लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
मागील भाग - http://misalpav.com/node/16898
***
शाल
सेंद्रिय खताची गोणी
दुकानांचे पत्ते
श्रीफळ - http://www.freakingnews.com/images/app_images/coconut.jpg
शाल - http://www.traderscity.com/board/userpix13/5365-nepal-spun-gold-eight-treasure-shawl-1.jpg
खत - http://product-image.tradeindia.com/00349636/b/1/Ecofit-Organic-Fertilizer.jpg
क्रमशः
(पुढील मिपाकर पूढल्या आठवड्यात - ज्यांना सत्कार नको असेल त्यांनी खरड व्यनीतुन सुचना देणे म्हणजे यादीतुन नाव कटाप करता येईल. यादी लै मोठी आहे)
माझ्या लहानपणच्या ज्या आठवणी अजून लक्षात आहेत त्यातली अगदीच लख्ख आठवणारी आठवण म्हणजे, संध्याकाळी आजीबरोबर विठोबाच्या देवळात जाणे. आमच्या गोरेगावात घरापासून अगदीच जवळ अशी तीन चार देवळं होती. एक अगदीच जवळ असणारं दुर्गादेवीचं. दुसरं म्हणजे गोगटेवाडीतलं गणपतीचं, पण ते जरा लांब. आणि तिसरं हे गवाणकर वाडीतलं विठोबाचं. आजी हिंडती फिरती असे पर्यंत वारानुसार, तिथीनुसार रोज संध्याकाळी देवळात जायची. विठोबाच्या देवळात जायचं म्हणजे आरे रोड ओलांडावा लागायचा. त्यावेळी तिला सोबत लागायची. मग आमची वरात निघायची तिच्यामागे. खरं तर मलाही तिच्याबरोबर विठोबाच्या देवळात जायला आवडायचं. बाकीच्या देवळांमधून अंगारा किंवा कुंकू लावायचे तिथले पुजारी. पण एकादशीला विठोबाच्या देवळात गेलं की तिथले बुवा काळा काळा बुक्का लावायचे कपाळाला. आणि अगदी तालासुरात तिथे किर्तन चालू असायचं. ते मोहमयी वातावरण अनुभवत तासचेतास तिथे काढलेले आठवत आहे. आमच्या घरी वातावरण धार्मिक असलं तरी कर्मकांडांचं स्तोम किंवा कसलीच बळजबरी नव्हती. पण साबुदाण्याची खिचडी, किंबहुना उपासाचे सगळेच पदार्थ आवडत असल्याने एकादश्या आणि चतुर्थ्या कधी येतात त्या आम्हाला बरोब्बर माहिती असायचं. एखादे वेळेस आजी विसरली तर आम्ही आठवण करून द्यायचो. पण खरी वाट बघायची ती आषाढी एकादशीची. त्या दिवशी घरात अगदी कंपल्सरी उपास असायचा. अगदी स्वर्गिय चंगळ असायची. अशीच एक एकादशी येऊ घातली होती. मी साधारण साताठ वर्षांचा असेन. आजीच्या बोलण्यात पालखी शब्द दोन तीन वेळेला आला. मला पालखी म्हणजे साधारणसे माहित होते. पूर्वीच्या काळी राजेमहाराजे पालखीत बसत आणि त्यांचे नोकर त्या पालख्या खांद्यावर उचलून त्यांना इकडे तिकडे फिरवत. पण आजीच्या बोलण्यात काही वेगळेच संदर्भ येत होते. वारी, पालखी, पंढरपूर वगैरे. काही तरी धार्मिक संदर्भात बोलणे चालले होते हे नक्की. शेवटी आजीला विचारले तेव्हा मला ही एकंदर चालत वगैरे पंढरपूरला जायची पद्धत कळली होती. आळंदीहून ज्ञानोबाची आणि देहूतून तुकोबाची पालखी निघते आणि मजल दरमजल करत आषाढीच्या बेतास पंढरीत पोचतात. गावोगावाहून अशाच दिंड्या निघतात. लोक दिवसचे दिवस चालत पंढरीला जातात. असं सगळं तिने मला अगदी रंगवून सांगितलं. मला तर हे सगळं अगदी अद्भुतच वाटायला लागलं होतं. पण खरी गंमत अजून पुढेच होती. ती अशी...अधिक वाचा - http://misalpav.com/node/13266 ***
तर सांगत काय होतो, त्या दिवशी मात्र मी अगदी खूप शांत होतो. खूप मोठ्ठं वादळ येऊन गेल्यावर कसं सगळं एकदम शांत वाटतं तसंच वाटत होतं. मस्तपैकी आठ वाजेपर्यंत असाच लोळलो अंथरूणात. पेपरवाला पोर्या अंगणात पेपर टाकून, सायकलची घंटी वाजवून गेला मग मात्र मला राहवेना. सकाळी सकाळी मस्तपैकी वाफाळता चहाचा कप हातात घेऊन ताजं वर्तमानपत्र वाचणं हा माझा दुसरा वीकपॉईंट. चहाचा आणि त्या वर्तमानपत्राचा वास असा काही इफेक्ट करतो की पूर्ण दिवस उत्साह वाटतो. उठलो. चहा वगैरे बनवला आणि सोफ्यावर मस्त तंगड्या पसरून पेपर वाचत बसलो. "डिंग डाँग"...... डोअरबेल वाजली. च्यायला, रविवारी सकाळी ८.३० वाजता माझ्या कडे कोण तडमडलं बुवा? आश्चर्यमिश्रित राग गिळत मी दुर्लक्ष करावं का असा विचार करत होतोच तेवढ्यात डोअरबेल परत वाजली आणि या वेळी मात्र जरा लांबच वाजली. मी सणकून उठलोच. त्याच तिरीमिरीत जाऊन दार उघडलं, साले हे सेल्समन आता रविवारी सकाळी पण यायला लागले? दार उघडलं आणि चक्रावलो. एक काळा सावळा पण तजेलदार चेहरा दोन टप्पोर्या डोळ्यातून माझ्या कडे बघत होता. एक सेकंद मी गडबडलोच. माझा एवढा अपेक्षाभंग झाला होता की काय करावं बोलावं ते सुचेचना. तेवढ्यात तो चेहरा हलला, जिवणी रूंदावली आणि हलकेच कुठून तरी लांबून यावे तसे शब्द आले, "काका, माझं नाव सुमित्रा". मी एकदम भानावर आलो. नीट बघितलं तिच्याकडे. एक ८ - १०वर्षांची चुणचुणित मुलगी माझ्यापुढ्यात उभी होती. साधे कपडे, केस नीट चापून चोपून बसवलेले. हातात शाळेची वाटावी अशी एक बॅग. "काका, मी आत येऊ?" मी भारावल्यासारखा बाजूला झालो आणि ती सरळ आत येऊन सोफ्यावर बसली. माझ्या एकदम लक्षात आलं की तिला जरा दम लागल्यासारखा झालाय. धाप लागली होती हलकी. "कोण गं तू?" माझा पहिला प्रश्न तिला. "काका, सांगते पण आधी पटकन मला पाणी देता का?" आणि ती परत लांब श्वास घ्यायला लागली. माझी एकदम पंचाईतच झाली. ही कोण कुठली आणि सरळ आत येऊन बसते काय आणि पाणी मागते काय. पण तिला काहितरी त्रास होतोय हे स्पष्टच दिसत होतं. मी पटकन आत जाऊन पाणी आणलं. तिला दिलं. पाचेक मिनिटं ती तशीच डोळे मिटून शांत बसली. ती लहान जरी असली तरी एक प्रकारचं आकर्षण होतं तिच्यामधे. काय होतं ते कळत नव्हतं पण काहि तरी होतं खास. मी पण गप्प बसून ती नॉर्मलला यायची वाट बघत बसलो. थोड्यावेळाने तिने डोळे उघडले आणि परत ते मगाच्चं गोड हसू हसली.अधिक वाचा - http://misalpav.com/node/4662 *** मंडळी वरती जे दोन परिच्छेद दिले आहेत ते सदर लेखकाची क्षमता दाखवुन देण्यास पुरेसे असले तरी तो लेखक केवळ एवढेच लिहु शकतो असे नाही. त्याचे अधिक लेखन http://misalpav.com/newtracker/322 इथे वाचता येईल. बरोबर आहे मंडळी, हा लेखक आहे बिपिन कार्यकर्ते :) ह्याच्या बद्दल काय बोलायचे? मिपावरील एक भला मनुष्य असेच याचे वर्णन करता येईल. मी पामर काय बोलणार याच्या बद्दल. ह्याचे लेखन, प्रतिसाद ह्याच्याबद्दल पूर्ण माहिती देतात. बिपिन आमच्या या आठवड्याचा "डोक्यात तिडीक आणणारा मिपाकर" आहे. कारण सरळ आहे त्याचा लेख, कथा वाचुन युगे लोटली आहेत. त्याच्याकडे "माती" आहे, बियाणे आहे पण बाग काही फुलत नाही. हरकत नाही. आम्ही त्याला एक खताची गोणी भेट देत आहोत ती त्याने वापरावी. बाग फुलवावी आणि त्याच्या बागेतील फुललेल्या फुलांचा बहर आम्हाला पहायला मिळावा. त्याच बरोबर शाल श्रीफळ पण देत आहोत त्याचा त्याने स्विकार करावा आणि लवकरात लवकर सुरेख लेख लिहावा अशी आमची इच्छा ! बाकी तो ठरवेल ते मान्य. कसे? श्रीफळ
शाल
सेंद्रिय खताची गोणी
दुकानांचे पत्ते
श्रीफळ - http://www.freakingnews.com/images/app_images/coconut.jpg
शाल - http://www.traderscity.com/board/userpix13/5365-nepal-spun-gold-eight-treasure-shawl-1.jpg
खत - http://product-image.tradeindia.com/00349636/b/1/Ecofit-Organic-Fertilizer.jpg
क्रमशः
(पुढील मिपाकर पूढल्या आठवड्यात - ज्यांना सत्कार नको असेल त्यांनी खरड व्यनीतुन सुचना देणे म्हणजे यादीतुन नाव कटाप करता येईल. यादी लै मोठी आहे)प्रतिक्रिया
हे... धत्तड तत्तड, धत्तड तत्तड....
उत्तम उपक्रम !!! या निमित्ताने अनेक जुने आणि चांगले लेख वाचायला मिळत आहेत.
या सर्व मिपाकरांनी लवकर लिहिते व्हावे अशी इच्छा आहे.
मिपावर हल्ली फक्त चर्चाच होत आहे. ललित लेखनाचा दुष्काळ आहे. तो या निमित्ताने दूर व्हावा.
मिपावर हल्ली फक्त चर्चाच होत आहे.हॅ हॅ हॅ म्हणतात ना "रिकामा सुतार, चर्चा करी फार" ;) (सौजन्य टारु)
ललित लेखनाचा दुष्काळ आहे. तो या निमित्ताने दूर व्हावा.+१
असेच म्हणतो!
पण मिष्टर शेख बिकाजान आमचा जीव घेतील म्हणून काही बोललो नव्हतो.
बिकाजीभाई पटेल म्हणजे मोटा मानुष!! यांच्याबद्दल आपण कै बोलतच नै ना, ते गुजरातवरुन आले परत की लिहीतील अशी अपेक्षा. आणि शेख अलदुबैना इथेच ह्याप्पी बर्डेच्या शुभेच्छा!
--असुर
क्षमस्व !
हा भाग मला वाचताच नाही आला, एक अक्षर लागेना व्यवस्थित.
पुढील भागासाठी शुभेच्छा :)
- छोटा डॉन
बिकाने लिहायला पुन्हा सुरुवात करावी अशी मागणी नोंदवते.;)
रेवतीप्रमाणेच मी ही बिकाने लवकारात लवकर काहीतरी फर्मास वाचायला द्यावे अशी मागणी करते आहे.
स्वाती
पुर्ण सहमत.
बिकांना लेखासाठी शुभेच्च्छा.
नाना पेटलेलेच दिसतायत...
पण,अतिशय उत्तम उपक्रम..या सगळ्या मिपाकरांनी लवकर लिहिते व्हावे ही मागणी.
बिका, लवकर काहीतरी लिहा.
वेगवेगळी फुले उमलली, रचुनि त्यांचे झेले
एकमेकांवरी उधळले, गेले ! ते दिन गेले ॥
असो. नानाने आठवण काढल्याबद्दल लै धन्यवाद. ते दिवस अजूनही आठवतात. मिपावर लोक भरभरून खूप काही चांगलं लिहित होते. मजा येत होती. माझा जिवलग मित्र मुक्तसुनीतने प्रोत्साहन दिले म्हणून 'माझे खोबार' लिहायला घेतले. आणि लिहित गेलो. आयुष्य थोडं स्थिरस्थावर झाल्यावर परत लिहिनच. 'माती' डोक्यात आहे, कागदावर येईल तेव्हा येईल... मी बळजबरी करणार नाही. अजूनही काही आहे डोक्यात. बघुया.
पण मला लेखनापेक्षा वेध लागले आहेत, उत्तमोत्तम वाचायचे.
दिस येतील दिस जातील, भोग सरंल सुख येईल.
काय बोलणार बाबा आपण. मोठी