मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आचार्य अत्र्यांच्या भाषणाचा दुवा

सुमीत भातखंडे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
आचार्य अत्र्यांच्या वक्त्रुत्व कलेबद्दल आजवर ऐकत आलो होतो - वाचत आलो होतो. एखादं भाषण खरंच ऐकायला मिळावं असं खूप वाटायचं. आणि आज हा दुवा सापडला: http://www.youtube.com/watch?v=19WXh6YP02g मी स्वतः अजून सगळे भाग ऐकलेले नाहीत. पण राहावलं नाही म्हणून आधीच इथे दुवा देत आहे. पण जे काही ऐकलय त्यावरून तरी, इट्स अमेझींग. त्यांनी सांगीतलेल्या पूण्याच्या, राम गणेश गडकर्यांच्या आठवणी नुसत्या ऐकत रहाव्या. सगळ्या भागांचा दुवा: http://www.youtube.com/results?search_query=acharya+atre&search_type=&aq=f सगळ्यांनी नक्की ऐका. सुमीत

वाचने 3222 वाचनखूण प्रतिक्रिया 13

घाटावरचे भट Fri, 10/09/2009 - 15:58
मी पण पहिलं भाषण पूर्ण ऐकलं. बोलण्याची शैली अफाटच आहे. इतके दिवस अत्र्यांबद्दल ऐकलं होतं, आज अत्रे ऐकायला मिळाले. धन्यवाद सुमीतराव.

In reply to by घाटावरचे भट

गणपा Fri, 10/09/2009 - 16:06
इतके दिवस अत्र्यांबद्दल ऐकलं होतं, आज अत्रे ऐकायला मिलतील. अगदी असच म्हणतो. (ऑफीस मध्ये तुनळी वर बंदी आहे. घरी जाई पर्यंत वाट पहावी लागणार) :W

दोन्ही भाषणं ऐकली. प्रथमच ऐकली आहेत अत्र्यांची भाषणं. उतरवून घेतली आहेत. अफाट व्यक्तिमत्व. बिपिन कार्यकर्ते

नंदन Fri, 10/09/2009 - 16:03
दुव्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद, सुमीतराव. (आगाऊपणाने एक सूचना करतो :), शीर्षकात आचार्य अत्र्यांच्या भाषणाचा दुवा असा बदल केल्यास अधिक लोक हा धागा वाचतील, असं वाटतं.)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

दिपक Fri, 10/09/2009 - 16:04
धन्यवाद सुमित :) डाउनलोडींगला लावली आहेत.

स्वाती२ Fri, 10/09/2009 - 17:38
धन्यवाद सुमित. शाळेत असताना 'मी अत्रे बोलतोय' पाहून दुधाची तहान ताकावर भागवली. आता तुमच्यामुळे अत्रे ऐकायला मिळाले.