लय भारी वळख करूं देली काका तुमी. यातल्या कथा तुमी तुमच्या भासेत टाका ना. नाय तरी इथं इक्रम येताळाच्या कथा चालू झाल्या हातती. तुमच्या कथा त्या पेक्शा लयी बेस र्हातील.
डायबेटीस विरुद्ध लढा
महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्यांच्या कटी||
महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३
एकच लेख सर्व संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्याच्या मनोवृत्तीचा निषेध म्हणून दुसर्या संकेतस्थळावर टाकलेला माझा प्रतिसाद येथे चिकटवत आहे. ;)
शुकसारिका असो किंवा अरेबियन नाईट्स (अरेबियन नाईट्सचा उगम तोता मैनाच तर नसावा) बर्याचशा कथा या स्त्रिया बेईमान आहेत हे दाखवणार्या आहेत.
शुकसारिकेत कथांची सुरुवात याच कारणास्तव होते की आपल्या मालकाची बायको, मालकाच्या गैरहजेरीत प्रियकराला भेटण्याचा बेत ठरवते तेव्हा तिला त्यापासून परावृत्त करण्यास शुक गोष्टी सांगत जातो.
अरेबियन नाईट्समध्ये शहरजादी शहरयारने आपला शिरच्छेद करू नये आणि त्याचा बायकांवर विश्वास बसावा म्हणून गोष्टी सांगत जाते. अरेबियन नाईटस् चे मूळच बायकांच्या बेईमानीवर आधारीत आहे. त्यातील कोळी व जीनची गोष्टही स्त्रियांची बेईमानी दाखवते.
दोन्ही कथांची मांडणी कथेत - कथा, त्यात आणखी एक कथा अशी केलेली आहे.
या तेवीस कथात एक कथा सारिका सांगते व त्याला उत्तर म्हणुन शुक चारित्र्यहीन स्त्रीची कथा सांगतो.
हे असे आहे का? माझ्यामते व्यापारानिमित्त बाहेर गेलेल्या व्यापार्याची बायको आपल्या प्रियकराला भेटायला इतकी उतावीळ असते की ती तिला रोखू पाहणार्या मैनेची मान मुरगळून टाकते. पोपट शहाणा असतो तो तिला सरळसोट परावृत्त करून आपला जीव धोक्यात टाकत नाही परंतु गोष्टीरुपाने तिला बोध देतो आणि सकाळपर्यंत रोखून धरतो.
असो. हे वरील पुस्तक मुलांसाठी आहे की मोठ्यांसाठी? असे साहित्य विस्मृतीत जाऊ नये म्हणून केलेले प्रयत्न वाखाणण्यासारखे आहेत. तरी, तत्कालीन समाजाचे दर्शन त्यात घडते किंवा कसे हे कळत नाही कारण या कथा मुखे-परमुखे शेकडो वर्षे चालल्याने त्यात काळानुसार बदल झाले असावेत. शुकसप्ततीचे अकबराच्या दरबारी तुतीनामा असे फारशी भाषांतर केले गेले होते. त्यात गोष्टी जशाच्या तशा राहिल्या की त्यांचे मुघलसंस्कृतीत ट्रान्सफॉर्मेशन झाले हे माहित नाही.
अरेबियन नाईट्स या त्यामानाने जुन्या गोष्टी. त्याही भारतीय लोककथांवरून प्रेरित असल्याचे सांगितले जाते. शुकसारिकाच तर त्यांचे मूळ नाही ना? :-) दोन्ही कथांमध्ये, घराबाहेर असणार्या नवर्यांना आपल्या अपरोक्ष पत्नी काय उद्योग करत असावी अशी चिंता पडत असावी. शेवटी काय आहे की माणूस स्वतःवरून इतरांना जोखतो. ;-)
प्रियाली फक्त स्त्री एकटी बेइमान होऊच शकत नाही , साथ द्यायला पुरुष हवा ना ;)
तेव्हा फक्त स्त्रीच्या बेइमानीच्या कथा कोणी म्हणूच शकत नाही.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
हंसः श्वेतो बकःश्वेतो को भेदो बकहंसयो:|
नीरक्षीरविवेके तु हंसः हंसो बको बकः||
फक्त स्त्री एकटी बेइमान होऊच शकत नाही , साथ द्यायला पुरुष हवा ना
पुरुष हा मुलतःच 'बेईमान' आहे असे गृहित असते. केवळ संधी मिळत नाहि म्हणुन तो ईमानदार असतो. संधि मिळेपर्यंतच तो साधु असतो मिळाल्यावर संधिसाधु होतो. याचा उगम खर तर जैविक प्रेरणेवर आहे.
बाईने वेसण घालून त्याला आपल्या काबुत ठेवायचे असते. ही जबाबदारी पुन्हा बाईवरच
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
हा निसर्गत: स्खलनशील मानला गेलाय आणि आहेही....त्यामुळे त्याला नैतिक अधिष्ठान नाहीये. मात्र स्त्रीला नैतिकतेत अडकवून ठेवलंय समाजाने आणि तिनेही..स्वत:ला. त्यामुळे स्त्रीने परपुरुषाशी संबंध ठेवला तर ती पातकी आणि त्याच वेळी तो पुरूष मात्र...पुरूषसिंह. ;)
बिचार्या बायका..दोन्हीकडून दूषणं मिळतात त्यांना.
केवळ संधी मिळत नाहि म्हणुन तो ईमानदार असतो.>>>>
हे मात्र पटलं बर्का दादानु ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
प्रतिक्रिया
चांगली ओळख
छान!!!
लय भारी
निषेध!
प्रियाली
हॅहॅहॅ
पुरूष...
केवळ संधी
छान!!
रंजक...