मस्तच..पण थोडा छोटा भाग वाटला.
त्या भारावल्या अवस्थेत मी बाहेर आलो.
माझीही थोडी अशीच अवस्था झाली होती. असेच मी एकदा (एकाने जबरदस्ती केली म्हणून) मोदीच्या सेमिनारला गेलो होतो. हाच सगळा प्रकार होता. तेथे तर एक 'मोदी' कंपनीचे गाणे पण होते. आणि आधीच फसलेले सगळे लोक उत्साहाने गात होते. जो मला घेऊन तेथे आला होता तो सुद्धा जेव्हा जेव्हा ते गाणे लागत होते, तेव्हा माझ्याकडे आणि इतर संभाव्य बकर्यांकडे बघून चेहर्यावर काही जोशयुक्त भाव आणत हे गाणे म्हणत होता. फारच लाचारी वाटत होती.
"बकरा किश्तो पें " हे आमच्या नव्या अवस्थेचे नाव होते. असे बरेच बकरे किश्तोमे हलाल होण्यासाठी रांकेत उभे होते
हॅ हॅ हॅ ..
खादाडमाऊ
दुष्टचक्रच आहे ते.
हे चेन मार्केटिंग म्हणजे शुद्ध गाढवपणा आहे. ( कोणीही पर्सनली घेऊ नये ही नम्र विनंती )
त्यात गुरफटलेला कधीही बाहेर येऊ शकत नाही.
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत...
मला ही गोल्डक्वेस्ट / अॅम-वे वगैरे मध्ये पैसे गुंतविण्यासाठी काही मंडळी मागे पडली होती.त्यांच्यापासुन सुटका करुन घेताना अगदी नाकीनऊ आले होते.
अगदी गोड गोड बोलुन,सध्या पैसे नसतील तर दोन क्रेडिट कार्ड्स्चा स्मार्ट उपयोग करुन पैसे गुंतव म्हणुन अगदी पिच्छा पुरविला होता.शेवटी एकदा त्यांना निर्णायकपणे नाही म्हणुन सांगावे लागले.
>>अहो माणूस मेल्यावर त्याला खांदा द्यायला चार आणि पुढे मडके धरायला एक असे पाच लोक लागतात. एखाद्याला इतकेहे जमवता येत नसेल तर तो माणूस कसला म्हणायचा.
हे वाक्य बोचरे तर आहेच. ते इतके बोचते की हे चार + एक प्रत्येकी आपल्या सांगण्यावरून लाख लाख रुपये गा*** **त घालतील का हा विचार मनाला शिवतच नाही.
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)
सुरूवातीला 'नाही' म्हणताना संकोच वाटायचा आता शहाणा झालोय.
नवीन ओळख झाली आणि तिसर्या दिवशी त्या व्यक्तीचा फोन आला की एकंदर संभाषणाचा रोख ओळखून मीच स्वतःहून सांगतो की मी अॅमवे वगैरे काही करत नाही आणि त्याच्यासाठी तुम्ही फोन केला असेल तर आपण दोघांचाही वेळ घालवतोय. त्यानंतर पुन्हा चुकूनही त्या अॅमवेवाल्या व्यक्तीचा फोन येत नाही !! (काही महिन्यांनी नवीन कुणीतरी भेटतो !)
गेल्या काही वर्षांत त्यांनी नवीन प्रकार सुरू केलाय. अॅमवे वगैरे न म्हणता, आय हॅन अॅन इन्टरनेट बेस्ड बिझनेस' अशी ओळख करून देतात. बाटली बदलली तरी दारू तीच :)
प्रतिक्रिया
नेहमीप्रमाणे मस्त भाग..
उत्तम मालिका....
एक
पुढील
मस्तच....
>>अहो माणूस
खरे आहे हे.
अॅम वे वाले असेच पीडतात