तो.पा.सुटल की नाही ?
चिंच दिसली की लहानपण डोळ्यासमोरुन गेल्याशिवाय राहत नाही. ही चिंच पाहून तोंडाला पाणी सुटणार नाही असे फार क्वचीतच आढळतील. मी लहान असताना भरपुर चिंचा खायचे. शेताच्या बांधावर जाऊन झाडावर दगड माडून चिंचा पाडायच्या आणि तिथेच झाडाखाली बसुन घरुन पुडीत बांधून आणलेला मिठ मसाला लावुन खायचा हे उद्योग बर्याचदा चालायचे. असे खाउन मन नाही भरायच तेंव्हा त्याच चिंचा घरी नेउन परत त्याची चटनी बनवायची आणि खायची. गोबोळी चिंचा शोधायलाही मजा यायची. चिंच हलवायला खास माणूस यायचा तेंव्हा मग त्या पिकलेल्या चिंचेत एखादी गाबोळी चिंच मिळाली की खुप आनंद व्हायचा. पिकलेल्या चिंचा आई-आजी घरात ठेवायच्या आणि संध्याकाळी फोडत बसायच्या आणि फोडून त्याचे जाड्या मिठात मिसळून गोळे करायच्या तेंव्हा त्यातही जाउन हात मारायचे. मग मात्र आई ओरडायची. अग किती चिंचा खातेस ? जास्त आंबट खाउ नकोस, आत्ता मजा वाटते खायला वय झाल की त्रास होईल. आणि आता तेवढ वय न होताही खरच मला संधीवाताचा त्रास होतो मधुन मधुन आणि आईचे ते शब्द आठवतात. पण आईला आता हे सांगण्याची हिंमत होत नाही. आई अजुनही ह्या चिंचा फोडत असते वय झालय तरी पण मी वय न होताही चिंचा खाण बंद केलय. (दु:खी बाहुली). फक्त जेवणातल्या काही पदार्थात तेही खुप कमी प्रमाणात चिंच घालते.
ह्यात चिंचेचा दोष काहीच नाही. माझ्या हट्टिपणाचा आणि कंट्रोलही नही होताचा आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक बरा नाही हे आई हजारवेळा सांगुनही मी तिच्यापासुन चोरून खायचे कधी कधी.
ह्या फुलांवरून हेही आठवत की चिंचा पाडून झाल्या की एखाद महिन्यातच लगेच दुसरी फुले येतात मग ती फुले आणि झाडाचा कोवळा पालाही मी खायचे. आणि झाडाला नुकतीच पकडलेली चिंच तर मला खुपच आवडायची.
हे पाहुन तुमच्याही काही लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या असतील त्या आपण शेअर करुया.
ह्या फुलांवरून हेही आठवत की चिंचा पाडून झाल्या की एखाद महिन्यातच लगेच दुसरी फुले येतात मग ती फुले आणि झाडाचा कोवळा पालाही मी खायचे. आणि झाडाला नुकतीच पकडलेली चिंच तर मला खुपच आवडायची.
हे पाहुन तुमच्याही काही लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या असतील त्या आपण शेअर करुया.
प्रतिक्रिया
चिंचा पाहुन तोंडाला पाणी
चिंचा नाही खाल्ल्या फारशा...
चालायचंच, कुणाला चिंचाची ओढ
तों पा सु
मी शाळेत असतांना खूप चिंचा
लेख वाचून शाळेत गेलो...
आईग्ग! अनेक आठवणी
वा!
मी चिंचोके धुवून ठेवून देत
आम्ही तर
मला चिंचांपेक्षा भाजलेले
त्याहीपेक्षा
आमच्या दातार कॉलनी मध्ये मोठे
थोड्याच चिंचा, बराच पाला खाल्ल्याची आठवण आली
फार फार आवडायची चिंच. शाळेजवळ
मस्त आठवणी जाग्या केल्यात...
तों पा...
गुलमोहराच्या फुलामध्ये राजा
तो.पा.सुटल.
आम्ही पण...
सगळ्यांच्या आठवणी मस्त आहेत.