परीक्षा ..... परीक्षा ... कोणा एकाच्या मृत्यूनंतरच संपणारी परीक्षा !!
मनातलं फक्त तुमच्याशी सामायीक करतोय. सगळ्यांना हे पटेल किंवा ते मान्य करावे असा आग्रह नाही. नाही पटलं तर दुर्लक्ष करून स्क्रोल डाउन करा ....
लग्नानंतर पहिले अपत्य होणे हा परमोच्च आनंदाचा क्षण असतो. पण सगळी जोडपी अशी भाग्यवान नसतात. काहीना मूल जन्माला यायच्या आधीच कल्पना असते की आपले मूल सर्व सामान्य नसणार आहे. किंवा काही केसेस मध्ये ते दोन किंवा तीन वर्षांनी समजते.
मग सुरु होते ती जन्मभराची अग्नी परीक्षा ! त्या जोडप्याची .... त्या मुलाची ....
काही वर्षे गेली की त्या जोडप्याला काळजी लागून राहते की आपल्यानंतर याचे / हिचे कोण करणार .... मग दुसरा चान्स घेण्याचा विचार सुरु होतो ... पुन्हा त्या जोडप्याच्या मनात काळजी ... दुसरे अपत्य सुद्धा असेच जन्मले तर ?
.. मग पॉसिटीव्ह थिंकिंग वगैरे संकल्पनांच्यावर भरवसा ठेऊन काही जोडपी दुसरा चान्स घेतात.... काही घेत नाहीत ...
क्वचित प्रसंगी मूल पुन्हा तसेच जन्मते ....
बऱ्याच प्रसंगी दुसरे अपत्य नॉर्मल असते ....
मग त्या दुसऱ्या अपत्याला असेच डिझाईन केले जाते की तुझा भाऊ / बहीण याला सांभाळणे हीच तूझी प्राथमिक जबाबदारी ....
तुला त्याच साठी जन्मास घातलय....
आणि मग नियतीच्या परीक्षार्थींमध्ये भर पडते ती त्या दुसऱ्या अपत्याची ....
परीक्षा ..... परीक्षा ... कोणा एकाच्या मृत्यूनंतरच संपणारी परीक्षा !!
कौस्तुभ पोंक्षे
वाचने
3467
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
कौस्तुभ सर तुम्हाला भेटलो आहे
देवा घरचे ज्ञात कुणाला.....
आपण खंबीर राहून लढत आहात.
वाचता वाचता...
अतिशय दुर्दैवी म्हणायचे हे !
धैर्यास अभिवादन
ओहह....
कल्पना करू शकतो.
मग त्या दुसऱ्या अपत्याला असेच
In reply to मग त्या दुसऱ्या अपत्याला असेच by सुबोध खरे
अगदी योग्य प्रतिसाद. एक
In reply to अगदी योग्य प्रतिसाद. एक by गवि
उमेद फाऊंडेशन
In reply to मग त्या दुसऱ्या अपत्याला असेच by सुबोध खरे
समाजातील प्रश्नांवर संवेदनशील पणे विचार व्हावा ना की परखडपणे.
In reply to समाजातील प्रश्नांवर संवेदनशील पणे विचार व्हावा ना की परखडपणे. by कर्नलतपस्वी
प्रतिसाद आवडला.
एखादा गर्भ दिव्यांग निपजणार आहे...
दुर्दैवाने आपण बघायला जात
In reply to दुर्दैवाने आपण बघायला जात by सुबोध खरे
डॉ. साहेब पण आता
In reply to दुर्दैवाने आपण बघायला जात by सुबोध खरे
ते स्थळ बहुतांशी नाकारले जाते.