Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by स्पा on Fri, 03/18/2011 - 07:30
लेखनविषय (Tags)
मुक्तक
जीवनमान
रेखाटन
४ वाजतात. मी पीसी बंद करून उठतो, ऑफिस मधल्या अनेकांच्या भुवया उंचावल्या जातात. अरे हा आज इतक्या लवकर कलटी? मी त्या नजरा जाणीवपूर्वक टाळतो.आज मनस्थितीच विचित्र असते, त्यात अजून बसून काम करणं मला तरी निदान शक्य नसतं . कामाचं टेन्शन झेपत नाहीये कि बाकीच्या टेन्शन मुळे काम झेपत नाहीये , काहीच कळत नाहीये. खाली येतो आणि बाहेर चालू लागतो, बाहेर भन्नाट हवा सुटलेली असते, पण सगळे उष्ण वारे , हम्म उन्हाळा सुरु झाला तर मी स्वतःशीच पुटपुटतो. आज चालत जाऊया नाहीतरी लवकर निघालो आहे. उन्हाची तीव्रता आता बरीच कमी झालेली असते, पण सुर्यनारायण मात्र अस्ताला जाण्याआधी मस्त त्याची चित्रकलेची हौस पुरवून घेत असावा, आकाशात केशरी,निळसर, अश्या अनेक रंगांची जणू रंगपंचमी सुरु होती, अहाहा काय निसर्गाचा चमत्कार आहे !!! पण साला मनात कसलं मळभ साठलंय देव जाणे, चालता चालता, विचारांचे घोडे चौखूर उधळलेले असतात. कधी कधी एखाद्या सकाळी प्रचंड ढग आकाशात गोळा होतात, सोसाट्याचा वारा सुटतो, गडगडत, विजा चमकतात पण अख्खा दिवस पाऊस काही पडत नाही,जीवाची काहिली मात्र होत राहते , तसच काहीस झालंय. भरपूर रडावस वाटतय, पण छ्या, मी आणि रडू ? मनातला पुरुषी बाणा जागा होतो. का रडू नये? पुरुषाला भावना नसतात ? त्या काय फक्त दारू पोटात गेल्यावर बाहेर काढायच्या असं थोडी आहे? अनेक म्याचो म्यान बार मध्ये पोरींच्या वरताण रडताना पाहिलेले आहेत मी. मनात द्वंद सुरूच असत. गाडीच्या आवाजाने मी दचकतो, विचारांच्या तंद्रीत न बघतच रस्ता क्रोस करत होतो. वा काय गाडी आहे, जवळ जवळ ४०-५० लाखांची सहज असेल, काय आरामदायक आयुष्य आहे यार, गाडी निघून गेल्यावर मी नजरेआड होईपर्यंत बघत बसतो , नक्की कोणीतरी श्रीमंत बापाचा पोरगा असणार , नुसता पैसा! सकाळी उठून रात्री झोपेपर्यंत पैसा कसा खर्च करावा याचाच विचार करत असतील साले. टिपिकल मध्यमवर्गीय विचार सुरु होतात. नाहीतरी साले आपण रोज सकाळी उठलं कि ७.२८ ची लोकल पकडायची जीवघेणी शर्यत, किडा मुंगी सारख स्वतःलाच चिरडून घ्यायचं, भयानक स्पर्धेत स्वतःला लोटून द्यायचं, दिवसभर गुरासारख राबायचं आणि रात्री कधीतरी दमून असंच चिरून चिरडून घरी यायचं . घरचे बिचारे तोपर्यंत झोपलेले असतात, कोणाशी संवाद नाही , थट्टा मस्करी नाही, काहीच नाही, सगळे मिळून पत्ते खेळून सुद्धा २ ३ वर्ष सहज झाली असतील, हल्ली ऑनलाईन गळाभेटी होतातच, एकमेकांना "लाईक" केलं कि विषय संपला. सालं आरामात जाऊन झोपायला तर अजून हक्काचं घर सुद्धा नाहीये. राहतं घर खाली कराव लागेल कि काय अशी परिस्थिती. आजूबाजूचे गगनचुंबी इमले बघत उगाचच त्यात राहणार्यांचा हेवा वाटतो. मनातला कडवट पण वाढतच असतो, स्टेशन येत तसं गजबजाटाने भानावर येतो. मुकाट खाली मान घालून ट्रेन ची वाट बघत बसतो. एका कोपऱ्यात एक भिकारी बाई बसलेली असते साधारण तिशीची, बाजूला एक छोटंसं नंगु पोर, आणि छातीची कवटाळलेलं एक तान्हुल, तिच्या चेहऱ्याची गालफड बसलेली, शरीर फाटके कपडे आहेत , म्हणून दिसतंय एवढी परिस्थिती, केसांचा अवतार, डोळ्यात कसल्याच भावना नाहीत, भिकार्यांच्या डोळ्यात निदान लोचट , पैसे मिळतील अश्या भावना मी बघितलेल्या आहेत, पण अशी स्वप्न शून्य नजर.. बापरे अंगावर शहारा येतो. ते तान्हुलं तिला लुचायचा प्रयत्न करत असतं, आणि माउली तशीच बसून, त्याची भूक कशी भागेल? मी पटकन रिक्षाचे वाचवलेले पैसे त्या नंगु पोराच्या हातात टेकवतो, ते उद्या मारत परत तिच्याकडे जात, पण तिच्या चेहर्यावरची रेषही हलत नाही , मला तो प्रकार असह्य होतो, ट्रेन येतंच असते, मी पटकन आत शिरतो, लवकर निघाल्याने ट्रेन बरीचसी रिकामीच असते , मस्त विंडो सीट मिळते. लोकल सुसाट सुटते , खिडकीतून वर आल्यावर जरा बरं वाटत. समोर कॉलेजचा कंपू बसलेला असतो, नुसता दंगा माजवलेला असतो त्यांनी, एकमेकांची खेचत, थट्टा मस्करी करत , अख्या डब्याच लक्ष वेधून घेतलेलं असत, मधेच एक दोघे जण माझ्याकडे बघत असतात, मीच त्यांच्यासमोर एवढं खत्रूड आणि निर्विकार थोबाड घेऊन बसलो असेन म्हणून असेल कदाचित परत पावसाची आठवण येते, त्यांचा आनंद जल्लोष पाहून , बाहेर मुसळधार पाऊस बरसतोय, आणि मी कोरडा राहून खिडकीतून बघतोय , तशीच माझी अवस्था असते . बाजूला लक्ष जात, एक प्रेमी युगुल त्याच्याच विश्वात गुरफटलेलं असत, तो तिला सारख चिडवत असतो, ती मधेच चिडायची, मधेच हसायची, मधेच तोंड फिरवून खिडकी बाहेर बघायची, पण तिचा त्याच्या हातातला हात मात्र तसाच, जणू जन्मोजन्मीची साथ देण्यासाठीच गुंफलेला. तीच लक्ष माझ्याकडे जात, मी गोंधळून चटकन नजर फिरवतो. गाडीने ठाणे सोडलेले असते, समोरचा कंपू पण उतरून गेलेला असतो, एखादा कुशल शिंपी ज्याप्रमाणे समोरचं कापड कुशलतेने सरसर कापत जातो, तसाच निसर्गाचा विशाल पट्टा कापत ट्रेन भरधाव निघालेली असते, चला आता २० मिनिटात डोंबिवली! बाहेर खाडी दिसत असते , आणि परत सूर्यनारायणाच दर्शन होत , त्याचा केशरी रंग इतका लोभस दिसत असतो कि बस , खाडीच पाणी सुद्धा केशरी रंगात नटलेल असत, मी पटकन दोन तीन फोटो काढतो मोबाईलवर , पण नीट येत नाहीत , असो शक्य तेवढ्या कटू आठवणी दूर करण्याचा प्रयत्न सुरु असतो. बोगद्यातून गाडी बाहेर येते आणि मुंब्रा देवीचा डोंगर दिसू लागतो . नकळत हात जोडले जातात, "सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके ........ " हे त्रम्बिके, नारायणी सर्वांचं मंगल कर. "जो जे वांछील तो ते लाहो" खरं आहे, सर्वांना सर्व काही मिळो, सर्व स्वप्न पूर्ण कर, त्या समोरच्या जोडप्याला कधीही वेगळं करू नकोस, विचार उलट सुलट कोणाबद्दलही येत असतात . ठाकुर्ली येत मी उतरतो . घरी पोहोचल्यावर आई दरवाजा उघडते , " अरे मन्या तू? इतक्या लवकर ? तब्येत बरी आहे ना? थांब पाणी आणते, बाबा सुद्धा आलेले असतात, ते सुद्धा विचारतात का रे असा दिस्तोयेस , बॉस ने झापला कि काय? मी हसतो. आई बाहेर येत म्हणते , अहो आता तो आलाय ना लवकर बरंय ना, रोज ११ वाजतात बिचाऱ्याला, मन्या तुला मस्त चहा टाकते हे पण घेतील अर्धा कप ! पोहे करू का पटकन ? बाबा पटकन पोहे आणा ना जरा खालून ,संपलेत आणि मला कॉफी ची दोन पाकीट पण आणा, आईची धावपळ बघतच बसतो, बाबा कधीच खाली सटकलेले असतात, मी हातपाय धुवून ग्यालरीत उभा राहतो, समोरची झाड केशरी उन्हात रंगलेली असतात, एका फांदीवर घरट्यात चिमणा चिमणी आणि त्यांचं पिल्लू चिवचिवाट करत असतात, . . . . . . आणि आत, मनात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली असते
  • Log in or register to post comments
  • 18057 views

प्रतिक्रिया

Submitted by चित्रा on Fri, 03/18/2011 - 07:36

Permalink

छान

फारच छान. लेखन आवडले.
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवट on Fri, 03/18/2011 - 07:39

Permalink

>> आणि आत, मनात मुसळधार

>> आणि आत, मनात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली असते मस्त..
  • Log in or register to post comments

Submitted by गणेशा on Fri, 03/18/2011 - 07:48

Permalink

लेखन आणि प्रत्येक गोष्टीतील

लेखन आणि प्रत्येक गोष्टीतील बारीकता आवडली ..
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Fri, 03/18/2011 - 07:48

Permalink

छान लिहिलंय...एकदम सेंटी!!

छान लिहिलंय...एकदम सेंटी!!
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक बेलापुरे on Fri, 03/18/2011 - 07:54

Permalink

छान

दुनिया बनाने वाल्ले क्या तेरे मन मै समायी काहे को दुनिया बनायी :)
  • Log in or register to post comments

Submitted by मनीषा on Fri, 03/18/2011 - 08:09

Permalink

मनातला पाऊस ... आवडला !

मनातला पाऊस ... आवडला !
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Fri, 03/18/2011 - 08:55

Permalink

व्वा, स्पावड्या! रोजच्या

व्वा, स्पावड्या! रोजच्या आयुष्यातले (हिंदीत याला चपखलपणे रोजमर्राकी जिंदगी म्हणतात) अनुभव मस्त लिहीलास. तुझ्या लिखाणातल्या प्रामाणिक साधेपणामुळे ते अगदी निर्लेप वाटते. बाकी आयुष्यात ऊन-पाऊस चालायचेच रे.
  • Log in or register to post comments

Submitted by राजेंद्र मेहेंदळे on गुरुवार, 01/09/2014 - 19:36

In reply to व्वा, स्पावड्या! रोजच्या by नगरीनिरंजन

Permalink

सहमत

स्पा मानवी स्वभाव जरा विचित्र आहे. माणुस प्रथम चाकोरीत रुळायला धडपडतो आणि मग त्याच त्या चाकोरीचा त्याला कंटाळा येउ लागतो. मला वाटते तुमची चाकोरीबाहेर पडायची वेळ झाली आहे..मग ती व्यक्तिगत आयुष्यात असो किवा कॉर्पोरेट.....घे भरारी
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Fri, 03/18/2011 - 09:18

Permalink

आवडेश

एव्हढंच सांगतो....... स्पावड्या रॉक्स.........!
  • Log in or register to post comments

Submitted by कुंदन on Fri, 03/18/2011 - 09:50

Permalink

भारी लिवलयस रे

भारी लिवलयस रे .
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Fri, 03/18/2011 - 09:57

Permalink

आवडला

लेख आवडला.
  • Log in or register to post comments

Submitted by गोगोल on Fri, 03/18/2011 - 09:59

Permalink

फार फार फार

सुंदर लिहिलय. हरू नको..लढत रहा.
  • Log in or register to post comments

Submitted by मी_ओंकार on Fri, 03/18/2011 - 10:27

Permalink

कूल

मस्त... - ओंकार.
  • Log in or register to post comments

Submitted by अभिज्ञ on Fri, 03/18/2011 - 10:33

Permalink

मस्तच. मुक्तक फार आवडले.

मस्तच. मुक्तक फार आवडले. अजून येउ द्यात. अभिज्ञ
  • Log in or register to post comments

Submitted by sneharani on Fri, 03/18/2011 - 10:42

Permalink

मस्त

सुंदर लिहलय! मस्तच!
  • Log in or register to post comments

Submitted by चावटमेला on Fri, 03/18/2011 - 10:44

Permalink

मस्त!!!

मस्तच!!! खूप आवडले..
  • Log in or register to post comments

Submitted by प्रीत-मोहर on Fri, 03/18/2011 - 10:57

Permalink

मस्तच रे मन्या स्पायल्या

मस्तच रे मन्या स्पायल्या :P
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल on Fri, 03/18/2011 - 11:05

Permalink

अतिशय सुन्दर छान

अतिशय सुन्दर छान
  • Log in or register to post comments

Submitted by मुलूखावेगळी on Fri, 03/18/2011 - 11:24

Permalink

आणि आत, मनात मुसळधार पावसाला

आणि आत, मनात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली असते
असेच कायम पावसात भिजत रहा. :) मस्त लिहिलेस.
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on Fri, 03/18/2011 - 11:31

Permalink

अव्वल....

अव्वल....
  • Log in or register to post comments

Submitted by ब्रिटिश टिंग्या on Fri, 03/18/2011 - 11:37

Permalink

क्या बात!

मस्त!
  • Log in or register to post comments

Submitted by पियुशा on Fri, 03/18/2011 - 12:06

Permalink

मस्त लिहिलय मनाला भिडलय !

मस्त लिहिलय मनाला भिडलय ! :)
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळलेला काव्यप्रेमी on Fri, 03/18/2011 - 12:34

Permalink

सुंदर..

सुंदर लेख..... भिडला मनाला.....
  • Log in or register to post comments

Submitted by सविता००१ on Fri, 03/18/2011 - 12:41

Permalink

खूप सुन्दर

मस्त लेख . अतिशय आवडला.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Fri, 03/18/2011 - 12:41

Permalink

छान !!

छान !!
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर१३७ on Fri, 03/18/2011 - 12:48

Permalink

नि:शब्द..................

नि:शब्द..................
  • Log in or register to post comments

Submitted by इंटरनेटस्नेही on Fri, 03/18/2011 - 12:49

Permalink

मस्त! मस्त! मस्त! मनातल्या

मस्त! मस्त! मस्त! मनातल्या भावना कागदवर उतरवण्यात स्पा नेहमी प्रमाणे यशस्वी झाला आहे. आजुबाजुच्या जीवनाचे चित्रण तर अप्रतिमच! मस्त! कथा आवडली! :) पुढील लेखनासाठी शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Fri, 03/18/2011 - 12:50

Permalink

मुक्तक आवडले.

मुक्तक आवडले. :)
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Fri, 03/18/2011 - 13:07

Permalink

मस्त !!

मस्त !!
  • Log in or register to post comments

Submitted by महेश हतोळकर on Fri, 03/18/2011 - 13:18

Permalink

मस्त रे! आवडलं

मस्त रे! आवडलं
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Fri, 03/18/2011 - 13:26

Permalink

स्पावड्या मस्त लिहितोस की रे.

स्पावड्या मस्त लिहितोस की रे. आवडले एकदम.
  • Log in or register to post comments

Submitted by योगेश सुदाम शिन्दे on Fri, 03/18/2011 - 13:43

Permalink

झक्कास ....

झक्कास ....
  • Log in or register to post comments

Submitted by स्मिता. on Fri, 03/18/2011 - 14:20

Permalink

मस्त

मुक्तक खूप आवडले. खरंच कधीकधी मनाची अशीच अवस्था होत असते. तीला शब्दात मांडणं तसं अवघड आहे. पण हे वाचताना वाटत होतं की मी ते सगळं अनुभवतेय!
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Fri, 03/18/2011 - 14:20

Permalink

स्पावड्या भावड्या मनातले सगळे

स्पावड्या भावड्या मनातले सगळे अगदी सुंदर कागदावर उतरवले आहेस :) लेखन एकदम भावले. *शक्य झाल्यास थोडे पॅरिग्राफ वगैरे सोडून सुटसुटीत लिहायचा प्रयत्न कर. खुप गिचमीड वाटत आहे हे*
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Fri, 03/18/2011 - 17:22

Permalink

स्पा.. सुंदर. Lovely..

स्पा.. सुंदर. Lovely..
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on Fri, 03/18/2011 - 17:29

Permalink

भावले लिखाण !!

भावले लिखाण !!
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद मुक्काम … on Fri, 03/18/2011 - 18:48

Permalink

मन्या तुला मस्त चहा टाकते हे

मन्या तुला मस्त चहा टाकते हे पण घेतील अर्धा कप ! पोहे करू का पटकन ? ''आणी काय हवे रे मन्या तुला ? गाडीने ठाणे सोडलेले असते, समोरचा कंपू पण उतरून गेलेला असतो, एखादा कुशल शिंपी ज्याप्रमाणे समोरचं कापड कुशलतेने सरसर कापत जातो, तसाच निसर्गाचा विशाल पट्टा कापत ट्रेन भरधाव निघालेली असते, चला आता २० मिनिटात डोंबिवली! बाहेर खाडी दिसत असते , आणि परत सूर्यनारायणाच दर्शन होत , त्याचा केशरी रंग इतका लोभस दिसत असतो कि बस , खाडीच पाणी सुद्धा केशरी रंगात नटलेल असत, मी पटकन दोन तीन फोटो काढतो मोबाईलवर , पण नीट येत नाहीत , असो शक्य तेवढ्या कटू आठवणी दूर करण्याचा प्रयत्न सुरु असतो. बोगद्यातून गाडी बाहेर येते आणि मुंब्रा देवीचा डोंगर दिसू लागतो . नकळत हात जोडले जातात, ह्यासाठीच कुर्ला ते डोंबिवली प्रवास मी दरवाजाला लटकून करतो .अगदी बसायला खिडकी मिळाली तरी सुद्धा . दिव्याला दादू हाल्याची खानावळ हा बोर्ड लहानपणापासून वाचत आलो आहे .पण कधी तेथे उतरून जायचा धीर झाला नाही . जुन्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीराम गावडे on Fri, 03/18/2011 - 19:21

Permalink

लगे रहो

खुप सुंदर खुप दर्जेदार लगे रहो स्पाभाई.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Fri, 03/18/2011 - 19:25

Permalink

प्रचंड आवडलं!

छान रंगवलीस "एक संध्याकाळ" जी रोजच नव्याने येते!
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Fri, 03/18/2011 - 19:40

Permalink

तुमच्यात चांगलं लिहीण्याची

तुमच्यात चांगलं लिहीण्याची ताकद दिसली . - पा
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Fri, 03/18/2011 - 21:29

Permalink

हा लेख म्हणजे रीड बिटविन्न द

हा लेख म्हणजे रीड बिटविन्न द लाईन्स आहे.. जबरदस्त!! खूप सुंदर लिहिले आहेस... घरी असे वातावरण अनुभवल्यावर मनातला दडपलेला पाऊस कोसळायलाच हवा!! :) जियो!!
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Fri, 03/18/2011 - 22:02

Permalink

जीयो भाय !! जीयो !

जीयो भाय !! जीयो !
  • Log in or register to post comments

Submitted by पुष्करिणी on Fri, 03/18/2011 - 22:45

Permalink

मस्तच रे स्पावड्या , छान

मस्तच रे स्पावड्या , छान लिहिलयस !
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on Fri, 03/18/2011 - 22:56

Permalink

अरे वा

अरे वा. इतके छान लिहतोस माहिती नव्हते. मस्त लिहलं आहेस ? एकटाकी लिहलं ना ?
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Sat, 03/19/2011 - 00:01

Permalink

सुरेख

छान लिहिलं आहेस रे, स्पावड्या. प्रामाणिक, आतून आलेलं मुक्तक.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रदीप on Sat, 03/19/2011 - 18:01

In reply to सुरेख by नंदन

Permalink

असेच

म्हणतो. अगदी आतून आलेले मुक्तक आवडले.
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Sat, 03/19/2011 - 07:14

Permalink

सुंदर! सुंदर!! सुंदर!!!

सुंदर! सुंदर!! सुंदर!!!
  • Log in or register to post comments

Submitted by अप्पा जोगळेकर on Sat, 03/19/2011 - 14:34

Permalink

काय भारी लिहिलंय राव. १००

काय भारी लिहिलंय राव. १०० पैकी १०० मार्क. वर्किंग डे ला रिकाम्या लोकलचा प्रवास म्हणजे मनामधे विचारांची गर्दी हे समीकरण अगदी पक्क आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by पर्नल नेने मराठे on Sat, 03/19/2011 - 14:48

Permalink

छान ल्हिलेस !!!

छान ल्हिलेस !!!
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Sat, 03/19/2011 - 15:26

Permalink

स्पावड्या, लई भारी लिहिलं

स्पावड्या, लई भारी लिहिलं आहेस, असे विचार मनात येत असतात ते कुठंतरी उतरवत जा. असे विचार मनात साठले ना की युष्य फार अवघड वाटायला लागतं उगाचच. बाकी आज होळी उद्या सुट्टी काय बेत आहे, डोंबिवली एमाय्डिसिच्या नाक्यावरचं हॉटॅल नंदि पॅलेस ना तिथं पुजा आणि पार्टी असते असं ऐकलंय मी. जा बेट्या ऐश कर ऐश कर.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com