गाभा:
खालील प्रतिसादात, माझा उल्लेख केलेला आहे आणि तो आर्थिक फसवणूकी बाबतीत आहे
https://www.misalpav.com/comment/reply/50302/1143095
मी कुणाचीही आर्थिक फसवणूक केली असल्यास, त्या सदस्याने, इथेच जाहीर रित्या सांगीतले तर उत्तम.....
खालील प्रतिसादात, माझा उल्लेख केलेला आहे आणि तो आर्थिक फसवणूकी बाबतीत आहे
https://www.misalpav.com/comment/reply/50302/1143095
मी कुणाचीही आर्थिक फसवणूक केली असल्यास, त्या सदस्याने, इथेच जाहीर रित्या सांगीतले तर उत्तम.....
प्रतिक्रिया
6 Jun 2022 - 6:00 pm | कॉमी
via GIPHY
6 Jun 2022 - 6:04 pm | मुक्त विहारि
होकारार्थी उत्तर असेल तर, इथेच स्पष्ट लिहीलेत तर फारच उत्तम...
6 Jun 2022 - 7:49 pm | अमरेंद्र बाहुबली
अरे काॅमी. ह.ह. पु वा :)
6 Jun 2022 - 8:23 pm | अमरेंद्र बाहुबली
हे कसं टाकावं? काॅमी मार्गदर्शन करा.
6 Jun 2022 - 8:44 pm | कॉमी
१. तुम्हाला हवं ते gif गुगल वर सर्च करा. उदा - पॉपकॉर्न gif.
२. giphy हि साईट येईल, त्यात सगळे पॉपकॉर्न वाले जिफ येतील.
३. आपल्याला हव्या त्या जिफ वर क्लिक करा.
४.मोबाईल वर असाल तर- जिफ उघडल्यावर डेक्सटॉप साईटचा पर्याय निवडा. डेक्सटॉप साईट आल्यावर तिथे एम्बेड हा पर्याय दिसेल. तो पर्याय निवडा, आलेला कोड कॉपी करा, आणि मग इथे पेस्ट करा- काम झालं.
जर कॉम्प्युटर वर असाल तर एम्बेड हा पर्याय थेट येईल.
6 Jun 2022 - 9:08 pm | अमरेंद्र बाहुबली
धन्यवाद.
6 Jun 2022 - 6:07 pm | चंद्रसूर्यकुमार
मुवि, कुठे त्या एकाहून एक गुडघ्यातले प्रतिसाद देणार्याच्या तोंडी लागत आहात? सरळ दुर्लक्ष करा की. हाथी चाले अपनी चाल कुत्ते भौके हजार म्हणा आणि सोडून द्या की.
6 Jun 2022 - 6:45 pm | मुक्त विहारि
पण
मुद्दा, फसवणूकी बाबतीत आहे....
खालील वाक्यांत त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे.... Mipa चा वापर करून आर्थिक फायदा करून घेत आहेतं..
संशयाला वाव ठेवायचाच कशाला?
7 Jun 2022 - 12:47 pm | साहना
पण खरच आर्थिक फायदा होत असेल तर जरूर कळवा म्हणजे काय आम्ही सुद्धा करून घेऊ. :)
7 Jun 2022 - 1:21 pm | अमरेंद्र बाहुबली
:) ईतके दिवस आपण बिनपगारी वापरले जात होतो हे आपल्याला कळाले तर किती दु:खः होईल.
7 Jun 2022 - 2:13 pm | सुबोध खरे
मग तुम्हाला किती पगार मिळतो
6 Jun 2022 - 6:53 pm | कर्नलतपस्वी
नांगी वेळीच ठेचली पाहीजे. आशी लोक पिकातल्या तृणांसारखी.हयगय नको.
6 Jun 2022 - 6:48 pm | कानडाऊ योगेशु
मुविकाका मला वाटले छगनलालचे सापळे सारखे काहीतरी असेल.
काही गोष्टींकडे दुर्लक्ष करा.
7 Jun 2022 - 2:24 pm | राजेंद्र मेहेंदळे
काही लोक्स पिचकार्या मारुन घाण करायलाच येतात मिपासारख्या ठिकाणी. कुठे लोड घेताय मुविकाका?
6 Jun 2022 - 6:48 pm | कर्नलतपस्वी
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात,
आंधळ्यासि जन अवघे चि आंधळे । आपणासि डोळे दृष्टी नाहीं ॥१॥
रोग्या विषतुल्य लागे हें मिष्टान्न । तोंडासि कारण चवी नाहीं ॥२॥
तुका म्हणे शुद्ध नाहीं जो आपण । तया त्रिभुवन अवघें खोटें ॥३॥
याचा उपाय काय?
तुका म्हणे ऐशा नरा, मोजुनी माराव्या पैजारा.”
व्यक्तीशः व्यक्तिगत हल्ल्याचा निषेध करतो.संपादक मंडळ याची नोंद घेईल आशी अपेक्षा.
6 Jun 2022 - 6:48 pm | कर्नलतपस्वी
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात,
आंधळ्यासि जन अवघे चि आंधळे । आपणासि डोळे दृष्टी नाहीं ॥१॥
रोग्या विषतुल्य लागे हें मिष्टान्न । तोंडासि कारण चवी नाहीं ॥२॥
तुका म्हणे शुद्ध नाहीं जो आपण । तया त्रिभुवन अवघें खोटें ॥३॥
याचा उपाय काय?
तुका म्हणे ऐशा नरा, मोजुनी माराव्या पैजारा.”
व्यक्तीशः व्यक्तिगत हल्ल्याचा निषेध करतो.संपादक मंडळ याची नोंद घेईल आशी अपेक्षा.
6 Jun 2022 - 6:49 pm | श्रीगुरुजी
मुर्खांच्या सर्व प्रतिसादांकडे पूर्ण दुर्लक्ष करा. लक्ष द्याल तर त्यांचे हेतू साध्य होतील.
6 Jun 2022 - 6:56 pm | मुक्त विहारि
मी आर्थिक फसवणूक करतो, असा जाहीर उल्लेख केलेला आहे, त्यामुळेच, धागा काढला ....
7 Jun 2022 - 1:33 am | सुक्या
काळजी नको .. त्यांना असेही कुणी सिरियसली घेत नाही. त्यामुळे कितीही बरळले तरी काय उपयोग नाही...
6 Jun 2022 - 7:17 pm | कर्नलतपस्वी
भले तरी देऊं कासेची लंगोटी | नाठ्याळा चि गांठी देऊं माथां |
मायबापाहूनि बहु मायावंत | करूं घातपात शत्रूहूनि |
तुका म्हणे आम्ही अवघे चि गोड | ज्याचें पुरे कोड त्याचेपरिं |
दुर्लक्ष नको,मुर्खाचे कोड मुलाला सारखेच व्हायला पाहिजेत.
6 Jun 2022 - 10:45 pm | चंद्रसूर्यकुमार
एक उपाय आहे. एखाद्या धाग्यावर नवे प्रतिसाद आलेले 'नवीन लेखन' टॅबमधून कळेलच. मग 'नवे प्रतिसाद' या टॅबवर जाऊन ते प्रतिसाद देणार्या सदस्याचे नाव वाचायचे. असले सदस्य प्रतिसाद देत असतील तर ते प्रतिसाद उघडूनच बघायचे नाहीत.
6 Jun 2022 - 7:19 pm | कर्नलतपस्वी
मुलाला - मुर्खा
6 Jun 2022 - 7:19 pm | कर्नलतपस्वी
मुलाला - मुर्खा
6 Jun 2022 - 7:58 pm | काड्यासारू आगलावे
तुम्ही फसवणूक केली हा आरोप कुणीच केलेला नाहीये. ऊगाच काहीतरी धागे काढून सहानूभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नका. तसेच कुठेतरी गटार तुंबली की लगेच “काय बोलावे हे सुचेना” हे खरडायचे. पुणे पालिकेतील भ्रष्टाचारासाठी राजेय शासनाला जबाबदार धरायचे. ह्यावरून लोकांना संशय येतो.
6 Jun 2022 - 8:00 pm | काड्यासारू आगलावे
तसेच धागे एकोळी नसावेत. संदर्भासहीत लिहावेत. आली लहर केला कहर हा प्रकार आपणास शोभत नाही. हा प्रकार म्हणजे चाळीतील कुणीतरी छाती पिटत चाळीच्या मध्यभागी बसतो ना लोकांची सहानूभूती मिळवतो त्यातला प्रकार वाटतोय.
6 Jun 2022 - 8:07 pm | sunil kachure
माणूस मेल्यावर रडण्यासाठी जसे रोजाने बायका उपलब्ध करण्याची पद्धत आहे.
कोणी ही मरू ध्या ह्यांनी फक्त रडायचे.
तसे राजकीय पक्ष पण आता पैसे देवून कॉमेंट करण्यासाठी आणि विचार व्यक्त करण्यासाठी माणसे नेमातात.
मग fb पासुन यूट्यूब ,विविध वेब पेज इथे कार्यरत असतात
त्या हिशोबाने नी ती कॉमेंट दिली आहे.
एकदा राजकीय पक्ष किती ही चुकीचा वागत असला तरी त्याचे समर्थन करणे.
हे लक्षण त्याचेच आहे.
6 Jun 2022 - 8:39 pm | मुक्त विहारि
"Mipa चा वापर करून आर्थिक फायदा करून घेत आहेतं"
ह्याचा अर्थ, मी आर्थिक फसवणूक करतो, असाच होत आहे...
मी तुमची तरी, आर्थिक फसवणूक केली आहे का?
6 Jun 2022 - 9:26 pm | अमरेंद्र बाहुबली
प्रथम गोष्ट, ह्यात आर्थीक फसवणूकीचा कुठेही ऊल्लेख नाही.
Mipa चा वापर करून आर्थिक फायदा करून घेत आहेतं" >>
कुणातरी फेसबूक चा वापर करून आर्थीक फायदा करून घएत असतो, कुणी तरी वाट्सअप चा वापर करून आर्थीक फायदा करून घेत असतो. ह्याचा अर्थ ते लोक कुणाचा तरी आर्थाक फसवणूक करताहेत असा होत नाही.
हे सर्व तुम्ही मिपाकरांची सहानुभूती मिळावी म्हणून रचलेलं ढोंग आहे. पण चंसुकू, श्रिगुरूजी, नी कर्नलतपस्वी सोडले तर ईथे कुणी ढूंकुनही पहायला आलेलं नाही. आवरा! तुमचं हसू होतंय ईथे.
7 Jun 2022 - 4:03 pm | इरसाल
तुम्ही कितीजण मिळुन हा विद्वान आयडी वापरता.
१. काही प्रतिसाद अगदी पाचवीच्या मुलाने( मुद्दाम लिहीलेले) वाटतात. व्याकरण बाजुला ठेवुया सध्या, नुसते शब्द लिहीताना असंख्य चुका.
२. काही प्रतिसाद अगदी व्याकरण, शब्दरचना व्यवस्थित कुठेही ध चा मा नाही.
पण नां एकाच धाग्यावर प्रतिसाद देताना जरा ध्यान ठेवा. दोन्ही प्रतिसाद अक्षरशः जिलबी-भजी असतात.
7 Jun 2022 - 4:17 pm | sunil kachure
प्रतिवाद पॉइंट नी करण्याची कुवत नसली की
शुध्द लेखन मधील चुका ,दुसऱ्यांना मूर्ख ठरवणे,
पण मूर्ख कसे हे मात्र दाखवून न देणे .
असे इरसाल आयडी इथे आहेतं
7 Jun 2022 - 5:10 pm | इरसाल
पॉइंट नं २ साबित केल्या बद्दल धन्यवाद.
आता धाग्यासंबंधित प्रतिसाद "दुसरा कोण?" लिहीणार
6 Jun 2022 - 8:12 pm | अमरेंद्र बाहुबली
मुवि काकांना मी वाट्सअपवर ओळखतो. मागे फेसबूकवर मुविकाकांचा फोटो, मोबाईल नंबर नी त्यांनी ठेवलेल्या स्टेटस चा स्क्रिनशाॅट एका राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या फेसबूक पेज वर “कुणीतरी ह्याला समजवा“ अश्या टिप्पणीसह फिरत होता. ह्या गोष्टाला २ वर्षे तरी झाली असावीत. सोशल मिडायावर थोडं काळजीपुर्वक वावरावे.
6 Jun 2022 - 8:40 pm | मुक्त विहारि
मुद्दा हा आहे की, मी तुझी आर्थिक फसवणूक केली आहे का?
6 Jun 2022 - 8:52 pm | सुरसंगम
पण काय समजवा?
म्हणजे नेमकं काय झालं फोटो पाहून एवढं चिडायला?
6 Jun 2022 - 9:10 pm | अमरेंद्र बाहुबली
सुरसंगम सर ह्या प्रकरणावर एखादी शिघ्रकविता होऊन जाऊद्या. टकासर आणी माझ्या तर्फे आगाऊ धन्यवाद. :)
6 Jun 2022 - 9:47 pm | सुरसंगम
अबा तुम्ही सांगावं आणि काआ ने त्वरित ऐकवं.
मी काआ नाही बर का.
6 Jun 2022 - 10:01 pm | अमरेंद्र बाहुबली
?
6 Jun 2022 - 11:33 pm | सुखी
:D
डावा अन् उजवा हातच जणू... शंका होतीच आता श श क निकालामुळे पृष्टी झाली की डावे उजवे नसून एकच हात आहेत..
6 Jun 2022 - 11:43 pm | श्रीगुरुजी
हे सर्वांनीच केव्हाच ओळखलंय.
6 Jun 2022 - 11:35 pm | सुखी
मुवि काका, तुमचा आक्षेप बरोबर आहे.
उचलली जीभ लावली टाळ्याला अस करत उगाचच मिपा सर्व्हर ची जागा वाढवत बसण्यापेक्षा चांगल्या श श क येतात त्या लिहाव्या. नाही ते उंटाच्या बुडाख्याचा मुका घ्यायचा कशाला
7 Jun 2022 - 12:20 am | उन्मेष दिक्षीत
फसवणूक राहू दे, पर्सनल रिप्लाय (रडगाणे) म्हणून मिपा धागा काढणे ही मिपाची फसवणूक आहे ! टिआर्पी द्यायला आलो नाही हं !
7 Jun 2022 - 7:34 am | कानडाऊ योगेशु
मिपा संमं ला एक विनंती आहे. प्रतिसादासाठी एखादे फिल्टर लावता येऊ शकते का? म्हणजे काही सदस्यांचे अनावश्यक प्रतिसाद इतके असतात त्यांना टाळून बाकीचे प्रतिसाद वाचता येतील.
7 Jun 2022 - 9:22 am | चंद्रसूर्यकुमार
१: लॉगिन केल्यावर 'नवे लेखन' वर क्लिक करून कोणत्या धाग्यांवर किती नवे प्रतिसाद आले आहेत हे बघायचे.
२. शेजारच्याच 'नवे प्रतिसाद' वर क्लिक करून आलेल्या नव्या प्रतिसादांची यादी बघायची.
३. जर त्या प्रतिसादांमध्ये 'दिसताक्षणी दुर्लक्षित करावे' या यादीतील कोणाचा प्रतिसाद असेल तर तो उघडूनही बघायचा नाही.
अशाप्रकारे संपादक मंडळाला मिपाच्या बॅकएन्ड प्रोग्रॅमिंगमध्ये काहीही बदल करायची गरज न लागता आपला फिल्टर वापरता येतो.
7 Jun 2022 - 6:10 pm | कानडाऊ योगेशु
मी ही तेच करतो चंसूकु. पण अडचण ही आहे कि तुमच्यासारख्यांचे किंवा डॉ.खरे बर्याच वेळेला ह्या आय.डींच्या प्रतिसादांना शिंगावर घेतात आणि त्यामुळे कुणाच्या प्रतिसादाला तुम्ही उत्तर दिले हे पाहु जाता हेच ठराविक लब्धप्रतिष्ठित मेंबरांचेच प्रतिसाद दिसतात आणि मग फसवले गेल्याची भावना होते. जर फिल्टर लावले असेल तर जर प्रतिसाद दिसतच नसेल तर तो उघडुन पाहण्याची तसदीच घेतली जाणार नाही.
7 Jun 2022 - 11:59 am | चौथा कोनाडा
पहिल्याच प्रतिसादावरून पिझ्झा बर्गर चे पैसे घेऊन पॉपकॉर्न गळ्यात मारून आर्थिक फसवणूक केली आहे असे मानण्यास पुरेपूर जागा आहे! संबंधितांनी योग्य ती माहिती उघड करावी.
7 Jun 2022 - 1:23 pm | अमरेंद्र बाहुबली
खिक्क.