चिजी - बटरी पिझ्झा.
ग्रीन पिझ्झा सॉस बनवण्यासाठी लागणारे साहित्य.
(चार मिडीयम साईझ पिझ्झा साठी)
- १ मध्यम आकाराचा कांदा
- १० पाकळ्या लसूण
- १.५ इंच आलं
- ३-४ हिरव्या मिरच्या
- थोडी कोथिंबीर
- अर्धे लिंबू
- १ टी स्पून मीठ
- १.५ चिज क्युब्स (३० ग्रॅम)
- ५० ग्रॅम अमूल बटर
वरील सर्व पदार्थ मिक्सर वर अगदी मुलायम पेस्ट तयार होई पर्यंत वाटून घ्यावे.
टॉपिंग्ज आणि स्टफिंग साठी लागणारे साहित्य.
(एका मिडीयम साईझ पिझ्झा साठी)
- १ मध्यम कांदा.
- १ लहानसा टोमॅटो
- १ लहानशी भोपळी मिरची
- थोडे मक्याच्या कणसाचे कोवळे दाणे
- थोडेसे ब्लॅक ऑलिव्ह्स
- १.५ चिज क्युब्स (३० ग्रॅम)
- ७५ ग्रॅम मोझरेला चिज (ग्रेटेड)
१.५ चिज क्युब्स वरच्या फोटोतल्या प्रमाणे लांबट आकारात कापून घ्यावेत.
एक पिझ्झा बेस ताटात घेऊन त्यावर सुरीने उभ्या चिरा पाडून घ्याव्या आणि त्यामध्ये कापलेले चिजचे तुकडे बोटाने दाबून दाबून भरावे.
एकीकडे मायक्रोवेव्ह ओव्हन , ओ. टी. जी. किंवा इलेक्ट्रिक तंदूर जे उपलब्ध असेल ते १५ मिनिटे प्री हिट करण्यासाठी लावून, आधी आपण तयार करून घेतलेला ग्रीन पिझ्झा सॉस चमच्याने पिझ्झा बेस वर व्यवस्थित लावून घ्यावा.
आता त्यावर टप्प्या टप्प्याने कापलेला कांदा, टोमॅटो, भोपळी मिरची, मक्याचे दाणे आणि ब्लॅक ऑलिव्ह्स पसरून घ्यावेत.
आता ह्या सर्व टॉपिंग्स वर ७५ ग्रॅम ग्रेटेड मोझरेला चिज पसरावे. (माझ्याप्रमाणे भरपूर चिज असलेला पिझ्झा खायला आवडत असल्यास १५० ग्रॅमचे पूर्ण पाकीट त्यावर ओतावे 😀)
आता हा सुशोभित पिझ्झा बेस उचलून मायक्रोवेव्ह ओव्हन / ओ. टी. जी. किंवा इलेक्ट्रिक तंदूर मध्ये बेक करण्यासाठी ठेवावा.
पिझ्झा व्यवस्थित बेक होण्यासाठी लागणारा वेळ तुम्ही वापरत असलेल्या उपकरणानुसार वेगवेगळा असू शकतो, मी पिझ्झा इलेक्ट्रिक तंदूर मध्ये बनवत असल्याने जेमतेम ५ मिनिटांत तयार होतो. (शक्यतो काचेतून आत बघत राहावे म्हणजे आपला पिझ्झा करपणार नाही)
बेक झाल्यावर पिझ्झा बाहेर काढून त्यावर एक चिज क्यूब किसून घालावा आणि आवडीनुसार त्याचे चार किंवा सहा भाग करावेत.
त्यावर चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो चवीनुसार भुरभुरावे.
मस्तपैकी तयार झालेला चिजी - बटरी पिझ्झा आवडत असल्यास टोमॅटो केचप घालून सर्व्ह करावा.
टीप: बाजारात तयार मिळणारे पिझ्झा बेस पातळ (आणि शिळे ) असतात त्यात चिज भरणे अवघड असल्याने शक्यतो बेकरीत ऑर्डर देऊन ताजे बेस घ्यावेत.
वाचने
17902
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
आरारारा!
अशा लोकांमुळे मी ब्याऐंशी किलो वरून पंच्यांन्नव कीलोवर आलोय. :D
असं काहीतरी जीवघेणं बनवतात, वर फोटोंसह धागे टाकतात!
+१
In reply to आरारारा! by तुषार काळभोर
हेच.. हेच म्हणतो.
पैलवान गडी तुम्ही... अभ्याच्या मनातले हिंद केसरी
In reply to आरारारा! by तुषार काळभोर
पैलवान गडी तुम्ही... अभ्याच्या मनातले "हिंद केसरी".
ब्याऐंशी, पंच्याण्ण्व चा कसला हिशोब करता? किमान एकशे पाचचे उद्दिष्ट ठेवा 😂
तो टप्पा गाठण्यास सहाय्यक ठरतील अशा काही रेसीपीज आहेत माझ्याकडे... यथावकाश शेअर करीनच 🙂 🙂
अस्ताला विस्ता!!
In reply to पैलवान गडी तुम्ही... अभ्याच्या मनातले हिंद केसरी by टर्मीनेटर
नका हो असा अन्याव करू!
अस्ता लुएगो!
In reply to अस्ताला विस्ता!! by तुषार काळभोर
अन्याय नाहि हो... हे सगळ खाउन वजन वाढ्ते ही माझ्या मते अंधश्रद्धा आहे! स्वानुभव असा आहे कि असे भरपुर चिज-बटरयुक्त पदार्थ गेली कित्येक वर्षे मी नित्यनेमाने खातोय, पण गेल्या वीस वर्षंत ७३ च्या खाली आणि ७५ किलोच्या वर वजन कधिहि गेले नाही. त्यामुळे आवडतं ते बिनधास्त खावे त्रास होत नाही असे माझे मत बनले आहे.
अजुन काहि रेसिपिज घेउन येतोच तो पर्यंत "अस्ता लुएगो!"
माझ्या मते अंधश्रद्धा आहे
In reply to अस्ता लुएगो! by टर्मीनेटर
माझ्या पण! :D
मागच्या वर्षी टोकाचं डाएट करून ८२ किलो झालो, ते सोडलं तर मी ९०-९२ च्या घरात आहे किमान पंधरा वर्षे.
पाककृती आवडली.
पाककृती आवडली.
इतकं सोप्पं आहे होय!
पाकृ छान सादर केली आहे.
क ह र
क ह र
काय हे सकाळी सकाळी अत्याचार.
वा ! वा !!
पाककृती आवडली.
छान
किती छान समजावून सांगत पाककृती मांडली आहे.
अशी सविस्तर पाककृती सांगणे ही सुद्धा एक कलाच आहे.
धन्यवाद.
येऊ देत आणखी पाककृती.
चिज वाला पिझा फार आवडतो
पाकृ मस्त स्टेप बाय स्टेप सांगितली आहे
बाजारात तयार मिळणारे पिझ्झा बेस पातळ (आणि शिळे ) असतात त्यात चिज भरणे अवघड असल्याने शक्यतो बेकरीत ऑर्डर देऊन ताजे बेस घ्यावेत.
किंवा घरीच लाटून पिझ्झा बेस बनवावे (अर्थात मी घरी फक्त खाण्याचे काम करत असल्याने असे म्हणणे मला फार सोपे जाते) पण घरी लाटून बनवलेल्या ताज्या पिझ्झा सारखे स्वर्गिय सुख बेकरीच्या पिझ्झा बेस मधे नाही हे नम्रपणे नमुद करतो.
पैजारबुवा,
पण घरी लाटून बनवलेल्या ताज्या
In reply to चिज वाला पिझा फार आवडतो by ज्ञानोबाचे पैजार
अशाच विचाराने भारावुन एकदा घरी पिझ्झा बेस बनवण्यचा प्रयत्न करुन पाहीला होता, पण तंदुर रोटी आणि नान च्या मधला म्हणता येइल असा एक भयंकर चिवट पदार्थ जन्माला आल्याने पुन्हा कधी त्या फंदात पडलो नाही 😀
आणि नशिबाने ऑर्डर प्रमाणे अगदी चांगल्या दर्जाचे बेस बनवुन देणारी बेकरी सापड्ल्याने तसा प्रयत्न करण्याची आवश्यकताच संपुष्टात आली आहे.
शेवटी त्या गुजराती म्हणी प्रमाणे "जेनु काम तेनु थाय... बिजा करेतो गोतो खाय..." हेच खरं
पिझ्झा हा अतिशय ओव्हररेटेड
पिझ्झा हा अतिशय ओव्हररेटेड आणि ओव्हरहाइप्ड खाद्यपदार्थ आहे. ना धड चव ना धड पोषणमुल्य!
मात्र, ह्या पाकृच्या मेहनतीला सलाम _/\_
- (पिझ्झा न आवडणारा) सोकाजी
@ गॉडजिल@, Bhakti, कंजूस काका
@ गॉडजिल@, Bhakti, कंजूस काका
प्रतिसादासाठी आभार 🙏
@ प्रचेतस, कुमार१, सरिता बांदेकर, सोत्रि
@ प्रचेतस, कुमार१, सरिता बांदेकर, सोत्रि
प्रतिसादासाठी आभार 🙏
रेसिपी काय मस्त समजावून
रेसिपी काय मस्त समजावून सांगितली आहे!
पिझ्झं पण अगदी चविष्ट झाला असणार.
@ वामन देशमुख
In reply to रेसिपी काय मस्त समजावून by वामन देशमुख
हो चांगला चविष्ट झाला होता 😊
धन्यवाद.
खरा चांगला पिझ्झा कसा असतो?
कडकडीत पाव आणि वर मऊ भाज्या?
कुरकुरीत पाव आणि वर खरपूस चीज?
खरा चांगला पिझ्झा कसा असतो?
In reply to खरा चांगला पिझ्झा कसा असतो? by कंजूस
ते क्रस्ट वर अवलंबुन आहे.
थिन क्रस्ट पिझ्झा असेल तर बेस पातळ व नाजुक असल्याने बेस कुरकुरित आणि वरचे पातळ टॉपिंग्स मउसर असावे.
थिक क्रस्ट पिझ्झा असेल तर बेस तसा मजबुत असल्याने बेस आणि त्यावरचे भरगच्च टॉपिंग्स हे दोन्हि लुसलुशित असावे.
अर्थात आपण स्वतः बनवत असल्यास वैयक्तिक आवडी नुसार हवा तसा बदल करु शकतो!
पिझ्झा म्हणजे माझा विक पॉइंट
पिझ्झा म्हणजे माझा विक पॉइंट !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - India displays military might at ZAPAD-21; China & Pakistan watch
सॉल्लिड!
सॉल्लिड!
ओवनचे तापमान किती असावे ?
ओवनचे तापमान किती असावे ?
ओवनचे तापमान किती असावे ?
In reply to ओवनचे तापमान किती असावे ? by तर्कवादी
हा थिक क्रस्ट पिझ्झा असल्याने मायक्रोवेव्ह ओव्हन २००° C (४००° F) वर प्री-हिट करुन घेतल्यास १० ते १२ मिनिटांत पिझ्झा तयार होइल, पण करपु नये म्हणुन त्यावर लक्ष ठेवणे उत्तम.
@ मदनबाण, पियुशा, तर्कवादी
@ मदनबाण, पियुशा, तर्कवादी
प्रतिसदासाठी आभार 🙏
- हायला .... हिरवी मिरची आलं
- हायला .... हिरवी मिरची आलं कोथिंबीर असा "बेस" कधी केला नाही... करून बघितला पाहिजे एकदा
जसे असा घरी पिझ्झा बनवण्यात मज्जा आहे तसेच जर त्याचा बेस पण घरी बनवला तर अजून मज्जा येते ( इष्ट चे प्रमाण जम ल पाहिजे मात्र )
एक शंका : मायक्रोव्हेव ओव्हन "प्री हिट" कसा करणार बुवा?
पिझ्झा मायक्रोव्हेव ओव्हन मध्ये " शिजेल" "भाजला" जाणार नाही! ... .. अर्थात आजकाल मायक्रोव्हेव ओव्हन मध्ये भाजण्याची पण सोय असेल तर गोष्ट वेगळी .
@ चौकस२१२
In reply to - हायला .... हिरवी मिरची आलं by चौकस२१२
जरुर करुन बघा, टेस्ट नक्की आवडेल.
खरं आहे! माझा तो प्रयत्न फसला असल्याने मी तो नाद सोडला 😀
हे उपयोगी पडु शकेल.
धन्यवाद.
हा म्हणजे तुम्ही कन्व्हेक्षन
In reply to @ चौकस२१२ by टर्मीनेटर
हा म्हणजे तुम्ही कन्व्हेक्षन माइक्रोवेव्ह ओव्हन म्हणताय ,, मग ठीक.. मी सर्वसाधारण माइक्रोवेव्ह ओव्हन बद्दल म्हणत होतो त्यात भाजले जात नाही शिजते !
करेक्टो!
In reply to हा म्हणजे तुम्ही कन्व्हेक्षन by चौकस२१२
करेक्टो!
धागा विषय रेसिपी पुरता मर्यादित ठेवल्याने अवांतर तांत्रिक माहिती देण्याचे टाळले आहे 😀
रंगीबेरंगी आणि देसी फ्लेवरचा
रंगीबेरंगी आणि देसी फ्लेवरचा पिझ्झा.
झकास !
धन्यवाद अनिंन्द्य साहेब...
In reply to रंगीबेरंगी आणि देसी फ्लेवरचा by अनिंद्य
धन्यवाद अनिंन्द्य साहेब 🙏