सचिन ला उर्मट लोकांत आणुन त्यामगाची थियरी जी मांडलीत ती शब्दशः.पटवुन सांगायची पद्धत आवडली.
कणेकर पाठ केलेत वाटतं?
फार छान लिहिलेस सगळेच पुष्प १ नं.
नेक्ष्ट कोन रे?
जर व्हिव रिचर्ड्स उर्मटांच्या शाळेचा मुख्याध्यापक असेल तर सचिन आणि गांगुली हे त्याच्या शाळेतून बाहेर पडलेले गुणवत्ता यादीतले विद्यार्थी आहेत. सचिनपेक्षा त्याची बॅट जास्त उर्मट आहे.
आजपर्यंत सचिनमुळे घरी बसून सामने बघायला लागणारे खेळाडू मोजायला गेलो तर त्याचेदेखील शतक झाल्याचे लक्षात येईल.
उर्मटांच्या शाळेत गांगुली बहुतेक रेकॉर्डहोल्डर असावा.
--असुर
गांगुलीचे लॉर्ड्स वर शर्ट काढून फिरवणे या इतके सॉलीड दृष्य भारतीय संघाने कधीच पाहिले नव्हते. त्या एका दृश्याने भारतीय संघ गोर्यांविरुद्ध "माज" दाखवू शकतो हे सिद्ध केले
लेख काय तुमचा प्रतिसाद काय.. इतका 'वाईड बॉल' आजवर बघितला नाय बा.. =)) =))
http://www.misalpav.com/sites/all/modules/bueditor/icons/quote_s.png
त्या ९८ धावा तर जागतिक उर्मटपणाचे पारितोषिक मिळवु शकल्या असत्या.
तो असले अपमान विसरत नाही. सचिनला बाद केल्यावर भर मैदानात भांगडा केलेल्या ओलोंगाला नंतर त्याने असेच धरुन धरुन बडवले होते.
अगदी अगदी! पाकिस्तान विरूद्ध विश्वचषकातला सामना.. ते चार्ज्ड वातावरण.. अब्जो लोकांच्या अपेक्षांचं ओझं .. नि तरी साहेब तितकेच निर्विकार .. कसं जमतं या माणसाला कोडंच आहे ब्वॉ..
बाकी ओलोंगासारखाच मॅग्रालाही धरून धरून बडवला होता त्यानं.. कॅडीकनंही नाही का फुकाची बडबड केली होतीन २००३ च्या वर्ल्डकपमधल्या सामन्याआधी आणि आता त्याला सचिन म्हटला की फक्त तो षटकार आठवत असेल!!
लेख मस्तच रे मृत्युंजया! फक्त सचिनची बॅटिंग क्रूर वाटली नाही कधी त्यामुळे जरा 'उर्मट-उद्धट' वगैरे विशेषणं पटायला वेळ लागला जरा.. पण मुद्दा एकदम मान्य! छान लिहिलंय!
हे पुष्पही आवडलेच
मी त्याच्या कारकीर्दीबद्दल काही लिहिणार नाही आहे. लिहायची इच्छाच नाही आहे.
येथे फक्त एक लहानसा बदल सुचवू इच्छिते..
इच्छा ऐवजी गरज... :)
बाकी मस्तच..
४थ्या उर्मटवीराची वाट पाहत आहे,
स्वाती
परंतु सचिनला उर्मट म्हणण्यापेक्षा बेडर आणि सडेतोड म्हणणे जास्त आवडेल. इतर महान खेळाडू आणि सचिन ह्यात हाच फरक मला नेहेमी जाणवत आलाय की आपल्या गुणवत्तेचा पुरेपूर माज बरेच मोठे खेळाडू दाखवतात आणि सचिन फक्त बॅटनेच बोलतो!
तरीही चांगल्या लेखाबद्दल तुझे कौतुक आहे! पुढचे शिरोमणी कोण ते बघायची उत्सुकता लागली आहे.
-रंगा
आमच्या लाडक्या सचिनला उद्देश्यून 'उर्मट' असे जरी "अत्यंत नाईलजास्तव" श्री.मृत्युन्जय यानी म्हटले असले तरी या लेखमालेचा तो एक भाग आहे म्हणून तिकडे दुर्लक्ष करावे असे वाटते...पण क्रिकेट विश्वातील कुठलाही देश त्याला 'उद्धट, उर्मट, आगावू, बेफिकीर, गुर्मीत असणारा...' अशी विशेषणे कदापिही लावण्याचे इच्छिणार नाही, इतकी सचिनची प्रतिमा धवल आहे.....[ती वरील काही उदाहरणावरून लेखकाने अधिकच स्पष्ट केलेली आहे....]
या देशात संगीतक्षेत्रातील अढळ तारा "लता" नावाचा तसा प्रत्येक क्रिडारसिकाच्या हृदयी वसलेला हा तारा "सचिन...". या लेखाच्या निमित्ताने या दोन तार्याच्या भेटीचा एक फोटो आपल्या सर्वांसाठी. [नेटवर हा फोटो सर्वानी पाहिला असणारच, पण तरीही या लेखाला पूरक आहे म्हणून इथे देत आहे....]
" alt="" />
लेख आवडला हे वेगळे सांगणे न लगे.
इन्द्रा
मस्त लेख झालाय
सचिन च्या तेंडूलकर ह्या गेटवे जवळील उपहारगृहात सहपत्नी ४ वर्षापूर्वी गेलो होतो .तिथला बार चा व्यवस्थापक माझा मित्र (सचिन भक्त ) तेथे मायकेल शूमेकर आणि सचिनचा एकत्र भलामोठ्ठा फोटो होता ..(त्यांचा जाहिरातीमधील ).
कुटुंब उद्गारले '' हा तर आमच्या देशाचा लिजेंड ''
''आणि हा आमच्या '' (इति मी )
ज्या दिवशी सचिनने शोहेबाची पिसे काढली २००३ मध्ये
उपहारगृहात सर्वांना शेंपेन पाजण्यात आली .
क्रिकेट आमचा धर्म
सचिन आमचा देव
सचिनला उर्मट म्हटल्याबद्दल ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील त्यांची जाहीर माफी. त्याला उर्मट म्हणलेच नाही आहे अॅक्चुयली. त्याच्या बॅटला उर्मट म्हटले आहे. :)
या मालिकेत सचिनवरचा लेख खरे म्हणजे ६ / ७ वा येणार होता पण उद्याच्या सामन्याचा मुहुर्त दाधुन जरा लवकर टाकला. :)
या लेखामालिकेत सौरव गांगुलीचा समावेश करण्याची जबरदस्त इच्छा होती. पण दुर्दैवाने त्याचे नाव या लेखमालिकेत येणार नाही आहे. त्याचा सूड तुम्हा सर्वांवर त्याच्यावर एक वेगळा लेख लिहुन काढण्यात येइल.
मनापासुन धन्यवाद आपले ...
सचिन बद्दल हि खुप छान लिहिले आहे.. खुप आवडले .. गेल्या भागातच याचे नाव यावे असे वाटले आणि लगेच पुढचा भाग सचिन म्हंटल्यावर खुपच छान वाटले.
पुढचा भाग कदाचीत : रीकी पाँटींग असेल असे वाटते..
अवांतर : बिच्चारा गांगुली .. कारकिर्द खुपच छान असताना ही तो दुर्दैवीच ठरला ..आणि येथे ही त्याचे तेच दुर्दैव आड आले वाटते.
ह्या सगळ्यात सचिन आणि वॉर्न बद्दलचे सारेच कसे र्हायले???
अता ह्या लेखाच्या शेवटापासून पूर्ण-विरामा पर्यंतचा उरलेला सचिनही लिहुन टाका. आणि मग त्यात नमनाला मात्र (अर्थातच-घडाभर! ;) ..) वॉर्न'च टाका . म्हणजे कसं, अनुष्ठानाची-सांगता जाहल्या सारखे कृतकृत्य वाटेल.
प्रतिक्रिया
छान
क ड क
डु प्रतिसाद काढला आहे.
डु प्रतिसाद काढला आहे.
सचिन ला उर्मट लोकांत आणुन
जर व्हिव रिचर्ड्स उर्मटांच्या
गांगुलीचे लॉर्ड्स वर शर्ट
लेख काय तुमचा प्रतिसाद काय..
मस्त मस्त..
संपादित. सुचनेबद्दल धन्यवाद.
माईक कास्प्रोवीच
लेखामागची भावना आवडली
दोन तारे....!!
मस्त!!
जमला आहे लेख एकदम झकास
मस्त लेख झालाय सचिन च्या
सचिनला उर्मट म्हटल्याबद्दल
मनापासुन धन्यवाद आपले ...
सुंदर लेख!पण
पण