मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कानसेन कोणः भाग १२

बहुगुणी · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
जुनी-नवी प्रसिद्ध मराठी आणि हिंदी गाणी निवडून त्यांचे मुखडे किंवा कधी कधी अंतरे मी आणि माझे इथलेच काही सहकारी पेश करु, तुमच्यातील 'कानसेनां'नी ते गाणं ओळखायचंय. अट इतकीच, की नुसतंच गाणं न ओळखता कमीत कमी वेळात त्या मूळ गाण्याची ध्वनीफीत आणि चित्रपटातील असेल (आणि उपलब्ध असेल) तर त्याची ध्वनीचित्रफीत या दोन्हींचे दुवेही द्यायचे आहेत. सहभागाबद्दल सर्वांचे धन्यवाद! या वेळची गाणी पुरवली आहेत डॉ. प्रसाद दाढे यांनी. त्यांचे मनःपूर्वक आभार पाहूयात पुढचे कानसेन कोण होतात ते... - बहुगुणी या आधीचे दुवे: भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७, भाग ८, भाग ९, भाग १०, भाग ११ ***************** कानसेन क्रमांक ८३: ज्ञानोबाचे पैजार कानसेन क्रमांक ८४: अतुलजी कानसेन क्रमांक ८५: ज्ञानोबाचे पैजार कानसेन क्रमांक ८६: अतुलजी कानसेन क्रमांक ८७: अतुलजी कानसेन क्रमांक ८८: ज्ञानोबाचे पैजार कानसेन क्रमांक ८९: ललिता कानसेन क्रमांक ९०: प्रदीप कानसेन क्रमांक ९१ : प्रदीप कानसेन क्रमांक ९२: प्रदीप कानसेन क्रमांक ९३: प्रदीप कानसेन क्रमांक ९४: प्रदीप *****************

वाचने 17861 वाचनखूण प्रतिक्रिया 54

आज सोचा तो आसु भर आये हसते जख्म http://www.youtube.com/watch?v=skDlgcC17FI Thanks for the clue पैजारबुवा, _______________________ बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, बोला पंढरीनाथ महाराजकी जय

In reply to by बहुगुणी

धन्यवाद, आज शनिवार असल्या मुळे चान्स मिळाला, नाहीतर प्रष्ण आणि उत्तर एकदमच पहायला मिळत होते. आमच नाव तेवढ चुकल बघा, (आम्हाला आमच्या नावाचा अभिमान आहे) पैजारबुवा, _______________________ बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, बोला पंढरीनाथ महाराजकी जय

In reply to by अतुलजी

सहज Sat, 07/10/2010 - 10:51
अतुलजी, ज्ञानोबांचे पैजार, अर्थात दाढेसाहेब तुम्ही लोक खरी कानसेन. _/\_ ही गाणी मला अजिबात ओळखता आली नाहीत :-(

In reply to by बहुगुणी

आज शनिवार असल्या मुळे ऑफिस मधुन खेळणारे कावळे उडाले आहेत _______________________ बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, बोला पंढरीनाथ महाराजकी जय

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

सहज Sat, 07/10/2010 - 10:53
खरच मी उडून बसतो दुसरीकडे. तुम्हा कोकीळांना सलाम! :-) (काला कौआ) सहज

In reply to by सहज

बुरा मत मानो, माझा म्हणण्याचा तो अर्थ नव्हता, पण दोन दीवस मी नुसता पहात रहाण्याशीवाय काही करु शकत नव्हतो, त्या मुळे कदाचीत असे म्हणालो असेन, मनापासुन क्षमा मागतो पैजारबुवा, _______________________ बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, बोला पंढरीनाथ महाराजकी जय

बहुगुणी Sat, 07/10/2010 - 16:49
दिलेल्या सुरावटीच्या तुकड्याची लांबी खूपच कमी ठेवली होती, तरीही अचूक ओळखलंत! Well-done! कानसेन क्र. ८९: ललिता [आधी विजेत्यांत आपलं नाव वाचल्याचं आठवत नाही, नवीन असाल तर स्वागत आहे!]

ललिता Sat, 07/10/2010 - 16:55
नवीन नाहीय... आज शनिवार नं त्यामुळे चान्स मिळाला. तसं ठराविक वेळी मी हपिसातून लॉग-इन होते तेव्हा संधी मिळणं कठिण होऊन गेलं!

बहुगुणी Sat, 07/10/2010 - 17:56
या पानावरचं संपादन करणं बाकी आहे (विजेत्यांची नावं वगैरे), आणि धागाही लांबला आहे, तेंव्हा पुढचा भाग सुरू करेन. प्रभो/ मेघवेडा: पुढचा भाग सुरू ठेवणार?