नाते प्राजक्ताचे
सकाळपासून पावसाची रिपरिप चालू आहे. श्रावणातला पाऊस तो हत्ती सारखा थोडाच कोसळणार. दररोजची प्रभातफेरी चुकली. येताना देवपूजेला फूले घेऊन येण्याचा नित्यनेम. लाईट नव्हती, पाच माळे उतरून खाली जावे की न जावे द्विधा मनस्थितीत. नित्यनेम चुकला की दिवसभर रुखरुख लागते. त्यापासून वाचण्यासाठी खाली उतरायचे ठरवले. विचारमग्न अवस्थेतच पाचव्या मजल्यावरून खाली आलो,छत्री विसरल्याचे लक्षात आले.
अरे देवा! आता पुन्हा पाचा वर जावून शून्यावर यायचे.जाऊ द्या थोडं भिजल्याने काय होणार आहे ? प्राजक्ताच्या झाडाकडे निघालो.झाडा जवळ पोहोचलो,फुलांचा सडा पडला होता.पाय ठेवायला जागा नव्हती.त्या पारिजातकाच्या सड्याचे कवी अनिल यांनी केलेले वर्णन किती खरे आहे हे लक्षात आले.
बाई या पावसानं, लावियली झीमझीम
भिजविलं माळरान, उदासलं मन
बाई या पावसानं !
फुलली ही जाई-जुई, बहरून वाया जाई
पारिजातकाची बाई, कशी केली दैन
मातीत पखरण
बाई या पावसानं !
कानात पु. ल. देशपांड्यांचा आवाज रुंजी घालू लागला.
पावसाच्या रिपरिपी बरोबर फूलं सुद्धा अंगावर पडत होती. भानावर आलो आणी पटापटा फूले वेचू लागलो.
'बहु चंचल चपळ।
जाता-येता नलगे वेळ।।'
अचानकच एकदम लहान झाल्या सारखे वाटू लागले. मन साठ वर्ष मागे गेले.
एकवर्षी चातुर्मासात महादेवाला प्राजक्ताची लाखोली वाहीन म्हणून आईने संकल्प सोडला.त्यावेळेस फारच थोड्या लोकांच्या परसात प्राजक्ताचे झाड असायचे.संकल्प सोडण्या आगोदर त्यांना सांगावे लागायचे म्हणजे जास्तीत जास्त फुले त्या घराला मिळायची.
रोज सकाळी पाच वाजता उठून फूले गोळा करणे,मोजणी करून त्याची नोंद वहीत ठेवणे हे माझे काम."जेवढी मिळतील तेवढाच आकडा लिही,जास्त लिहू नकोस",आई अधून मधून सुचना देत असे.
एक दिवस अशीच पावसाची रिपरिप चालू होती.आई म्हणाली डोक्यावर काहीतरी घेऊन जा. त्यावेळेस छत्री,रेनकोट श्रीमंतीचे चोचले होते. सुतळीचे बारदानच आमचा रेनकोट असे. "होय आई ",म्हणत डोक्यावर पातेले ठेऊन पावसात धूम ठोकली.दोन पातेली भरून फूले गोळा करताना ओला चिंब,नखशिखांत भिजलो होतो." मी म्हटंले होते की डोक्यावर काहीतरी घेऊन जा", म्हणत आईने पदराने डोकं पुसायला सुरवात केली. आईचं काम केलं म्हणून माझी छाती फुगली तर मुलाचे कर्तृत्व बघून आईचा ऊर कौतुकाने भरून आला.
आठवणीने डोळ्याच्या कडा पाणावल्या, पाऊस पडत होता म्हणून इतरांना दिसल्या नाहीत.
घरी आलो,आईच्या फोटोकडे नजर टाकली,उगाचच ती गालातल्या गालात हसते आहे असा भास झाला.
वाचने
7405
वाचनखूण
प्रतिक्रिया
34
सुंदर प्राजक्त सडा!
म्हणत आईने पदराने डोकं
म्हणत आईने पदराने डोकं
वा !
नाते प्राजक्ताचे
धन्यवाद
धन्यवाद
In reply to धन्यवाद by कर्नलतपस्वी
लेख वाचतांना डोळे पाणावले होतेच
In reply to लेख वाचतांना डोळे पाणावले होतेच by मुक्त विहारि
+१
In reply to लेख वाचतांना डोळे पाणावले होतेच by मुक्त विहारि
+१
खरंय मुवि.
पुलंनी गायलेले हे गाणे माझ्या
In reply to पुलंनी गायलेले हे गाणे माझ्या by विजुभाऊ
धन्यवाद
प्राजक्ताच्या सुंगधाचा
छान लिहिलंय __/\__
हृदयस्पर्शी!
वरील सर्वांशी सहमत.
खुप छान लिहिलंय!!!
In reply to खुप छान लिहिलंय!!! by अथांग आकाश
धन्यवाद
खूप छान लिहिलंय, तुमच्या
सुरेख आणी सुरेल लेखन .
In reply to सुरेख आणी सुरेल लेखन . by सिरुसेरि
धन्यवाद
पेढे आवडले हो काका.
In reply to पेढे आवडले हो काका. by रंगीला रतन
चुकीच्या जागी पोस्ट झाला
वाह कर्नल साहेब. आईचा संकल्प पूर्ण करण्यासाठी
In reply to वाह कर्नल साहेब. आईचा संकल्प पूर्ण करण्यासाठी by टर्मीनेटर
धन्यवाद
खूप छान.
विस्तृत प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.
In reply to विस्तृत प्रतिसादाबद्दल मनापासून आभार. by कर्नलतपस्वी
पहिल्यांदा गद्य पण बोरकर
छान
सुंदर, भावस्पर्शी लिखाण.
In reply to सुंदर, भावस्पर्शी लिखाण. by चित्रगुप्त
+१
खूप सुंदर लिहिलंय
भक्ती सरीताजी,चित्रगुप्त आणी