कळतं रे पण..
लेखनविषय:
कळतं मला पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय,
पहिलं पाऊल टाकायचं, दोघांकडून राहून गेलंय.
कळतं आता तुझंमाझं उरलं नाही वेडं वय.
येताजाता उचकी लागेल अशी आता कुठली सय?
कळतं की भरतीनंतर ओहोटी ही येणारच,
किती कुणी जवळ येवो दूर तर जाणारच..
तरीही,
उठता उठताच आधी पहिला फोनकडे जातो हात,
तुझ्या मेसेजशिवाय होते दिवसाची सुरुवात.
स्टेटस, डीपी, पोस्ट, फोटो कुठंतरी तर भेटशील खरं?
पण डिलिटलेल्या नंबरवर कसं कुणी दिसणार बरं?
कधीतरी तर वाजेल रिंग समजावतं एक मन
चोवीस तास उगाचंच हाताजवळ असतो फोन!
...
सोडायचं म्हटलं तरी सवयी सुटता सुटत नाहीत;
जीर्ण शीर्ण झाल्या तरी काही गाठी तुटत नाहीत..
वाचने
3464
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
मन उदास झालं असेल कवयित्रीचे.... तर
In reply to मन उदास झालं असेल कवयित्रीचे.... तर by आंद्रे वडापाव
हा हा .. खुप हसले :) भारी.
छान
In reply to छान by सरिता बांदेकर
धन्यवाद!
मस्त कविता
In reply to मस्त कविता by अनंतफंदी
धन्यवाद!:)
वॉर ऑन लोनलीनेस
In reply to वॉर ऑन लोनलीनेस by प्रसाद गोडबोले
जय गुरुदेव!;)
छान लिहीली आहे...
In reply to छान लिहीली आहे... by कर्नलतपस्वी
शालजोडीला चिंधी लावतोय, कशी वाटते सांगा.
In reply to शालजोडीला चिंधी लावतोय, कशी वाटते सांगा. by प्रसाद गोडबोले
मार्क्स भौ...
In reply to मार्क्स भौ... by कर्नलतपस्वी
हायला!!
In reply to हायला!! by राजेंद्र मेहेंदळे
उमेदीच्या दिवसात, कदाचित ..
In reply to छान लिहीली आहे... by कर्नलतपस्वी
वाह!