मराठा लाईट इनफंट्री - भाग - २
मराठी लाईट इनफंट्री... भाग १ , भाग २ , भाग ३ , भाग ४ , भाग ५
***
दुसर्या महायुध्दातील मराठ्यांचा पराक्रम/शौर्य. भाग- २
या अगोदर या रेजिमेंटची अजून थोडिशी माहिती घेऊयात. अर्थात ही आपल्याला माहीती आहेच कारण महाराष्ट्रातील प्रत्येक लहान मुलगा वा मुलगी लहानपणी खेळताना ही घोषणा देतेच.
या रेजिमेंटची युध्दघोषणा आहे -
“छत्रपती शिवाजी महाराज / की जय !
हर हर / महादेव”.
प्रमूख पहिला जयजयकार करतो आणि बाकीचे त्याला जय ! आणि महादेव म्हणून साथ देतात.
असो.
जर्मनी आणि इंग्लंडपासून भारत बराच दूर असला तरी जशी जशी युध्दाची धग वाढू लागली तसे तसे हे अंतर कमी होऊ लागले. सर्वच जगाला या युध्दाने ग्रासले आणि जवळ जवळ सगळ्याच देशांना कुठली ना कुठली तरी बाजू घेणे भाग पडू लागले. भारत तर इंग्लंडचाच भाग असल्यामुळे भारतीय सैन्याला या युध्दात भाग घ्यायलाच लागला. त्यामुळे या नवीन प्रकारच्या युध्दाची भारतीयांना माहीती झाली आणि अर्थातच त्याचा फायदा आपण अजूनही बघतोच आहोत.
भारतीय फौजांना पहिली कामगिरी मिळाली ती इजिप्तचे इटलीच्या सैन्यापासून संरक्षण करणे आणि सुदानच्या पट्यात संरक्षक फळी मजबूत करणे. मुसोलीनीच्या पूर्व आफ्रिकेच्या साम्राज्याला जो सुरूंग लागला त्यात मराठा लाईट इनफन्ट्रीचा मोठा सहभाग होता.
२ बटॅलियन जी एडनमधेच होती तिच्या सोबतीला भारतातून ३री बटॅलियन पाठवण्यात आली. या दोन्ही बटॅलियन्सचे लक्ष होते इटलीची एरिट्रियाची वसाहत. या युध्दात आपली शौर्याच्या परंपरेला जागून या सैन्याने केरेनचा डोंगरी किल्ला काबीज करताना अतुलनीय शौर्य गाजवून आपले नाव इतिहासात नोंदवले. या रक्तरंजीत युध्दाची हकिकत आपण आता बघू.
साल होते १९४० –
हा किल्ला एका डोंगरावर होता आणी त्या डोंगराच्या उतारावर दोन चांगली मोठी टेकाडे होती. एकाचे नाव होते पिनॅकल आणि दुसर्याचे पिंपल. हा सगळा डोंगर मोठमोठ्या दगडांनी भरलेला होता आणि त्याच्या आडोश्याने शत्रूला येणार्या दोस्तराष्ट्रांच्या सैन्यावर अचूक हल्ला करता येत होता. इटालियन सैन्याकडे भरपूर तोफा आणि त्याचा दारूगोळ्याचा साठा होताच. केरेन काबीज करण्यासाठी ४ थ्या इंडियन डिव्हिजनची नेमणूक करण्यात आली होती. पण आपण ही जी दोन टेकाडे काबीज करण्यासाठी झालेल्या युध्दात, मराठा लाईट इनफंट्रीने भाग घेतला त्याचकडे प्रामुख्याने बघणार आहोत, कारण नाहीतर हा लेख फार मोठा होईल.
१५ मार्च रोजी हायलॅंड लाईट इनफंट्रीने ले. कर्नल पर्सीवल यांच्या आधिपत्याखाली डोलोगोरोडॉक किल्यावरच्या पहिल्या टेकाडावर हल्ला करण्यासाठी कूच केले. त्यांच्या वर लगेचच मशीनगनचा तिखट मारा करण्यात आला. गोळ्यांच्या वर्षावात हे सैनिक त्या टेकाडाच्या पायथ्याला पोहोचले. हा आख्खा दिवस वरून होणार्या गोळीबारामुळे या सैनिकांना वर तोंड काढता आले नाही. वरून तळपता सुर्य आणि गोळ्यांचा व तोफगोळ्यांचा वर्षाव यामुळे या सैनिकांची दिवसभर फारच दमछाक झाली. श्वास घेणे सुध्दा अवघड झाले होते. प्यायचे पाणी संपल्यामुळे त्यांच्या हालात अजूनच भर पडली. इटालियन सैनिकांना वरून यांची बारिकशी हालचाल सुध्दा टिपता येत होती. जराशी हालचाल झाली की वरून गोळीबार होत होता. हे बघता दिवसा ढवळ्या पिनॅकल वर हल्ला करणे अशक्य आहे असे ठरवण्यात आले. खरे तर पुढे गेलेल्या सैन्यालाच मागे कसे आणावे हाच मोठा प्रश्न होऊन बसला होता. शेवटी अंधार पडल्यावर HLI ने यशस्वी माघार घेतली.
तो पर्यंत जनरल हिथ आणि मेसर्व्ही यांनी एक दुसरीच योजना आखली. अंधाराचा फायदा घेऊन मधली छोटीशी दरी पार करून पिनॅकलवर हल्ला करायची ती योजना होती आणि या करता आक्रमक ३/५मराठा लाईट इनफंट्रीची निवड करण्यात आली. कमांडर होते कर्नल रीड. कव्हरींग फायर देण्यासाठी तोफखाना होताच पण तो काही काळच चालू ठेवता येतो – आपली स्वत:ची हानी टाळण्यासाठी. हल्ला चालू झाला पण त्या अगोदर एक इंग्लीश आधिकारी जो पहिल्यांदीच मराठ्यांबरोबर लढाईत भाग घेत होता तो काय म्हणाला ते बघूया, त्याच्या शब्दात –
“हे मराठे हिरव्या रंगाची बेरेट घालतात. जेंव्हा ते हेल्मेट घालत नाहीत तेव्हा त्या टोपीवर एक हिरव्या आणि लाल रंगाचा तुरा फडकत असतो. पहिल्यांदा बघितल्यावर हे कसे लढणार असे वाटते खरे, पण यांनी कपडे काढल्यावर त्यांचे पिळदार शरीर आपल्या नजरेस पडते आणि ही शंका दूर होते. हे भारतातल्या दख्खन नावाच्या प्रांतातले सैनिक असून उत्तम कुस्ती करतात. हे अत्यंत शांत वृत्तीचे सैनिक कोणाच्याही वाटे जात नाहीत पण राग आल्यावर यांच्या डोळ्यात रक्त उतरते. डोळे लालबूंद होतात आणि मग आसपासचे सगळे चित्रच बदलू लागते. कितीही थंडी असो किंवा उष्णता असो, हे कुठल्याही हिंदीसेनेपेक्षा जास्त तडफेने युध्द करू शकतात.”
अंधार पडल्यावर मराठा लाईट्ने आपला हल्ला चालू केला. ज्या खडबडीत व दगडाधोंड्यांनी भरलेल्या, मोठमोठे दगड पडलेल्या डोंगराच्या उतारावर जेथे दिवसा ढवळ्यासुध्दा दोन्ही हाताचा आधार ने घेता चढणे मुष्कील होत, तेथे जिद्दीने हे सैनिक चढत होते, केवळ युध्दात शत्रुला पाणी पाजण्यासाठी. हे शब्द माझे नाहीत. वरील आधिकायाचे आहेत. सगळ्यात पुढे होते B कंपनीचे प्रमूख सुभेदार श्रीरंग लावंड. मागे कष्टाने C आणि D कंपन्या मार्ग आक्रमत होत्या. त्यांचे प्रमूख होते – बूमगार्ड्ट आणि सेमूर. इटालियन सैन्याने यांना कडवा प्रतिकार केला. लाल रंगाच्या बॉंबचा अखंड वर्षाव ते खालून येत असलेल्या मराठ्यांवर करत होते. त्या बॉंबच्या आणि मशीनगनच्या आवाजात मराठ्यांच्या युध्दघोषणांचा “शिवाजी महाराज की जय ! हर हर महादेव” आवाज वरच्या टिपेला पोहोचला होता आणि खाली जेथे त्यांचे कर्नल रीड बसले होते त्यांना त्या स्पष्ट ऐकू येत होत्या. मेजर मून, जे त्या वेळी कर्नल रीड बरोबर बसले होते त्यांनी अशी आठवण लिहून ठेवली आहे की कर्नल रीड्ची छाती त्यांच्या फौजेच्या या पराक्रमाने फुगली होती आणि ते मराठ्यांविषयी अखंड बोलत होते. रात्रीतल्या घनघोर युध्दानंतर मराठा लाईटने पिनॅकलच्या पायथ्यापाशी जो छोटीशी सपाट जागा होती ती काबीज केली व तिथे मोर्चे बांधणी केली. सकाळी जेव्हा या मोर्च्यावर मेसर्व्ही गेला तेंव्हा त्याने तोंडात बोटे घातली. त्याच्या सहाय्यकाने लिहून ठेवले आहे की “ज्या रस्त्यावरून मला कुठलेही सामान न घेता चढता येत नव्हते त्या रस्त्याने अंधारात एवढे अवजड सामान घेऊन तोफांच्या मार्यात हे रीडचे मराठे कसे चढले असतील ? याची कल्पना करूनच मेसर्व्हीच्या निळ्याशार डोळ्यात पाणी आले.”
पिनॅकल सर झाल्यावर इटालियन सैन्य काही गप्प बसले नव्हते. त्यांनी त्या टेकाडावर प्रतिहल्ले चढवण्यास सुरवात केली. त्यांच्या विरूध्द आता संरंक्षणाचे काम करावे लागले. सगळ्या सैनिकांना एकत्र जमवून कामे वाटून देत पर्यंत पहाटेचे चार वाजले व इटालीयन सैन्याचे हल्ले चालू झाले. त्यांना मागे रेटेतोपर्यंत सकाळ उजाडली आणि काही इटालीयन सैनिकांना मराठ्य़ांनी पकडले. कर्नल रीडला एका युध्दज्वर चढलेल्या मराठी जवानाला धक्का मारून जमिनीवर पाडावे लागले. त्याच्या हातून मशीनगनच सुटत नव्हती.
दुसर्या दिवशी हे युध्द संपले आणि मराठा लाईट्ची तेथून सुटका झाली. या युध्दात स्वत:च्या प्राणाची पर्वा न करता, तोफगोळ्यांच्या व मशीनगनच्या गोळ्यांच्या वर्षावात सुभेदार लावंड यांनी जे न डगमगता आपल्या कंपनीच्या पुढे राहून मार्गदर्शन केले त्याबद्दल त्यांना मिलीटरी क्रॉस बहाल करण्यात आला.
पुढच्याच एका दिवसात मुख्य किल्लापण सर करण्यात आला. हा किल्ला हातातून गेल्यामुळे व तो परत न जिंकता आल्यामुळे इटलीची आफ्रिकेमधली सत्ता मोडकळीस आली आणि लवकरच नष्ट झाली. या सगळ्यात मराठा लाईट इनफंट्रीचा फार मोठा सहभाग होता असे तज्ञांचे मत आहे.
जेव्हा युध्द चालू असते, तेव्हा अशा पराक्रमांना तोटा नसतो व कोणालाही त्या बद्दल विशेष वाटत नाही. पण केरेनेच्या युध्दाबद्दल ले. कर्नल करसे यांना ११व्या इंडियन इंनफंट्री ब्रिगेडच्या कमांडर कडून एक पत्र आले
“I wish in particular to thank your Battalion for the great dash it displayed in capturing and holding Flat Top Hill, in spite of very severe casualties. It has been a magnificent effort. Will you please tell your officers and men that I am now more proud than ever to have them in my Brigade.”..............
जयंत कुलकर्णी
भाग दोन समाप्त.
पुढे चालू......

प्रतिक्रिया
वाचते आहे..
आणखी
छान लेख,
बरोबर
मस्त लेख ....
छान आहे.
धन्यवाद
मनोरंजक
चांगली
जेव्हा
उत्तम
मस्त!! हा
जब्बरदस्त!
सही आहे.
मस्त लिखाण....आणि ही लेख माला बहारदार होणार......
उत्तम
धन्यवाद !
छान लेख!
छान
चांगली
चांगली लेखमाला. वाचतोय.