मी आणि नारायण भंगी
लेखनप्रकार
माझे अर्धे बालपण एका छोट्या गावात गेले. आमच्या गावात टोपली संडास होते. टोपली संडास म्हणजे पत्र्याच्या मोठ्या तेलाच्या डब्ब्याची एक बाजू कापून दिवस-दोन दिवस विष्ठा जमा करण्यासाठी बनवलेले भांडे. आमच्या वाड्यात एकमेव संडास होता आणि चार भाडेकरू होते. ग्रामपंचायतीचा ट्रॅक्टर रोज गावभर फिरत असे व या डब्ब्यांतील घाण एकत्र करून घेऊन जात असे. या ट्रॅक्टरच्या ड्रायवरचे नाव नारायण होते. तो, त्याची बायको आणि एक म्हातारी हे गावभर फिरून मैला गोळा करण्याचे काम करत असत.
नारायण - सतत बिड्या फुकणारा, अर्धवयस्क मिशी असलेला, मधला पडलेला दात सोडून सगळीकडे तांबारलेला - येता जाता आम्हा मुलांकडे कौतुकाने पाहत असे. घरून ताकीद दिल्यामुळे लांबूनच त्याच्याबरोबर मस्ती करायला आम्हाला खूप मजा येत असे. मी दुसरीत असतांना मला शाळेतच धनुर्वाताचा झटका आला. कंबरेखाली काहीच हालचाल करणे शक्य नव्हते. वर्गातल्या मुलांना कळले, बाईंना कळले व त्यांनी मला उचलून खाली (वर्ग दुसर्या मजल्यावर होता व फोनसारखी काहीच साधने नव्हती) आणले. योगायोगाने तिकडून नारायण ट्रॅक्टरवर येत होता. त्याने ट्रॅक्टर थांबवला. त्याच्या बायकोने (त्या माऊलीचे नाव कधीच कळले नाही) मला उचलले. ट्रॅक्टर सरळ सार्वजनिक दवाखान्यात गेला. रस्ताभर मी ओकत होतो. नारायणविषयी असलेली किळस बाहेर पडत होती. आई-वडिल येईपर्यंत नारायण, त्याची बायको थांबून होते. वडिल आल्यावर त्यांनी नारायणला मिठी मारली आणि रडू लागले. मी मनातच आंघोळ केली.
मी महिनाभर घरी पडून होतो. नारायण रोज सकाळी येत असे. फुटक्या कपातला चहा पिऊन माझी आंघोळ झाली का असे आईला विचारून माझ्या डोक्यावर हलकेच टपली मारत असे.
बर्याच वर्षांनी मी आणि आई गावातल्या आठवणी उगाळत होतो. आई बोलता बोलता म्हणाली नारायच्या मुलीला पोलियो होता.
वाचने
10585
वाचनखूण
प्रतिक्रिया
37
त्याच्या
In reply to त्याच्या by विसोबा खेचर
लेखन
विलक्षण प्रभावी
In reply to विलक्षण प्रभावी by राजेश घासकडवी
सहमत
In reply to सहमत by श्रावण मोडक
असेच..
हृदयस्पर्शी
In reply to हृदयस्पर्शी by मुक्तसुनीत
हृदयस्पर्शी
In reply to हृदयस्पर्शी by मुक्तसुनीत
कचराकोंडी
In reply to हृदयस्पर्शी by मुक्तसुनीत
+१
In reply to हृदयस्पर्शी by मुक्तसुनीत
कैच्या कैच !
In reply to कैच्या कैच ! by मिसळभोक्ता
दिलगीरी आणि धन्यवाद
In reply to हृदयस्पर्शी by मुक्तसुनीत
संपूर्ण
अल्टिमेट !!
मस्तच.....
उत्तम लेख
१) स्वच्छतागृहाची सफाई
२) स्वच्छतेच्या बैलाला
३) परत एकदा स्वच्छतेच्या बैलाला
४) क्रयशासन प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
अक्षय, छान
वा फारच
पूर्णपात्
आपला
विषयच मनाला हात घालणारा
एक नितांतसुंदर लेख
+१
उत्तम लेख
लेख आवडला..!
मस्त
श्री.
श्री. पूर्णपात्रे अतिशय प्रभावी आणि नेमके लेखन.
लहानपणचा मोठा अनुभव
छान लेख
अक्षय,
प्रभावी...
और एक बात
In reply to और एक बात by पंगा
आरं ए बाबा,
In reply to आरं ए बाबा, by पाषाणभेद
सही बोलले
अक्षयजी,
अप्रतिम....
ह्या अशा लोकांना आपण जाणून