डॉक्टर जगो..
डॉक्टरलोक पेशंटला नेहमीच कापतात, पैशांत मापतात किंवा टाळूवरचं लोणी चापतात... असे अनेक गैरसमज जनमाणसांत पसरलेले असतील. परंतु डॉक्टरांची कथा अन् व्यथा निराळीच आहे.
मूळात हा व्यवसाय/ पेशा रांत्रंदिन युद्धाचा प्रसंग असा असतो. डोळ्यात तेल घालून रुग्ण तपासणे, योग्य निदान करणे, उपचार पुरवणे हे काही सोपे काम नाहीये मित्रांनो.
पेशंटचा आजार वा पिडा कशी दूर करता येईल याच विचारांत डॉक्टर गढलेले असतात. रुग्ण बरा झाल्याशिवाय बिल घेतले जात नाही किंबहुना तसे उद्दिष्ट त्यांच्यापुढे मुळीच नसते.
समाजसेवा अन् सेवाभाव डॉक्टरकीत दडलेला असला तरी मेवा लाटणारे लुटारू डॉक्टरही आढळतात. वस्तुतः कुठलीही सेवा मेव्यासाठीच योजिली असल्याचा आभास लुटारूंच्या अंतरी वास करून असतो. म्हणूनच तिथे भ्रष्टाचाराशी सहवास सुरु होतो.
पूर्वीपेक्षा वैद्यकिय क्षेत्र फार प्रगत झालेय. नव नव्या संशोधनांनी परिपूर्ण होऊ लागलेय. नाविण्याची नवी चिकित्सा साधने उपलब्ध झाल्यामुळे आजाराच्या मूळापर्यँतचा प्रवास स्क्रिनवर सहजपणे पाहता येऊ लागलाय. अर्थात 'आमच्या अद्ययावत ज्ञानाचा उपयोग खर्चिक असल्याने तो तुम्ही पेलवलाच पाहिजे' अशी लालसा डॉक्टरीपेशात मूळ धरतांना आढळते.
कितीही किस काढला तरी मोरपिस हाती न लागता खराटाच अंगावरून फिरेल अशी परिस्थिती आहे. चांगल्या सेवाभावी व्रतस्थांना विसरायचं अन् वाईट वागणाऱ्यांची खुलेआम चर्चासत्रे भरवायची ही तर समाजाची वृत्ती.
चांगलं सोडून देऊन वाईटाला कुरवाळायचं अशी ही प्रवृत्ती. वृत्ती काय किंवा प्रवृत्ती काय एकदा का बोकाळली की चित्ती समाधान उरत नाही. म्हणूनच कोणत्याही पेशाकडे, व्यक्तिकडे आपण कोणत्या नजरेने पाहतो त्यावर सर्व काही अवलंबून आहे.
वैद्यकीय व्यवसाय अगोदर सेवेचं व्रत असतं मागाहून अर्थार्जनाचा पेशा ठरतो. हे लक्षात घेऊन अगणितांचे प्राण कंठाबाहेर पडू न देणाऱ्या डॉक्टरांना आदरार्थी शुभेच्छा द्यायलाच हव्यात. नाही का?
प्रतिक्रिया
किती लेख
तुम्हीही
अजून काही
५) लेडी डॉ.
लेडी डॉ.
तुम्ही
जागु ही चर्चा...वैद्यकिय डॉ. बद्दलच सुरु आहे.
असो..
आपण
+१
+१
रुग्ण बरा
हल्ली
<<<पेशंटचा
मित्रहो, आधी
पेशंटचा
हा हा हा हा!
कोणता डॉक्टर रुग्ण बरा झाल्याशिवाय बिल घेत नाही ?
१ जुलै
डॉक्टरसाह
डॉक्टरसाहेब,
अचाट विधानांनी तुम्ही एका चांगल्या विषयावरच्या लेखाला हास्यास्पद बनवले आहे. डॉक्टरांच्या समस्या, कार्ये आम्हालाही माहीती आहेत. उदा : स्थानीक लोकांचा त्रास, रुग्णाच्या अतीउत्तेजीत नातेवाईकांचा त्रास, वेळी अवेळी केव्हाही इमर्जन्सी ड्युटी लागण्याचा त्रास, अतिप्रचंड सुरुवातीची गुंतवणूक, सावकाश परतावा इ.इ.
पण तुम्ही जी काही विधाने केली आहेत ती खूपच अचाट आहेत.
पेशंटचा आजार वा पिडा कशी दूर करता येईल याच विचारांत डॉक्टर गढलेले असतात. रुग्ण बरा झाल्याशिवाय बिल घेतले जात नाही किंबहुना तसे उद्दिष्ट त्यांच्यापुढे मुळीच नसते.
हे म्हणजे एखाद्या बिल्डरने लोकांच्या निवार्याच्या समस्येचाच विचार करतो किंवा शिक्षण सम्राटाने "लोकांना शिकवून शहाणे करण्याचे व्रत घेतले आहे" असे म्हणण्यासारखे आहे. एक किस्सा सांगतो. माझ्या पत्नीला बाळंतपणासाठी दवाखान्यात ठेवले होते. मुख्य डॉक्टरांनी सांगीतले होते की दर ३ तासांनी रक्तदाब तपासून त्याची नोंद ठेवा. प्रत्यक्षात इतर डॉक्टरांनी एकदाच तपासून बाकीच्या नोंदी तश्याच भरण्याचा उद्योग केला, कारण फक्त आळस.
"रुग्ण बरा झाल्याशिवाय बिल घेतले जात नाही"
हे काय आहे हो? मान्य करा की "व्यवसाय करतो". लोकांचीही तीच अपेक्षा आहे. आता हे सांगू नका की कट् प्रॅक्टीस, MLM ची औषधे(!?) गळ्यात मारणे या गोष्टी माहीत नाहीत.
वैद्यकीय व्यवसाय अगोदर सेवेचं व्रत असतं मागाहून अर्थार्जनाचा पेशा ठरतो.
तुम्ही स्वतः तरी हे पाळता का?
डॉक्टरांच्या समस्या, व्यवसायाचे इतर परीणाम, याविषयी लिहीले असते तर अपेक्षीत परीणाम साधला गेला असता. (जे खादाडमाऊंच्या प्रतीसादात हे सगळं आलच आहे.)
डॉक्टर
सर्वप्रथम
दिवटे
कवटे
टारझन
कवटे
खरयं
पेशंटच्या
किती