✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मोटर व्हेईकल ऍक्ट १९८८, कलम १८५...!

व
विसोबा खेचर यांनी
Wed, 04/23/2008 - 16:54  ·  लेख
लेख
  • मोटर व्हेईकल ऍक्ट १९८८, कलम १८५...! (अंतीम भाग)

Book traversal links for मोटर व्हेईकल ऍक्ट १९८८, कलम १८५...!

  • मोटर व्हेईकल ऍक्ट १९८८, कलम १८५...! (अंतीम भाग) ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
25824 वाचन

💬 प्रतिसाद (46)

प्रतिक्रिया

काय तात्या...

नीलकांत
Wed, 04/23/2008 - 17:04 नवीन
असं काठावर आणायचं आणि पुढे ब्रेक के बाद... झकास उत्सुकता ताणल्या गेलीये. लवकर लिहा पुढे काय झालं ते. नीलकांत
  • Log in or register to post comments

अगदी अगदी

विसुनाना
Wed, 04/23/2008 - 18:47 नवीन
असं काठावर आणायचं आणि पुढे ब्रेक के बाद... झकास उत्सुकता ताणली गेलीय. लवकर लिहा पुढे काय झालं ते. मला तर ब्रेकमधली 'रॉयल चॅलेंज'ची (म्हंजे मल्ल्याबाबाच्या आयपीएल टीमची हो!) जाहिरातही दिसत आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलकांत

एकदम मस्त !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 04/23/2008 - 19:27 नवीन

असं काठावर आणायचं आणि पुढे ब्रेक के बाद...
झकास उत्सुकता ताणली गेलीय. लवकर लिहा पुढे काय झालं ते.

 

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना

थ्रिलींग

विजय आचरेकर
Wed, 04/23/2008 - 17:33 नवीन
खरच थ्रिलींग.......
  • Log in or register to post comments

आयला...

धमाल मुलगा
Wed, 04/23/2008 - 17:39 नवीन
तात्याबा, तुम्हाला भिती नाही वाटली? च्यामारी, एखादा इमानदार पोलिस बघितला तरी आपली हवा टाईट होते बॉ! डेंजरच आहे प्रकरण... लवकर टाका बॉ पुढचा भाग! -(घाबरट) ध मा ल.
  • Log in or register to post comments

आवडले....

स्वाती राजेश
Wed, 04/23/2008 - 17:44 नवीन
तात्या मस्त लिहिले आहे पण अर्धवट का सोडले? वाचता वाचता विचारांची तारच तोडली.. आम्ही आपले तात्या आत पोलिसांच्या गाडीत बसलेत.. कसे असतील? याविचारात असतानाच पुढील भागात असे लिहिले. उत्सुकता लावून ठेवली... लवकर लिहा....
  • Log in or register to post comments

अगदी खरं..

प्राजु
गुरुवार, 04/24/2008 - 12:58 नवीन
स्वाती म्हणते ते अगदी खरं आहे.. आम्ही आपले तात्या आत पोलिसांच्या गाडीत बसलेत.. कसे असतील? याविचारात असतानाच पुढील भागात असे लिहिले. उत्सुकता लावून ठेवली... .. काय तात्या...?? पण हे असं खुशालचेंडू वागणं खरंच शोभतं तुम्हाला.. :)) आता पुढचा भाग मात्र लवकर लिहा.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती राजेश

डेंजरच आहे प्रकरण...

मनस्वी
Wed, 04/23/2008 - 17:46 नवीन
थ्रिलींग... (स्वगत : आता या कहाणीचेपण २ भाग करायची काय गरज होती.)
  • Log in or register to post comments

तात्याकहानी .....

मदनबाण
Wed, 04/23/2008 - 17:47 नवीन
आता मात्र त्या शिंदेसाहेबांमधला पोलिस जागा झाला आणि दुसर्‍याच क्षणी तो त्या पंजाब्याला स्वच्छ मराठीतून बोलता झाला,"ए आता गप बसतो, का कानाखाली दोनचार आवाज काढू? बड्या साहेबाशी बोलायच्या धमक्या कुणाला देतोस रे मादरचोद? भडव्या, एक तर दारू पिऊन गाडी चालवतोस आणि वर पुन्हा पैशाची मस्ती करतोस? कर, तुला ज्याला कुणाला फोन करायचाय तो कर. पण मी कुणाशीही बोलणार नाही!" याला म्हणतात मराठी दणका !!!!! कंसातला प्रश्न अर्थातच मनातल्या मनात होता! ;) :) (१०० मालिकेचा जबरदस्त पंखा) आणि पुढील ४८ तासांच्या प्रतिक्षेत..... मदनबाण
  • Log in or register to post comments

रंगतदार....

प्रभाकर पेठकर
Wed, 04/23/2008 - 17:48 नवीन
रंगत आणली आहे, तात्या. ४८ तास वाट बघतो.
  • Log in or register to post comments

मस्त

लिखाळ
Wed, 04/23/2008 - 18:49 नवीन
मस्त ! ४८ तासांची वाट पाहतो आहे. लवकर लिहा. --लिखाळ. मला बरेच काही समजते असे मला अनेकदा वाटते हेच माझ्या असमंजसपणाचे निदर्शक आहे.
  • Log in or register to post comments

चुकीची सुधारणा

शितल
Wed, 04/23/2008 - 18:58 नवीन
तात्या माझ्या माहिते प्रमाणे तुमचा तत्सम गुन्हा हा आय.पी.सी. कलम १८५ नसुन मोटर व्हेईकल ऍक्ट १९८८ कलम १८५ अन्वये आहे. कारण आय.पी.सी. १८५ हा Illegal purchase or bid for property offered for sale by authority of public servant आहे, मोटर व्हेईकल ऍक्ट १९८८ कलम १८५ हा Driving by a drunken person or by a person under the influence of drugs. असा आहे. ४८ तास कधी स॑पत आहेत ह्या प्रतिक्षेत असलेली शितल.
  • Log in or register to post comments

सुधारणा..

विसोबा खेचर
Fri, 04/25/2008 - 11:59 नवीन
तत्सम गुन्हा हा आय.पी.सी. कलम १८५ नसुन मोटर व्हेईकल ऍक्ट १९८८ कलम १८५ अन्वये आहे. मोटर व्हेईकल ऍक्ट १९८८ कलम १८५ हा Driving by a drunken person or by a person under the influence of drugs. धत् तेरीकी! मला वाटलं हे आय पी सी मधलं कलम आहे. धन्यवाद शितल. या भागात आणि पुढल्या भागात तशी सुधारणा करेन.. आपला, (मोटर व्हेईकल ऍक्ट १९८८, कलम १८५ अंतर्गत सजा झालेला आरोपी) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल

४८ तास!

स्वाती दिनेश
Wed, 04/23/2008 - 19:31 नवीन
काय रे बाबा असे तुकड्यातुकड्यात देतोस? आता आले ना ४८ तास वाट पाहणे? हा भाग झकास जमला आहे हे वेसांन ल. स्वाती
  • Log in or register to post comments

एकेक क्षण-

विदेश
Wed, 04/23/2008 - 20:53 नवीन
मोजत बसलोय की तात्या! अजून किती तास-मिनिटे-सेकंद राहिले हो ४८ तास संपायला?
  • Log in or register to post comments

थ्रिलिंगच

धनंजय
गुरुवार, 04/24/2008 - 00:57 नवीन
पण हे कलम भा.दं.सं.१८५ म्हणजे काय भानगड आहे बुवा? हे मला कळलेच नव्हते. वर शितल यांनी सांगितले म्हणून मोटार वाहातुक कायद्याबद्दल १८५ कळले... चौकीवर जाऊन रक्तचाचणी करण्यापेक्षा तिथल्या तिथे काही चाचण्या केल्या असत्या तर बरे झाले असते. म्हणजे सरळ रेषेवर पावलापुढे पाऊल ठेवून चालणे, डोळे बंद करून उभे राहाणे, वगैरे. शक्यतोवर जे पोलीस दारूच्या गुत्त्यासमोर पाळत ठेवून असतात, त्यांच्यापाशीच श्वासातल्या आल्कोहोलची चाचणी करण्याचे यंत्र असले तर बरे असते. असे केल्याने एकच पेग घेणार्‍या तात्यांचा खोळंबा झाला नसता. तसेच पोलीस अधिकार्‍याने त्यांना जातीने स्टेशनावरती नेले. तिथे आणखी चार फुल्टू लोक स्कूटर, गाड्या चालवत गेले असतील! चाचणी तिथल्या तिथे केली असती, तर या कर्तव्यदक्ष अधिकार्‍याचे कामही कार्यक्षम झाले असते. असो. लिहिताय म्हणजे सहीसलामत सुटलात. कसे सुटलात त्याबद्दल कुतूहल आहे.
  • Log in or register to post comments

उत्कंठावर्धक...

विकास
Wed, 04/23/2008 - 22:44 नवीन
लेख चांगलाच उत्कंठावर्धक आहे आणि स्वतःसंदर्भात नसल्याने वाचायला मजा आली :-) बाकी मद्यपानानंतर स्कूटर चालवायची नाही इथपर्यंत ठिक आहे पण आपण (४८ तासाची वाट पहायला न लावता) लिहीणे चालू ठेवले असते तर बरे झाले असते! :-)
  • Log in or register to post comments

जमून आला आहे हा भाग

भाई
Wed, 04/23/2008 - 23:06 नवीन
खुमासदार आणि ओघवत्या वर्णनामुळे मुळातच चटपटीत असलेला विषय अधिक रंजक झालेला आहे. पोलिस आणि आमचे कसे जमायचे कारण आम्ही तर नांवापासूनच, भाई
  • Log in or register to post comments

झकास सुरवात!

पिवळा डांबिस
गुरुवार, 04/24/2008 - 01:47 नवीन
उत्तम वातावरण निर्मिती!! बरं शिंदेसाहेबांचा चेहेराच इतका करडाकठोर होता की जास्त वाद घालण्यात काही अर्थ नव्हता! साला कुठल्याही क्षणी फाडकन कानफटात बसायची! होय बाबा, आम्ही पाह्यलंय या लोकांना दुसर्‍यांना कानफटवतांना!! विशेषतः आयपीएस अधिकार्‍यांना!! काय त्यांना कानफटात कसं मारायचं याचंही ट्रेनिंग देतात का काय नकळे. पण काडकन आवाज काढतात!!!:))) तात्या अभ्यंकर, आरोपी - भारतीय दंड विधान, कलम १८५! व्वा! काय जबरदस्त टायटल आहे!! आत्तापर्यंतच्या वाचलेल्या तुझ्या सगळ्या टायटल्सपेक्षा जोरदार!!!!:)) पुढल्या भागाची वाट पहात आहे.... फोलिसांपासून दूर रहाणारा, पिवळा डांबिस
  • Log in or register to post comments

माईक बंद

भोचक
गुरुवार, 04/24/2008 - 14:50 नवीन
मैफल रंगात यावी अन माईक बंद पडावा असं झालंय. ४८ तास संपण्याची वाट पहाणारा. (भोचक)
  • Log in or register to post comments

आणि काय सांगू मंडळी...

प्रमोद देव
गुरुवार, 04/24/2008 - 15:19 नवीन
मी आपला तंद्रीतच गुणगुणायला लागलो. "लट उलझी,सुलझा जा बालम!" तुम्हाला सांगतो चीज काय नजाकतदार आहे. प्रेयसी अशी आपल्या प्रियकराला..... जाऊ द्या. मुद्याचे सांगतो. नाहीतर तुम्ही म्हणाल... तो इनस्पेक्टर माझ्याकडे संशयाने पाहतोय असे वाटायला लागले... अहो खरंच होते ते. खस्सकन खेचून त्याने मला कोपच्यात घेतले. मी टरकलो. म्हटलं आज काही आपले खरे नाही. मनातल्या मनात अण्णांचा धावा केला.... आणि चमत्कार झाला. "आत्ता तुम्ही गात होता ती चीज बिहागमधली काय हो!" इन्स्पेक्टरच्या ह्या अनाहूत प्रश्नाने मी तर गारच पडलो. इन्स्पेक्टरला हे 'अंग' असेल असे कधीच वाटले नाही. मी होकार देताच त्याने मला हळूच इतरांपासून अगदी दूर नेले आणि ही चीज मला नीट म्हणायला सांगितली. मग काय महाराजा! आपण समजलो. पंछी पिंजडेमे फस गयेला है! असा काय जोरदार गायलोय की इन्स्पेक्टर साहेब खूश झाला आणि मला चक्क माझ्याच स्कुटरवरून त्या हवालदारामार्फत घरी पोचवले. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments

हा हा हा

सहज
गुरुवार, 04/24/2008 - 15:43 नवीन
मस्त!!! +१ एकदम शक्य आहे!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव

:)

विसोबा खेचर
Fri, 04/25/2008 - 11:48 नवीन
मी टरकलो. म्हटलं आज काही आपले खरे नाही. मनातल्या मनात अण्णांचा धावा केला.... आणि चमत्कार झाला. असा काय जोरदार गायलोय की इन्स्पेक्टर साहेब खूश झाला आणि मला चक्क माझ्याच स्कुटरवरून त्या हवालदारामार्फत घरी पोचवले. हा हा! सह्ही लिहिलं आहे प्रमोदशेठ... तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव

वा!

चित्रा
Fri, 04/25/2008 - 01:33 नवीन
लेखाचे शीर्षक बघून मला आधी वाटले तात्या काहीतरी "माहितीपूर्ण" लिहीतायत की काय?! ४८ तास कधी संपणार, म्हणे?
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो :)

आनंदयात्री
Fri, 04/25/2008 - 12:44 नवीन
बाकी लेख फक्कड, दुसर्‍या भागाची वाट पहायला लावणारा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

तात्या,..वाट....बघतो.....आहे.........!

चतुरंग
Fri, 04/25/2008 - 01:45 नवीन
वाट............लावू..................नका................................!!;)) चतुरंग
  • Log in or register to post comments

तात्या

केशवसुमार
Fri, 04/25/2008 - 01:52 नवीन
चित्रगुप्त दादरला बसलो होतो तेव्हा ऐकवला होता..उत्तम शंब्दांकन.. आणि तो पुढचा भाग लवकर टाक..पुढे काय झाले ते मला माहिती आहे पण लोकांना असे टांगत ठेऊ नकोस.. केशवसुमार (स्वगत:-'बरी अद्दल घडली !'असे किती जण मनातल्या मनात म्हणाले असतील बरं?)
  • Log in or register to post comments

अरे ओ

मनस्वी
Fri, 04/25/2008 - 11:42 नवीन
अरे ओ सांबा.. अठ्ठेचाळीस तास खतम होनेको कितने तास है रे.. बस्स ५ तास सरकार.. कहाणी एका रात्रीची.. आणि ब्रेक ४८ तासांचा.. बहुत नाईन्साफी है..
  • Log in or register to post comments

४८ तास

विजुभाऊ
Fri, 04/25/2008 - 12:13 नवीन
४८ तास मोजायला सुरवात कधीपासुन करायची......
  • Log in or register to post comments

आहाहा..तात्

भडकमकर मास्तर
Fri, 04/25/2008 - 14:07 नवीन
आहाहा..तात्या... हा लेख म्हणजे खणखणीत सिक्सर आहे.... लै मजा आली राव..... ..............हा प्रसंग कधीही कोणाच्याही आयुष्यात घडू शकतो...इतका रिअलिस्टिक लेख !!!! एक विनंती : प्लीज पुढचा लेख क्रमशः नको... वेळ घ्या पण काय ते एकदम संपवा...
  • Log in or register to post comments

हाजिर हो....

अभिज्ञ
Fri, 04/25/2008 - 19:33 नवीन
तात्या, आपल्या वाद्याप्रमाणे ४८ तास उंलटून गेलेले आहेत तरिहि आपला पुढचा भाग अजुन आलेला नाहि. अजुन किति वेळ वाट पाहायचि??????? आपल्या केसचि आतुरतेने वाट पाहणारा.. (हायकोर्ट जज्ज) अबब. »
  • Log in or register to post comments

अहो...

प्रभाकर पेठकर
Fri, 04/25/2008 - 21:15 नवीन
तरिहि आपला पुढचा भाग अहोऽऽऽऽ आपल्या कथेचा किंवा लेखाचा पुढचा भाग असे म्हणा.. इथे उरात धडकी भरते हो....!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ

पेठकर काऽऽऽऽकाऽऽ!

चतुरंग
Fri, 04/25/2008 - 22:17 नवीन
अहो काय हा ऍटमबाँब??!! एकदम हसू सुध्दा नीट बाहेर येईना;०० मी ऑफिसातल्या खुर्चीतून घसरलोच, तरी बरं लॅबमधे असल्यामुळे आजूबाजूला कोणी नाहीये नाही तर काही खरं नव्हतं!;))) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

:)))))

मदनबाण
Fri, 04/25/2008 - 22:27 नवीन
हे वाचुन जज्ज साहेबांना मात्र नक्कीच उरात धडकी बसेल..... :))))) (कोर्टची पायरी कधीही न चढलेला) मदनबाण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

हाहाहा....

अभिज्ञ
Sat, 04/26/2008 - 00:24 नवीन
चुकलेच कि, पेठकर काका लै भारी......) कथेचा भाग असेच वाचावे....) तात्या,पुढचा भाग (लेखाचा हो) लगिच येउ द्यात. हि विनंती अबब अवांतर-आमचे उपनाम "वाघ" असल्याने ,आम्हि शिकार "भाग" करुन खात नाहि बरे...)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

बापरे एकदम थ्रिलिंग

वरदा
Fri, 04/25/2008 - 23:36 नवीन
मला तर जवळ तिकीट असलं तरी समोरुन टी सी आला की उगाच भिती वाट्टे..कधी बिनातिकीट गेले नाही तरी मला टी सी ने पकडल्याची स्वप्न पडायची लोकांना पकडलेलं पाहून्..... हे तर एकदम भारीच्...
  • Log in or register to post comments

आमचीही कहाणी

सुनील
Sat, 04/26/2008 - 05:49 नवीन
तुमची तात्याकहाणी वाचून ३-४ महिन्यांपूर्वी (गेल्या डिसेंबरात) घडलेला प्रसंग आठवला. आमच्या कंपनीची ख्रिसमस पार्टी होती. परंतु काही कामामुळे मला फार काळ थांबता येणार नव्ह्ते. तेव्हा मी फक्त एक बाटली बियर घेतली (अमेरीकेतील बियरची बाटली भारतात मिळणार्‍या बाटलीच्या निम्मी असते) आणि थोडेसे खाऊन निघालो. तरीही रिस्क नको म्हणून फ्रीवेने न जाता शहरातील रस्त्याने जाण्याचा विचार केला (आणि फसलो!). तसा बियरच्या अर्ध्या बाटलीने कोलमडणारा मी नव्हेच! त्यामुळे निदान माझ्यामते तरी मी व्यवस्थित गाडी हाकीत होतो. एक सिग्नल पार करून मी पुढे निघालो आणि तेव्हढ्यात गाडीच्या आरशात निळे दिवे चमकताना दिसले. ट्रॅफिक पोलीसाला भिडण्याचा हा चौथा प्रसंग असल्यामुळे अगदी सराईताप्रमाणे गाडी रस्याच्या कडेला नेऊन थांबवली. लायसन्स व इतर कागदपत्रे असल्याची खातरजमा करून स्वस्थ बसून राहिलो. मिनिटाभरात तो आलाच. बहुदा त्यानेही माझ्याक्डे शत्र वगैरे काही नसल्याची खात्री केली असावी. "कुठून आलात?" मी साळसूदपणे रस्त्याचे आणि छेदरस्त्याचे नाव सांगितले. "हो, पण तेथे होते काय? रेस्टॉरन्ट वगैरे?" "हो. रेस्टॉरन्ट." "अच्छा. मग काही ड्रिन्क्स वगैरे?" "होय साहेब." "किती घेतलीत?" "फार नाही. फक्त एक बियर!" "ह्म्म. जरा इकडे पहा.", असे म्हणून त्याने एक प्रकाशझोत माझ्या डोळ्यावर टाकला. स्वतःचे एक बोट माझ्या डोळ्यापुढे ठेवून तो म्हणाला, " मी हे बोट फिरवीन त्याप्रमाणे तुम्ही डोळे फिरवायचे, समजले?" मी मान डोलावली. तो त्याचे बोट उजवीकडून डावीकडे फिरवत गेला तसा मीही मान फिरवून त्याच्या बोटाकडे पाहत राहिलो. "अहं. मान नाही फिरवायची. मान सरळ. फक्त डोळे फिरवायचे." आता मान न वळवता नुसते डोळे फिरवून आसपासचा अंदाज घ्यायची जनानी पद्धत मला कुठे जमायला? काही "बघणेबल" दिसले की अगदी ९० (क्वचित १८० देखिल) अंशात मान फिरवून बघायची आमची सवय! असो. कसेबसे जमवले. तोही डोळ्यात प्रकाशझोत टाकून काहितरी बघत होता. "नक्की एकच बियर?" "होय साहेब, एकच." "जरा तुमचे लायसन्स बघू." मी लायसन्स काढून दिले. ते घेऊन तो आपल्या गाडीकडे गेला. आता मला थोडा धीर आला. कारण जरी त्यापूर्वी तीन वेळा मला ट्रॅफिक पोलीसाने अडवले असले तरी प्रत्येक वेळेस वॉर्निंग देऊन सोडले होते त्यामुळे माझ्या नावावर नोंद अशी नव्हती. तो परत आला. "कुठपर्यंत जाणार? " मी घरचा पत्ता सांगितला. तिथून एक्-दीड मैलाचाच तर पल्ला होता. "नक्की ना? की अजून कुठे बसणार?" "नाही साहेब. अगदी थेट घरी." "नीट जा." लायसन्स हातात देऊन तो म्हणाला. मी गाडी चालू केली. घरी आलो. फ्रीजमधून करोनाची बाटली काढली. त्यात एक लिंबाची फोड घालून सोफ्यावर अंग टाकले आणि एक एक घोट घेत डोके शांत करू लागलो! आता मी तुम्हाला काय सल्ला देणार म्हणा. पण भारतात एक नियम मी पाळ्तो तो म्हणजे वाहन कधीही बारच्या समोर उभे करीत नाही. थोडे दूर एखाद्या आतल्या गल्लीत ठेवतो. तुमच्या तात्याकहाणीचा दुसरा भाग वाचण्याची उत्सुकता आहे. लवकर टाका. जाता जाता - हायवे चेकनाक्यावरच्या एकाही बारमध्ये जाण्याचा योग अद्याप आला नाही. पण तुम्ही म्हणता तो कुठला बार? "सोनिया" की काय? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

क्या बात है!!

धोंडोपंत
Sat, 04/26/2008 - 08:07 नवीन
क्या बात है तात्या!!! अप्रतिम कथन. गेले अनेक दिवस याची वाट पहात होतो. कारण तुला पकडल्यानंतर तू बोलतांना याचा उल्लेख केला होतास. पुढील भागाच्या प्रतिक्षेत. आपला, (वाचक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments

या

भडकमकर मास्तर
Sat, 04/26/2008 - 17:02 नवीन
या लेखावरून आम्हीही स्फूर्ती घेऊन आमचा एक अनुभव लिहिणार आहोत....क्रमशः नाही...पूर्ण अनुभव एकत्र...
  • Log in or register to post comments

तात्या, अस॑ फसवू नका हो

डॉ.प्रसाद दाढे
Sat, 04/26/2008 - 17:19 नवीन
रोशनीची आठवण उरात ताजी असता॑ना हा नवा वार करू नका..तुम्ही आम्हा गरीब वाचका॑ना अस॑ चक्क्यासारख॑ टा॑गू नका..एकतर इतक॑ छान लिहिता, आणि तेही क्रमशः?का अ॑त पाहता??
  • Log in or register to post comments

च्यामारी

झकासराव
Sat, 04/26/2008 - 18:34 नवीन
४८ तासाचा वादा करुन तो पार न केल्याबद्दल तात्या शेट वर इन्डियन पीनल कोड ४२० नुसार खटला लावायचा का काय आता???????????????? :) आणि किती वाट बघु?? अवांतर : तात्या शेठ काल तुमच्या मामलेदाराची मिसळ (तिखट अशी ऑर्डर देवुन) खाल्ली. चांगली आहे. :) अजुनच अवांतर : नुकतेच मिसळपाव.कॉम चे उर्ध्वश्रेणीकरण ( अपग्रेडेशन )>>>> तो उर्ध्वश्रेणीकरन हा शब्द मनात म्हणताना देखील आमचाच उर्ध्व लागला की. डेंजर शब्द हाये.
  • Log in or register to post comments

क्षमस्व!

विसोबा खेचर
Sat, 04/26/2008 - 18:51 नवीन
झालेल्या विलंबाबद्दल रसिक मायबाप वाचकांची मी मनापासून क्षमा मागतो. अचानक काही घरगुती/कार्यालयीन कामं आल्यामुळे दुसर्‍या भागास थोडा विलंब झाला आहे. दुसरा (अंतीम) भागही बराचसा लिहून तयार आहे. परंतु त्यामध्ये काही ठिकाणी अद्याप माझ्या मनासारखं लेखन झालेलं नाही, ते जरा ठाकठीक करून सोमवार दिनांक २८ एप्रिल २००८ रोजी संध्याकाळी ७ वाजण्याच्या आत दुसरा भाग प्रसिद्ध करतो... येत्या आठवड्यातच रौशनीचं लेखनही पूर्ण करण्याचा मानस आहे... असो, झालेल्या विलंबाबद्दल रसिक मायबाप वाचकांची मी पुनश्च एकदा क्षमा मागतो. मिपाकर रसिक मला उदार अंत:करणाने क्षमा करतील अशी खात्री आहे... तात्या.
  • Log in or register to post comments

आता विलंब नको :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 04/26/2008 - 20:46 नवीन
असो, झालेल्या विलंबाबद्दल रसिक मायबाप वाचकांची मी पुनश्च एकदा क्षमा मागतो. मिपाकर रसिक मला उदार अंत:करणाने क्षमा करतील अशी खात्री आहे... कोयी बात नही, माफ किया ;) सोमवार दिनांक २८ एप्रिल २००८ रोजी संध्याकाळी ७ वाजण्याच्या आत दुसरा भाग प्रसिद्ध करतो... या दिवशी कोणतेही घरगुती/कार्यालयीन काम निघू नये असे वाटते :) येत्या आठवड्यातच रौशनीचं लेखनही पूर्ण करण्याचा मानस आहे... आपल्या इच्छेला शुभेच्छा !!! आपला बिरुटेसेठ, (तात्याचा लेखनाचा जुना पंखा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

बास काय?

प्रभाकर पेठकर
Sat, 04/26/2008 - 18:58 नवीन
बाऽऽस काय तात्या, जाओ मुआऽऽफ किया।
  • Log in or register to post comments

अच्छा बाबा

डॉ.प्रसाद दाढे
Sat, 04/26/2008 - 20:33 नवीन
अच्छा बाबा माऽऽऽफ किया..रोशनीही लिहिणार आहात हे वाचून विशेष आन॑द झाला :)
  • Log in or register to post comments

तात्या,

देवदत्त
Sat, 04/26/2008 - 22:02 नवीन
तात्या, लवकर लिहा. दोन्ही एकत्र वाचूनच प्रतिक्रिया देतो :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा