मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लेह - लडाख -काश्मिर

विलास आंबेकर · · कलादालन
प्रत्येक भारतियाच्या मनात काश्मिर बद्दल एक अनाम असे कुतूहल असते. आपण लहानपाणापासून काश्मिर, लडाख वगैरे नावं ऐकत आलेलो असतो. पूर्वी चित्रपटांमधून दिसायचंही. पण नंतर ते ही नाही. अशा या काश्मिर आणि लडाखला भेट द्यायची इच्छा मागच्या वर्षीच्या जून महिन्यात पूर्ण झाली. बरोबर माझा Canon EOS 400D DIGITAL Camera होताच. तिथे काढलेली काही छायाचित्रं इथे देत आहे. तुम्हाला आवडली तर अजून टाकेन म्हणतो... चला फिरायला... प्रतिबिंबातली कलाकृती... अस्ताचलास जेथे रविबिंब टेकलेले... आत्ता पर्यंत सुरूची झाडं बघितली नव्हती... दोन दोन इंद्रधनुष्य... प्रथम बर्फदर्शन... मराठी माणसाला दुसरं काय आठवणार... खिचडीवर खोबरं... :D दुधाचे ओघळ... धुंद एकांत हा... वक्त और हवा बदलते देर नही लगती... बघता बघता ढग जमा झाले... निळाई... पँगाँग लेक... घसरगुंडी... फक्त इथे जीवाशी खेळ होतो, एवढंच. स्नोस्लाईड. सुवर्णमुकुट... साद देती हिमशिखरे चक्क वाळवंट... आणि त्यात लपलेला हा लष्कराचा तळ... सिंधु नदी... संगम... सिंधु आणि झांस्कर नद्यांचा. कृष्णछाया... भारताची नवीनतम तीर्थक्षेत्रं ... टायगर हिल, द्रास. भारताची नवीनतम तीर्थक्षेत्रं ... तोलोलिंग, द्रास. सायोनारा... जाताजाता विमानातून घेतलेले छायाचित्र.

वाचने 13594 वाचनखूण प्रतिक्रिया 54

In reply to by घाटावरचे भट

गणपा Mon, 09/21/2009 - 01:51
+३ पृथ्वीचा स्वर्गच जणू. प्रत्यक्ष पहाण्याचा योग अजुन जुळुन नाही आला :( .

In reply to by नंदन

प्रियाली Mon, 09/21/2009 - 00:53
सगळीच छायाचित्रे अप्रतिम आहेत. विशेषतः सिंधू नदीचे फोटोज पाहून छान वाटले. अजूनही येऊ द्यात.
+१. सिंधू नदीचे फोटो पाहून मन विलक्षण सुखावले

In reply to by नंदन

शक्तिमान Sun, 09/27/2009 - 17:43
सिन्धु नदीचा फोटो पाहुन उर भरुन आला... काय नातं आहे ते कळत नाही... आपल्या सर्वांची आई वाटते ही नदी... एकदा दर्शन घेऊन यायला पाहिजे आता!

मदनबाण Sun, 09/20/2009 - 17:55
अप्रतिम !!!!!!!!!!!!!!!!!! :) तुम्हाला आवडली तर अजून टाकेन म्हणतो... हे काय विचारताय्...टाकाच. :) वाट पाहतोय... मदनबाण..... तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे. काय होणार ? http://www.timesnow.tv/videoshow/4327745.cms »

विंजिनेर Sun, 09/20/2009 - 18:00
फार सुंदर... दुसरे तर खूप छान.... सिंधू नदी आणि हिमशिखरे.... रारंग ढांगातली शांतता आठवून गेली...

In reply to by विंजिनेर

गुंडोपंत Mon, 09/21/2009 - 04:14
सिंधू नदी आणि हिमशिखरे.... रारंग ढांगातली शांतता आठवून गेली...
सहमत! हिमालय फारच सुंदर आहे. आपला गुंडोपंत

प्रभो Sun, 09/20/2009 - 18:02
मराठी माणसाला दुसरं काय आठवणार... खिचडीवर खोबरं... अप्रतीम ...........के व ळ अ प्र ति म!!!!!! --(महाराष्ट्राबाहेर न गेलेला भटक्या)प्रभो

सोनम Sun, 09/20/2009 - 22:00
काश्मिरचे फोटो खुपच छान आहे. सर्व फोटो अप्रतिम आहे. :) :) बाकी खिचडीवर खोबरं... खूपच छान आहे. =D> =D> (काश्मिर प्रेमी) :) :) काश्मिर भेटीला जाणाच्या प्रतिक्षेत.... :( :(

लवंगी Sun, 09/20/2009 - 19:31
सिंधु नदि बघुन फार प्रसन्न वाटल.. पहिल्या चित्रातल बाळ खूप गोड.

पाषाणभेद Sun, 09/20/2009 - 21:44
येवू द्या अजून. ----------------------------------- आणि हो, सांगायच राहूनच गेलं, या विधानसभेच्या ईलेक्शनदरम्यान मी नविन कार घेणार आहे. - पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या

अभिजा Sun, 09/20/2009 - 21:50
अप्रतिम आहेत फोटो आणि वर्णन सुद्धा! अजून येऊ देत.

चित्रा Mon, 09/21/2009 - 01:05
पाण्याच्या तळ्याचे विशेष करून आवडले. किती मोठे तळे आहे हे? सिंधू नदी फोटोंमध्येही पाहिली नव्हती. अजून फोटो जरूर येऊ देत.

सुनील Mon, 09/21/2009 - 06:24
सुंदर फोटो पण फोटोंसोबत थोडे प्रवासवर्णनदेखिल असते तर छान झाले असते. २००४ च्या ऑक्टोबर-नोव्हेंबरात काश्मिरला भेट देण्याचा योग आला होता. दुर्दैवाने बरेचसे फोटो आता उपलब्ध नाहीत. एक दाल लेकमधिल चार चिनार बेटाचा (जो माझ्या खवमध्येही आहे) आणि दुसरा हजरत बल दर्ग्याचा येथे डकवतो. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

विलास आंबेकर Mon, 09/21/2009 - 12:34
सुनिल राव, तुमचे फोटो पण छान! मला जमल्यास अजुन फोटो दाखवीन. तुमच्या सर्वांच्या सदिच्छा सोबत असतांना अजुन खुप काही करता येईल.

भडकमकर मास्तर Mon, 09/21/2009 - 14:28
ल इ भा री फो टो आ हे त.. पँगोंग लेकचे फोटो फार आवडले... _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

भोचक Mon, 09/21/2009 - 17:09
सर्वच फोटो उत्तम. सिंधू नदी पाहून डोळे सुखावले. नंतर खालच्या प्रतिक्रिया वाचल्यानंतर आपल्याला जे वाटते तेच इतरांनाही वाटते या भावनेने सुखावलो नि विचारमग्नही झालो. एरवी सिंधूचे फोटो सहसा पहायला मिळत नाही हे खरेच. तरीही या नदीत असं काय दडलं असावं? आपली ओळख? मुळ? अस्मिता की आणखी काही? (भोचक) तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे? ही आहे आमची वृत्ती

डॉ.प्रसाद दाढे Mon, 09/21/2009 - 17:35
निव्वळ अप्रतिम!! फोटो सुरेख आहेतच, तुमची शीर्षकेही छान आहेत. हिमशिखरे खरोखरंच साद घालत आहेत.

अमोल केळकर Mon, 09/21/2009 - 17:49
वा ! क्या बात है. एका पेक्षा एक सरस चित्रे -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

प्राजु Mon, 09/21/2009 - 22:54
माझ्याजवळ शब्दच नाहियेत.. आणखीही पहायला खूप आवडतील.. नक्की द्या इथे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

प्रभाकर पेठकर Mon, 09/28/2009 - 00:44
अप्रतिम छायाचित्रं. खूप आनंद होतो पाहताना. अजून असतिल तर टाका अशी सुंदर सुंदर छायाचित्रं. आमची भांडणं समजुतीने मिटतात. मी माझी चूक कबूल करतो आणि बायको मला समजून घेते..... हे महत्त्वाचे.

JAGOMOHANPYARE Sun, 12/13/2009 - 16:28
सुंदर......... सिंधु नदीचा फोटो आवडला........ *************************** प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

प्रशु Mon, 12/14/2009 - 21:16
सिंधु दर्शन घडवल्या बद्द्ल धन्यवाद..... सिंधु दर्शनाने सुखावलेला.. प्रशु.

रेवती Mon, 12/14/2009 - 21:24
हा धागा कसा कोण जाणे बघायचा राहून गेला होता. एकदम भारी फोटो आणि त्यांना दिलेली नावे तर साजेशीच! अजून फोटो असल्यास कृपया चढवा. पहिल्या फोटोतील बाळ कसलं गोड आहे. रेवती

sneharani Wed, 12/16/2009 - 16:13
एक न् एक फोटो सुरेख, अप्रतीम आहे. खूपच आवडले. आणखी असे फोटो असतील तर बघायला आवडतील. :)

sneharani Wed, 12/16/2009 - 16:14
एक न् एक फोटो सुरेख, अप्रतीम आहे. खूपच आवडले. आणखी असे फोटो असतील तर बघायला आवडतील. :)