ज्यूरी ड्यूटी
लेखनप्रकार
"पंचांचा निकाल काहीही असो, मी निरपराधी आहे असेच माझे मत आहे. या जगाचे नियमन करणारी.........", लोकमान्य टिळक.
लहान असतांना मराठी दुसरीत गेलेली ही वाक्यं!!!!
मला नेहमी प्रश्न पडत असे की जर लोकमान्य टिळकांना पंचाचा निकाल मान्य नाही तर ते टॉवेल का नाही वापरत?
बाबांना हा प्रश्न विचारला तर त्यांनी हसून सांगितलं की ए येड्या, इथे पंचा म्हणजे अंग पुसायचा नाही तर पंच म्हणजे ज्यूरी......
मी लगेच बाबांना म्हटलं की मला ही ज्यूरी दाखवाच...
पण स्वतंत्र भारतात जन्म झाल्यामुळे ही ज्यूरी पहाणं माझ्या नशिबी नव्हतं. ब्रिटिशांच्या काळात कोर्टातल्या केसेस सोडवतांना सामान्य नागरिकांचा ज्यूरी म्हणून उपयोग केला जायचा म्हणे! स्वतंत्र भारताच्या सरकारचा सामान्य नागरिकांच्या सद्सदविवेकबुद्धीवर फारसा विश्वास नसल्यामुळे ही ज्यूरी सिस्टम भारत सरकारने मोडीत काढली असावी......
अनेक वर्षे लोटली. तरीही मनाच्या कुठल्यातरी कोपर्यात ज्यूरीबद्दल कुतुहल जागृत होतं....
आणि अचानक परवा मला एक समन्स बजावण्यात आलं....
"तुमची पुढल्या आठवड्यात ज्यूरीसाठी पंच म्हणून गरज आहे. तेंव्हा अमूक दिवशी व्हेन्चुरा फेडरल सुपिरियर कोर्टात सकाळी आठ वाजता हजर रहा!!!!!
तुझ्या आयला तुझ्या!!!
साधं बोलावणं नाही काही नाही, एकदम समन्स?
आजवर "शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये:" ही बापजाद्यांची शिकवण नियमितपणे पाळत आलो होतो.....
पण आता कोर्टाचं समन्स म्हणजे काही इलाजच नाही....
नाही पाळलं तर साले माझ्याविरुद्ध वॉरंट काढून मला कैद करून न्यायचे आणि विनाचौकशी ग्वान्टानामो बे तुरुंगात महिनोनमहिने खितपत ठेवायचे!!!!!
झक मारत ठरलेल्या दिवशी सकाळी पाच वाजता उठून (हरामी साले!!!) एक तास ड्राईव्ह करत आठ वाजता कोर्टाच्या आवारात हजर झालो.....
तिथे हल्ली नव्यानेच सुरू केलेल्या प्रथेनुसार यथासांग सिक्युरिटी चेकिंग वगैरे होतंच!!!! त्यांना बहुतेक ओसाम बिन लादेन उत्साहाने अमेरिकेत ज्यूरी म्हणून येतोय असंच वाटत असावं!!!!!
बाकी या अमेरिकनांच्या विनोदबुद्धीलाही तोड नाही! जिथे साक्षात पिढीजात अमेरिकन नागरिक ज्यूरी ड्यूटी चुकवायचा शर्थीने प्रयत्न करतात तिथे टेररिस्ट कुठले यायला बसलेत? बोअर होऊनच मरतील ना ते!!! असो...
सिक्यूरिटीवरच्या ऑफिसरला पॅन्ट उचलून मोजे वगैरे दाखवल्यावर माझ्याकडे डेंजरस असं काही नाही याची त्याला खात्री पटली. त्या आनंदात त्याने माझे खिसे तपासलेच नाहीत. त्याच्या दृष्टीने मी खिशात हत्यार घेऊन आत गेलो तरी हरकत नव्हती, फक्त मोज्यात ते हत्यार दडवलं नसल्याशी कारण......
आत गेलो तर तिथे माझ्यासारखेच इतर सुमारे दोनशे बकरे कोंडलेले आढळले. प्रत्येकाच्या तोंडावर एकवीरा देवीला बळी द्यायला आणलेल्या बकर्याचे भाव होते....
तिथे जाऊन एका खुर्चीवर स्थानापन्न झालो...
सुमारे पंधरा-वीस मिनिटांनंतर आज मधुबाला जर हयात असती आणि ऐशी वर्षांची असती तर कशी दिसली असती तशी दिसणारी सुमारे साठीतली एक महिला स्टेजवरच्या मायक्रोफोनपाशी आली...
तिने आमच्या बापाला झापल्या सारख्या कडक स्वरात आमचं स्वागत केलं.....
आम्ही तिथे हजर होऊन किती देशसेवा करतोय याबद्दल आमचं अभिनंदन केलं.....
आम्ही ज्यूरी ड्यूटीसाठी हजर होऊन कसं मोठं देशकार्य करतोय याची आम्हाला जाणीव करून दिली.....
पण हे सगळं सांगतांना स्वर मात्र, "भडव्यांनु! आपणहून आलांत म्हणून ठीक!! आला नसतांत तर तुमची सालटी सोलून वर मीठ शिंपडलं असतं!!!!" स्टाईल!!
हे सरकारी स्वागत गोड मानून आम्ही आंबट चेहरा करून तिथे बसलो.....
थोड्याच वेळात एक हिरोसारखा दिसणारा मनुष्य तिथे आला....
हे सुपिरियर कोर्टाचे जज्ज आहेत अशी त्यांची ओळख करून देण्यात आली....
हे हिरोसारखे दिसणारे जज्ज? असेल बुवा!!! हॉलिवूडच्या इतक्या जवळ असल्याने इथले जज्जदेखील हिरोसारखे दिसत असतील!!!
किंबहुना इथले जज्जच दिवसा जज्जगिरी आटोपून रात्री हॉलिवूडला शूटिंगसाठी जात असतील!!! आपल्याला काय माहिती?.... आम्ही आमच्या मनाची समजूत काढली....
जज्जसाहेबांनी अत्यंत म्रूदू आवाजात आमचे पुन्हा आभार मानले आणि ज्यूरीविषयीची त्यांची अपेक्षा आणि नियम आम्हाला समजावून सांगितले.....
हा सुपिरियर जज्ज जर इतका नरम तर मघाशी त्या थेरड्या मधुबालेला कसला माज चढला होता?
पण पोलीस कमिशनरपेक्षा हवालदार जास्त उर्मट या अनुभवाची अमेरिकन आवृत्ती आम्ही अनुभवली होती म्हणा ना!!!
असो. जज्जसाहेबांच्या म्हणण्याचा मतितार्थ इतकाच की आम्ही शांतपणे आमचे नांव पुकारले जाण्याची वाट पहात तिथे दिवसभर बसून रहावं. नांव पुकारलं गेल्यास आम्हाला कुठल्यातरी केसवर ज्यूरी म्हणून निवडण्यात येईल! पुकारा न झाल्यास आम्ही संध्याकाळी तसंच घरी जावं (आणि आपापल्या बायकोला आपल्या मर्दुमकीची कथा स्वता:च रचून सांगावी!!!)
टू बी फेअर, हे सांगणं आवश्यक आहे की त्या रूममध्ये आम्हाला आमचं दिल बेहेलवण्यासाठी असंख्य मासिकं होती. दोन बिग स्क्रीन टीव्ही होते. कंप्यूटर वापरू इच्छिणार्यांसाठी मुबलक टर्मिनल्स होती आणि मुख्य महणजे इंटरनेट सेवा मोफत उपलब्ध होती.....
आणि महत्त्वाचं म्हणजे त्या खुर्च्या अत्यंत आरामदायी होत्या, जणू कोचासारख्याच!!!
पण आम्हाला त्या सुविधांची गरजच नव्हती....
आम्ही आधीच तयारी म्हणून आमच्याबरोबर रणजित देसाईंचं "श्रीमान योगी" बरोबर घेऊन गेलो होतो. आम्ही तो ग्रंथ काढून वाचायला सुरवात केली....
शेजारी बसलेल्या एका तिशीतल्या ब्लाँन्ड अमेरिकन महिलेने आमच्या पुस्तकात नजर खुपसून पाहिलं. अनोळखी लिपी पाहून ती आम्हालाच ओसामा बिन लादेन समजली असावी.....
आम्हीही तिच्या लो कट ब्लाऊजमध्ये नजर खुपसून पाहिलं. निरिक्षण करण्यासारखं तिथे फारसं काही नव्हतं. म्हणून मग आम्ही पुन्हा श्रीमान योगीत लक्ष घातलं.....
शिवाजी महाराजांच्या जन्माचं कथानक चालू होतं......
असाच किती वेळ गेला कोण जाणे.....
अचानक आमचं नांव पुकारलं गेलं......
आता शिवाजी महाराज अफझलखानाचं पोट फाडायला निघाले होते.....
आम्हीही त्याच आवेशात कोर्टरूममध्ये एका जज्जसाहेबांच्या पुढे जाऊन हजर झालो......
(लोकांना आवडलं तर क्रमशः)
वाचने
18289
वाचनखूण
प्रतिक्रिया
53
आवडलं
In reply to आवडलं by सहज
+१
In reply to आवडलं by सहज
हा हा हा
In reply to आवडलं by सहज
+२
In reply to +२ by प्रभो
च्यामारी
आवडलं.
आरारारा
In reply to आरारारा by दशानन
नको तिकडे
झकास....
डांबिस काका,
In reply to डांबिस काका, by लंबूटांग
करेक्ट!
In reply to करेक्ट! by पिवळा डांबिस
पुढच्या भागाची
In reply to पुढच्या भागाची by लंबूटांग
ज्युरी व्ह्यायला अमेरिकन सिटिझन असावं लागतं.
In reply to ज्युरी व्ह्यायला अमेरिकन सिटिझन असावं लागतं. by श्रीकृष्ण सामंत
अगदी बरोबर
ज्यूरीकाका
In reply to ज्यूरीकाका by दिपक
+ १
आजोबा येवु
हा हा हा...
वा वा, नवीन
मस्त
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to मस्त by नंदन
असेच म्हणतो !
बराय बॉ.
खुसखुशीत!
लिहा
मस्तच पिडां काका......
आवेश-
ज्युरीकाक
आवडले.
छान ओघवती
In reply to छान ओघवती by निमीत्त मात्र
खटकली?
In reply to छान ओघवती by निमीत्त मात्र
हम्म
In reply to छान ओघवती by निमीत्त मात्र
तुमच्या
आवडतंय
आवडले.
वा!
वा!!! वा!!!
अर्थातच
In reply to अर्थातच by सुमीत भातखंडे
सहमत ----------------
ओक्के ज्यूरीसाहेब!
डांबिसकाक
हीहीहीही
व्वा
लोकाना
पुढे?
मस्त
In reply to मस्त by भडकमकर मास्तर
:-)
मस्त...
मस्त!
मजेदार
५०...
५१.....
शेजारी बसलेल्या एका तिशीतल्या
लौकर लौकर लिहा !!