दुनियादारी !
लेखनप्रकार
“तू गपे xxxच्या ! अजून दुनियादारी वाचलं नाहीयेस आणि म्हणे माझं लग्नं करा !”
हे ठेवणीतलं वाक्य यायचं आलं की वाक्याचा recipient आपोआप गप्प व्हायचा. बरोबर आहे, वर्मावर का कुठे म्हणतात तिथे बोट ठेवलं जायचं. आपण सुहास शिरवळकरांची जवळपास सगळी पुस्तकं पारायणं करून वाचली पण अजून मास्टर पीस वाचला नाहीये ! मारे ढीगभर हिंदी सिनेमा पाहिले पण ‘शोले नाही पाहिला अजून? ‘दुनियादारी’ नेमकं आत्ताच out of print? हॅत्त तेरी तर !!!
एक दिवस अचानक मिळालं. हुर्रे !!! जिओ यार…पुणे नगर वाचनालय जिंदाबाद !! एक दिवसात परत करायच्या बोलीवर मित्राकडून कसंबसं मिळालं. पुस्तक नुसतं हाताळतानाही थरारलो. रात्रीचा दिवस करून वाचलं आणि एका रात्रीत खूप काही बदललं. मागे एकदा किमी काटकरची मुलाखत वाचली होती. (बरोबर आहे, तीच किमी ! हिंदी “टारझन” सिनेमात जिच्यापेक्षा टारझनच्या अंगावर जास्त कपडे होते ना ती !) ती म्हणाली होती की ‘हम’ सिनेमात अमिताभची हिरॉइन झाल्यावर लोक तिला ‘किमी’ ऐवजी ‘किमीजी’ म्हणू लागले. तसं, ‘दुनियादारी’ वाचल्यावर, “गपे xxxच्या ! अजून दुनियादारी…..” हा डायलॉग म्हणायचा अधिकार मिळाला. आता ‘दुनियादारी’ची स्टोरी वगैरे सांगत नाही कारण तो ह्या लेखाचा उद्देशच नाही. ‘चिकन सूप’ चाखून ताटातल्या झणझणीत रश्याची नक्की चव नाही कळत !
कॉलेजच्या वयातच दुनियादारी वाचायला मिळणं फार आवश्यक असतं. खरं तर प्रत्येकानं college मधे असताना दुनियादारी वाचायलाच हवं. शिरवळकरांनी एक-एक पात्र काय अप्रतिम रेखलं आहे. College life मधली सळसळ म्हणजे दुनियादारी ! रोमँटिक तरूणाईची दुनियादारी ! भग्न प्रेम म्हणजे दुनियादारी ! अस्सल शिव्या, मारामारीची दुनियादारी ! वास्तवाचं भान देणारी दुनियादारी ! ह्या सगळ्यापेक्षा दशांगुळं वर म्हणजे कोवळ्या वयात चुका होऊ न देणारी दुनियादारी !!!
कॉलेजच्या भाषेचा एक छान लहेजा कादंबरीला आहे, योग्य तिथे आणि योग्य त्या शब्दांसकट !! दुर्दैवानं आता सुहास शिरवळकर आपल्यात नाहीत पण त्यांचा वाचक-चाहता म्हणून मी अकरावीत असताना त्यांना पाठवलेल्या पहिल्याच पत्राच्या उत्तरात त्यांचं वाक्य होतं ,”दुनियादारी मात्र जरूर वाच.” त्यानंतर वयाचं अंतर पार करून, त्यांच्याशी छान स्नेह जुळला होता. मला आठवतंय एकदा त्यांच्या घरीच त्यांना विचारलं होतं की ‘दुनियादारी’त इतक्या सहजपणे शिव्या वगैरे का? ते म्हणाले होते, “एक तर कॉलेजमधली तुझ्याच आसपासची भाषा बघ, तुला वाक्यांगणिक सहज शिव्या सापडतील. दुसरं म्हणजे मारामारीचा वगैरे प्रसंग वाचताना,” अरे नालायका, मूर्खा ! थांब जरा तुझ्याकडे बघून घेईन” कसं वाटेल? तिथे शिव्यांशिवाय intensity येणारच नाही !! तसंच कॉलेजची पोरं, “काय वेडा किंवा काय बावळट आहेस का तू?” वगैरे म्हणतात का? नाही! सरळ “काय xx झाला काय?”, असंच म्हणतात ना?” येस बॉस, मानलं !
‘दुनियादारी’मधे श्रेयस तळवळकर मुख्य पात्र आहे पण ‘धासू रोल’ म्हणजे, एस.पी. कॉलेजमधला टेरर, ‘डीएसपी.’ ! दिग्या एस. पाटील !! जसं, रामगोपाल वर्माच्या ‘सत्या’ मध्ये ‘सत्या’भोवती कथा फिरते पण ‘धासू रोल’ आहे ‘भिखू म्हात्रे’! सुशिंनी कादंबरीतलं ‘डीएसपी’ हे character ज्या कुणावरून तरी साधारणपणे घेतलं होतं ते शांत आणि मवाळ दिसणारे-बोलणारे गृहस्थ एकेकाळी ‘टेरर’ होते?
अर्थात दुनियादारीत शिव्या, रोमान्स, मारामारी, एस.पी. कॉलेजचा कट्टा, दारू, इतकंच काय श्रेयस, दिग्या, मिनू, रेखा, शिरीन, साई, अश्क्या, एम.के.श्रोत्री वगैरे सगळी फक्त ‘साधनं’ आहेत...कादंबरीचं ’साध्य’ नाही !! आपल्याला मारझोड करणाऱ्याची ओळख सांगताना नित्या म्हणतो “दिग्या त्याला काही करू शकणार नाही. ‘नितीन सदाशिव घोडके’ मधला तो माणूस ‘सदाशिव’ आहे रे !” असं अंगावर येणारं वाक्यं दुनियादारीतच आहे !
ऑर्कुटवर ‘Suhas Shirvakar’ नावाची कम्युनिटी आहेच पण नुकतीच ‘duniyadari’ ही community सापडली! Yes, आपल्या आवडत्या पुस्तकाची दुनियादारी !! मी तर त्या कम्युनिटीतल्या बऱ्याच मेंबर्सना (अजून तरी) ओळखतही नाही. कोण कुठले हे लोक? वेगवेगळ्या वयांचे, ठिकाणांचे, मतांचे आणि विचारांचेही !! पण सगळ्यांच्या मनाच्या एका सुगंधी कोपऱ्यात कुठेतरी ‘दुनियादारी’ कायम आहे.
‘दुनियादारी’नं तुम्हाला ‘बि’घडवलं असेल तर नक्की सांगा कारण आपण-तुपण गाववाले !!!
-------------------------------------------------------------------------------------------------------
अवांतर: मध्यंतरी धम्याशी व्यनिवर गप्पा करताना आमचं या लेखाबद्दल बोलणं झालं होतं.
तो म्हणाला होता की मिपावर 'दुनियादारी'चे (आणि सुहास शिरवळकरांचे) पंखे / एसी आहेत म्हणून इथे हा लेख :)
--------------------------------------------------------------------------------------------------------
वाचने
17239
वाचनखूण
प्रतिक्रिया
49
जबरदस्त आहे दुनियादारी.
बरं झालं
In reply to बरं झालं by रेवती
नक्की मिळव
In reply to नक्की मिळव by संदीप चित्रे
धन्यवाद
वाचलेलं नाही.
In reply to वाचलेलं नाही. by रामदास
अरेरे ... नक्की वाचा
In reply to अरेरे ... नक्की वाचा by सागर
>>दुनियादार
In reply to वाचलेलं नाही. by रामदास
लायब्ररीत
मॅन... यू
In reply to मॅन... यू by टारझन
आयल्ला
In reply to मॅन... यू by टारझन
हॅट्स ऑफ टू "दुनियादारी"
रमो व्हिस्को नहीं तो खिस्को !
In reply to रमो व्हिस्को नहीं तो खिस्को ! by मुक्तसुनीत
सहमत...
In reply to सहमत... by मनिष
+१
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to रमो व्हिस्को नहीं तो खिस्को ! by मुक्तसुनीत
+१
In reply to रमो व्हिस्को नहीं तो खिस्को ! by मुक्तसुनीत
एकदम
In reply to एकदम by मेघना भुस्कुटे
+१
नाही
In reply to नाही by दशानन
मी पाठवू शकेन
In reply to नाही by दशानन
राजे..
दुनियादारी..
In reply to दुनियादारी.. by स्वाती दिनेश
+१००% सहमत
अल्फा
In reply to अल्फा by मदनबाण
मालिकेने न्याय नाही दिला
In reply to मालिकेने न्याय नाही दिला by सागर
मालिकेचं
In reply to मालिकेचं by बिपिन कार्यकर्ते
सहमत.
In reply to मालिकेचं by बिपिन कार्यकर्ते
मालिका पाहिली नाही पण
In reply to मालिका पाहिली नाही पण by संदीप चित्रे
अरे...
काळजाचा तुकडा गहाण
In reply to काळजाचा तुकडा गहाण by संदीप चित्रे
हम्म...
In reply to हम्म... by मनिष
क्या बात है...
In reply to क्या बात है... by मुक्तसुनीत
यावर नवा
In reply to यावर नवा by मेघना भुस्कुटे
हेच म्हणतो....
In reply to हेच म्हणतो.... by बिपिन कार्यकर्ते
कुठे?
In reply to क्या बात है... by मुक्तसुनीत
मान्य...
In reply to काळजाचा तुकडा गहाण by संदीप चित्रे
संदीप,
सुंदर
हैद्राबादमधील मिपाकरांपैकी कोणाकडे आहे का हे पुस्तक?
छा लिहिल
In reply to छा लिहिल by ऋचा
थोडा असहमत ...
वाचल पाहिजे!
मला पन हवय
धन्स मित्रा
In reply to धन्स मित्रा by विशाल कुलकर्णी
>> आजही अस्वस्थ वाटायला लागलं,
आनंद मिळाला
हे किंवा त्यांचे कुठलही
वेड...
दुनियादारीच्या निमित्ताने अजून एक लेख
दुनियादारी ! दुनियादारी !!