शुकसारिका
शुक-सारिका
वरदा बुक्सचे प्रकाशक ह अ भावे यांच्या दरबारी आमची हजेरी अधून मधून असतेच. आजच बसलो होतो. त्यांना आंतरजालीय वाद व गमतीजमती याबाबत गप्पा मारत माहिती देत होतो. तेवढ्यात त्यांना पुस्तक मागणीचा फोन आला.ग्राहक अधिक माहिती विचारत होता. "शुक म्हणजे पोपट, सारिका म्हणजे मैना. ....."भावे नीरगाठउकलतंत्राने फोड करून फोनवर सांगत होते
तोता मैना की कहानी तो पुरानी हो गय़ी! आता मला सांगा जुन्या बाटलीत नवी दारू घ्यायला आवडेल की नव्या बाटलीत जुनी दारू घ्यायला आवडेल. ओ काय लावलंय! पहिली बाटली फोडा दारू महत्त्वाची. हॆहॆहॆ आता कसं बोल्लात! चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलं असेलच ही शुकसारिका म्हणजे काय?
हम बेवफा हरगीज ना थे ! पर हम वफा करना सके। पुरुष बेइमान की स्त्री चारित्र्यवान हा वाद आंतरजालावरही जुना आहे व जालाबाहेर ही जुनाच आहे. हा विषय काही क्षणाची सोबत नसून अनंत काळची सोबत आहे. जालकरी स्त्री पुरुषांना चघळायला तो आवडतो. काहींना झाडावर बसून पाहायला आवडतो. संस्कृत साहित्यात या वादाविषयी अनेक पुस्तके प्रसिद्ध व लोकप्रिय आहेत. त्यापैकी शुकसारिका या संस्कृत ग्रंथाचा अनुवाद हिंदीत तोता- मैना नावाने फारच लोकप्रिय आहे मुख्यत: या प्रेमाच्या कथा आहेत व प्रेमात शृंगाराला महत्त्व आहेच. त्यामुळे काही शृंगारकथा या अश्लिलतेकडे कडे झुकलेल्या असतात हा आक्षेप असतोच. चटपटीत करताना हिंदी रूपांतरात देखील तसे घडलेले आहेच. मूळ संस्कृत साहित्यात श्लील अश्लील असा भेदच नाही. सर्व काही स्पष्ट आणि उघड असते. परंतु मराठी अनुवादात हा संयम पाळला आहे. कुटुंबात वाचण्यायोग्य होईल याची काळजी घेतली आहे.
या तेवीस कथांत एक कथा सारिका सांगते व त्याला उत्तर म्हणून शुक चारित्र्यहीन स्त्रीची कथा सांगतो. अशी ही कथांची प्रश्नोत्तरे या तेवीस कथांत चालू असतात. शेवटच्या कथेत शुक आणि सारिका यांचे एकमत होते व ते सुखाने संसार सुरू करतात.
मूळ पुस्तक हे संस्कृत असल्याने प्राचीन भारतातील समाजजीवनाचे प्रतिबिंब त्यात पाहायला मिळते. शेकडो वर्षांपूर्वीचा भारतीय समाज कसा होता याचेही दर्शन या कथांतून होते. या कथांचा समाजशास्त्रीय अभ्यास कुणी केला नसावा. या कथेत राजे राण्या प्रधान व प्रधानपुत्र श्रेष्ठी व व्यापारी, नर्तिका व नायिका, साधू व दरोडेखोर अशी नाना प्रकारची व्यक्तिचित्रे आढळतात.
प्रस्तावनेत ह.अ. भावे म्हणतात," संस्कृत साहित्यात शुकबहात्तरी व कोकोलाछत्तिशी असे अर्थ असलेली दोन पुस्तके उपलब्ध आहेत परंतु मला एक शुकसारिका असे नाव असलेले हस्त लिखित प्राच्यविद्या संस्थेत पाहायला मिळाले."
" शुकसारिका हे संस्कृत पुस्तक ही मूल तीनचार संस्कृत ग्रंथांवर आधारित आहे. यातील मूळ कथा जनसमूहात प्रचलित असलेल्या लोककथाच आहेत.भारतीय संस्कृतीत फार पूर्वीपासून कथाकथन होते. त्या कथाकथकांची जमात विसाव्या शतकापर्यंत कथाकथन करून उदरभरण करणारी आढळली आहे. या चित्रकथीजवळ एक पेटी असते व त्यातील चित्रे दाखवत ती कथा सांगतात असे चित्रकथील मी स्वत: लहानपणी पाहिले आहे"
या कथा चिरतरुणांची मन रिझवतात व चारित्र्य संपन्नतेचे ही महत्त्व पटवतात किमान तसा प्रयत्न करतात. आताच्या काळात चारित्र्य संपन्नता गोष्ट जरा अवघडच बनत चाललीय असो. कथेची नावे मोठी मजेशीर व सूचक असतात.
उदा. श्रेष्ठीपुत्र श्रीयाळ व भंगीकन्या; मदनपाल, कुत्रा व हिरामण पोपट; राजकन्या पद्मावती व साधू विद्यानंद सरस्वती; नीतिसेन विमला व प्रेमलता.
असो एवढा परिचय बास झाला.
पुस्तकाचे नांव- शुक-सारिका
संपादक - प्रकाशक:- ह. अ. भावे; वरदा प्रकाशन प्रा.लि ३९७/१ सेनापती बापट मार्ग पुणे 411016
फोन 25655654 ईमेल पत्ता- नाही
पृष्ठे- २१६ मूल्य- १५०/- (एकशे पन्नास फक्त)
वाचने
3719
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
चांगली ओळख
छान!!!
लय भारी
निषेध!
In reply to निषेध! by प्रियाली
प्रियाली
In reply to प्रियाली by शुचि
हॅहॅहॅ
In reply to हॅहॅहॅ by प्रकाश घाटपांडे
पुरूष...
केवळ संधी
छान!!
रंजक...