मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शशक'२०२२ - आईचा मार

साहित्य संपादक · · स्पर्धा
दुपारी भावड्याबरोबर खेळताना झालेल्या भांडणानंतर आईचा मार खाऊन छोटी आन्जी दिवसभर रूसून बसलेली. संध्याकाळी बाबा घरी आले की धावत जाऊन त्यांना बिलगली. "काय झालं बबड्या?" "मला तर वाटतं हा भावड्या नसताच तर बरं झालं असतं बाबा." आन्जी बाबांच्या कुशीत हुंदका देत बोलली. रात्री जेवतानाही बाबांनी आन्जीला बळंच आणून बसवली. आई अजूनही जाणूनबुजून तिच्याकडे लक्ष देत नव्हती. जेवायला सुरूवात झाली तसा भावड्या रडवेला होत आईला म्हटला, "आई! भोपळ्याची भाजी नाय ग आवडत मला." "खातोयस का मुकाट्याने, का देऊ धपाटा?" आई रागावून बोलली. "हम्म, कशी मारतेस ग माझ्या भावाला? बघतेच की." आन्जी नाकपुड्या फुगवीत आईला बोलली आणि आई-बाबांना फिस्सकन हसू फुटलं.

वाचने 14301 वाचनखूण प्रतिक्रिया 27

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चौथा कोनाडा 12/05/2022 - 13:54
म्हणे ट्वीस्ट नाही ! असायलाच पाहिजे का ? लोक ट्वीस्ट, धक्कातंत्र, सनसनाटीच्या आहारी गेलेत. निरलस,निर्मळ, निरागसतेच्याबाबतीत संवेदनाहीन झालेआहेत! बोथटपणा वाढत चाललाय !

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चौथा कोनाडा 12/05/2022 - 13:54
म्हणे ट्वीस्ट नाही ! असायलाच पाहिजे का ? लोक ट्वीस्ट, धक्कातंत्र, सनसनाटीच्या आहारी गेलेत. निरलस,निर्मळ, निरागसतेच्याबाबतीत संवेदनाहीन झालेआहेत! बोथटपणा वाढत चाललाय !

In reply to by चौथा कोनाडा

कथा मला फारच शामळू वाटली. म्हणजे महागुरू छाप. कथेचे नाव “बहीणीचे प्रेम आणी तिरूमला” असेकाहीतरी हवे होते. :)

चौथा कोनाडा 11/05/2022 - 20:41
+१ छान, निरागस. धक्कातंत्र नसलेली शशक ही अशीही उत्तम असू शकते !