✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

साडीखरेदीची गोष्ट

स
समीरसूर यांनी
गुरुवार, 04/09/2009 - 16:12  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
26276 वाचन

💬 प्रतिसाद (49)

प्रतिक्रिया

मस्त

सुप्रिया
गुरुवार, 04/09/2009 - 16:44 नवीन
मस्त खुसखुशीत वर्णन! मजा आली वाचायला. -सुप्रिया देहरुप गावाहून रामरुप गावाच्या प्रवासात रामनाम हीच उत्तम शिदोरी होय.
  • Log in or register to post comments

१००+ सहमत....

सागर
गुरुवार, 04/09/2009 - 17:01 नवीन
=)) =)) =)) माझा अनुभव पण काही वेगळा नाही..... समीर ...मजेशीर लेख आहे अजून येऊ द्यात ... फक्त फरक हाच आहे की अशा अनेक खरेद्यांना मी गेलेलो आहे... :) का कुणास ठाऊक पण अनेकदा टाळायचा प्रयत्न करुनही मला असे प्रसंग टाळता आलेले नाहीत. लक्ष्मी रोडला आणि कुमठेकर रोडला गेले तर कधी कधी ४-५ तासांची निश्चिंती.... अर्थात पोटात कावळे ओरडू लागण्याच्या वेळेला मी खूप वेळा गेलो असल्यामुळे २-३ तासांपेक्षा जास्त या साडीखरेदीच्या भानगडीत वेळ नाही द्यावा लागला.. एक मुद्दा सांगावासा वाटतो... बर्‍याच वेळा असेही होते की दुसर्‍या - तिसर्‍या दुकानात गेल्यावर बायकांना आठवते की याच्यापेक्षा पहिल्या दुकानातली साडी चांगली होती... :) सागर
  • Log in or register to post comments

माझा अनुभव

घाशीराम कोतवाल १.२
Mon, 04/13/2009 - 12:00 नवीन
माझा अनुभव पण काही वेगळा नाही..... ४ साड्या घ्यायला साडे चार तास लावले होते काल आमच्य होणार्‍या सौं पण वैतागु शकलो नाही ना कारण आता कुठे आमची सुरुवात होणार आहे मग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागर

अ-भि-नं-द-न !!!!

धमाल मुलगा
Mon, 04/13/2009 - 12:59 नवीन
घाश्या, भावा, नशीबवान आहेस. साडेचार तासात चार साड्या म्हणजे ढोबळमानानं ताशी एक साडी हा वेग दिसतोय. हार्दिक अभिनंदन. सर्वसाधारणतः एका साडीला तीन तास लागतात असा आमचा वैयक्तिक अनुभव :( कोणतं रे व्रत केलं होतंय? की गेल्या जन्मीची पुण्याई म्हणायचं ह्याला? ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाशीराम कोतवाल १.२

अप्रतीम

अबोल
गुरुवार, 04/09/2009 - 19:31 नवीन
मी हळूच रावसाहेबांकडे बघितलं. ते अजूनही निश्चल होते. त्यांचा आवडता नट नवीन निश्चल असावा असे मला उगीच वाटून गेले.
  • Log in or register to post comments

मस्त

रेवती
गुरुवार, 04/09/2009 - 19:32 नवीन
मस्त लेखन! बायकांच्या जिव्हाळ्याच्या खरेदीच्या विषयाला हात घातला आहे. समस्त नवर्‍यांच्या मनाची दुखरी बाजू म्हणजे साडी/ड्रेस खरेदी... साड्याच्या दुकानातले सेल्समन फार म्हणजे फारच संयम असलेले असतात. त्यांना त्याचे वेगळे ट्रेनिंग मिळत असावे बहुधा. नवर्‍यांनाही अश्याच प्रकारचे ट्रेनिंग जर मिळाले तर बायको जमात खूष होउन जाईल. रेवती
  • Log in or register to post comments

एकतर सेल्समनला

संदीप चित्रे
गुरुवार, 04/09/2009 - 20:56 नवीन
त्या संयमाचे पैसे मिळतात ..... दुसरं म्हणजे एकदा साडी विकून झाली की -- प्रत्येक वेळी त्या बाईने ती साडी नेसल्यावर -- प्रत्येक वेळी त्याच बाईच्या "ही साडी कशी दिसतीय" (म्हणजे "आज या साडीत मी कशी दिसतीय?") या प्रश्नाला -- प्रत्येक वेळी त्याच बाईला 'छान दिसतीय' (म्हणजे "तू छानच दिसतीयस") हे उत्तर -- सेल्समन देत नाही ! तिथे नवरा कामी येतो (पक्षी: धारातीर्थी पडतो -- जर उत्तर चुकलं तर) त्यामुळे ट्रेनिंग बिनिंगचा नवर्‍यांना काही उपयोग नाही -- त्यांचं आपलं इन्स्टिंक्टवर वेळ निभावणं चालतं :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

काहीही

प्राजु
Fri, 04/10/2009 - 01:07 नवीन
गरज नाहीये.. नवर्‍यांची बाजू घ्यायची. साडी घ्यायची तीही कधी तरी नेसायला.. आणि तीही इतके भरमसाठ पैसे घालून.. मग जरा बघून घेतली तर बिघडलं कुठे? आणि बरोबर कोणी असलं तर चॉईसला त्रास होत नाही. दुसरं मत घेता येतं. कोणी नसेल तर नवर्‍याने यायला काय हरकत आहे? नाहीतरी घरी बसून टीव्ही बघणार नाहीतर.. चकाट्या पिटणार.. मग हेच बायको सोबत गेलं तर काय बिघडलं. (माझ्या नवर्‍याने हे वाचलं तर.. ५ वर्षापूर्वीचा प्रसंग नक्की आठवेल त्याला.. "वामा" मध्ये तो आणि माझा भाऊ.. एका सोफ्यावर तीन तास नुसते बसून होते.. मारायला तिथे माशाही नव्हत्या..) ;) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे

गुड वन..

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 04/09/2009 - 19:39 नवीन
मस्त लेखन!!! झकास!!!! अवा॑तर : लग्नाआधी " मी तुझ्याबरोबर साड्या घ्यायला येणार नाही" ही अट घालणार आहे. सुहास
  • Log in or register to post comments

कर बेट्या कर गमजा!

धमाल मुलगा
Fri, 04/10/2009 - 15:34 नवीन
असल्या अटी घालणारे लईईईईई बघितलेत (स्वतःसकट!) एक डाव लग्न होऊ दे मग बघु काय म्हणतोयस ते ;) आरं बाबा, अणुभवाचे बोल आहेत हे आमचे! :D ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूहास

सहमत ... तरी पण .....

सुधीर कांदळकर
Sun, 04/12/2009 - 19:42 नवीन
खरेदी करणार्‍यांचे नमुने पाहायला मजा येते. सौ. नें आवडलेल्या साड्या जमा व्हायची वाट पाहात आपण विरक्त मनानें सौंदर्यावलोकन करावें व तिची आवड पूर्ण झाल्यावर निवडीचें काम करावें. तुझी आवड किती चांगली आहे अशी तारीफ जरूर करावी. व आपण निवडलेल्या साड्या तुला कशा व कां छान दिसतील हे सांगायला विसरूं नये. सेल्समेन पण आपल्याला पाठिंबा देतात. वेळ कसा जातो कळत नाहीं. फक्त आपण रसिक आणि धोरणी असायला पाहिजे. सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

बेष्टच

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 04/09/2009 - 21:24 नवीन
यकदम झकास.
मी उडालोच. एवढी महाग साडी? एवढ्या पैशात माझे पुढच्या ५ वर्षांचे कपडे होतील. त्यात मोजे, हातरुमाल, बनियन हे देखील आरामात बसतील.
काय बोल्लात राव ! अहो आमचे तर धा वर्षाचे व्हतील. आपन कापड घाल्तो कशासाठी? प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

मस्त

समिधा
गुरुवार, 04/09/2009 - 22:30 नवीन
बाकी रेवतीशी सहमत... समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
  • Log in or register to post comments

मजा आली.

पक्या
गुरुवार, 04/09/2009 - 22:36 नवीन
:D मजा आली. मस्त लेखन. येऊ द्यात असे लेखन अजून.
  • Log in or register to post comments

हेहे सहीच

भाग्यश्री
गुरुवार, 04/09/2009 - 22:49 नवीन
हेहे सहीच लिहीलंय!! अशा अनेक खरेद्यांना लक्ष्मी रोडवर आईबरोबर गेलीय मी.. पण अर्थात मला ते काम आवडायचं.. भरपूर हुंदडायला मिळायचे.. अधून मधून पॉपकॉर्न्स, भाजलेले कणीस, स्वीट होमची खिचडी-चहा, जनसेवा मधे पण खादाडी इत्यादी इत्यादी असे साग्रसंगीत लाड व्हायचे ! :)
  • Log in or register to post comments

ऑफिसात...

बबलु
Fri, 04/10/2009 - 05:29 नवीन
ऑफिसात मी चुकून मोठमोठ्यानं हसेन की काय अशी भिती वाटत होती. इतकं सह्ही लिहिलयं. लगे रहो समीरसूर. मस्त लेखन. ....बबलु
  • Log in or register to post comments

हम्म्म...सग

मदनबाण
Fri, 04/10/2009 - 05:52 नवीन
हम्म्म...सगळी गम्मतच आहे. मस्त लिहल आहे. :) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments

सॉल्लीड!!

अनिल हटेला
Fri, 04/10/2009 - 06:19 नवीन
समीर भाउ मनसोक्त हसलो आज !! माझी चीनी कलीग अगदी विचीत्र नजरेने बघत होती ( आता तर चांगला होता ह्या अर्थी) एकदाच ताईबरोबर साडी खरेदीला गेलेलो ! आणी परत कधीच तशी चुक करणार नाही अशी भीष्मप्रतीज्ञा केलेली !! ;-) एकदम खुसखुशीत लेख !! आंदो और भी !! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

दोन्ही

भडकमकर मास्तर
Fri, 04/10/2009 - 06:39 नवीन
दोन्ही बाजूंचा जिव्हाळ्याचा विषय ... छान मांडला आहे... :) ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

नेसून पण दखवतात

समीरसूर
Fri, 04/10/2009 - 09:40 नवीन
आजकाल (की आधीपासूनच माहित नाही; मी पहिल्यांदाच पाहिले) सेल्समन स्वतः साडी नेसल्यासारखी स्वतःभोवती मिर्‍या पाडून गुंडाळून दाखवतात. मिशा असलेले, धष्टपुष्ट, हातावर केसांचं जंगल असलेले, चेहर्‍यावर राकटपणा असलेले सेल्समन जेंव्हा एखादी पैठणी किंवा शालू नेसून दाखवतात तेव्हा मात्र जे काही दिसतं ते खूप विचित्र असतं. म्हणजे जी साडी एखाद्या सुंदर, कमनीय बांध्याच्या स्त्रीने (बायको सोडून ;-)) नेसून हल्ले करायचे असतात; ती साडी एका पुरुषाने नेसून दाखवल्यावर अगदी विरस होतो. :) आपल्या सगळ्यांच्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद! --समीर
  • Log in or register to post comments

ठ्ठ्यॉ....!!!!!!

प्राजु
Fri, 04/10/2009 - 09:43 नवीन
तुम्हाला साडी खरेदीला जायला आवडत नाही हे ठीक. पण म्हणून साडी नेसण्याचं वर्णन तरी नीट शब्द वापरून करा.. :) सेल्समन स्वतः साडी नेसल्यासारखी स्वतःभोवती मिर्‍या पाडून गुंडाळून दाखवतात इथे मिर्‍या नव्हे हो... 'त्यां'ना निर्‍या म्हणतात.. शुद्ध मराठीत प्लिट्स.. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

माफ करा!

समीरसूर
Fri, 04/10/2009 - 09:50 नवीन
मी बराच वेळ नीर्‍या की मिर्‍या या गोंधळात होतो पण शेवटी मनाने आणि बुद्धीने चुकीचा कौल दिला. :-) मला नीर्‍याच म्हणायचे होते. :) चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद! --समीर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

मी आनी नी

प्रकाश घाटपांडे
Fri, 04/10/2009 - 10:44 नवीन
मी बराच वेळ नीर्‍या की मिर्‍या या गोंधळात होतो पण शेवटी मनाने आणि बुद्धीने चुकीचा कौल दिला
मला नीर्‍याच म्हणायचे होते.
मी ही तेच सांगणार होतो 'मी' पेक्षा 'नी' महत्वाचा आहे पण तो प्रमाण भाषेत. बोली भाषेत काही लोक 'मी' वापरतात तर काही बोली भाषेत 'नी' वापरतात. 'मी 'ही कोणाची मक्तेदारी नाही अथवा 'नी' ही कोणाची मक्तेदारी नाही. 'नी' ऐवजी 'मी' वापरल्याने फार हानी झाली असे नाही. कदाचित मी वापरल्याने मी मी पणाचा भास येउ शकतो असे काहीनी म्हटले जाउ शकते. पण तो नी मुळे पण होउ शकतो. खर तर तो भास (किंवा वास्तव) हा मी किंवा नी मुळे नसुन लिखाणा मुळे असतो. चांगल्या नीर्‍या करणारी व्यक्ती ही डोक्यावर मीर्‍या वाटू शकते. साडीच्या नीर्‍या कडे लक्ष देण्यापेक्षा मी टर कडे जास्त लक्ष देतो. तो किती डाउन होतो हे महत्वाचे. नीर्‍या कडे ठळक लक्ष जाताना मी टर कडे पुसट लक्ष देता कामा नये. एखादी गोष्ट किती ठळक करायची किंवा (पुसट) हे नीट लक्षात घेतले म्हणजे झाले. सबब आपल्या बुद्धीनी चुकीचा कौल दिला असे मी मानीत नाही. ध्यानी मनी नसतानी साडी खरेदीचा प्रसंग आला कि कशे वांदे व्हत्यात हे लई भारी सांगातल ब्वॉ.शेवटी साडी खरेदीत 'मनी' महत्वाचा. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

प्रतिसाद माहितीपूर्ण आहे :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 04/10/2009 - 10:53 नवीन
>>बोली भाषेत काही लोक 'मी' वापरतात तर काही बोली भाषेत 'नी' वापरतात. मिर्‍याच ! 'नी' चा काही संबध नाही ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

>>>>>बोली

दशानन
Fri, 04/10/2009 - 13:06 नवीन
>>>>>बोली भाषेत काही लोक 'मी' वापरतात तर काही बोली भाषेत 'नी' वापरतात. =)) उच्च ! ;) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हाहाहा...

समीरसूर
Fri, 04/10/2009 - 10:54 नवीन
मस्तच! पण टर ही काय भानगड आहे? मनी तर महत्वाचाच आहे. शेवटी त्याच्यावरच जग चालते. रावसाहेबांच्या मनी 'मनी' ची चिंता नव्हती म्हणून तर बाईसाहेब एवढ्या महाग साड्या घेण्याची हिम्मत करू शकत होत्या ना! शेवटी काय, नवर्‍याने आपल्या 'मनी'च्या जोरावर बायकोच्या हट्टापुढे मान तुकवली तर वैवाहिक आयुष्यात 'हार्मनी' राहते. --समीर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

अग्गायायायायायायाया.........

धमाल मुलगा
Fri, 04/10/2009 - 15:31 नवीन
प्रतिसादभर निस्तं 'ढिश्क्यँव ढिश्क्यँव' =)) =)) पकाकाका मला दोन मिनिटं 'काऊबॉय कॉस्च्युम'मध्ये दोन्ही हातात पिस्तुलं घेऊन भर लक्ष्मीरस्त्यावर उभं राहुन धडाधड गोळीबार करतानाच दिसले! ;) बाकी, मीटरबद्दलचं पटलं हो काका! अवांतरः हॅ हॅ हॅ हॅ हॅ! आपलाच, -(आचरट पुतण्या) ध (मा ल) ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

हॅहॅहॅहॅ....

भडकमकर मास्तर
Fri, 04/10/2009 - 16:09 नवीन
हॅहॅहॅहॅ.... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

मस्त रे !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 04/10/2009 - 10:10 नवीन
समीरसूर , साडीखरेदीची गोष्ट मस्तच ! साडी खरेदीला जातांना आम्हीही खूप नर्व्हस असतो. दुकानदार ढीगभर साड्यांचे वेगवेगळे प्रकार दाखवतो, डिझाइन्स दाखवतो, अगदी थकून जातो बिचारा, तरी निर्विकार चेहरा करुन दुस-या दुकानात पाहू म्हटलं की , आम्हाला त्या दुकानदाराची खूप दया येते . (कोणतीही खरेदी न करता त्याला पैसे द्यावे वाटतात) साडी खरेदी करुन घरी आणल्यानंतरही तीचे निरिक्षण चालूच असते, आणि थोड्या वेळाने...तो दुकानदार साडी बदलून देईल का ! या प्रश्नाने आमची तब्येत खराब होते. -दिलीप बिरुटे (साडी खरेदी प्रकरणाचा धसका घेतलेला )
  • Log in or register to post comments

हाहाहा....

समीरसूर
Fri, 04/10/2009 - 10:48 नवीन
तब्येत खराब होते.....मस्तच! बायकांना स्वतःला साडी आवडली आहे की नाही हे महत्वाचे वाटत नाही; ती इतरांना (नवरा, जावा, नणंदा इत्यादी) चांगली वाटते आहे की नाही हे जास्त महत्वाचे वाटते. दोन-तीन बायकांनी "छानच आहे गं साडी तुझी!" असं म्हटलं की साडीसाठी खर्च केलेले पैसे वसूल झाल्याचं समाधान यांच्या चेहर्‍यावर दिसतं. पुरुषांना असे वाटत नाही बहुधा. नवीन कपडे घालून जरी ऑफीसात आले तरी त्यांना अजिबात अपेक्षा नसते की कुणीतरी त्यांचं कौतुक करेल. केलं तरी त्यांच्या चेहर्‍यावर जग जिंकल्याचे भाव झळकत नाहीत. :) हे असे का असेल बरे? कोडेच आहे एक. :) --समीर
  • Log in or register to post comments

सहमत आहे !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 04/10/2009 - 10:58 नवीन
>>बायकांना स्वतःला साडी आवडली आहे की नाही हे महत्वाचे वाटत नाही; ती इतरांना (नवरा, जावा, नणंदा इत्यादी) चांगली वाटते आहे की नाही हे जास्त महत्वाचे वाटते. आपल्याला काय आवडते या पेक्षा...साडी दुसर्‍यांना कशी वाटेल ? आवडेल का ? दुसरे कौतुक करतील का ? याच साठीचा तो प्रपंच असतो , याच्याशी १०० टक्के सहमत (टक्क्याचे चिन्ह सापडेना ) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

महाग

समीरसूर
Fri, 04/10/2009 - 11:02 नवीन
कुणी छान आहे म्हटलं की मग लवकरात लवकर त्याची किंमत सांगायची घाई होते. खूप महाग असेल तर फुशारकीने सांगीतली जाते आणि स्वस्त असेल तरी फुशारकीनेच सांगीतली जाते ("बघा, इतकी चांगली साडी आम्ही किती वाजवी किंमतीत विकत आणली, नाहीतर तुम्ही, ते पोतेरं परवा हजार रुपयात आणलं. व्यवहारज्ञान नाहीच आजिबात! तरी सांगत होते की माझ्यासोबत चला साडी घ्यायला...जाऊ द्या...पैसे वर आलेत नं तुमचे!") --समीर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 04/10/2009 - 11:08 नवीन
च्यायला समीरसूर...तुमचे निरिक्षण अगदी मना-मनातले आहे. :) बरं आपण काही बोलायला जावे, तर ऐकावं लागते की, तुम्हाला कपड्याचा चॉइस नाही. (आपला चॉइस नेहमीच चुकतो हे बोलायचे असते पण तेही बोलता येत नाही. ) सतत ते रेघा-रेघांचे (चेक्स ) शर्ट घेऊन येतात. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

साड्यांची लायब्ररी

प्रकाश घाटपांडे
Fri, 04/10/2009 - 13:56 नवीन
आम्ही एक आयडिया बायकोच्या मैत्रिणींना सुचवली होती. एक तर यवढाले पैशे देउन साड्या विकत घ्यायच्या. त्या एखाद्या समारंभात घालायच्या. बाकीच्या वेळेला वाया जाणार. परत काही बायांकडे म्हणे शंभर शंभर साड्या असतात. किंमती पण म्हणे पाच पाच हजार असतात. अरे बापरे काय ही उधळ पट्टी! कपाटात किती जागा लागत असणार? आता आमची आयडिया - एखादा समारंभ असल्यावर त्यावेळेस पुरती साडीची पुर्ण किंमत देउन ती भाडे तत्वावर आणायची . साडी परत केल्यानंतर तो दुकानदार २० टक्के वा २५ टक्के घेउन उरलेली रक्कम परत देणार. पुढच्या वेळी दुकानदार ती साडी ड्रायक्लिन करुन दुसरीला देणार. अगदी नव्या साडीवानी. तिला नवी आहे कि जुनी हे कस काय कळणार ड्रायक्लिन केल्यावर? ब्लाउजचे माप प्रत्येकीचे वेगवेगळे असणार त्यामुळे ब्लाउज ची लायब्ररी कदाचित करता येणार नाही. पण आमची विलॅष्टीकची आयडिया वापरली तर ब्लाउज बी ऍडजस्ट होनार लायब्ररीत . म्हणजे बायकांना कमी पैशात वेगवेगळ्या व्हरायटीच्या साड्या वापरायला मिळतील. हीच आयडिया दागिन्यांच्या बाबत पण वापरता येईल. मला त्यांनी मुर्खात काढल! पण मित्रांनो आयडिया भारी हाय कि नाई आपली? प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 04/10/2009 - 17:31 नवीन
ब्लाउजचे माप प्रत्येकीचे वेगवेगळे असणार त्यामुळे ब्लाउज ची लायब्ररी कदाचित करता येणार नाही. पण आमची विलॅष्टीकची आयडिया वापरली तर ब्लाउज बी ऍडजस्ट होनार लायब्ररीत . =)) आयडीया भारी आहे. पण साड्या भाडेपट्टीवर वापरायचा फार्म्यूला टीकणार नाही. वस्तूंवर 'मालकी हक्क' मिळाला पाहिजे, हा स्त्रियांच्या स्वभावाचा (चांगला ) गुण आहे. त्यामुळे दुसरी काहीतरी आयड्या सांगा ! :) -दिलीप बिरुटे (चावट )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

लोकान्ला काय कळनार?

प्रकाश घाटपांडे
Fri, 04/10/2009 - 18:11 नवीन
लोकान्ला काय कळनार की भाड्याची हाय कि मालकीची? बर फुल डिपॉजिट भरलय. म्हंजे ती आपली बी हायेच. यखांदी फटाकडी लईच आघावपना करायला लाग्ली तर सौंशय याय्ला नको म्हनुन साडी परत करायची नाई. दुसरी आयडिया म्हंजे एक्सेचेंज ऑफर मदी एक साडी देउन दुसरी साडी घ्यायची. किंमतीतला मधला फरक चुकभुल देनेघेने सारखा. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

साड्यांच्

रेवती
Mon, 04/13/2009 - 04:59 नवीन
साड्यांच्या लायब्ररीची आयडीया भारी आहे पण दागिन्याची आयडीया नविन नाही. पंजाबी लोक (म्हणजे बाईलोक)स्वत:च्या लग्नातही भाड्याने आणलेले दागिने घालतात हे ऐकल्यावर तर मी चाट पडले होते. बरं, हे त्यांच्याकडे सर्रास चालतं त्यामुले लग्नात कुणी किती तोळे सोनं दिलयं हे कळून त्यावर नको त्या चर्चा होत नसाव्यात किंवा कमी होत असाव्यात. बाकी आपली साड्यांची सुचना चांगलीच आहे. रेवती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

सुर

विनायक प्रभू
Fri, 04/10/2009 - 10:58 नवीन
चांगला आहे रे समीर तुझा सुर
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

समीरसूर
Fri, 04/10/2009 - 10:58 नवीन
सगळ्यांच्या उत्साहवर्धक प्रतिसादांबद्दल मनापासून धन्यवाद! सगळ्यांच्या साडी खरेदीच्या (स्वतःसाठी किंवा स्वतःच्या कुटुंबातल्या स्त्रियांसाठी) इच्छा पूर्ण होवोत ही सदिच्छा! :) फक्त खरेदी लवकर पूर्ण व्हावी ही आचारसंहिता पाळली गेली तर पुरुषांचाही साडी खरेदीतला आनंद (?) द्विगुणित होईल असे वाटते. :) धन्यवाद, समीर
  • Log in or register to post comments

>>आम्ही

शिप्रा
Fri, 04/10/2009 - 11:18 नवीन
>>आम्ही सगळे दुकानात गेलो. सुदैवाने तिथे पुस्तकाच्या दोन प्रती मिळाल्या आणि हाश्शहुश्श करत आम्ही इटालियन क्रेपच्या ऐवजी 'संपूर्ण चातुर्मास' पुस्तक घेऊन घरी परतलो! लेख सहि लिहिला आहे पण हे सगळ्यात खतरनाक =))
  • Log in or register to post comments

सह्ही लिहिलंय समीरसूर!

धमाल मुलगा
Fri, 04/10/2009 - 15:51 नवीन
मजा आली वाचायला. बाकी, ह्या साड्यांच्या दुकानातले सेल्समन्सना बहुतेक आर्मीच्या ट्रेनिंगसारखं कडक ट्रेनिंग तरी देत असावेत किंवा हे सेल्समन पोहोचलेले सन्याशी असावेत..एकदम स्थितप्रज्ञ. अशी माझी एक समजुत आहे. तासन् तास त्या माणसाला साड्यांचे ढिगारे काढायला लावायचे, सत्राशेसाठ प्याटर्न मागायचे (जळ्ळी नावं ती कसली असतात त्यांची! ) बरं, मलातर सगळे प्याटर्न एकसारखेच वाटतात..किंमतीची लेबलं सोडुन. ;) तर एव्हढा पसारा मांडायला लावायचा, आणि (समजा चुकुन पहिल्याच दुकानात साडी घेतलीच तर) त्यानं सगळ्यात पहिल्यांदा नमुन्यासाठी दाखवलेली साडीच उचलायची! वर आणि "अय्या! मगाशी किती कैतरीच्च दिसत होती नै? आत्ता अशी पाहिली ना, ह्या साडीच्या पदरावर तिचा पोत पट्टकन जाणवून आला! " असं म्हणल्यावर आपण मनातल्या मनात हुश्श्य करायला जावं तर लगेच, "काय हो, ह्यात आणखी काही रंग आहेत का? पदराचं डिझाईन वेगळं असलेली रेंज आहे?" आयला, त्या साडीच्या दुकानाला, त्यातल्या स्टॉकसकट आग लाऊन द्यायची इच्छा अनावर होते राव! बरं साडी घ्यायची नक्की केली आणि काऊंटरवर पाठवली की ह्यांचा ठरलेला डायलॉग असतो, "ताई, पुढच्या वेळी निवांत वेळ काढून या. खुप व्हरायटी आहेत आपल्याकडं!" अरे फोकलीच्या, इथं नुसतं शेजारी बसुनच माझं कडबोळं झालं, तुला गेल्या चार तासाच्या ह्या उस्तवारीचा काहीच शीण नाही??????? बरं इतका वेळ दुकानात घालवायचा तर ह्या साड्यांच्या दुकानदारांनी आम्हा गोरगरीब नवरे लोकांच्या सोयीसाठी काहीतरी तजवीज करायला हवी असं माझं प्रांजळ मत आहे. मॉल्समध्ये नाही का, पोरांना गेम्स लाँजमध्ये सोडुन देतात तसं काहीसं. दुकानाच्या एखाद्या कोपर्‍यात चार दोन टेबलं टाकावीत, जरा बीयर वगैरे द्यावी आम्हाला, सोबत टी.व्ही.वर एखादी रेकॉर्डेड का होईना म्याच लाऊन ठेवावी.....मग बायकांनी चार काय आठ तास खरेदी करत बसलं तरी आमची ना नाही! अवांतरः माझे दोन सदरे आणि दोन विजारी घ्यायला एकदा(च) चुकुन बायकोला सोबत घेऊन गेलो! तब्बल दोन तास मोडले. कानाला खडा लावला!!!! एकट्याने जाणे. आता माझी स्वतःच्या कपड्यांची खरेदी पुर्वीसारखीच पंधरा मिनीटात पुर्ण होते. म्हणजे घरातून निघाल्यापासून खरेदी करुन, बाहेर येऊन चहा-बिडी उरकुन घरी पोचतोही मी पाऊण-एक तासात :) ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments

हा हा हा

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 04/10/2009 - 16:08 नवीन
मलातर सगळे प्याटर्न एकसारखेच वाटतात..किंमतीची लेबलं सोडुन हा हा हा सुहास " जाली॑द॑र जलालाबादी प॑खे मड॑ळ" च्या सर्व सदस्या॑ना शुभेच्छा ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

कोकची बाटली

मिसळभोक्ता
Sun, 04/12/2009 - 14:47 नवीन
कोकच्या कॅन मध्ये दोन पेग टाकून, शांतपणे घुटके घेत, साडी खरेदी चांगली होते. -- मिसळभोक्ता
  • Log in or register to post comments

एकदम सहीच

ऋचा
Mon, 04/13/2009 - 11:49 नवीन
एकदम सहीच लिहिलय!!! पण माझा अनुभव वेगळा आहे.... मी नवर्‍याच बरोबर साडी खरेदीला जाते आणि १५-२० मिनिटात साडी घेऊन बाहेर येते..मलाच आवडत नाही साडीसाठी इतका उहापोह करायला... त्यामुळे नवरा पण खुष आणि तो माझ्या बरोबर आला म्हणुन मी पण खुष!!!! "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments

उत्तम

समीरसूर
Mon, 04/13/2009 - 13:13 नवीन
मी पण माझे कपडे १० ते १५ मिनिटात घेऊन बाहेर पडतो. कपड्यांमध्ये काय चांगलं आणि काय वाईट हे मला ठरवताच येत नाही. जे दिसतं ते सगळच चांगलं वाटतं. मग जास्त कीस न पाडता जे त्यातल्या त्यात बरं वाटेल ते घेऊन टाकतो. मी एकाच दुकानातून सगळं घेऊन टाकतो. कपड्यांसाठी सत्राशेसाठ दुकाने हिंडत बसणं म्हणजे मला निव्वळ टाईम पास वाटतो. :) --समीर
  • Log in or register to post comments

सहमत!

धमाल मुलगा
Mon, 04/13/2009 - 14:35 नवीन
नायतर काय राव? मुळात आपल्याकडं पेशन्स नावाची चीजच नसते. त्यात इतकी दुकानं फिरायची म्हणलं तर साला, कपडे घ्यायचा विचारच रद्द होऊन जातो :) आणी मुळात बघायचं असतंय काय? एक रंग, दुसरं टाईप, तिसरं ब्रँड (हवा असल्यास!), आणि बजेट! फिनीश!!! दुकानात शिरल्याबरोबर सेल्समनला पकडून वरच्या यादीच्या उलट्या क्रमानं गेलं की १५ मिनिटात खरेदी होते. उदा: १. अमुक किंमतीपर्यंतचा शर्ट, पँट हवी. २.फक्त ह्या ब्रँडचे कपडे दाखव ३.प्लेन्/चेक्स/स्ट्राईप्स/कॅज्युअल्स ह्यातलंच फक्त बाहेर काढ. ४. अमुक एका रंगाच्या शेड्स दाखव.... सं-प-लं !!!! डोक्याला शॉट्ट नाय! बाहेर उभ्या असलेल्या दोस्ताची बिडी संपायच्या आत आपण बील देऊन दुकानाबाहेर! हाय काय आन नाय काय :) ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समीरसूर

हाहाहाहा

दिव्यश्री
गुरुवार, 09/03/2015 - 02:37 नवीन
(नवरा सुखी राहिल हिचा आयुष्यभर!) , तेवढ्यात माझी बायको तळपली. "आता रात्रीचे ८ वाजून गेलेत. >>> इइ. आणी कंसातील सगळीच वाक्ये भारी. मस्त मस्त...अगदी रिफ्रेशिंग लेख आहे. मला साडी खरेदीला १० मिणिटांपेक्षा जास्त वेळ लागत णै म्ह्णूण मी प्यांटवाल्यांचे बोलणे खाते, दरवेळी... :( काय सांगु आता. मला कुठल्याही खरेदीला जास्त वेळ लागत णै. पण मग प्यांटवाल मला लगेच म्हणतात काय घाइ असते णेहमी, दहाव्या मिणिटाला दुकाणाच्या बाहेर आलेच पाहिजे असा णियम आहे का? ई.ई.ई. ह्म्म .असो.
  • Log in or register to post comments

माझा अनुभव

pradnya deshpande
गुरुवार, 09/03/2015 - 15:12 नवीन
लग्न होऊन १८ वर्षे झाली. लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी फक्त १ तास घेतला. त्यानंतरच्या १८ वर्षात १८ वेळाही साडी घेण्यासाठी दुकानात गेले नाही. ज्या ज्या वेळी साडी घेतली त्या त्या वेळी फक्त अर्धा तास लागला. साडी ध्यायला एवढा वेळ कं लागतो याचे कोडे मलाही समजत नाही.
  • Log in or register to post comments

खी खी खी

बाबा योगिराज
गुरुवार, 09/03/2015 - 17:58 नवीन
या बाबतीत (नवरे मंडळीतुन) मी पन भाग्यवानच. ७-८ वेळा दुकानाच्या खरेदी साठी सुरतला घेउन गेलो होतो. तेंव्हा पासुन आमच्या मंडळी चा खरेदीचा नुरच पालट्ला. अर्ध्या तासात ४-५ साड्या सहजच खरेदी होतात. जर का दुकानदाराने उगच पसारा घातला की त्याने बोलनी खाल्लिच म्हनुन समजा. आणि मी सोबत असेल तर १५-२० मिनिटे सुद्धा पुरेशी आहेत. आज काल आमच्या शहरात, काही दुकानात जर का गिर्‍हाईकाने पसारा काढला, आणि काही खरेदी केली नाही की गिर्‍हाईकच बोलन खात.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा