींचे पुणे आणि सध्याचे ह्यात किती फरक जाणवतो? पुण्यात फुटपाथ किती ठिकाणी आहेत? ज्यावरुन विनाअडथळा चालता येईल? झोपडपट्ट्या, फुटपाथांची/झाडांची कमी होणारी संख्या,शहरात प्रवासासाठी लागणारा वेळ्,नाक्यानाक्यावर बनलेले 'कॉम्प्लेक्स्/पॅलेस' ह्याला विकास म्हणता येईल का? भारतातल्या अनेक मोठ्या शहरांचा 'विकास' साधारण ह्याच दिशेने चालु आहे . ईतर राज्यांत 'दुसरे पुणे' तयार झाले नाही कारण तशी गरज निर्माण झाली नाही.
  • Log in or register to post comments

चिरोटा शेट, धाग्याच्या मूळ

मराठमोळा
गुरुवार, 04/07/2011 - 10:07 नवीन
चिरोटा शेट, धाग्याच्या मूळ विषयापासून भटकता आहात. >>पुण्याच्या विकासाचे मूळ कारण ब्रिटिशांनी घडवलेल्या पूनामध्ये आहे. तसे असेल तर ब्रिटिशांनी फक्त पुण्यात सोयी उपलब्ध केल्या नव्हत्या.. ईतरही शहरे आहेत.. कोलकाताचं काय? त्याच मुंबई का नाही झालं आजपर्यंत? >>ह्या 'विकासा'बरोबर जीवनाचा दर्जा(quality of life) सुधारला का हा महत्वाचा प्रश्न आहे. २५ वर्षापूर्वींचे पुणे आणि सध्याचे ह्यात किती फरक जाणवतो? पुण्यात फुटपाथ किती ठिकाणी आहेत? ज्यावरुन विनाअडथळा चालता येईल? झोपडपट्ट्या, फुटपाथांची/झाडांची कमी होणारी संख्या,शहरात प्रवासासाठी लागणारा वेळ्,नाक्यानाक्यावर बनलेले 'कॉम्प्लेक्स्/पॅलेस' ह्याला विकास म्हणता येईल का? हे प्रश्न मुळात इथे गैरलागु आहेत.. ह्या प्रश्नांसाठी वेगळा धागा काढावा.. तिथे विकास म्हणजे काय आयुष्याचा दर्जा सुधारला आहे की नाही याचा विचार करुयात.. कारण हे सर्व प्रश्न फक्त पुण्याला लागु होत नसून पुर्ण देशाला लागु होतात. विनाअडथळा फुटपाथ पुण्यात ईतर सर्व शहरांच्या मानाने तुलनीयच आहेत.. >>२५ वर्षापूर्वींचे पुणे आणि सध्याचे ह्यात किती फरक जाणवतो ह्या प्रश्नाचे उत्तर मी न दिलेलेच चांगले. तुम्हाला २५ वर्षापुर्वीच्या आणि सद्ध्याच्या पुण्यात विकासाच्या दृष्टीने फरक जाणवत नसेल तर काही न बोललेलेच चांगले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

मला वाटत, पुण्याच्या

नन्दादीप
गुरुवार, 04/07/2011 - 11:01 नवीन
मला वाटत, पुण्याच्या विकासामागे मराठी राजसत्तेचा (शिवाजी महाराज, पेशवे) मोठा हात आहे. शिवाजी महाराजांनी पुण्यात सोन्याच्या फाळाचा नांगर वापरून शेती केली आणि पुण्याच्या विकासाला सुरुवात झाली. पेशवे (पर्यायाने नाना) यांनी तर पुण्याला ऐश्वर्य प्राप्त करून दिले. पाणि-पुरवठा योजना, बाजारपेठ विकास हे सर्व पेशव्यांच्या काळात झाले. मला वाटते पुणे ही पेशव्यांची राजधानीच होती..... आणि म्हणूनच पुण्याचा आज इतका विकास दिसत आहे. अर्थात म.न.पा. ने केलेले प्रयत्न ही प्रशंसनीयच आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा

खुप उत्तम विवेचन ममो. पण मला

मृत्युन्जय
गुरुवार, 04/07/2011 - 10:26 नवीन
खुप उत्तम विवेचन ममो. पण मला वाटते हे विवेचन पुण्याने कशी प्रगती साध्य केली याऐवजी पुणे इतर मोठ्या शहरांएवढी प्रगती का साध्य नाही करु शकले यासाठी जास्त उपयोगी पडेल. पुण्यात प्रगती झालेली आहे पण जेवढी आणि जशी व्हायला पाहिजे आहे तशी झालेली आहे की नाही हा मुख्य प्रश्न आहे. प्रगती आणि संस्कृतीचा मेळ देखील पुण्याला घालता आलेला आहे असे वाटत नाही. पुणेकर, त्यांचा उर्मटपण, फटकळपणा, कुजकटपणा या सर्वांबद्दल कडकड करणार्‍या परप्रांतियांना आम्ही फाट्यावरच मारतो. पण त्यावेळेस हेही मान्य करायला हवे की पुणे सध्यातरी नक्की कुठल्या प्रवाहात सामील व्हावे या डायलेमा मध्ये आहे. प्रगती तर हवी पण काँक्रीटीकरण तर नको आहे. व्यवसायवृद्धी तर हवी आहे पण परप्रांतीयांचे लोंढे तर नको आहेत. या सर्वांचा समतोल साधणे अवघड होते किंवा आहे असे वाटत तरी नाही. पण त्या दृष्टीकोनातुन प्रयत्नच केले गेलेले नाही आहेत.
  • Log in or register to post comments

+१

गवि
गुरुवार, 04/07/2011 - 16:10 नवीन
+१.. सही बोललास..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

अत्यंत नावडते.

साती
गुरुवार, 04/07/2011 - 16:28 नवीन
घ्या,पूणे माझेही अत्यंत नावडते शहर आहे. भारतात खरं तर शहर म्हणण्यासारखं एकच शहर आहे ते म्हणजे मुंबई. बाकी सगळी आडवी तिडवी वाढलेली खेडीच हो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

अत्यंत स्फोटक प्रतिसाद..

गवि
गुरुवार, 04/07/2011 - 17:13 नवीन
अत्यंत स्फोटक प्रतिसाद.. पुणेकरांना जाज्वल्य अभिमान असतो (इति श्री. पुलदे) हे विसरलात ताई.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

साती शहरी लोक त्याच शहरांना

यशोधरा
गुरुवार, 04/07/2011 - 17:23 नवीन
साती :) शहरी लोक त्याच शहरांना कंटाळून खेड्यांत जातात हो.. :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

मुंबई

मराठी_माणूस
गुरुवार, 04/07/2011 - 17:29 नवीन
महाराष्ट्र सरकारचे लाडावलेले बाळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

+११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११

पिवळा डांबिस
Fri, 04/08/2011 - 11:13 नवीन
भारतात खरं तर शहर म्हणण्यासारखं एकच शहर आहे ते म्हणजे मुंबई. शाबास!!! मुंबय ती मुंबयच!!!! बाकीचे वगीच टणाटण उड्या मारतात!!! जणू बेडकीच्या पिल्लाने बैल पाहिला!!!!!!!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

उगाचच..

मराठमोळा
Fri, 04/08/2011 - 11:30 नवीन
हाहाहाहा.... खुप हसू आलं पिडांचा हा प्रतिसाद वाचून.. :) मुंबई जर एवढं आवडत असतं तर ही "मुंबईप्रेमी लोकं" हामेरिकेत का हो गेली? आणि तिथलीच झाली? मुंबैत पाहिजे तसं राहणीमान आणि पैसा मिळाला नाही म्हणूनच ना? त्यांना म्हणावं या परत करा इथे सेवा.. ;) असो, हा चर्चाप्रस्ताव कोणते शहर चांगले किंवा वाईट आहे हे ठरवण्यासाठी नाही हे पुन्हा एकदा नमूद करु ईच्छितो. ह्या धाग्यात कुठेही पुणे चांगले किंवा तत्सम आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला गेलेला नाही. बाकी मुद्दाम चर्चेला फाटे फोडले जातात हे पाहुन आनंद झाला. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

ममोशी सहमत होण्याचा मोह आवरत

llपुण्याचे पेशवेll
Fri, 04/08/2011 - 11:32 नवीन
ममोशी सहमत होण्याचा मोह आवरत नाहीये. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा

मनोरंजक प्रतिसाद

पिवळा डांबिस
Fri, 04/08/2011 - 11:53 नवीन
मुंबई जर एवढं आवडत असतं तर ही "मुंबईप्रेमी लोकं" हामेरिकेत का हो गेली? आणि तिथलीच झाली? मुंबैत पाहिजे तसं राहणीमान आणि पैसा मिळाला नाही म्हणूनच ना? असं म्हणतां? अमेरिकेत आलेली सगळी मराठी माणसं मुंबैकरच आहेत काय? मग इतर शहरातली लोकं अमेरिकेत का हो आली? आणिक का इथेच स्थायिक झाली? :) त्यांना म्हणावं या परत करा इथे सेवा.. सेवा करायचा इथं काय संबंध? सगळी स्थानिक लोकं तिथे कुठं अशी काय मोठी सेवाच करतांयत? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा

पुन्हा गल्लत होते आहे.. इथे

मराठमोळा
Fri, 04/08/2011 - 11:58 नवीन
पुन्हा गल्लत होते आहे.. इथे मुंबई किंवा पुणे चांगले की वाईट हा वाद मुळातच नव्हता.. एका अवांतर प्रतिसादामुळे हे घडलं असाव.. बाकी प्रश्न मुंबईचा.. तर मुंबई मला देखील आवडते.. मी तिथे राहिलो आहे.. पुन्हा एकदा तेच सांगतो.. कोणते शहर चांगले किंवा वाईट आहे हे ठरवणे हा वैयक्तीक प्रश्न आहे.. शहरांचा विकास आणि प्रगती या विषयामधे काही भर घालू शकलात तर छानच.. :) नाही का.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

हं!

पिवळा डांबिस
Fri, 04/08/2011 - 12:35 नवीन
माझ्या प्रतिसादात तर पुण्याचा उल्लेखही नव्हता.... आता महाराष्ट्रातल्या सर्व शहरांत मुंबई थोर असं म्हटलं तर ते इतकं सत्य आहे की कुणाही नि:पक्षपाती (मराठीत: ऑब्जेक्टीव्ह) माणसाला त्यात काही गैर वाटू नये!! तरीही आम्ही मुंबई थोर म्हटल्यानंतर तुम्ही अगदी अमेरिकेपर्यंत पोचलांत!!!!! हा वैयक्तिक हल्ला होता आणि म्हणूनच आम्ही त्याला उत्तर दिलं..... मला पुणं ही आवडतं, विशेषतः पुणे कॅम्प, औंध हा भाग, आता नव्यानेच झालेला आळंदी रोड.... पुणे जुना भाग मला आवडत नाही तसाच भायखळा, अ‍ॅन्टॉप हिल,मुसाफिरखाना वगैरे मुम्बईतला भागही आवडत नाही...... तुम्ही तुम्हाला पुणं प्राणप्रिय आहे असं म्हणायला माझा काहीच विरोध नाही.... पण मी मुंबई ही मला भारतातील सर्व शहरात प्राणप्रिय आहे आणि ते सर्वात श्रेष्ठ शहर आहे असं म्हणायला मी मुख्यत्यार आहे.... तुम्ही मुंबई तशी नाही यावर माझ्याशी चर्चा करून मला पटवू इच्छित असाल तर तुमचं स्वागत आहे..... पण अमेरिका वगैरे काढून केवळ वडाची साल पिंपळाला चिटकवू म्हणाल तर ते सहन केलं जाणार नाही.... असो. धाग्यावर यापुढे अवांतर नको म्हणून यापुढील चर्चा करण्यास मी माझ्या खव मध्ये उपलब्ध आहे......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा

युपी बिहार मधला युपीबिहारी

टारझन
Fri, 04/08/2011 - 12:01 नवीन
युपी बिहार मधला युपीबिहारी मुंबैत आला .. आणि मुंबैकर अमेरिकेत जाउन युपीबिहारी झाला :) बाकी मुंबै अमिबा सारखी वाढली आहे . ना रस्त्यांचे नियोजन , ना स्वच्छतेचे , ना झोपडपट्टीचे , ना बांग्लादेशी-बिहारींचे , ट्राण्सपोर्ट चा तर बेंडबाजा वाजलाच आहे. एका एका सिग्नल ला आपला नंबर येऊ तो ३ रेड सिग्नल झेलावे लागतात. :) मुंबै मधे आम्हाला आवडणारी गोष्ट एकंच ... पण ती आम्ही इथे नै सांगणार :) - (एका गोष्टीसाठीच मुंबैप्रेमी) टारझन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

बाकी मुंबै अमिबा सारखी वाढली

llपुण्याचे पेशवेll
Fri, 04/08/2011 - 12:04 नवीन
बाकी मुंबै अमिबा सारखी वाढली आहे . ना रस्त्यांचे नियोजन , ना स्वच्छतेचे , ना झोपडपट्टीचे , ना बांग्लादेशी-बिहारींचे , ट्राण्सपोर्ट चा तर बेंडबाजा वाजलाच आहे. एका एका सिग्नल ला आपला नंबर येऊ तो ३ रेड सिग्नल झेलावे लागतात. सहमत आहे. पुण्याचेही तसेच होऊ घातले आहे. आणि याप्रकारच्या विकासालाच संकुचित दृष्टी असे म्हणतो आम्ही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

+१

छोटा डॉन
Fri, 04/08/2011 - 12:07 नवीन
>>बाकी मुंबै अमिबा सारखी वाढली आहे . ना रस्त्यांचे नियोजन , ना स्वच्छतेचे , ना झोपडपट्टीचे , ना बांग्लादेशी-बिहारींचे , ट्राण्सपोर्ट चा तर बेंडबाजा वाजलाच आहे. एका एका सिग्नल ला आपला नंबर येऊ तो ३ रेड सिग्नल झेलावे लागतात. सहमत आहे. पुण्याचेही तसेच होऊ घातले आहे.
+१, सहमत आहे. - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

>>पुण्याचेही तसेच होऊ घातले

मराठमोळा
Fri, 04/08/2011 - 12:10 नवीन
>>पुण्याचेही तसेच होऊ घातले आहे. आणि याप्रकारच्या विकासालाच संकुचित दृष्टी असे म्हणतो आम्ही. टारु आणि पुपेशी सहमत आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

टारुशेट डोंगळे गुळालाच

गणपा
Fri, 04/08/2011 - 13:14 नवीन
टारुशेट डोंगळे गुळालाच चिटकायचे हो. ;) (मुंबैकर) गण्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

हम्म

नंदन
Fri, 04/08/2011 - 12:45 नवीन
एकाच धाग्यात मराठी आंतरजालावरील दोन अजरामर विषय आलेले पाहून (अनुक्रमे) ड्वाले पाणावले आणि अं. ह. झालो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

व्यवसायवृद्धी तर हवी आहे पण

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 04/07/2011 - 18:06 नवीन
व्यवसायवृद्धी तर हवी आहे पण परप्रांतीयांचे लोंढे तर नको आहेत. या सर्वांचा समतोल साधणे अवघड होते किंवा आहे असे वाटत तरी नाही. पण त्या दृष्टीकोनातुन प्रयत्नच केले गेलेले नाही आहेत. सहमत.. त्यासाठी कष्ट कोणालाही करायला नको आहेत. ना जमिनदार लोकांकडे त्या जमिनींचा वापर करून स्वतःचा विकास करण्याची क्षमता, दृष्टी आहे ना इर्षा. त्यांचा रस गुंठेवारीतच. परत त्यांचे पुढारीही तसलेच. १५-२० वर्षांचे नियोजन करून सातत्याने त्या दृष्टीने वाटचाल करण्यापेक्षा पैसे खाऊन, ते पैसे खालच्या लोकांमधे वाटून स्वतःची फडतूस राजकीय कारकीर्द घडवण्यातच रस. आणि त्या मिळालेल्या तुकड्यातच त्यांचे कार्यकर्ते समाधानी. जोपर्यंत इथल्या जनतेचा नेत्यांवर विश्वास आहे तोवर काहीही होऊ शकत नाही. आणि मुळात लोकच फालतू असल्यावर त्यांच्यातूनच पुढे आलेले राज्यकर्तेही तसेच असणार. प्रयत्न न करता फुकटचं पाहीजे सगळं. प्रशासनाला आणि सरकारला तर अक्कल नाहीच असे वाटते. साधं उदाहरण हिंजवडी(हल्ली याला हिंजेवाडी़ म्हणतात. आणि असेच त्याचे खरे नाव आहे असे मराठी लोकही अक्कल शिकवतात. तरी काही काही सर्कारी बोर्डांवर अजूनही Hinjawadi असेच स्पेलिंग आहे). तर या हिंजवडी मधे MIDC ने फेज १ आणि २ काढल्यावरच इतकी प्रचंड गर्दी वाढली आहे. तरीही अजूनही एकच प्रवेश रस्ता आहे. आणि तरीही अजून फेज ३ मधे प्रचंड मोठ्या प्रमाणात बांधकामांना परवानगी दिली आहे. हे कमीच झाले म्हणून आजूबाजूला प्रचंड रहीवासी भाग विकसित केला जात आहे. वाहतुक कोंडीचा इतका राडा माहीती असूनही कंपन्याही अंधपणे फेज ३ मधेही मोठमोठा जागा घेऊन त्यांची केंद्रे उभारत आहेत. सगळेच आंधळे झालेत का हे कळत नाहीये. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

+१

कुंदन
Fri, 04/08/2011 - 10:56 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

महाराष्ट्र हे एकच राज्य अहे

वपाडाव
गुरुवार, 04/07/2011 - 11:26 नवीन
महाराष्ट्र हे एकच राज्य अहे जिथे कित्येक शहरे विकास साधत आहेत उदा. नागपूर, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर..
यात नांदेडचे नाव न घेतल्याने इथुन पुढच्या चेन्नै वरील एकाही धाग्याला प्रतिसाद न देण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे. एकतर ममोंनी नाव जोडावे नाहीतर खवत यावे.
राजधान्यांमधे पब्लीक ट्रान्स्पोर्ट साठी सरकारी सपोर्ट असतो. मग चेन्नई असो वा बंगलोर. मग चेन्नै मधे सहाजिकच तिकेट ७ रुपये असेल ते पुण्यात १५-१८ रुपये असणार.
मी हैद्राबादेत अन वारंगळ या दोनही ठिकाणी वास्तव्य केले आहे. तिकिटे जवळ्पास समान आकारली जातात. गुजरात महाराष्ट्राला मागे टाकेल पण त्यासाठी त्यांना शुन्यातुन (हे जास्त होतंय का?) सुरुवात करावी लागेल. अमदावाद, बरोदा, सुरत अन थोडंफार राजकोट हे सोडुन गुजरातेत काय आहे?
  • Log in or register to post comments

शहर-राज्य यांची तुलना एका

गणेशा
गुरुवार, 04/07/2011 - 14:06 नवीन
शहर-राज्य यांची तुलना एका व्यव्स्थीत पातळीवरुन आवडते.. म्हनुन उत्तर देतो आहे. . ( बाकी आम्ही कसे चांगले.. हेच कसे भारी वगैरे मधेय जास्त सारस्व नाही.. त्यामुळे तसा उद्देश नक्कीच नाही लिखानात)
गुजरात महाराष्ट्राला मागे टाकेल पण त्यासाठी त्यांना शुन्यातुन (हे जास्त होतंय का?) सुरुवात करावी लागेल. अहमदाबाद, बरोदा, सुरत अन थोडंफार राजकोट हे सोडुन गुजरातेत काय आहे?
गुजरात मध्ये मान्य महाराष्ट्रायेव्हडे नसेल ही कदाचीत, पण तेथील राजकारणी लोकांचा द्रुष्टीकोण हा महाराष्ट्रातील राजकारणी लोकांच्या द्रुष्टीकोणापेक्षा जास्त व्यापक आहे. आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे गुजरातेत द्रुष्टीकोण हा एकच येव्हडा मोठा फॅक्टर आहे की तो त्याला पुढे न्हेत आहे. मागे वाचनात आले की गुजरात शेती मध्ये ही अग्रेसर झाले आहे(नक्की माहित नाही.. पण प्रगती खुप आहे हे नक्की)... माझाच उलट असा सवाल आहे की.. १० वर्षापुर्वीचा गुजरात बघितला.. तर जास्त सुपिक नसलेली जमीन ...व्यापारीपणाला असलेले महत्व यातुन कोणी म्हणु शकले असते का शेतीत गुजरात अग्रेसर होयील ते ... यालाच म्हणतात शुन्यातुन वर येणे ... आणि सुरत -बडोदा हे सोडुन गुजरात माहीत नसले तरी महाराष्ट्राने ही पुणे- नाशिक - कोल्हापुर ह्या मोठ्या शहरांचा विकास योग्य पद्धतीने करावा. --- अवांतर : नांदेड, बारामती, सातारा- कराड,, ही आनि अशी शहरे ही पुणे-नाशिक-नागपुर-मुंबई या नंतरच्या लेवल वर आहेत .. त्यामुळे त्यांचे नाव लिस्ट मध्ये नाही ते बरोबर आहे ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

'दिवार' मधील डायलॉग आठवला..

योगप्रभू
गुरुवार, 04/07/2011 - 15:34 नवीन
बच्चन म्हणतो, 'आज मेरे पास बंगला है, गाडी है, धनदौलत है. तुम्हारे पास क्या है?' त्यावर शशी कपूर म्हणतो, 'मेरे पास माँ है' तसेच महाराष्ट्राने गुजरातला विचारले, तर तो म्हणेल, 'मेरे पास नरेंद्र मोदी है'
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

अ‍ॅज कम्पेअर्ड टू चेनै....

मृगनयनी
गुरुवार, 04/07/2011 - 16:35 नवीन
अ‍ॅज कम्पेअर्ड टू चेनै.... पुण्याच्या मुली जास्त बोल्ड, स्वतन्त्र विचारांच्या आणि अन्यायाविरूद्ध आवाज उठवणार्‍या असतात... :) ( इथे - पुण्याच्या मुली-- याचा अर्थ प्रॉपर पुण्याच्या मुली.. बरंका!... बाहेरून / गावाहून पुण्यात राहायला आलेल्या मुली बर्‍यापैकी शिकाऊ असतात.... आणि त्या लगेच ओळखूही येतात ;) ;) ;) ... तीच तर्‍हा मुलांची.... या मुला-मुलींना पिडायला जाम मजा येते.! ;) ;) ;) ) कर्नाटकच्या मुली / बायका थोड्या जास्तच उग्र आणि भांडकुदळ वगैरे असतात...पण सनातनी असतात... या बायकांना सॉरी म्हणण्यापेक्षा यान्च्या पटकन पाया पडलं... की यान्ना खूप बरे वाटते! ;)... ( हुबळी, गोकर्ण .. येथे आलेले काही अनुभव ) (ओरिजिनल )गोव्याच्या मुली मात्र गोड आणि गोर्‍या पान असतात्!..त्यान्चं बोलणंही लयबद्ध आणि गो$ड असतं! ... "बरी$$ असंस$ ?" (बरी आहेस ना! ) ... हे ऐकतानाच खूप बरं वाटायला लागतं! :) मला या कारवारी , साऊथ इन्डियन लोकांन्ची घरं खूप आवडतात!... इतकी प्रशस्त... आणि हवेशीर... असतात.... की तिथून निघूच नये... असं वाट्टं! :) अर्थात... ओरिजिनल गोव्याची मुलंही खूप हॅन्डसम असतात.... ;) ब्लू आईज, कर्ली हेअर, लस्टी स्माईल, किलिन्ग लुक्स ...... अगदी पु.लं'च्या "नन्दा प्रधान"ची आठवण येते.... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

घ्या.. कुणाला कशाचं तर

मराठमोळा
गुरुवार, 04/07/2011 - 17:53 नवीन
घ्या.. कुणाला कशाचं तर बोडक्याला केसाचं.. ;) ह्.घ्या. मृगनयनी ताई फारच पारखी स्वभावाच्या दिसतात.. आणि त्यांना निरिक्षण करण्याचा छंद आहे असेही दिसते. असो, तुम्ही पुरवलेल्या माहितीचा आम्ही पुरेपुर उपयोग करु.. :) मंडळ आभारी आहे. धन्यवाद!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

-प्र्काटाआ

वपाडाव
गुरुवार, 04/07/2011 - 18:41 नवीन
-
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा

मृग्गाच्या या प्रतिसादाला अन

वपाडाव
गुरुवार, 04/07/2011 - 18:40 नवीन
मृग्गाच्या या प्रतिसादाला अन पैसातै, बिकाजी, प्री-मो यांच्या आमचे गोंय या सिरिजला वाचुन गोवा जाणे ठरले आहे... पुढील संपर्कासाठी खवत जात आहोत... तिकडे भेटा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा

सहमत!

पिवळा डांबिस
Fri, 04/08/2011 - 11:08 नवीन
महाराष्ट्र हे एकच राज्य अहे जिथे कित्येक शहरे विकास साधत आहेत उदा. नागपूर, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर.. यात कल्याण, धुळे, जळगांव, सोलापूर, लातूर, बीड परभणी, ठाणे, रत्नागिरी, बारामती, सावंतवाडी, सांगली, सातारा, यवतमाळ, पनवेल, नांदेड इ.इ.चे नाव न घेतल्याने इथुन पुढच्या चेन्नै वरील एकाही धाग्याला प्रतिसाद न देण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे. एकतर ममोंनी नाव जोडावे नाहीतर खवत यावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

+२३ लातूर, बीड परभणी हो हो

मुलूखावेगळी
Fri, 04/08/2011 - 11:27 नवीन
+२३ लातूर, बीड परभणी हो हो BPL कसे विसर्लात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

पिडाकाकांनी वैदर्भीय शहरांना

वपाडाव
Fri, 04/08/2011 - 12:02 नवीन
पिडाकाकांनी वैदर्भीय शहरांना (स्वारी खेडयांना) फाट्यावर मारलेले आहे... अपवाद : यवतमाळ
कारण या शहराचा उपयोग इंद्र कुमारने "धमाल" चित्रपटात संजय दत्तने मिशन पुर्ण न केल्यास, तंबी देताना त्याच्या (संजयच्या) बदलीकरिता करुन घेतलेला आहे. त्यामुळे हे वेगळेपण सिद्ध होते. (विदर्भातील इतर खेड्यांपेक्षा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

नाय रे बाबा!

पिवळा डांबिस
Sat, 04/09/2011 - 00:25 नवीन
पिडाकाकांनी वैदर्भीय शहरांना (स्वारी खेडयांना) फाट्यावर मारलेले आहे... नाय रे बाबा! मी वैदर्भीय शहरांची बिल्कुल उपेक्षा करून नाय र्‍हायलो!!!! नागपूर तर त्यांनीच म्हटलं आहे, मी यवतमाळचं नांव घेतलं... त्यात अजून अ‍ॅड कर, चंद्रपूर, भंडारा, ..... मी विदर्भात क्धीच गेलेलो नसल्याने मला नांव चटकन आठवली नाहीत इतकंच... तो दोष माझा, त्या शहरांचा नव्हे... रागावू नको भाऊ!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

लिखानाचा उद्देश मस्त आहे ..

गणेशा
गुरुवार, 04/07/2011 - 13:53 नवीन
लिखानाचा उद्देश मस्त आहे .. आवडला.. पुण्या बद्दलची कारणे ही पटली .. पुणे हे राजधानी नसल्याने येथे जास्त राजधानी येव्हडे सगळे निर्मान होत नाही.. ऑड सिटी बद्दल ची मते पण पटली .. तरीही ... जसा विकास पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेला करता आला तसा विकास पुणे महानगर पालिका का करु शकत नाहिये हे कळत नाही. नुकतेच पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या हद्दीत घर घेतले.. कारण ही तेच होते .. पुण्या पेक्शा जास्त डेव्हलपमेंट करणारी महानगर पालिका. रस्ते - सोयी हे नक्कीच जबरदस्त आहेत ... आता औंधच्या पुढुन डांगेचौक -- आणि काळेवाडी - पिंपरी हा चारपदरी रोड तर पुर्ण होयीलच .. आणि वाकड ते नाशिक फाटा यांना जोडणारा एकप्रेस बायपास पन चालु आहे.. पुण्याचे बोलाल तर पिंपरी-चिंचवड येव्हडे ट्रांस्पोर्ट -रस्ते जरी त्यांनी सुधरावले तरी छान आहे. -------- पुण्याबद्दल वाईट बोलतोय असा भाग नाहिये .. पुणे माझे ही एक आवडते शहर आहे... पण मुंबई जास्त आवडते .. आता मुंबईतील ट्राफिक पोलीस, सिग्नल तोडल्यावर कंपल्सरी पावती फाडतातच.. त्यांचे कर्तव्यदक्ष पण हे पुण्यातील पोलीसांपेक्षा जास्त आहे .. यासाठी किंवा लोकांच्या टेंडशी.. काम करण्याच्या वृत्ती मध्ये फक्त राजधानी नाही म्हणुन फरक नक्कीच नाही पडला पाहिजे असे माझे मत. --------- नागपुर ही सुद्धा राजधानी नाही.. पण ऐकुन आहे तेथील रस्ते खुप छान आहे .. बघु मे मध्ये जातोय पाहणार आहेच.. पण फक्त जागा कमी पडते आहे हे एकच कारण सांगणे चुकीचे वाटते ... स्वारगेट - हडपसर सारखा भंगार रोड आणि प्रदुषण दूसरीकडे कुठेच नाही.. वाकड -हिंजेवाडी ब्रिज बांधुन - खुद्द एक्सप्रेस वे ला सिग्नल लावल्याने होणारी ट्राफिक नाहि आवडत .. कारण एक तर त्या ब्रीज वरुन कोणी जास्त जात नाहित .. उलट एक्सप्रेस वे ला ब्रीज हवा होता ना. .. नुकताच संपलेला युनवर्सिटी चा ब्रिज .. काय ट्राफिक कमी झाले का तेथील रोडवरचे .. नाही हे उत्तर आहे. कारण पैसे खावुन मुद्दाम मॉल साठी वन वे ब्रीज आणि मध्येच कसे ही कोठे ही उतरवलेत ते .. त्यामुळे बाणेर- पाषाण -औंध वरुन येणारी वाहणांची कोंडी तशीच आहे.. अआणि ब्रीज पण नाही.. -- मगरपट्टा सिटी च्या चौकापर्यंत हवा असणारा हडपसर- गाडीतळ हा ब्रीज आधीच उतरवल्याने.. होणार्या वाहतुक कोंडीला उत्तर म्हणुन पुन्हा एक ब्रीज बांधावा लागत आहे... बघु तो किती व्यव्स्थीत वापराचा होतोय .. पण हे नक्की विकास होत नाही असे नाही.. पैसे मिळत नाही असे नाही.. पण हे असे चुकीच्या पद्धतीने इम्प्लेंट होणार्या गोष्टी विशेषता ट्रांस्पोर्ट संधर्भातील .. हे कोणीच का लक्षात घेत नाही.. येथे पैसा तर तेव्हडाच जातोय ... ---------- तुम्ही म्हणता तसे देशातील पुणे हे असे शहर आहे.. जे राजधानी नसुन विकसित झालेले आहे.. मान्य .. अभिमान आहेच.. पण ते अजुन सुधारले तर बिघडणारे नाहीच .. पण जो कारभार चालु आहे तो नक्कीच पाठिंबा देण्यालायक नाहि .. उलट पिंपरी चिंचवड ने खुद्द nh4 ला पण जे रुप दिले आहे ते नक्कीच वाखणण्या जोगे आहे.. असो थांबतो .. विरोध करायचा हेतु नव्हता -- एक पुणेकर
  • Log in or register to post comments

गणेशा, मुळात पुण्यात काय आहे,

मराठमोळा
गुरुवार, 04/07/2011 - 17:50 नवीन
गणेशा, मुळात पुण्यात काय आहे, ते चांगले आहे की नाही, पुणे कुणाला आवडते की नावडते, किंवा पुण्याचे लोकं, त्यांचे आचार्-विचार हा या चर्चेमागचा हेतु नव्हता.. तो विषय वेगळा आहे. पुण्याची जी वारंवार तुलना मोठ्या शहरांशी केली जाते ती चुकीची आहे हे माझे म्हणणे आहे. पुण्याशी तुलना करावी लागावी ही त्या त्या शहरांसाठी शरमेची बाब नाही काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

रोचक ...

छोटा डॉन
गुरुवार, 04/07/2011 - 18:11 नवीन
पुणे हे त्या प्रातांची ( इथे महाराष्ट्राची ) राजधानी नाही आणि इतर शहरे त्या त्या प्रातांच्या राजधान्या आहेत म्हणुन त्या त्या शहराची तुलना पुण्याशी करण्यास त्या त्या शहरांना शरम वाटावी हे गृहितक रोचक आहे. राजधानी असण्याचा आणि विकास होण्याचा तितकासा संबंध नाही हे आपण जर व्यापक स्तरावर पाहिले तर आपल्या लक्षात येईल. अर्थात राजधानी असल्याचा फायदा भरमसाट सरकारी फंडाच्या मार्गाने होत असला तरी त्याशिवायही शहर सुधारु शकते अशी उदाहरणे आहेत. फ्रँकफर्ट ह्या जर्मनीच्या अतिप्रसिद्ध शहराचा प्रांत ( पक्षी : राज्य ) येते "हसन" आणि ह्या 'हसन' ची राजधानी आहे 'विस्सबाडेन'. फ्रँकफर्ट राजधानी नसतानासुद्धा ते केवळ जर्मनीचे नव्हे तर आख्ख्या जगातले एक महत्वाचे व्यापारी केंद्र आहे. ह्याच अनुषंगाने सांगावासा वाटणारा मुद्दा म्हणजे 'फ्रांकफर्ट'मधली सार्वजनिक वाहतुक व्यवस्था की राजधानी असलेल्या 'विस्सबाडेन'पेक्षा कैक पटीने भारी आहे. असो, बाकी लेख छान वाटला - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा

फ्रँकफर्ट ह्या जर्मनीच्या अतिप्रसिद्ध शहराचा

चिंतामणी
गुरुवार, 04/07/2011 - 18:25 नवीन
हा प्रतीसाद नक्की कोणाचा आहे? चोता दोन चे अकांउट हॅक नाही ना झाले????? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

का बॉ ?

छोटा डॉन
गुरुवार, 04/07/2011 - 18:38 नवीन
का बॉ ? आमचे अकाउंट हॅक होण्याचा काय संबंध ? - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

नो चिंता

चिंतामणी
गुरुवार, 04/07/2011 - 18:44 नवीन
आपण भारताबाहेरचा दिलेला संदर्भ बघून तसे म्हणले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

डानराव, मी एवढ्या व्यापक

मराठमोळा
गुरुवार, 04/07/2011 - 18:34 नवीन
डानराव, मी एवढ्या व्यापक दृष्टीकोनातुन विचार केला नाही हे खरे आहे. माझा अभ्यास तितका नाही. पण मग विषय फारच मोठा होईल. अमेरिकेतील खेडीसुद्धा सोयीसुविधांच्या बाबतीत भारतातल्या कोणत्याही शहराला लाजवतील कदाचित. सिंगापूर अजुन एक उदाहरण. युरोप म्हंट्ल तर तिथे साक्षरतेचे प्रमाण बर्‍यापैकी आहे आणि सोशल अवेरनेस सुद्धा आहे आणी हे सर्व देश विकसित आहेत. असो, सद्ध्या भारतावरच फोकस ठेवुयात. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

सहमत आहे ...

छोटा डॉन
गुरुवार, 04/07/2011 - 18:42 नवीन
युरोप म्हंट्ल तर तिथे साक्षरतेचे प्रमाण बर्‍यापैकी आहे आणि सोशल अवेरनेस सुद्धा आहे आणी हे सर्व देश विकसित आहेत. असो, सद्ध्या भारतावरच फोकस ठेवुयात.
सहमत आहे. आपण भारताच्या परिघातच चर्चा करुयात असे सांगतो. हरकत नाही. - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा