Three of Us : एक काव्यात्मक सुंदर अनुभव.
काही सिनेमे पुस्तकातल्या सुंदर कवितेसारखे असतात. असाच एक हिंदी सिनेमा. एका रुटीन आयुष्य जगणा-या मध्यमवर्गीय माणसाची कथा. आपला फ्लॅट आपली नौकरी. नव-याचा वेगवेगळ्या पॉलीसी विकण्याचा व्यवसाय. मुलगा इंजिनियरींगच्या शिक्षणासाठी बाहेर गावी आहे.
![]() |
Three of Us- चित्र सौजन्य जालावरुन. |
अशा कुटुंबातल्या शैलजा ( शेफाली शहा) कुंटुंब न्यायालयात घटस्फोटाच्या विभागात काम करणारी आणि जीचा हळुहळु स्मृतीभ्रंशचा (डीमेंशियाचा आजार) आजार बळावतो आहे. आपल्या कामाच्या नोंदी तिला नोंदवहीत करुन ठेवाव्या लागतात. आपण कोण आहोत आपल्या आजुबाजुला काय चाललंय या रुटीन जीवनाचा कंटाळा म्हणूण ती आपल्या कोंकणातल्या एका गावी वेंगुर्ल्याला आपल्या नव-याबरोबर एका आठवड्यासाठी दीपांकर ( स्वानंद किरकिरे) बरोबर सुट्या घालवायला जायचं ठरवते, अर्थात आठवणी जपणे तिला महत्वाचे वाटते.
वेंगुर्ल्याला गेल्यावर तिथे आपल्या शाळा मित्र प्रदीप कामतचा (जयदीप आहलत)चा ती शोध घेते. बँकेत नौकरी करत असलेला प्रदीपशी तिच्या शाळा-परिसराच्या काही आठवणी आहेत. काही आठवणी आठवतात काही नाही. आठवणीबरोबर तीन पात्रांचं एक हळुवार कथानक सुरु होतं. दीपांकर शैलजाला म्हणतो की इतक्या वर्षात कधी तु शाळा मित्राबद्दल कधी बोलली नाही. तर, ती म्हणते कधी सांगावं वाटलं नाही. तिघांच्याही मनातली हळुवार कथा-स्पंदने. वेगवेगळय विचारांची मालिका संथपणे सुरु होते. आपलं बालपण सर्वांनाच हवंहवंस असतं. आठवणी हव्याशा आणि रुटीन आयुष्यात उत्साह भरवणा-या असतात. आपल्या आयुष्यातली काही अशी स्थाने असतात की, आपल्याला पुन्हा नव्याने आयुष्य तिथून सुरु करण्याचा केंद्रबिंदु ती वाटायला लागतात. 'उद्गम' शब्दाभोवती हा चित्रपट फिरत राहतो. प्रदीप लेखक-कवीही आहे. शाळेतली मैत्रीण इतक्या दिवसानंतर भेटल्यानंतर तो एक कविताही लिहितो. प्रदीपची बायको सारिका (कादंबरी कदम ) म्हणते, आपला इतक्या दिवसाचा संसार झाला, तुम्ही कधी माझ्यावर कविता नाही लिहिली. आज मैत्रीण भेटली आणि थेट 'उद्गमावर' कविता लिहिली. काही प्रश्न अडचणींचे आणि त्याचीही उत्तरं आपल्याला इतर प्रसंगातून मिळत जातात. सिनेमा एक सुंदर दीर्घ काव्यात्मक अनुभव आहे. एक सुंदर गजल आहे.
कोंकणातला अतिशय रम्य परिसर. घर-दारं वेली फुलं. समुद्र. ही सुद्धा सिनेमातली पात्र वाटायला लागतात. शैलजाचा स्मृतीलोपाचा आजार आणि तिचा तो ताकदीचा अभिनय. काहीही न बोलता डोळ्यातून व्यक्त होत राहणे. नंबर एक झालं आहे. सिनेमात एकूण पात्र चार ते पाच. शैलजाच्या नव-याचा दीपांकरचा अभिनयही तसाच अप्रतिम. आपण पती म्हणुन अपयशी ठरलो की काय असा न बोलता व्यक्त होणारा शब्दबद्ध अनुभव. प्रदीपचाही तसाच भारदस्त अनुभव. करारी वाटणारा पण हळवा. दोन मुली आहेत. पत्नीही अतिशय समजदार आणि पतीचे होणारे बदल ती सहज टीपते. संथ वाटणारा सिनेमा. आठ दिवसाच्या सुटीनंतर संपतो. शेफालीचा स्मृतीभ्रंश आणि बालपणीच्या मित्रामुळे तिच्यात काही बदल होतो ? पती सगळं स्विकारतो ? चित्रपटाचा शेवट प्रेक्षकांना बेचेन करतो ? की सिनेमा योग्य ठिकाणी संपलाय ? की आणखी काही ? त्यासाठी अविनाश अरुण निर्मित एक तास आणि चाळीस मिनिटांचा हा सिनेमा ओटीटीवर बघायलाच हवा.

तुम्ही इतके भारावून गेले आहात
In reply to तुम्ही इतके भारावून गेले आहात by गवि
हं...
एखाद्या व्यक्तीशी नातेसंबंध
In reply to एखाद्या व्यक्तीशी नातेसंबंध by कंजूस
+१
थ्री ऑफ अस चं
In reply to थ्री ऑफ अस चं by सर टोबी
+१
बघणार.
आता पुन्हा कॅन्सल केलेलं
तुम्ही चित्रपट पाहिल्यावर खूप
In reply to तुम्ही चित्रपट पाहिल्यावर खूप by प्रचेतस
तुम्हांस नेमकी आवड तरी कशा
In reply to तुम्हांस नेमकी आवड तरी कशा by गवि
सूत्रांची माहिती.
In reply to सूत्रांची माहिती. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भारंभार चुंबने आणि सारखं
In reply to भारंभार चुंबने आणि सारखं by गवि
तुम्हा दोघा ज्येष्ठांची पिढी
In reply to तुम्ही चित्रपट पाहिल्यावर खूप by प्रचेतस
प्रचेतस+1
चला किमान लिहिते तर झाले... :
अवांतर : लई हासलो
तुमचे वर्णन वाचून सिनेमा
आभार...!