शंकराचार्यांच्या कंपूतील लोकांचा पर्दाफाश आणि त्याला तात्याचे समर्थन! सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा! :)

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
18 Oct 2009 - 10:01 am

आजकी ताजा खबर, आजकी ताजा खबर!

शंकराचार्यांच्या कंपूतील लोकांचा पर्दाफाश!
:)

आणि त्याला हे आमचं समर्थन -

"ब्रह्म सत्य जगत् मिथ्या" ही विचारसरणी प्रमुख असली तरी सर्वमान्य किंवा बहुतांशी तत्त्वज्ञानी लोकांना मान्य होती अशी वस्तुस्थिती नाही.

अगदी खरं आहे.. आपल्याला तर साला पयल्यापासनंच या शंकराचार्यांचं म्हणणं पटत नाय! हां, आता आपण सर्वमान्य नाय परंतु एक सागतो. समोर एखादी देखणी, सुंदर साडी नेसलेली, बिनबाह्यांचं पोलकं घातलेली, तारुण्याने मुसमुसलेली बाई असेल, कुठूनतरी तळलेली मासळीचा घमघमाट नाकात शिरत असेल, त्या बाईला पाहून डोक्यात हमीरचे छानसे सूर रुंजी घालत असतील तर तेच खरं ब्रह्म! उगाच कसलं काय मिथ्या वगैरे! छ्या..!

माझ्या मते या शंकराचार्यांनी नकळत्या वयात आजन्म ब्रह्मचार्याची वगैरे शपथ घेतली असणार व जवानीत पस्तावले असणार! पण सांगतात कुणाला? मग "ब्रह्म सत्य जगत् मिथ्या" असलं काहीसं स्वत:शी घोकावं लागतं अन् पब्लिकच्या मनात पण ठासावं लागतं! अहो एखाद्या भुकेल्या वाघाला समोर शेळी दिसत असतांना म्हणा पाहू "ब्रह्म सत्य जगत् मिथ्या" म्हणून! तो शेळीआधी तुम्हाला खाईल! :)

आधी शंकराचार्यांचे म्हणणे बघू. त्यांच्या मते जग ही माया आहे, आभास आहे, मिथ्या आहे.

असहमत....!

अर्थ - म्हणून जगाचा निरास करून मला पहावे, तसा मी नाही, तर सर्वांसकट मीच आहे. शंकराचार्यांच्या "ब्रह्म सत्य जगत् मिथ्या" याचे यापेक्षा स्पष्ट शब्दांत खंडन मी तरी दुसरीकडे कुठे वाचले नाही

जियो विनायकराव!

तर्कतीर्थांनी एका लेखात लिहिले होते " शंकराचार्यांचे अनुयायी स्वत:च्या सोयीसाठी उपनिषदे, गीता, ब्रह्मसूत्रे यांची ओढाताण करतात.

हा हा हा! सह्ही..! :)

पण ज्ञानेश्वर हे शंकराचार्यांचेच तत्त्वज्ञान सांगतात हे सिद्ध करण्यासाठी ज्ञानेश्वरांच्या विचारांची ओढाताण करतात याला आमचा आक्षेप आहे.

अगदी खरं आहे. विनायकराव, शंकराचार्यांच्या कंपूचा हा खोडसाळपणा दाखवून दिलात त्याबद्दल आभार..

शुभ दिपावली.

तर्कतीर्थ तात्याशास्त्री अभ्यंकर.

मिपाकरांची मतं अपेक्षित... :)

(मिपाकर) तात्या.

संस्कृतीधर्मवाङ्मयजीवनमानमौजमजाप्रकटनलेखमतसंदर्भप्रतिसादप्रश्नोत्तरेप्रतिक्रियाप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

हेरंब's picture

18 Oct 2009 - 11:18 am | हेरंब

'चित्रलेखा' या जुन्या सिनेमाची गाणी लिहिताना साहिर लुधियानवीने या जगन् मिथ्या वाल्यांना सणसणीत उत्तर दिले होते.
'संसारसे भागे फिरते हो' हे गाणे आठवा! त्यातली प्रत्येक ओळ न् ओळ या भोंदू निराशावादी थिअरीला फटकारणारी आहे.
ये भोगभी एक तपस्या है तुम त्यागके मारे क्या जानो
अपमान रचेताका होगा रचनाको अगर ठु़कराओगे |
किंवा
हम कहते है ये जग अपना है तुम कहते हो झुटा सपना है
हम जनम बिता कर जायेंगे तुम जनम गवां कर जाओगे |
मला वाटते, यापेक्षा दुसरे चांगले उत्तर या मंडळींना कोणी दिले नसेल.
सध्याच्या जमान्यात असे लिहिले तर लगेच संस्कृतीसंरक्षक येतील दंडा घेऊन!

सुहास's picture

18 Oct 2009 - 10:40 pm | सुहास

http://www.youtube.com/watch?v=oIGPeL4v6GA

हेच का ते गीत? सॉल्लिड आहे.. :)

--सुहास

नंदू's picture

18 Oct 2009 - 11:21 am | नंदू

मूळ लेखाला केवळ एक प्रतिसाद आणि इथे हा पहिलाच असं का व्हावं
बाकी पदवी "तीर्थशास्त्रि अशी हवी होती. ;)

नंदू

विसोबा खेचर's picture

18 Oct 2009 - 11:26 am | विसोबा खेचर

ये भोगभी एक तपस्या है तुम त्यागके मारे क्या जानो
अपमान रचेताका होगा रचनाको अगर ठु़कराओगे |

क्या केहेने!

तात्या.

--
अरे दाद द्या रे. सारा निसर्ग दाद मागून राहिला आहे यार तुमच्याकडे. पावसाळ्यात आकाशात मेघांचा पखवाज आणि बिजलीचा कथ्थक सुरू होतो, मोर नाचू लागतात? कुणासाठी? तुमच्याआमच्यासाठीच ना? मेंडकीरोडवर बेडकं ओरडतात. ओहोहो, काय खर्ज लागतो एकेका बेडकाचा! असं वाटतं कुठी दशग्रंथी ब्राह्मण वेदपठण करून राहिले आहेत बेटे! (इति काकाजी : नाटक - तुझे आहे तुजपाशी)

धनंजय's picture

22 Oct 2009 - 7:13 pm | धनंजय

भोग आणि गूढवादाबद्दल गणित कठिण आहे. या गूढ गणितासाठी ही कडवी लागू पडतील असे वाटते.

श्रावण मोडक यांच्या "गणित" कवितेत दोन-चार शब्द बदलून अर्थ पूर्णपणे वेगळ्या दिशेला नेला आहे. (माफी असावी.)

- - - अनंगाचे अंग - - -

नव्या शेजेमध्ये शिरताना
प्रेमी स्वतःशीच म्हणाला,
"शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध -
रती अनंग की अंग?"
गणित सुटेनासं झालं तेव्हा,
अंधुक फुटलेला एक हुंकार
अंगाकडून अंगाकडे झेपावला...
***
वस्त्र कवच उतरवताना
शय्येवर पाहिले प्रेम्याने
तेव्हा 'अनंगा'तही त्याला
अंग-प्रत्यंगच दिसले...
दिसणं, आणि असणं
या खेळाचे नियम
उमजेपर्यंत तो हरला...
फैलावत शक्त-सबल बाहू
एकदा मिठीत घेतलं तेव्हा
त्याच्याकडंच पाहात
ते अंग म्हणालं,
"अंग हेच तर अनंग!"

- - -

पार्टनर's picture

18 Oct 2009 - 9:01 pm | पार्टनर

याबाबत एक श्लोक सापडला .. जाणकार लोकांनी अजून माहिती द्यावी !

श्रीराम :

कस्त्वम ?

हनुमान :

देहबुद्‍ध्या त्वदासोऽहं जीवबुद्‍ध्या त्वदंशकः।
आत्मबुद्‍ध्या त्वमेवाहम् इति मे निश्चिता मतिः॥

संदर्भ :

http://kirtimukha.com/surfings/Valmiki/ValmikiRamayanam.htm

युयुत्सु's picture

19 Oct 2009 - 10:33 am | युयुत्सु

तर्कतीर्थांनी एका लेखात लिहिले होते " शंकराचार्यांचे अनुयायी स्वत:च्या सोयीसाठी उपनिषदे, गीता, ब्रह्मसूत्रे यांची ओढाताण करतात.

बोद्धमताचे खंडन करताचा ब-याच ठिकाणी खोडसाळपणे misquoting, उचलेगिरी इत्यादी गोष्टी शंकराचार्यांनी आणि अद्वैतवादांच्या समर्थकांनी केल्याचे अनेक विद्वानांकडून ऐकले होते. त्याची यानिमित्ताने आठवण झाली...

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

JAGOMOHANPYARE's picture

19 Oct 2009 - 12:20 pm | JAGOMOHANPYARE

चार्वाकाचा श्लोक देखील एका शंकराचार्यानीच बदलला........... यावज्जीवेत सुखं जीवेत नास्ति मृत्युत अगोचर च्या ऐवजी ऋणं पीत्वा घृतं पीबेत नास्ती.....

हाच तो बदल ! बाकी यात त्यांचे चुकले काय, हे मात्र सांगू शकत नाही.... कारण धर्मप्रसार हे देखील एक राजकारणच ! ते सगळेच धर्म खेळत असतात...

***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

विकास's picture

23 Oct 2009 - 8:15 am | विकास

चार्वाकाचा श्लोक देखील एका शंकराचार्यानीच बदलला........... यावज्जीवेत सुखं जीवेत नास्ति मृत्युत अगोचर च्या ऐवजी ऋणं पीत्वा घृतं पीबेत नास्ती.....

हे प्रथमच ऐकत आहे म्हणून हा प्रश्नः यासाठी कुठला संदर्भ सुचवू शकाल का? (कृपया ह्या प्रश्नातून गैरसमज करून घेऊ नये. अविश्वास म्हणून नाही, तर मला जर इतरत्र हे वापरायचे असेल तर कुठेतरी संदर्भ असलेले लिखाण माहीती असणे आवश्यक आहे, म्हणून...)

JAGOMOHANPYARE's picture

25 Oct 2009 - 12:17 pm | JAGOMOHANPYARE

हे बर्‍याच ठिकाणी तुम्हाला मिळू शकेल.... चार्वाक वादावरची पुस्तके वाचलीत तर मूळ श्लोक मिळेल.... शंकराचार्यांचा संदर्भ मी अलीकडेच एका पुस्तकात्/कादंबरीत वाचला... को$हं असे नाव आहे, लेखक माहीत नाही, पण पुस्तक छान आहे....... जगभरच्या सगळ्या धर्मांचा एक ओझरता इतिहास कथेची पार्श्वभूमी म्हणून वापरला आहे.........

***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

विकास's picture

25 Oct 2009 - 6:33 pm | विकास

नक्कीच अधिक माहीती करून घेईन. "कोsहं" - लक्ष्मण लोंढ्यांची तर म्हणत नाही आहात ना?

JAGOMOHANPYARE's picture

26 Oct 2009 - 9:05 am | JAGOMOHANPYARE

नाही, लोन्ढेंची विज्ञानकथा आहे.... ही वेगळी आहे.... नावदेखील सोहं की कोहं आता आठवत नाही.... पण त्यात हा संदर्भ अगदी डिटेलमध्ये आहे........

***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

jaypal's picture

19 Oct 2009 - 12:44 pm | jaypal

A buddha-mind is a pure consciousness.
It is like a mirror: it simply reflects, it does not project. It has no ideas, no content, no thoughts, no desires, no imagination, no memory.
It is present to the everpresent,
it lives in the present.
And when you are totally in the present, the mind disappears, it loses all its boundaries.------ budha

प्रमोद देव's picture

19 Oct 2009 - 5:41 pm | प्रमोद देव

आरं वा!
बुद्ध बी फारिन रिटर्न्ड व्हता की काय? ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Oct 2009 - 5:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

"ब्रह्म सत्य जगत् मिथ्या" हे आपल्याला काय कळत नाही. सत्य कशाला म्हणावे आणि मिथ्य कशाला म्हणावे हे काय माझ्यासारख्याला झेपणारं नाही. पण, तुमच्या मित्राला कसंही करुन ज्ञानेश्वरांवर त्यांच्या विचारांवर चर्चा आणायची असते असे वाटते. अर्थात तसे करतात म्हणून आपल्या काय अडचण नाही. फक्त जे सांगायचं आहे ते स्पष्ट सांगितलं पाहिजे. उगाच कशाला शंकाराचार्यांना वेठीस धरायचे, नाही का ? :)

-दिलीप बिरुटे

विसोबा खेचर's picture

20 Oct 2009 - 9:39 am | विसोबा खेचर

पण, तुमच्या मित्राला कसंही करुन ज्ञानेश्वरांवर त्यांच्या विचारांवर चर्चा आणायची असते असे वाटते.

हा हा हा!

अर्थात तसे करतात म्हणून आपल्या काय अडचण नाही. फक्त जे सांगायचं आहे ते स्पष्ट सांगितलं पाहिजे.

खरं आहे!

उगाच कशाला शंकाराचार्यांना वेठीस धरायचे, नाही का ?

हा हा हा!

सर, बरोब्बर ओळखलंत बॉ! : )

तात्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Oct 2009 - 5:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तात्या, तुमचे मूळ विषयावरील चर्चाकार मित्र [उपक्रमवर]खरड करुन विचारतात की, बिरुटे साहेब "वेठीस धरणे" म्हणजे नक्की काय? मी शंकराचार्यांना वेठीस धरले आहे म्हणजे नेमके काय केले आहे? [ संदर्भ या संस्थळावरील चर्चेचा असल्यामुळे हा खुलासा इथेच]

वेठीस धरणे चा अर्थ आहे 'आपले काम करण्यासाठी एखाद्याला भाग पाडणे'. आता इथे शब्दशः अर्थ घेऊ नये. आपल्याला काही सांगायचे आहे, पण कोणाला तरी पुढे करुन ते सांगायचे, या अर्थाने तसे म्हणायचे आहे. आता शंकराचार्यांना वेठीस धरले म्हणजे काय केले आहे. ''जग ही माया आहे, आभास आहे, मिथ्या आहे. अ़ज्ञानाने ब्रह्माला झाकल्याने हा मिथ्याभास होतो. याला विवर्तवाद असे नाव आहे''
त्यावर ज्ञानेश्वरांचे मत काय आहे, हे सांगण्यासाठी आपला चर्चेचा खटाटोप आहे. खटाटोपाबद्दल माझी काही तक्रार नाही. पण, जे काय सांगायचे ते स्पष्ट सांगायचे. शंकराचार्य त्यांच्या जागी मोठे आहेत आणि ज्ञानेश्वर त्यांच्या जागी मोठे आहेत. ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणारे म्हणतात, ज्ञानेश्वरीमधे अनेक ग्रंथातील तत्त्वज्ञानाचे पडसाद दिसून येतात. वेद,उपनिषदे,भगवद्गगीता,शांकरभाष्य,काव्य,नाटक,मीमांसा, इत्यादी. त्यामुळे शंकराचार्यांचे "ब्रह्म सत्य जगत् मिथ्या"चुकीचे आणि ज्ञानेश्वरांचे तत्व दोन-पाच अध्यायाचे दाखले देऊन ते कसे बरोबर आहेत हे स्पष्ट होणार नाही. आणि नेमके आपण ते करु पाहात असे वाटते. शंकराचार्य आणि मंडनमिश्र यांचा वाद प्रसिद्ध आहे, मंडनमिश्र सारख्या विद्वानास वादात ते पुरले नाहीत. आपण तर फार लहान ठरु नाही का ? म्हणून 'वेठीस धरणे' हा शब्दप्रयोग वापरला आहे.

-दिलीप बिरुटे

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Oct 2009 - 9:39 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

शंकराचार्य आणि मंडनमिश्र यांचा वाद प्रसिद्ध आहे, मंडनमिश्र सारख्या विद्वानास वादात ते पुरले नाहीत. आपण तर फार लहान ठरु नाही का ?

कोण कोणाला वादात पुरलं नाही, मंडनमिश्र का आदी शंकराचार्य?

अदिती

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Oct 2009 - 9:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>कोण कोणाला वादात पुरलं नाही, मंडनमिश्र का आदी शंकराचार्य?
आदि शंकराचार्य मंडनमिश्रला भारी पडलेत.

-दिलीप बिरुटे

चतुरंग's picture

25 Oct 2009 - 9:50 pm | चतुरंग

मंडनमिश्रांना वादात पुरुन उरले असे म्हणायचे असावे बिरुटेसाहेब तुम्हाला! (कारण तुमच्या मूळ वाक्याचा अर्थ बरोब्बर उलटा होतोय)

चतुरंग

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Oct 2009 - 9:51 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

असं वाटल्यामुळेच प्रश्न विचारला!

(प्रश्नातून उत्तर सुचवण्याच्या प्रयत्नात) अदिती

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Oct 2009 - 9:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>मंडनमिश्रांना वादात पुरुन उरले असे म्हणायचे असावे बिरुटेसाहेब तुम्हाला!
करेक्ट...! असेच म्हणायचे आहे. चुक निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यू.......!

[मुळ चर्चाकाराने प्रतिसाद वाचून अजून एक खरड टाकली आहे, प्रतिसाद थोड्याच वेळात] :)

-दिलीप बिरुटे
(वेंधळा)

देव साहेब
बुद्ध बी फारिन रिटर्न्ड व्हता की काय? याची मला कल्पना नाही.
इंग्रजी मधे पोस्ट करण्याच कारण मला गमभन निट वापरता येत नाही.
लब्जों को छोड दो. मतलब समजलो.
"दया क्षमा आणि शांति"
सगळ्यांच मंगल होवो.

विजुभाऊ's picture

20 Oct 2009 - 11:45 am | विजुभाऊ

रजनीशानी या असल्या तथाकथीत ब्रम्हचार्यांवर मस्त टीप्पण्णी केली आहे.
ते म्हणतात की संसारी माणसाला स्त्री जितक्यावेळा आठवते त्यापेक्षा कैक पटीने अधीक वेळेस ती ब्रम्हचार्याला आठवते.
याचे कारण म्हणजे की ब्रम्हचारी एका नैसर्गीक सत्यापासून पळ काढत असतो.

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

सहज's picture

20 Oct 2009 - 12:08 pm | सहज

>मिपाकरांची मतं अपेक्षित...

तर्कतीर्थ तात्यास्वामी तुमचे दोस्त जोशीबुवा यांनी खिशाला खार लावून असल्या विषयावर चर्चा करायला स्वतंत्र स्थळ काढून सोय करुन दिली आहे ना. तिकडे टाका.

मिपाचे उपक्रम करु नये, ही विनंती.

अधीक चर्चा केल्यास महर्षी व्यास पुरस्काराने गौरवण्यात येईल.

अवलिया's picture

20 Oct 2009 - 12:10 pm | अवलिया

हा हा हा
सहजरावांशी सहमत आहे.

तात्या, उगाचच विचारवंतांच्या समजुतींच्या मर्यादा उघड करणारे लेख, प्रतिसाद मिपावर नको ब्वा !

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

विनायक's picture

25 Oct 2009 - 10:27 pm | विनायक

खरे तर लोकांना सांगायची गरज नाही. तरीपण एक गोष्ट स्पष्ट करतो. ज्या लोकांना माझ्याकडून प्रतिसादाची अपेक्षा आहे त्यांनी उपक्रमावर मूळ लेखावर प्रतिसाद द्यावा. तिथे उत्तर देईन. बिरुट्यांनी लिहिलेल्या खरडींना यापुढे उत्तरे देणार नाही.
विनायक

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Oct 2009 - 10:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>बिरुट्यांनी लिहिलेल्या खरडींना यापुढे उत्तरे देणार नाही.
माझ्या आठवणी नुसार माझ्या मसं वरील आंतरजालीय कारकिर्दीत मी आपल्याला हा प्रतिसाद लिहीपर्यंत कधीच खरड केलेली नाही. त्यामुळे मी तुम्हाला खरडी करण्याचा प्रश्नच नाही. उलट आपल्याच खरडी येऊन पडल्या आहेत.
>>ज्या लोकांना माझ्याकडून प्रतिसादाची अपेक्षा आहे त्यांनी उपक्रमावर मूळ लेखावर प्रतिसाद द्यावा.
मला आपल्याकडून कोणत्याच प्रतिसादाची अपेक्षा नाही आणि आपल्याकडून मला काही समजूनही घ्यायचे नाही. धन्यवाद....!!!

-दिलीप बिरुटे

विसोबा खेचर's picture

26 Oct 2009 - 10:43 am | विसोबा खेचर

अहो विनायक भावजी,

असे भडकू नका. टेक अ चिल पिल! :)

तात्या.

अवलिया's picture

26 Oct 2009 - 10:48 am | अवलिया

बिरुट्यांनी लिहिलेल्या खरडींना यापुढे उत्तरे देणार नाही.

बिरुटे नाही... प्रा.डॉ.बिरुटे... :)

मिपावरील सन्माननीय सदस्य आणि संपादक असलेल्या सरांचा "बिरुट्यांनी" असा केलेला उल्लेख खटकला. किमान बिरुटे सर असे म्हणणे गरजेचे होते.

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

हा विषय माझ्या आवाक्याबाहेरचा आहे, मला पेलत नाहीं. म्हणून "नो कॉमेंट्स".
सुधीर
------------------------
कटी रात सारी मेरी मयकदेमें
खुदा याद आया सवेरे सवेरे!