✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कळतं रे पण..

प — प्राची अश्विनी, Tue, 02/07/2023 - 12:07
कळतं मला पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय, पहिलं पाऊल टाकायचं, दोघांकडून राहून गेलंय. कळतं आता तुझंमाझं उरलं नाही वेडं वय. येताजाता उचकी लागेल अशी आता कुठली सय? कळतं की भरतीनंतर ओहोटी ही येणारच, किती कुणी जवळ येवो दूर तर जाणारच.. तरीही, उठता उठताच आधी पहिला फोनकडे जातो हात, तुझ्या मेसेजशिवाय होते दिवसाची सुरुवात. स्टेटस, डीपी, पोस्ट, फोटो कुठंतरी तर भेटशील खरं? पण डिलिटलेल्या नंबरवर कसं कुणी दिसणार बरं? कधीतरी तर वाजेल रिंग समजावतं एक मन चोवीस तास उगाचंच हाताजवळ असतो फोन! ... सोडायचं म्हटलं तरी सवयी सुटता सुटत नाहीत; जीर्ण शीर्ण झाल्या तरी काही गाठी तुटत नाहीत..

प्रतिक्रिया द्या
3447 वाचन

💬 प्रतिसाद (14)

मन उदास झालं असेल कवयित्रीचे.... तर

आंद्रे वडापाव
Tue, 02/07/2023 - 12:39 नवीन
अरे अरे .. अशी लॉन्ग-डिस्टन्स रिलेशनशिपवरील कवितेवर .. मन उदास झालं असेल कवयित्रीचे.... तर कवयित्रीने हा व्हिडीओ पहावा ... https://www.youtube.com/watch?v=Jcu2AcGx01Q Image removed.
  • Log in or register to post comments

हा हा .. खुप हसले :) भारी.

Bhakti
Wed, 02/08/2023 - 17:42 नवीन
हा हा .. खुप हसले :) भारी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंद्रे वडापाव

छान

सरिता बांदेकर
Tue, 02/07/2023 - 13:50 नवीन
छान लिहीलं आहे.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

प्राची अश्विनी
गुरुवार, 02/16/2023 - 13:48 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सरिता बांदेकर

मस्त कविता

अनंतफंदी
Tue, 02/07/2023 - 13:56 नवीन
"डिलिटलेल्या" शब्द विशेष आवडला
  • Log in or register to post comments

धन्यवाद!:)

प्राची अश्विनी
गुरुवार, 02/16/2023 - 13:48 नवीन
धन्यवाद!:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनंतफंदी

वॉर ऑन लोनलीनेस

प्रसाद गोडबोले
Tue, 02/07/2023 - 23:38 नवीन
पहिलं पाऊल टाकायचं, दोघांकडून राहून गेलंय.
म्हणुनच म्हणतो , बिनधास्त बोलुन टाकायचं , मनात ठेवायचं नाही . कोणी आवडलं की स्पष्ट सांगायचं जास्त आढेवेढे न घेता ! तुम्ही जर डीसेंटली विचारलेत तर , जास्तीत जास्त वाईट काय होइल , नकार येईल , त्यापेक्शा तर जास्त काही होणार नाही ना , मग ठीक आहे की ! तो नकार तुम्हाला किंव्वा तुमच्या पर्सनॅलिटीला नसुन सर व्यक्तिच्या स्वतःविषयीच्या परिस्थीतीला आहे , बस्स ! आणि तसेही , विचारले असते तर कदाचित काहीतरी वेगळे होऊ शकले असते ह्या कल्पनेत जळत रहाण्यापेक्षा , ठीक आहे , नाही तर नाही , मुव्ह ऑन . हे म्हणणे जास्त सोप्पे असते :) हे मोबाईल अन व्हॉत्सॅप्प मेसेजेस अन सोशळ मीडीयाच्या नादात लोकं स्पष्ट बोलायलाच विसरली आहेत . बोला रे बोला... मनातलं बोला , उगाच बाष्कळ गफ्फा मारत बसु नका , स्पष्ट मनातलं बोला . बोलुन रिकामे व्हा . #वॉर_ऑन_लोनलीनेस
  • Log in or register to post comments

जय गुरुदेव!;)

प्राची अश्विनी
गुरुवार, 02/16/2023 - 13:47 नवीन
जय गुरुदेव!;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

छान लिहीली आहे...

कर्नलतपस्वी
Wed, 02/08/2023 - 11:33 नवीन
वय झालं तरी सय सुटत नाही तुला विसरावे हेच मुळी पटत नाही. शालजोडीला चिंधी लावतोय, कशी वाटते सांगा. पुला खालून बरचं पाणी वाहून गेलं आहे. तरीही आठवणींचा ओलावा अजून टिकून आहे दगड गोट्यावरचे हिरवे शेवाळ सुकत आहे जुन्या जखमेतून रक्त लाल गळत आहे काळे मेघ अजुन विरलेले नाहीत गुलाबी स्वप्नांचे दिवस सरलेले नाहीत दिवसा मागून दिवस पळत आहेत उरलेल्या आसवांना बांध घालत आजुनही वाट बघत आहे. -कसरत
  • Log in or register to post comments

शालजोडीला चिंधी लावतोय, कशी वाटते सांगा.

प्रसाद गोडबोले
Wed, 02/08/2023 - 11:45 नवीन
शालजोडीला चिंधी लावतोय, कशी वाटते सांगा.
अहो चिंधी म्हणता म्हणता पार गोधडी करुन टाकलीत तुम्ही तीही रंगीबेरंगी =)))) हिरवे शेवाळ, रक्त लाल, गुलाबी स्वप्न , काळे मेघ =)))) Image removed. गोधडी जड असेल पण प्रतिसाद हलक्यात घ्या =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

मार्क्स भौ...

कर्नलतपस्वी
Wed, 02/08/2023 - 11:56 नवीन
प्रतिसाद आवडला. काहीतरी उधडायचं काहीतरी बुनायचं विसाव्याचे दिवस आता असचं काहीतरी करायचं &#128512
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

हायला!!

राजेंद्र मेहेंदळे
Wed, 02/08/2023 - 12:47 नवीन
विसाव्याच्या दिवसात प्रतिभा एव्हढी उफाळुन आलेय तर उमेदीच्या दिवसात काय असेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

उमेदीच्या दिवसात, कदाचित ..

आंद्रे वडापाव
Wed, 02/08/2023 - 13:57 नवीन
उमेदीच्या दिवसात, कदाचित .. त्यांच्या बाईकच्या, मागच्या अर्धी सीटवर, कधीच धूळ जमत नसेल ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

वाह!

प्राची अश्विनी
गुरुवार, 02/16/2023 - 13:46 नवीन
वाह!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा