मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शशक'२०२२ - खानावळ

साहित्य संपादक · · स्पर्धा
'मॅडम, आपल्या एरियातली ती खानावळवाली बाई मला जरा गडबड वाटतेय. ' 'कोण?' 'अहो ती नाय का.... काळीसावळीच पण एकदम देखणी आहे बघा .... कोपऱ्यावर नवी खानावळ सुरु केलीये... ' 'हम्म... तिचं काय ?' 'ती आणि तिचा भाऊ... दोघंच काम करतात तिथे.... मदतीला कोण नाही. ना कधी किराणा सामान येतं त्यांच्याकडे ना कधी भाजी येते. मग जेवायला येणाऱ्यांना नक्की वाढतात काय? आणि तो किस्न्या... मानलेला भाऊ आहे म्हणे तिचा... तो तर जाम चॅप्टर आहे. मी काल बोलताबोलता काही माहिती मिळते का बघायला गेलो होतो तर मला गोलगोल गप्पा मारत कधी तिथून बाहेर काढलं मलाच कळलं नाही ... कायतरी ड्रगबिगचा लफडा असायचा ... ' 'अच्छा.... नाव काय तिचं?' 'द्रौपदीबाई'

वाचन 20146 प्रतिक्रिया 0