✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

कातीन हत्याकांड ... दडवलेला इतिहास...

भ
भडकमकर मास्तर यांनी
Wed, 09/15/2010 - 03:26  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
36219 वाचन

💬 प्रतिसाद (75)

प्रतिक्रिया

नेताजींची नाव अजुनही

मृत्युन्जय
Fri, 09/17/2010 - 16:03 नवीन
नेताजींची नाव अजुनही दुसर्‍या युद्धाच्या गुन्हेगारांमध्ये येते म्हणे. कारण त्यांनी हिटलरची मदत स्वीकारली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी

आता यात चर्चिल यांचा हात

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 09/17/2010 - 18:06 नवीन
आता यात चर्चिल यांचा हात नसावा, नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

छे छे. चर्चिल सारखा सहृदय

मृत्युन्जय
Fri, 09/17/2010 - 23:54 नवीन
छे छे. चर्चिल सारखा सहृदय आणि सज्जन माणूस असा खोडसाळपणा करेल असे वाटत नाही मला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

इन्द्र्राज पवार

Pain
गुरुवार, 09/16/2010 - 19:01 नवीन
चर्चिल त्याच्या देशासाठी जसा होता त्या तुलनेत तेव्हाचे किंवा आत्ताचे राजकारणी (आपल्या देशासाठी) काहीच नाहीत असे त्यांना म्हणायचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

सुरेख प्रतिसाद

यशोधरा
Wed, 09/15/2010 - 14:36 नवीन
सुरेख प्रतिसाद पुष्का. मध्यंतरी लोकप्रभा मध्ये पोलंडवर अतिशय सुरेख लेखमाला येत होती. अजूनही येत आहे का, कल्पना नाही. त्यात लेखकाने पोलंडवर झालेले अत्याचार, अजूनही त्याच्या जपलेल्या खुणा, एकूणातच ह्या अत्याचारांचे तेथील जनमानसावर झालेले व आजही टिकलेले मानसिक परिणाम ह्यासंबंधी अतिशय प्रभावी पद्धतीने लिहिलेले आहे. वाचताना सुन्न व्हायला होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी

प्रकाटाआ.

यशोधरा
Wed, 09/15/2010 - 16:09 नवीन
प्रकाटाआ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी

पोलंड आणि आंद्रे वायदा

चिंतातुर जंतू
Wed, 09/15/2010 - 14:00 नवीन
पोलंडचा एकंदरीत इतिहास हा फारच करुण आहे. दुसर्‍या महायुध्दाअगोदरही रशिआ, ऑस्ट्रिआ आणि जर्मनीसारख्या सत्तापिपासू राष्ट्रांच्या आक्रमणांपायी पोलंड दबला आणि विभागला गेला होता. पहिल्या महायुध्दात दोस्त राष्ट्रं जिंकली तेव्हा कुठे पोलंडला स्वतंत्र राष्ट्र म्हणून काही वर्षं जगता आलं, पण दुसर्‍या महायुध्दानं पुन्हा ते सर्व नष्ट केलं. युरोपातलं एक संस्कृतीसमृध्द पण दुर्लक्षित राष्ट्र म्हणून पोलंडची पहिल्यांदा जाणीव ग्युंटर ग्रासच्या 'टिन ड्रम' या कादंबरीनं करून दिली. या कादंबरीवर निघालेला चित्रपटही खूप चांगला आहे. त्याला परकीय चित्रपटासाठीचं ऑस्कर आणि कान महोत्सवामध्ये पारितोषिक होतं. खुद्द आंद्रे वायदा ('कातीन'चे दिग्दर्शक) यांच्या इतर चित्रपटांत होणारं पोलंडचं दर्शन अतिशय हृद्य आहे. 'अ‍ॅशेस अ‍ॅन्ड डायमंड्स' (१९५८) मध्ये दुसर्‍या महायुध्दाच्या अखेरची सत्तास्पर्धा दिसते. तर 'मॅन ऑफ मार्बल' (१९७६) मध्ये लेक वॉवेन्सा यांच्या सॉलिडॅरिटी चळवळीचा काळ दिसतो. वायदांच्या 'दॉन्तों'(१९८३) या चित्रपटात त्यांनी त्यांचे आस्थाविषय फ्रेंच राज्यक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मांडून त्यांना वैश्विक परिमाण दिलं. हे सर्व (आणि त्यांचे इतरही अनेक) चित्रपट पाहण्यासारखे आहेत. मी त्यांची गणना जगातल्या सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शकांमध्ये करतो.
  • Log in or register to post comments

मास्तरांचा लेख बर्‍याच

मराठमोळा
Wed, 09/15/2010 - 14:25 नवीन
मास्तरांचा लेख बर्‍याच दिवसांनी वाचला.. :) लेख वाचुन डोक्यात झिणझिण्या आल्या.. काहीच समजेना.. सविस्तर प्रतिसाद.. वेळ मिळाल्यास..
  • Log in or register to post comments

मास्तरांनी खुप दिवसाने

गणपा
Wed, 09/15/2010 - 14:48 नवीन
मास्तरांनी खुप दिवसाने किबोर्ड वरची धुळ झटकली ते बर केलं. या घटने बद्दल फार थोडी माहिती होती. पुष्करिणीच्या प्रतिसादानेही माहितीत अजुन भर पडली. शोधुन पाहातो मिळतो का हा चित्रपट.
  • Log in or register to post comments

चित्रपट पाहिला पाहिजे

डॉ.प्रसाद दाढे
Wed, 09/15/2010 - 15:39 नवीन
पोलंडवर अनन्वित अत्याचार झालेले आहेतच. परंतु नुकतेच मी गिरीश कुबेरांचे 'युद्ध जिवांचे' हे रासायनिक व जैविक युद्धांवरचे पुस्तक वाचले आहे; त्यावरून एकंदरीत मानवजात ही अति; अतिशयच क्रूर आहे (ज्यात कोणीही अपवाद नाहीतः अमेरिकन, रशियन, इंग्लिश, ज्यू, अरब, जर्मन, जपानी, चिनी कोणी कोणी अपवाद नाहीत) अश्या निष्कर्षाला मी आलो आहे. त्या पुस्तकाचा एव्हढा सुन्न इफेक्ट माझ्यावर झाला आहे की माझ्या संवेदनाच बधीर झाल्या आहेत.. खरं म्हणजे हे सगळे नरसंहार वाचून अजून मानवजातीचा कुठलाच प्रकार (उदा ज्यू वा पोलिश लोक) संपूर्ण नष्ट कसा झाला नाही ह्याचेच आश्चर्य वाटू लागते. बिचारे माळढोक पक्षी किंवा चित्त्यासारखे प्राणीच पूर्णपणे नाहीसे व्हायच्या मार्गावर आहेत..
  • Log in or register to post comments

निशब्द ..

गणेशा
Wed, 09/15/2010 - 17:06 नवीन
शहारा
  • Log in or register to post comments

निशब्द ..

गणेशा
Wed, 09/15/2010 - 17:06 नवीन
शहारा
  • Log in or register to post comments

निशब्द ..

गणेशा
Wed, 09/15/2010 - 17:06 नवीन
शहारा
  • Log in or register to post comments

चित्रपट बघवेल की नाही हे

युयुत्सु
Wed, 09/15/2010 - 17:51 नवीन
चित्रपट बघवेल की नाही हे माहित नाही पण ओळ्ख मात्र सुंदर
  • Log in or register to post comments

सुपर्ब!!

ऋषिकेश
Wed, 09/15/2010 - 23:48 नवीन
बरेच दिवसांनी आलात पण एकदम धमाका केलात.. अतिशय छान लिहिले आहे.. आधी इतिहास समजावून मग चित्रपटाबद्दल माहिती देणं आवडलं.. पोलिश जनतेवर रशियाचे अत्याचार किंवा ज्यूंवरचे अत्याचार हे नृशंस शब्द छोटा म्हणावा असे आहेतच तसेच नाझींचे जिप्सी लोकांना संपवणे, विविध युरोपियनांनी रेड इंडियन्सना नामषेश करणे, ऑस्ट्रेलियातील स्टोलन जनरेशन्सचा इतिहास, तिबेटींवर लाल चायनाचा संहार हे सारे याच पठडीत मोडणारे एक माणूस म्हणून आपली असहायता अधिक ठळक करणारी उदाहरणे.
  • Log in or register to post comments

सुंदर ओळख.

ज्ञानेश...
Wed, 09/15/2010 - 18:41 नवीन
पुष्करिणी यांचा प्रतिसादही आवडला. चित्रपट नक्की बघणार.
  • Log in or register to post comments

युद्धस्यः....

वाटाड्या...
Wed, 09/15/2010 - 20:44 नवीन
कोण म्हणेल युद्धस्यः कथा रम्या...कदाचित आतापर्यंत फक्त. मास्तर बर्‍याच दिवसांनी छान लेखन..धन्यवाद...विकीपिडीयावरची (mass grave) ची चित्रं अशीच जिवघेणी आहेत. इच्छुकांसाठी.... १. असाच एक अजुन चित्रपट फक्त विषय वेगळा...अर्थात मनुष्याचाच तेही त्याच्या नॄशंस हत्यारी स्वभावाचा..(The Devil Came on Horseback) नावाचा. २. Behind Enemy Lines (2001) - नक्की पहावा असा चित्रपट. ह्या मधे सुद्धा अशीच काही नॄशंस सीन्स आहेत. - वाटाड्या...
  • Log in or register to post comments

सिनेमा बघायचा म्हणजे मानसीक तयारी करूनच बसावे लागेल.

चिंतामणी
Wed, 09/15/2010 - 22:28 नवीन
परीक्षण वाचुन सुन्न झालो. सिनेमा बघायचा म्हणजे मानसीक तयारी करूनच बसावे लागेल. भ.मा. परीचयाबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

अप्रसिद्ध हत्याकांड

धनंजय
गुरुवार, 09/16/2010 - 02:29 नवीन
वाचण्यालायक लेख आणि चर्चा. धन्यवाद. हे हत्याकांड जितके मोठे आहे, त्या मानाने अप्रसिद्ध आहे. दुसर्‍या महायुद्धानंतरच्या आंतरराष्ट्रीय राजकरणाचे वेगवेगळे पैलू वर प्रतिसादकांनी सांगितलेलेच आहेत. ("एनिग्मा" नावाच्या चित्रपटात या हत्याकांडाचा उल्लेख बघितला, तेव्हा याच्याबद्दल मी पहिल्यांदा ऐकले.)
  • Log in or register to post comments

प्रभावी

नंदन
Fri, 09/17/2010 - 05:55 नवीन
लेख. पुष्करिणी यांचे प्रतिसादही आवडले. कॅझिन्स्कींच्या विमानाला झालेल्या अपघातावेळीच प्रथम ह्या हत्याकांडाबद्दल वाचलं होतं. तिथे श्रद्धांजली वाहून परत येत असताना अपघात होणे हा '...अकस्मात तोही पुढे जात आहे' चा दुर्दैवी पडताळाच.
  • Log in or register to post comments

वाचनिय लेख आणि चर्चा. चित्रपट

स्वाती२
Fri, 09/17/2010 - 17:02 नवीन
वाचनिय लेख आणि चर्चा. चित्रपट बघायला धीर नाही होणार.
  • Log in or register to post comments

मास्तरांचे नेहमी प्रमाणे

कवटी
Sat, 09/18/2010 - 02:48 नवीन
मास्तरांचे नेहमी प्रमाणे सुंदर परिक्षण! पुष्करिणी, पवार्,म्रुत्युंजय, यांच्या माहितीपूर्ण प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो

आनंदयात्री
Sat, 09/18/2010 - 05:58 नवीन
हेच म्हणतो. हिस्टरी चॅनल बघत दिवस काढल्याचा फील आला :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवटी

सुन्न करणारा चित्रपट

रंगासेठ
गुरुवार, 10/28/2010 - 09:09 नवीन
मास्तर हा चित्रपट कालच पाहिला. सुन्न झालो. तुमच्या परिक्षणात दिल्याप्रमाणे रशियाचा नालायकपणा दिसून येतो. चित्रपटात या हत्याकांडाचा जर्मनी व नंतर रशिया हे एकमेकांविरुध्द कसे करतात यातून त्यांच्या निगरगट्टपणाची जाणीव होते. या चित्रपटाबद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

थर्ड आय एशियन फिल्म

मेघना भुस्कुटे
Sat, 10/30/2010 - 22:59 नवीन
थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिवलमधे आज 'कातिन' पाहिला. तुमच्या अभ्यासपूर्ण पार्श्वभूमी-लेखनाचा प्रचंड उपयोग झाला, मास्तर. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा