या उपद्रवाची कल्पना भारतीय संरक्षण खात्याला होती व आहे. त्यासाठी काही उपाययोजना केली गेली आहे. मात्र फक्त भारतीयच नव्हे तर सध्याच्या सर्व जागतिक पुढाऱ्यांच्या कचखाऊ व भ्याड मनोवृत्तीमुळे, जगाला शांततापुर्ण सहजीवन येत्या काही वर्षात अशक्य होणार असे संकेत आहेत.
शशिकांत
या उपद्रवाची कल्पना भारतीय संरक्षण खात्याला होती व आहे. त्यासाठी काही उपाययोजना केली गेली आहे. मात्र फक्त भारतीयच नव्हे तर सध्याच्या सर्व जागतिक पुढाऱ्यांच्या कचखाऊ व भ्याड मनोवृत्तीमुळे, जगाला शांततापुर्ण सहजीवन येत्या काही वर्षात अशक्य होणार असे संकेत आहेत.
शशिकांत
मी तुमच्याशी सहमत आहे. आजच्या "फट् म्हणता ब्रह्महत्या" परिस्थितीत फक्त पाकिस्तानी व चिनी "डॉन क्विक्झोट" प्रवृत्तीचे लोकच मनमानी करू शकतात.
बाकीचे "good boy" नेते कचखाऊ वृत्तीने वागतात!
सुधीर काळे, जकार्ता
------------------------
हा दुवा उघडा: http://72.78.249.107/esakal/20100309/5306183452989196847.htm
किती किती खोटारडेपणा... किती ती फसवाफसवी! अशा सत्ता, असे लोक मोकाट असल्यावर नक्की कोणावर विश्वास ठेवायचा? अमेरिका अॅन्ड पाकिस्तान डिझर्व्ह ईच अदर!!!
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
अरुंधती-ताई,
अगदी मनापासूनच्या रागातून आलेला हा प्रतिसाद मला सर्वात जास्त आवडला. पुस्तक वाचतांना मलाही असेच वाटत होते कीं इतके लोकप्रतिनिधी (जॉन ग्लेन, सोलार्त्झ, क्रॅन्स्टनसारखे) रेगनच्या खरे बोलण्याबाबत संशय घेत असताना इतकं खोटं बोलणं खपून कसं गेलं व खरं दडवून कसं ठेवता आलं?
हे प्रतिनिधीगृहातले सभासद, सिनेटर्स व गालुच्चींसारखे सनदी नोकर अगदीच कसे इतके 'गोबर-गणेश'?
कां सगळेच विकाऊ होते? लुटपुटीचा विरोध करायचा आणि स्वत:ची 'धन' झाली कीं गप्प बसायचं?
आणि आपले राजदूत, दूतावासातील RAW चे प्रतिनिधी काय अमेरिकेला मजा मारायला गेले होते? इतकं रामायण घडलं पण कुणालाच कसं कांहींच कळलं नाहीं, दिसलं नाहीं, ऐकू आलं नाहीं? मग यापेक्षा सगळे दूतावास बंद करून टाकावेत व पैसे तरी वाचवावेत!!
सुधीर काळे, जकार्ता
------------------------
हा दुवा उघडा: http://72.78.249.107/esakal/20100309/5306183452989196847.htm
निर्णय घेणे आणि आदेश देणे..ह्या दोन गोष्टी जोवर भ्रष्ट राजकारण्यांच्या हातात आहे तोवर त्यांना माहिती पुरवणार्या गुप्तचर संघटना,लष्कर वगैरेंनी कितीही चांगलं आणि नेकीने काम केलं तरी ते फुकट जातं.
राजकारणात १+१=२ कधीच होत नसतात...त्यामुळे कोणत्या गोष्टीमुळे काय घडेल वगैरे सांगणं खूप कठीण आहे.
देशप्रेम वगैरे बाबी ह्या फक्त जनतेसाठी असतात...राजकारण्यांचे प्रेम फक्त सत्तेवर...बुडाखालच्या खुर्चीवर असते आणि ती टिकवण्यासाठी ते लोक काहीही करू शकतात.
त्यामुळेच तर पडद्यामागे चाललेल्या कुटिल कारवाया लोकांसमोर जरी आल्या...तरीही त्यामुळे फारसा फरक पडत नाही...फक्त काही दिवस प्रसार माध्यमांची चलती होते आणि लोकांना आपापसात वांझ चर्चा करण्यासाठी अजून एक विषय मिळतो...इतकेच.
खरे आहे तुम्ही म्हणता ते! पण 'इमानदारी'त काम करणार्यांना राग येणारच व तसा अरुंधतीताईंना व मलाही आला.
पण बदल आपल्यालाच घडवून आणायचा आहे. जमेल तेवढे व जमेल तसे करत रहायचे व वैफल्यग्रस्त व्हायचे नाहीं हाच माझा तरी प्रयत्न असेल!
सुधीर काळे, जकार्ता
------------------------
हा दुवा उघडा: http://72.78.249.107/esakal/20100309/5306183452989196847.htm
"अमेरिका अॅन्ड पाकिस्तान डिझर्व्ह ईच अदर!!!" हेही वाक्य दाद देण्यासारखे आहे! अगदी खरं आहे! दुर्दैवाने या दोन डिसर्विंग देशांच्या 'प्रेमप्रकरणा'त भारताला मधल्यामध्ये ताप होतोय्!
धन्यवाद.
सुधीर काळे, जकार्ता
------------------------
हा दुवा उघडा: http://72.78.249.107/esakal/20100309/5306183452989196847.htm
सही, हॅट्स ऑफ टू खान आणि पाकिस्तानी नेते, याला म्हणतात रिझल्ट ओरिएंटेशन. इंग्रजी मधे म्हणतात ना 'गॉड हेल्पस् देम हू हेल्प देमसेल्व्हस्' . जे पाहीजे होते ते 'हूक ऑर क्रूक' पध्दतीने त्यांनी पाकिस्तानसाठी मिळवले. त्या साठी त्यांनी जागतीक राजकारण, परिस्थितीचा जबराट वापर केला. चाणाक्य त्यांना कळला हो. आम्हाला असे नेते कधी मिळणार? :(
पण खरे तर ही पाकिस्तानी हुषारी की अमेरीकी मूर्खपणा हेच माहित नाही, कधी कधी वाटते अमेरीकेला हेच पाहिजे होते किंवा त्यांच्या आशिर्वादानेच हे झाले आणि त्या वेळच्या जागतीक परिस्थितीचा विचार करता आणि अमेरिकन विचारपध्दती बघता हे शक्य वाटते.
एनी वे, खरे कधी बाहेर येईल असे कधी वाटत नाही.
तुषार
विश्व जालावरील मराठी जग
सुधीर काका, तुम्ही फार कठीण पण छान काम करता आहात, त्या मुळे तुम्हालाही हॅट्स ऑफ
तुषार,
धन्यवाद. मूळ पुस्तकाचे रूपांतर करतांना मी त्यात माझी मते घुसडत नाहीं, पण त्या त्या लेखाखाली माझ्या प्रतिसादांत ती मी लिहितो.
शत्रूच्या शक्तींचा अभ्यास नेहमीच करावा व त्या नात्याने मी झिया, डॉ. खान, आगा शाही व मुशर्रफ या चौघांना खूप जास्त गुण देतो. मला असे वाटते कीं पाकिस्तानी सेनाधिकार्यांना व्यवस्थापनाचे प्रशिक्षण छान दिले जात असावे.
डॉ. खान हे तर एक अद्वितीय व्यक्तिमत्व आहे असे पुस्तक वाचल्यावर वाटते. ही मालिका संपल्यावर एक अख्खा लेख त्यांच्यावर लिहायचा विचार आहे. बघू उत्साह राहतो कां!
प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद.
अद्याप प्रत्यक्ष परिचय नसल्याने एकेरी उल्लेख करावा कीं नाही या पेचात पडलो होतो, पण तूच मला 'काका' म्हणून संबोधलेस त्या अर्थी तू वयाने बराच लहान असावास असे वाटल्याने असा उल्लेख केला. चालेल ना?
सुधीर काळे, जकार्ता
------------------------
हा दुवा उघडा: http://72.78.249.107/esakal/20100309/5306183452989196847.htm
एक प्रश्न पडतो.....एका ट्वीन टॉवर वर हल्ला झाला म्हणून अमेरीकेने हजारो मैल दूर असलेले अफगाणीस्तान उध्वस्त केले.
कोणताच हल्ला न होताही अमेरीकेने सद्दाम ला पदच्यूत केले फाशी दिले इराक भस्मसात केले
या उलट भारतात वर्षभर पाकिस्तान काहीनाकाही कुरापती काढतच असतो. कारगीलच्या वेळेस संधी असूनही भारताने सर्वंकश यूद्ध पुकारले नाही.
हा भ्याडपणा की की मूर्खांचा शहाणपण मानायचा ?
पाकिस्तान हे अमेरीकेच्या माडीवर बसलेले द्वाड कार्टे आहे. भारताने याचा बाउ किती दिवस करायचा?
जय हो, विजूभाऊ, जय हो!
खरं तर २६/११ नंतर लगेच प्रतिहल्ला केला असता तर सारे जग आपल्यामागे उभे असलेले दिसले असते. पण आपले भोले सांब नेते (व मावश्या) निषेधखलिते पाठवत बसले! मग जगानेही आपले पाणी जोकले.....!
आपण आता निर्लज्ज झालो आहोत! आधी मारे जाहीर केले कीं पाकिस्तान टेरर नेटवर्क नष्ट करेपर्यंत पुन्हा बोलणी नाहींत. पण मग शेपूट पायांत घालून बसलोच ना वांझ वाटाघाटींना?
अरुणाचलवर उदक सोडायचंच बाकी आहे.
कसले आपले दळभद्री नेते व सरकार व त्यांना निवडून देणारे आपण सर्व तर महा दळभद्री!
सुधीर काळे, जकार्ता
------------------------
हा दुवा उघडा: http://72.78.249.107/esakal/20100309/5306183452989196847.htm
आपण १९७१ साली एक सफाईदार घाव घालून त्या देशाचेच दोन तुकडे केले. शत्रूची आर्थिक शक्ती निम्म्याने कमी केली, आणि दोन आघाड्यांवर लढाई करावी लागण्याऐवजी एका बाजूला मित्रराष्ट्र तयार केलं. यामध्ये रॉ, लष्कर, वायूदल, व देशाचं सिव्हीलियन नेतृत्व यांनी नेत्रदीपक कामगिरी बजावली.
यापेक्षा आणखीन काय अपेक्षा असावी?
राजेश
जुन्या गोड आठवणींवर किती वर्षं जगायचं हाच प्रश्न आहे! खरंच इंदिराजींची पदोपदी आठवण येते आजच्या नेत्यांचे काम पाहून.
या लेखात दिल्याप्रमाणे इंदिराजींनी कहूता उडवायची योजना केली होती, पण दुर्दैवाने कार्यवाहीत नाहीं आणली!
पण अरुणाचलवरून झालेली World Bank च्या सभेतली बाचाबाची व आपले मागे घेतलेले पाऊल ही बातमी सगळीकडे झाली होती. कृष्णासाहेबांनीसुद्धा सारवासारवीचीच उत्तरं दिली!
"जिथे गवताचे पातेही उगवत नाहीं (इति नेहरू)" असा प्रचंड प्रदेश चीनने आधीच गिळला आहे. सध्या नेपाळमार्गे उपद्व्याप चालूच आहेत. लडाखला चिन्यांनी त्यांच्या बाजूला सीमेपर्यंत हमरस्ते बांधले! आपण बांधायला गेल्यावर objection घेतले. दुर्दैवाची गोष्ट अशी कीं आपण ते काम थांबवले! मी या घटनेची लिंक शोधतो आहे. मिळाल्यास आपल्याला पाठवेन.
सुधीर काळे, जकार्ता
------------------------
दोन अत्यंत वाचनीय दुवे: http://www.dnaindia.com/opinion/main-article_dynasty-vs-government_1368625 (DNA) व http://indiatoday.intoday.in/site/Story/89840/Inhuman+rights.html?complete=1 (India Today)
दुर्दैवाची गोष्ट अशी कीं आपण ते काम थांबवले! मी या घटनेची लिंक शोधतो आहे. मिळाल्यास आपल्याला पाठवेन.
काळे काका हे दुवे चालतील का पहा जरा :---
http://rupeenews.com/2009/11/30/chinese-army-forces-indian-to-stop-road-construction-in-ladakh/
http://www.indianexpress.com/news/Work-stopped-on-Ladakh-road-after-Chinese-troops-object/547903
http://www.expressindia.com/latest-news/Work-stopped-on-Ladakh-road-after-Chinese-troops-object/547903/
मदनबाण.....
There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama
अमेरिकेचे भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांची केवळ आपल्या मदतनीसांना वाचवण्यासाठी खोटे बोलल्यासाठी राजीनामा देण्यास भाग पाडणारी अमेरिकन मीडियाची स्नायूशक्ती (muscle power) रेगन यांच्या काळात इतकी मवाळ कशी झाली? अमेरिकेतीलच नव्हे तर युरोपमध्ये चाललेल्या खटल्यांमध्येही हस्तक्षेप करून त्या खटल्यांना उलथून टाकण्यात किंवा हलक्या शिक्षा देऊन त्यांचे रूपांतर 'निलंबित शिक्षां'मध्ये करण्याचा पराक्रम रेगन सरकार कसा काय गाजवू शकले?
निक्सन यांचे किरकोळ खोटे बोलणे एका बाजूला तर रेगन यांचे धादांत खोटे बोलणे (व तेही प्रतिनिधीगृहाच्या सभासदांपुढे) दुसर्या बाजूला! एकाला अपमानित करून पदच्युत करणारी मीडिया त्यानंतरच्या आठच वर्षांत इतकी नक्काम कशी झाली हे अनाकलनीय आहे!
अमेरिकास्थित मंडळी यावर कांहीं प्रकाश प्रकाश टाकू शकतील काय?
सुधीर काळे, जकार्ता
------------------------
हा दुवा उघडा: http://72.78.249.107/esakal/20100309/5306183452989196847.htm
सुधीरभाऊ,
हेही प्रकरण छान लिहिले आहे तुम्ही. मजा आली वाचायला व नवी माहिती पण मिळली.
रेगन भलताच चालू माणूस होता! तुमचे लेख वाचेपर्यंत कल्पना नव्हती.
पुढच्या प्रकरणची वाट बघतो आहे.
भापू
काका,इतक छान लिहीत आहात की काय विचारु नका.पाकड्यांना अमेरिका इतक झुकत माप देउन मदत देतच राह्यते आहे याचे नेहमी आश्चर्य वाटते,अमेरिकेला जेव्हा केव्हा पाकड्या़कडुन फटका बसेल तेव्हा बराच उशीर झाला असेल असं मला नेहमी वाटतं...
मदनबाण.....
There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama China hackers ‘stole’ missile info, Naxal data
http://news.in.msn.com/internalsecurity/news/article.aspx?cp-documentid=3771253
मित्रांनो,
आधी योजल्याप्रमाणे आज मी 'सकाळ'ला प्रस्तावनेचे प्रकरण + पहिली सात प्रकरणे पाठविली आहेत.
या उपक्रमात बर्याच 'मिपा'करांनी टंकनाच्या कांही चुका, द्विरुक्ती व कांहीं ठिकाणी स्पष्ट अर्थबोध होत नसल्याचेही लक्षात आणले. त्यांची मला खूप मदत झाली. याबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार व यापुढेही मला अशीच 'घरची' मदत मिळावी अशी त्यांना व सर्व मिपाकर वाचकांना विनंती!
मालिका प्रकाशित होऊ लागल्यास त्यांची लिंक इथे पाठवीन.
धन्यवाद!
सुधीर काळे, जकार्ता
------------------------
हा दुवा उघडा: http://72.78.249.107/esakal/20100309/5306183452989196847.htm
नमस्कार !
आपण जर पूर्ण पुस्तकाचे सविस्तर भाषांतर करणार असलात तर मेहता पब्लिशींग हाऊस हे आपल्यासाठी योग्य ठरेल. त्यांचा ई-मेल mehpubl@vsnl.com Attn. Mr. Mehta.
आगावू सल्ल्यासाठी क्षमस्व !
जयंत कुलकर्णी
कुलकर्णीसाहेब, मन:पूर्वक आभार!
आपणहून पण अतीशय आपुलकीने व जिव्हाळ्याच्या भावनेने दिलेला हा सल्ला माझ्यासारख्या या 'प्रांता'तल्या नवशिक्याला खूपच उपयोगी असा सल्ला आहे व मी मेहतांशी जरूर संपर्क साधेन!
मी या पुस्तकाचे ५५-६० टक्के संक्षिप्तीकरण व भाषांतर करत आहे. 'मिपा'वर प्रकाशित होणारी सर्व प्रकरणे अशी संक्षिप्त करून व मग भाषांतर करून पोस्ट केलेली आहेत.
मेहतांचे ऑफीस कुठे आहे? पुण्याला असेल तर मी २१, २२, २३ ला पुण्यात आहे त्या वेळी त्यांना समक्ष भेटेण्याचा प्रयत्न करेन.
पुनश्च आभार.
सुधीर काळे, जकार्ता
------------------------
दोन अत्यंत वाचनीय दुवे: http://www.dnaindia.com/opinion/main-article_dynasty-vs-government_1368625 (DNA) व http://indiatoday.intoday.in/site/Story/89840/Inhuman+rights.html?complete=1 (India Today)
नमस्कार !
खरं सांगूका, सकाळ इतका फालतू वर्तमानपत्र सध्या महाराष्ट्रात नाही. पैसे देऊन जहिराती वाचणे एवढाच सकाळचा अर्थ उरला आहे. आणि असले फालतू लेख ते छापत नाहीत. तुम्ही जर शरद पवारांनी राजकारणात कोणाचाही विश्वासघात केला नाही याच्यावर जर ५ वर्षे चालणारी लेख मालीका लिहीलीत तर मात्र तुमची चंगळ आहे. त्याच बरोबर एखादी जहिरात दिलीत तर मग काय विचारायलाच नको. :-)
मेहतांचे ऑफिस पुण्यातच आहे.
जयंत कुलकर्णी.
व्यनि पहा
सुधीर काळे, जकार्ता
------------------------
दोन अत्यंत वाचनीय दुवे: http://www.dnaindia.com/opinion/main-article_dynasty-vs-government_1368625 (DNA) व http://indiatoday.intoday.in/site/Story/89840/Inhuman+rights.html?complete=1 (India Today)
पण हा व्यनि बघायचा कुठे ? मला तर माझ्या खात्यावर इनबॉक्स असे काही दिसले नाही.
माझ्यासाठी यात वेळ घालवल्याबद्द्ल धन्यावाद !
जयंत कुलकर्णी.
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
प्रतिक्रिया
अभ्यासपुर
मान्य आहेच
मान्य आहेच
"good boy" नेते कचखाऊ वृत्तीने वागतात!
किती किती
सगळेच कसे इतके 'गोबर-गणेश'?
काळेसाहेब,
पण 'इमानदारी'त काम करणार्यांना राग येणारच!
पण मधल्यामधे भारताला ताप!
हॅट्स ऑफ
मी झिया, डॉ. खान, आगा शाही व मुशर्रफ यांना खूप जास्त गुण देतो
एक प्रश्न
जय हो!
कशाला वाईट वाटून घ्यायचं?
जय इंदिरा-जी!
दुर्दैवाच
अमेरिकन मीडियाची स्नायू-शक्ती इथे कुठे गायब झाली?
छान लेख
काका,इतक
मस्त लिखाण!
आज सकाळ'ला प्रस्तावनेचा + पहिली सात प्रकरणे पाठविली
Fantastic !
नमस्कार
आपुलकीच्या व जिव्हाळ्याच्या सल्ल्याबद्दल धन्यवाद!
नमस्कार
इकडे
व्यनि पहा
व्यनि ????:-)
व्यनि..
अच्छा !