ओरिजिन्स ऑफ द कास्ट सिस्टिम

अप्पा जोगळेकर's picture
अप्पा जोगळेकर in काथ्याकूट
19 Mar 2010 - 12:52 pm
गाभा: 

इंग्रजी लेखाचा दुवा -

ओरिजिन्स ऑफ द कास्ट सिस्टिम

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Mar 2010 - 2:17 pm | बिपिन कार्यकर्ते

अप्पाजी, हे लेखन आपले आहे का? कृपया खुलासा करावा.

बिपिन कार्यकर्ते

नितिन थत्ते's picture

19 Mar 2010 - 2:18 pm | नितिन थत्ते

आप्पा, विंग्रजी वाचाय टायम लागतो. मराठीत लिवा की.

असो. वाचून प्रतिसाद देईन.

पहिल्या परिच्छेदापासुन (आर्यांचे आक्रमण) लोक तुटून पडणार आहेत.

नितिन थत्ते

Nile's picture

19 Mar 2010 - 2:21 pm | Nile

पहिल्या परिच्छेदापासुन (आर्यांचे आक्रमण) लोक तुटून पडणार आहेत.

इथे?? छे! ;)

अप्पा जोगळेकर's picture

19 Mar 2010 - 2:39 pm | अप्पा जोगळेकर

हो. हे लिखाण माझेच आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

19 Mar 2010 - 4:34 pm | प्रकाश घाटपांडे

अप्पा विंग्रजी कह्याला लिवता राव आमच्यासारख्यांना कवा समजायच.
म्हंजी पुर्वी ज्ञानग्रंथ संक्रुतात व्हते तव्हा जणसामाण्यांना ते समजत नसे. मंग ह्येंची च मक्तेदारी झाली की
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

विसोबा खेचर's picture

19 Mar 2010 - 5:01 pm | विसोबा खेचर

अरे बापरे.... एव्ढं विंग्रजी?

मग आमचा पास..!

तात्या.

अप्पा जोगळेकर's picture

19 Mar 2010 - 5:09 pm | अप्पा जोगळेकर

आर्यांचे भारतावर झालेले आक्रमण हा वादाचा विषय आहे. परंतु तसा स्पष्ट उल्लेख मी लेखात केलेला आहे हे ध्यानी घ्यावे. सत्य काय आहे हे डोळे उघडे ठेवून नि:पक्षपातीपणे तपासले पाहिजे. पण हे दिपंकर सारखे हिंदुत्ववादी आमचेच म्हणणे खरे अशा पद्धतीने हा वाद पुढे रेटतात हा माझा अनुभव आहे. दिप्या, तरी मी तुला मागेदेखील चर्चेदरम्यान सांगितलं होतं.

अप्पा जोगळेकर's picture

19 Mar 2010 - 5:12 pm | अप्पा जोगळेकर

नाही तात्या. असं करु नका. करा पाहू उतारी.

विसोबा खेचर's picture

19 Mar 2010 - 7:21 pm | विसोबा खेचर

अरे उतारी करायला हरकत नाही.. पण जळ्ळ्या त्या साहेबाची भाषा येत नाही ना आपल्याला..! :)

असो, तरीही प्रयत्न करतो..

तात्या.

Dipankar's picture

19 Mar 2010 - 5:26 pm | Dipankar

अप्पा हे माझेच म्हणणे खरे आणि तुझे खोटे हे मी कधी म्हणलो, मी फक्त टाईम्सचा दुवा दिला, आता चर्चाच करायची असेल तर तारा मध्ये टेबलावर करू

प्रशु's picture

19 Mar 2010 - 8:25 pm | प्रशु

अहो चर्चा इथेच करा.. आम्हाला सुद्धा लुफ्त उठवता येइल.....

नितिन थत्ते's picture

19 Mar 2010 - 10:04 pm | नितिन थत्ते

लेखाचा रोख आधी वर्णव्यवस्था आणि त्यातून जातींची निर्मिती असा आहे.
मुळात वर्णसंकर होऊन जातींची निर्मिती होऊ शकत नाही असे वाटते.

जाती याच मुळापासून वास्तव आहेत. जसजसे नवनवीन गट (टोळ्या) समाजात सामावल्या गेल्या तसतशा जाती बनत गेल्या.

टोळीचे अंतर्गत बेटीव्यवहाराचे तत्त्व आणि जातींचे तेच तत्त्व समांतर दिसते.

वर्णव्यवस्था हे असलेल्या व्यवस्थेचे काल्पनिक / हायपोथेटिकल एक्सप्लेनेशन आहे.
उदा. एखादे वेस्ट इंडिअन गाणे तात्यांनी ऐकावे आणि त्यातले सूर ऐकून हे क्षयज्ञ या रागात बसते असे म्हणावे तसे आहे. (क्षयज्ञ रागातून ते गाणे बनलेले नाही).

आर्यांचे आक्रमण सिंधुसंस्कृतीच्या विनाशानंतर १००० वर्षांनी ही माहिती कोठून मिळाली ? ते समकालीन असल्याचे (किंवा थोडातरी ओव्हरलॅप असल्याचे) मी आजवर वाचले आहे.

नितिन थत्ते

अप्पा जोगळेकर's picture

21 Mar 2010 - 9:11 am | अप्पा जोगळेकर

आर्यांचे आक्रमण सिंधुसंस्कृतीच्या विनाशानंतर १००० वर्षांनी ही माहिती कोठून मिळाली ?

मला ही माहीती 'Discovery Of India' या पुस्तकात मिळाली.

ते समकालीन असल्याचे (किंवा थोडातरी ओव्हरलॅप असल्याचे) मी आजवर वाचले आहे. जाती याच मुळापासून वास्तव आहेत. जसजसे नवनवीन गट (टोळ्या) समाजात सामावल्या गेल्या तसतशा जाती बनत गेल्या.टोळीचे अंतर्गत बेटीव्यवहाराचे तत्त्व आणि जातींचे तेच तत्त्व समांतर दिसते. -

मी शेवटच्या परिच्छेदात हे नमूद केले आहे आणि जातींच्या उगमाचे कारण अधिक जुन्या इतिहासात सापडू शकेल हेही नमूद केले आहे. तो शेवटचा परिच्छेद देत आहे.

It is also believed that Aryan migration had taken place in successive waves. Period which we are talking about (i.e. 2000 B.C. approximately) deals with most of the recent wave. So it could also be the case that process of the stratification of the community might have been initiated when older waves of Aryan people came to India. All this is entirely baffling & ambiguous though; it appears reasonable that seeds of the stratification of the society might have been sown in even more ancient past.