!! मिपा पुणे कट्टा साद्यंत व्रुतान्तःबखर क्र १!! चौक ४

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in काथ्याकूट
26 Mar 2008 - 11:47 am
गाभा: 

!! मिपा पुणे कट्टा साद्यंत व्रुतान्तःबखर क्र १!! चौक ४
सार्‍यांस बहुत आस्चर्य जाहले...त्यावरी त्याणी खुलासा जे केला की मूळ यावनी ईर्षाद हा शब्द सूद्ध भारतीय आहे...ईर्षाद मूळ उचार
'नाईलाज" ऐसा आहे...त्याचा मतलब ही तोच आहे....
ये समयी मि पा सदस्यानी ईर्षाद हा शब्द नाईलाज ये अर्थाने भविस्यात वापरणेचा आहे ऐसा ठराव करणेत आला. त्यास येक्मुखाने सर्वानी दुजोरा दीला.....
ईतरही काही म्हत्वाचे ठराव ये समयी सदनात पेष केले गेले
ईतर ठराव ऐसे
१) पि पा वरील उत्तमोत्तम साहित्य कठीण स्वरूपात ( हार्ड कॉपी) आणणे. व ..त्याची जिम्मेदारी घेणेबाबत व साहेबी असोन राहाणे बाबत
२) मि पा सदस्य उत्तमोत्तम कळा जाणुन आहेत
उदा: साहेब श्री दंताड वैदु सरदार दाढे सरकार यांच्या नरड्यात मझा आहे..सरदार सो! गाणे सोबत बजावणे ही उत्तम करतात
सदाशीव्/शनिवार गोटाचे सर्मुखत्यार हसबनवीस सरदार साहेब श्री श्री श्री धमाल नाटके करतात
विजुभाऊ येकपात्री करतात
कविवर्य मेहेर्बान उले उलेमान केशवसुमार यांच्या विडंबनांची खुमारी सांगणे न लगे
दश हजारी मनसाबदार सरदार चित्तर ह्यांचेही णरडे फक्कड गाते.........
शायर ए मिपा गझल नवाझ अक्षरनवीस ॐकारखान हे गझला ऐशा नझाकतीने पेष करतात की तबियत खुष होते
ऐसे नग आणि नरपुंगव मिपा च्या दरबारात हझेरी देत असतात्....
या सर्वांस येकत्र आणुन मिपा चा येक खाषा जाहीर गोंधळ करणे बाबत्......रात्र रंगत गेल्यामुळे या येका विषयावर खलबतास फार्फार मजकूर आणि फार्फार वेळ उपलब्ध झाला नाही
सर्वांचा खाना आटोपला ( व ईतर ही.ते सांगणे न लगे)
पाउस ही तांडव करुकरुन थकला होता. रात्रीचा पहीला प्रहर उलटुन दुसरा येतच होता.
११:३० वाजले सगळे सरदार आपपली घोडी काढु लागले ( कोण रे तो म्हणाला सगळेच सरदार .१२ वाजायची रिस्क कशाला म्हणुन्.आणा त्याला धरुन इकडे)आणि आपापल्या निवासी परतों लागले.
ईतरत्र प्रुछा झाल्याप्रमाणे ये ठीकाणी मिसळीचा कट नव्हता...कार होती पण स्थान तिथेच सोडुन आल्यामुळे कोणतेही कट कार स्थान जाहले नाही.
सरदार धमाल पुणे कट्टा पुन्हा जमविण्याचा घाट घालत आहेत त्याबद्दल चर्चा झाली .परंतु ते सारे काडी बहादुर सरदार छोटा डॉन ( जे फकस्त काडी पेटवोन नीघोन जातात आणि आगोटी फुंकुन पेटती ठेवायची जबाबदारी धुम्रशलाकाबहदुर सरदार धमाल्यावर टाकतात) यांछ्या येण्यावर अवलंबुनआहे
ईती लेखन सीमा
येणे वाग्यज्ञे तोषावे...तोषौनी मज द्यावे मिसळ्पाव हे...
सिका आणि मोर्तब....
शके आठवत नाय वैषाख शुद्ध द्वितीया
व्रुतान्त मी सांगणार्..तुम्ही ऐकणार ..रन्ग तो चढणार रं जी जी जी
धन्य धन्य झाला तो सरदार जी जी जी जी जी जी र जी जी जी
आर रं दाजी जी जी रं दाजी जी जी र जी जी जी र जी जी जी
....मूळ बखरनवीस्..खरडनवीस...विजुभाऊ कलमदाने....

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

26 Mar 2008 - 12:03 pm | विसोबा खेचर

वा विजूभाऊ, मस्त लिहिलंय! :)

उदा: साहेब श्री दंताड वैदु सरदार दाढे सरकार यांच्या नरड्यात मझा आहे..सरदार सो! गाणे सोबत बजावणे ही उत्तम करतात
सदाशीव्/शनिवार गोटाचे सर्मुखत्यार हसबनवीस सरदार साहेब श्री श्री श्री धमाल नाटके करतात
विजुभाऊ येकपात्री करतात
कविवर्य मेहेर्बान उले उलेमान केशवसुमार यांच्या विडंबनांची खुमारी सांगणे न लगे
दश हजारी मनसाबदार सरदार चित्तर ह्यांचेही णरडे फक्कड गाते.........
शायर ए मिपा गझल नवाझ अक्षरनवीस ॐकारखान हे गझला ऐशा नझाकतीने पेष करतात की तबियत खुष होते
ऐसे नग आणि नरपुंगव मिपा च्या दरबारात हझेरी देत असतात्....

अरे वा! मिपावर बरीच कलाकार मंडळी आहेत की! :) डॉक्टर दाढेसाहेबांचं गाणं ऐकलं पाहिजे एकदा!

असो, उत्तम वृत्तांत...

छोटा डॉन आल्यावर पुढचा मिपाकट्टा ठरवा रे लवकरच! :)

तात्या.

स्वाती राजेश's picture

26 Mar 2008 - 5:54 pm | स्वाती राजेश

"मिसळ पाव चे पहिले वहिले संम्मेलन" चा वृतांत विजुभाऊनी मस्त लिहिला आहे.
या मुळे नविन कलाकारांची ओळख झाली..
वेगळ्या पद्धतीने सादर केल्यामुळे खूप छान वाटले..

प्रभाकर पेठकर's picture

26 Mar 2008 - 6:08 pm | प्रभाकर पेठकर

वा...वा...वा...
मिपाच्या पहिल्या वहिल्या संम्मेलनाचा मान पुण्यास मिळाला. पहिलेच कार्य अगदी थाटामाटात (अणि कात्रज घाटात) पार पाडल्याबद्दल श्री. धमाल मुलगा आणि इतर संबंधित सरदारांचे कौतुक करावे तितके थोडेच. सर्वांचे अभिनंदन. काही वैयक्तिक मजबुरीमुळे हजर राहू शकलो नाही पण पुढच्या मेळाव्यात नक्कीच हजेरी लावण्याचा प्रयत्न करेन.

डॉ.प्रसाद दाढे's picture

26 Mar 2008 - 7:43 pm | डॉ.प्रसाद दाढे

स्तुती करावी परमेश्वराची, करू नये व्यर्थ ती...वानराची! (इती बोरटाके गुर्जी) तात्या तुम्ही स्वतः चा॑गले गाता व तुम्हाला हि॑दुस्थानी (अस्थानी नव्हे :)) शास्त्रीय स॑गिताची उत्तम जाण आहे मला ठाऊक आहे, ते॑व्हा तुमच्या पुढे मी गाण्याची वगैरे जुर्रत अजिबात करणार नाही. त्यादिवशी स॑मेलनात बरेच जण (बरीच) प्याले होते म्हणून माझे गाणे खपून गेले (ईर्षाद~ नाईलाज..:)
मात्र चित्तर व छत्रपती ज्या फरमाईशी करीत होते व थोडे फार गातही होते त्यावरून त्या॑ची उच्च (कोण रे तो हुच्च म्हणतोय??) अभिरूची जाणवत होती. विजुभाऊ म्हणतात त्याप्रमाणे मिपा-करा॑च्या अ॑गी ना ना (नको त्या सुद्धा) कळा आहेत हे स॑मेलनात दिसून आले एव्हढे खरे..
आगामी मिपा-स॑मेलन बहुधा अ.भा. मराठी साहित्य स॑मेलनापेक्षा जास्त गाजणार अशी चिन्हे आत्ताच दिसो लागली आहेत्..म॑डळी तय्यार राहा

विसोबा खेचर's picture

26 Mar 2008 - 11:34 pm | विसोबा खेचर

मात्र चित्तर व छत्रपती ज्या फरमाईशी करीत होते व थोडे फार गातही होते त्यावरून त्या॑ची उच्च (कोण रे तो हुच्च म्हणतोय??) अभिरूची जाणवत होती.

दाढेसाहेब,

आमचा चित्तर अहे एक नंबरचा हलकट, परंतु भटसाहेबांची,

दु:खाच्या वाटेवर गाव तुझे लागले
थबकले न पाय जरी हृदय मात्र थांबले

वेशीपाशी उदास हाक तुझी भेटली,
अन् माझी पायपीट डोळ्यातून सांडली!

मग माझा जीव तुझ्या वाटेवर तळमळेल,
अन् माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल!
मग माझा जीव तुझ्या वाटेवर तळमळेल!

ही गझल मात्र चित्तर खूप छान गातो! चितरकडनं ही गझल ऐकायला खूप बरं वाटतं! साला, ह्या गझलेचे शब्द आणि अर्थ काळजाला हात घालतात!

जरा ये अंतरा सुनीये,

सहज कधी तू घरात, लावशील सांजवात
माझेही मन तिथेच, ज्योतीसह थरथरेल,
मग माझा जीव तुझ्या वाटेवर तळमळेल!

!!

क्या केहेने! दाढेसाहेब, घुसते हो साली ही गझल काळजात!

बाय द वे दाढेसाहेब, ही गझल मी पण बरी गातो बरं का! अहो आमच्या यमन रागातली गझल आहे ही, सुधीर मोघेनी फार छान बांधली आहे!:)

ऐकवीन केव्हातरी आपल्यालाही. अरे आप सुनो तो सही तात्या का गाना! :)

आपला,
(अण्णांचा मानसशिष्य) तात्या.

वरदा's picture

26 Mar 2008 - 8:47 pm | वरदा

आज वेळ झाला तर सगळे व्रुत्तांत वाचुन काढले...सॉलिड आहेत्....बखर लिहिण्याची आयडीया कशी सुचली?...सहीच आहे एकदम्...सॉरी खूप उशीरा प्रतिक्रीया दिल्याबद्दल....

प्राजु's picture

26 Mar 2008 - 10:50 pm | प्राजु

विजुभाऊ..
एकदमच भारी...
सगळा वृतांत वाचून... डोळ्यासमोरच घडते आहे सारे असे वाटले. आणि मिपाकरांच्या अंगात बर्‍याच कला (आणि कळाही) आहेत हे समजले.
धन्य पावलो आम्ही.

- (सर्वव्यापी)प्राजु

अघळ पघळ's picture

27 Mar 2008 - 2:59 am | अघळ पघळ

विजुभाऊ तुझी ही श्टाइल आवडली रे! सगळ्यांच्या गमती जमती सांगीतल्यास पण आमच्या इनोबाचे काय? तुझ्या सारखा गुजराथी माणुस आजकाल मराठी संकेतस्थळांचे कट्टे गाजवतो म्हणून सगळा वेळ तो नुसता त्या फोटोतल्या सारखा रागीट चेहरा करुन बसला होता का काय? ही ही ही..सर्वांनी ह.घ्या.रे

इनोबा म्हणे's picture

27 Mar 2008 - 10:54 am | इनोबा म्हणे

तरी म्हटलं बरेच दिवस दिसला का नाहीस.मुद्द्याची वाट पाहत बसला होतास की काय?(तिकडून निरोप आला वाटतं) :)

बाकी काहीही म्हण तुझ्यासारखी (केवळ जन्माने)मराठी माणसं आणि विजुभाऊंसारखा दिलखूलास गुजराथी माणूस पाहील्यानंतर चांगलं आणि वाईट यातला फरक कळला हो! आमच्यातला फरक त्यांनाही जाणवलाच असावा,कारण आम्हीही त्यांना मनमूराद दाद दिली(तुझ्यासारखी खाज-खुजली नव्हे :) बाकी आमच्याकडून काही चूकलं असेल तर विजुभाऊ आम्हाला माफ करतीलच.काय विजुभाऊ!

आमचा खुललेला चेहरा पाह्यला तुला कट्ट्यालाच यायला लागेल बरं का! पण त्यानंतर तूझा चेहरा कसा होईल ह्याची तूच कल्पना कर :)

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

विजुभाऊ's picture

27 Mar 2008 - 12:55 pm | विजुभाऊ

रे बाबा अघळपघळ्या तुझ्या सारखा गुजराथी माणुस म्हणजे काय ? हे असे असणे चांगले की वाईट?
..................किंचीत गुजराथी विजुभाऊ
बरे झाले तु सांगुन टाकले ते ....मला गुजराथी अस्खलीत लिहीता वाचता बोलता येते एवढेच.

विजुभाऊ's picture

27 Mar 2008 - 1:34 pm | विजुभाऊ

ईर्षाद....एका मित्राला हे सगळे सलग पहायचे आहे

सुधीर कांदळकर's picture

27 Mar 2008 - 9:42 pm | सुधीर कांदळकर

कविवर्य मेहेर्बान उले उलेमान केशवसुमार यांच्या विडंबनांची खुमारी सांगणे न लगे
दश हजारी मनसाबदार सरदार चित्तर ह्यांचेही णरडे फक्कड गाते.........

हे झकासच. मज्जा आली.

अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.

विजुभाऊ's picture

18 Dec 2024 - 12:01 pm | विजुभाऊ

मुवि नी फोटोंचा धागा वर आणल्यामुळे हे उत्खनन केले

मुक्त विहारि's picture

18 Dec 2024 - 6:47 pm | मुक्त विहारि

सध्या अंथरुणावर खिळून असल्याने, मुद्दाम असे कुणाला भेटता येत नाही...

त्यामूळे, जुने कट्ट्याचे धागे उपसून काढतो आणि फोटो रुपी तरी का होईना, पण मिपाकरांना भेटतो.

बखरनवीस्..खरडनवीस...विजुभाऊ कलमदाने... भारी लिहिलाय वृत्तांत 😀