कधीतरी .... कुठेतरी.... थोडेसे रसग्रहण....
कधीतरी .... कुठेतरी....
.........खरेतर लेखन हा आमचा प्रांत नव्हे, तरिपण या छायाचित्रांचे थोडेसे रसग्रहण करण्याचा एक प्रयत्न.....
खालील चित्राचे चार भाग, म्हणजे आकाश, दूरचा डोंगराळ प्रदेश, खालील जमिनीचा उतार, घरे आणि त्याभोवतालची झाडे, खडक.... या चारी भागात एक सुंदर समतोल तर आहेच, शिवाय या सर्वांवर असलेले धुक्याचे एक हलकेसे आवरण या चारी भागांना बांधून ठेवते. अगदी समोरील झुडुपांचा, घराखालच्या खडकांचा, तसेच घरांच्या छपरांच्या सावलीचा भाग, लहान झाडांचे खुंट आणि मोठ्या झाडांच्या फ़ांद्या...या सर्व चित्रात विखुरलेल्या गहिर्या जागा, आणि तश्याच विखुरलेल्या प्रकाशमान जागा... मुख्यतः झाडां-झुडुपांवरील ऊन्ह आणि दूरची पायवाट, हे या चित्राला विषेश उठाव देणारे भाग, पण तेही अगदी हवा तेवढाच, त्यात भडक नाट्यमयता अगदी नाही......घरे मानवनिर्मित असली, तरी त्यांच्यावर वर्षानुवर्षे झालेल्या निसर्ग-चक्रांच्या परिणामी त्यांचे भोवतालच्या निसर्गाशी घडून आलेले अतूट नाते....आता निसर्गाने त्यांना आपल्या उबदार कोषात आपलेपणाने सामावून घेतलेले आहे.....खरंच, अश्या ठिकाणी रहायला किती छान वाटेल.....
खालील दृष्य बघताना अपली नजर डावीकडून खाली वेगाने उतरत, ठेचाळत, गहिर्या हिरवेपणात चिंब भिजत, लाल-सोनेरी उन्हात न्हाणार्या घरापाशी थबकत, अगदी उजवीकडल्या दाट झाडीत पहुचते न पहुचते, तोच तिथले इंद्रधनुष्य आपल्याला उंच उंच आकशात भरार्या घ्यायला लावते....तिकडून ढगांमध्ये रमत गमत आपण डावीकडल्या जुन्या घरांच्या चिमण्यांमधून खाली उतरतो, आणि परत त्याच अटळ, पण हव्या हव्याश्या वाटणार्या उताराच्या प्रवासाला लागतो....यंदा आपण थोडेसे जास्त तपशील बघतो, जसे दोन्ही झाडांचं एकमेकांशी चाललेलं हितगुज, आणि खालच्या हिरवाईवर इथे तिथे लाजत लाजत पसरलेलं थोडंस ऊन्ह.... आकाशाचा पसारा मोठा असला, तरी जमिनीच्या हिरव्या गहिराईमुळे आणि त्यातील अनेक बारकाव्यांमुळे एकंदरित तोल बरोबर साधला जातो, आणि या दोघांना जोडणारे इंद्रधनुष्य ढगांमध्ये शिरता शिरता आपल्याला अलगदपणे तिथे सोडून स्वतः मात्र हळुच हरवून जाते...
रात्रीच्या वेळी या गूढरम्य जागी चालणारा हा एकला प्रवासी डावीकडल्या उबदार घरात शिरून विसावणार, की पलिकडल्या घराच्या पायर्या चढून हिरवट, काळोखे दार ठोठावणार? की दाट काळोखाने वेढलेल्या गल्लीत शिरणार? पहाट होईपर्यंत हा असाच भटकत राहणार का? तो जर मी असतो, तर नक्कीच भटकत बसलो असतो.....
असावे घरटे आपुले छान......
इथे आपले कोणीच नाही.....तरिपण इथून निघूच नये, असे वाटते....पण जरा जपून....जीएंच्या 'प्रवासी' मधील "ते" गाव हेच तर नव्हे?
पाऊस अगदी कोसळण्यात आहे,पटकन त्या झाडाखाली जाऊया....पण वीज तर नाही ना कोसळणार?
इथे राहणारी माणसे पण अशीच वॄद्ध, जराजर्जर असतील का? त्यांना मुले, सुना, गोजिरवणी नातवंडे असतील ना?
रोमच्या प्राचीन वैभवाचा सूर्य केंव्हाच ढळला...आता उरलेत भग्नावशेष.....पण तेही किती भव्य दिव्य....
या धबधब्यासोबत आपणही खालच्या कुंडात कोसळावे....मग पक्षी बनून दूर दूर उडून जावे.....
महाराज अजून नाही का पहुचले गडावर? त्यांचा इशारा आला, की मगच मी हा देह सोडेन....

प्रतिक्रिया
सु रे ख..! हा
अशक्य
कॉपीराईट वगैरे भानगडी
सुंदर...
झक्कास!
सुंदर
ही चित्रे बघताना....
छान चित्र
+१ क्लास! -
चित्रकथेला एक गूढात्मक पार्श्वभूमी
रसग्रहण
प्रतिक्रियांबद्दल सर्वांचे आभार.
मार्च २०१० चा धागा
भन्नाट आहेत सगळी चित्रे !
पाऊस अगदी कोसळण्यात आहे,पटकन त्या झाडाखाली जाऊया....पण वीज तर नाही ना कोसळणार?हे चित्र आहे, फोटो नाही, हे सांगितल्याशिवाय कळणार नाही ! चित्राच्या तळाशी असलेली पायवाट म्हणजे अशक्य चित्रकला आहे !!!!!!!!!!!!!!!!!!!काही उपाय आहे का ? चौदा वर्षे जुन्या धाग्यातले फोटो दिसेनासे
दिसत नव्हते...
मिपा तांत्रिक बाबी.
सायकल जरा बाजूला ठेवली तरच
लै अवघड आहे.
पुण्यात प्रशांतची भेट झाली तेंव्हा हा विषय
फोटोचा संदर्भ घेऊन मांडलेलं