भीमाशंकर -भाग १- गुप्त भीमाशंकर
शनिवारी संध्याकाळी भीमाश़ंकरला जायचा कार्यक्रम ठरतो व रविवारी आम्ही ६ जण चुलत, आते भावंडे सकाळी लवकरच निघतो. गाडी मंचर मार्गे घोडेगावला थांबते. मिसळीचा कार्यक्रम उरकला जातो. पुढे शिनोली गाव मागे टाकून डिंभे धरणापाशी येतो. घाट चधून वर जाताच डिंभे धरणाचा विस्तृत जलाशय डोळ्यांसमोर येतो. धरण सर्व बाजूंनी अजस्त्र पहाडांच्या कोंदणात बसलेले दिसते. धरण मागे टाकून पुढे जातो. वाटेत तळेघर, निगडाळे अशी गावे लागत जातात. व थोड्याच वेळात भीमाशंकराच्या सदाहरीत अरण्यात प्रवेश होतो. आता घाटमाथ्यावर आल्याची जाणीव व्हायला लागते. सुखद गार वारा सुटलेला असतो. भीमाशंकर गावात प्रवेश करतो. गाडी पार्कींगला लावली जाते. एस. टी स्टँडच्या मागेच कोकणकडा आहे. आधी कोकणकडा बघितला जातो व आम्ही भीमाशंकरच्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घ्यायला निघतो. भीमाशंकराचे मंदिर खोलवर आहे. पायर्या उतरून खाली जावे लागते. रविवार असल्याने गर्दी असते. रांगेत उभे राहतो. यथावकाश डाकिनी वनातल्या महादेवाचे दर्शन होते. भीमाशंकराचे मंदिर बहुत प्राचीन आहे. पेशव्यांनी याचा जीर्णोद्धार केला. अतिशय सुबक कोरीवकामाने हे हेमाडपंथी बांधणीचे मंदिर सजलेले आहे. मंदिरासमोरच चिमाजीअप्पांनी वसईच्या किल्ल्यातून जिंकून आणलेल्या घंटांपैकी एक अजस्त्र घंटा लावलेली दिसते. मंदिराभोवती पाण्याची २/३ कुंडे आहेत पण अस्वच्छ.
आता आमचे लक्ष्य असते ते गुप्त भीमाशंकर. हे भीमाशंकराचे मूळ स्थान मानले जाते. मंदिरापासून जवळजवळ १.५ ते २ किमीवर असून घनदाट जंगलात वसलेले आहे. भीमानदीचे मूळ उगम ज्योतिर्लिंगात आहे परंतु ती तिथून गुप्त होते असे मानले जाते. ती पुन्हा प्रकत होते ते गुप्त भीमाश़ंकरात असे म्हणतात. देवळाच्या पाठीमागूनच गुप्त भीमाशंकराला जायचा रस्ता आहे. थोडेसे खाली उतरताच घनदाट जंगलाला सुरुवात होते. भीमाश़ंकराच्या जंगलाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वसाधारणपणे घाटमाथ्यावर आढळणार्या खुरट्या झाडांपेक्षा इथले जंगल थोडे वेगळे आहे. इकडे अतिशय मोठमोठे वृक्ष आढळतात. अजस्त्र बुंधा, अतिशय उंच वाढत गेलेले झाड, वेड्यावाकड्या फांद्या यामुळे इथली वने शेकरूचे आश्रयस्थान बनले असल्यास नवल नाही.
आम्ही जंगलात चालतच असतो. वाटेत जागोजागी गुप्त भीमाशंकराच्या मार्गदर्शक पाट्या लावल्यात तसेच एकमेव ठळक वाट त्यामुळे वाट चुकण्याच्या संभव नाहीच. मध्येच सुतारप़क्ष्याची टोक टोक ऐकू येत असते. तांबट कुटुर्र...कुर्र अशी साद घालतो, क्षणात हुप्प्याचे किंचाळणे ऐकू येते, झाडावरून शेकरू थोडीशी झलक दाखवून पसार होते. बाजूलाच रानातल्या एका सर्वांगसुंदर पक्ष्याचे दर्शन होते. पॅराडाइज फ्लायकॅचर अर्थात स्वर्गीय नर्तक. हा लांब शेपटीचा पक्षी अतिशय देखणा आहे.
आता समोर एक छोटेसे मंदिर दिसते ते आहे सा़क्षीविनायकाचे. दर्शन घेउन पुढे जाताच एक तीव्र उतार आपल्याला थेट ओढ्यात घेउन जातो. तीच भीमानदी. ओढा ओलांडून पलीकडच्या बाजूने खाली जायला रस्ता आहे बरोबर ओढ्याच्या खाली एक छोटासा धबधबा दिसतो. त्याच्या खालीच पिंडीसदृश आकार नैसर्गिकरित्या तयार झालाय तेच गुप्त भीमाशंकर. तिथून आम्ही पलीकडच्या बाजूने जाण्यास निघतो. सुरुवातीला अतिशय तीव्र चढ चढून जातो. वाटेत ठिकठिकाणी झाडांवर एक प्रकारची बुरशी दिसते. हीच पावसाळ्यात अंधारात चकाकून निघत असते व सर्व जंगल प्रकाशमान होत असते. हा प्रकार पाहायला मात्र पावसाळ्याच्या रात्री इकडे यायची हिंमत दाखवायला लागते. परत तिकडून पाउण तासात आम्ही मंदिरापाशी येतो. पायर्यांवरील दुकानांतून विक्रीस ठेवलेला गरमागरम कढईतला ताजा खवा व कुंदा विकत घेतला जातो. पायर्या चढून परत पठारावर येतो. आता पुढचे लक्ष्य असते ते हनुमान तळे व त्यापुढील नागफणीचा कडा.
भीमाशंकराचे मंदिर-
गुप्त भीमाशंकरला जाताना-
गुप्त भीमाशंकर
एक झाड फुललेले
क्रमशः
Book traversal links for भीमाशंकर -भाग १- गुप्त भीमाशंकर
वर्गीकरण
प्रतिक्रिया
शेकरू
फक्त झलक
शेकरु म्हनजे काय? बाकि फोटो
शेकरू...
१. २. वरील चित्र जाला वरून
यात काय कठिण आहे कळत नाही
सारी दादा...जरा घाईत
९० मध्ये गेलो होतो (शाळेला
होय
मस्त रे वल्ली. ९३ ते ९७ सलग
३ घाटवाटा आहेत
मीही गेलो होतो मित्रमैत्रिणी
जायला आवडेल
एकदम सुंदर फोटो.. अजून हवे
झक्क्कास!
जवळच आहे
छान
वर्णन आवडले
डाकिनी वन
झकास!
प्रवासवर्णन फारच छान झाले
वल्ली, चित्रयम प्रवासवर्णन
वल्ली मस्त सुरुवात. फोटू आणि
कारण
अरे वा मस्त फोटो .. पुढच्या
बम बम भोले. २००५ साली
२६ जानेवारीला (बुधवारी) गेले होते
घ्या...
उत्कृष्ट