यमकं बिमकं, कविता बिविता..
काव्यरस
तू म्हणालास ,
"यमकंबिमकं, कविता बिविता ऐकून होतो नुसता जाच
माझ्यासाठी कधीतरी तुझीमाझी गोष्ट वाच."
मला खुदकन् आलं हसू, आपली गोष्ट कशी वाचू?
आगा नाही पिछा नाही, गोष्टीला त्या नावही नाही,
अशी गोष्ट सांगतात का? आणि कुणी ऐकतात का?
समजा जर सांगितली तर तुझं नाव घालू कसं?
नावच जर बदललं तर मी पुढं बोलू कसं?
तो तिला कुठं भेटला, सांगताना पापणी थरथरेल.
कसा हात मागितला? ओठाचा कोपरा हळूच हसेल.
हळवा स्पर्श वाचताना गाल होतील लाल लाल,
पुढची गोष्ट गाणंच जणू, पाय हळूच धरतील ताल.
वाचता वाचता मध्ये मध्ये डोळे माझे मिटून जातील,
भांडणांच्या जागी कधी गंगाजमुना दाटून येतील...
तेव्हा गोष्ट काही गोष्ट नाही, लोकांना पटकन कळेल
कोण गं कोण गं मैत्रिणींचा प्रश्न छळेल?
त्याला उत्तर देऊ कशी?कोरडा चेहरा ठेऊ कशी?
त्याच्यापेक्षा कविताच बरी, ख-या खोट्याची मिसळण सारी.
यमकामध्ये वृत्तांमध्ये सहज लपून जाते चोरी.
रमत गमत हसत हसत, कविता छान वाचता येते,
ऐकता ऐकता ऐकणा-याचीच गोष्ट जणू होऊन जाते.
तुला मात्र कवितेमधला ओ की ठो कळत नाही
मला तेही कळतं रे पण काय करू वळत नाही..
वाचने
12916
वाचनखूण
प्रतिक्रिया
30
भारी
In reply to भारी by ज्ञानोबाचे पैजार
धन्यवाद पैजारबुवा!
भारीच! खूप सहज आणि सुंदर आहे
In reply to भारीच! खूप सहज आणि सुंदर आहे by राघव
+१
In reply to +१ by मूकवाचक
मूकवाचक आणि राघव, धन्यवाद.
काय सुरेख कविता आहे
In reply to काय सुरेख कविता आहे by मिसळपाव
वा! प्रतिसाद खूप आवडला.
खूप छान आहे कविता मजा आली
क्या बात है...! एकदम मस्त.
+१
विजुभाऊ, प्रचेतस आणि गोंधळी,
:)
वाह !
गद्य-पद्य संग्राम छान रंगवला
टका, बिरुटे सर , पॉईंट
ईश्क विश्क प्यार व्यार...यमकं बिमकं कविता बिविता....अतिसुंदर
ईश्क विश्क प्यार व्यार...यमकं बिमकं कविता बिविता....अतिसुंदर
In reply to ईश्क विश्क प्यार व्यार...यमकं बिमकं कविता बिविता....अतिसुंदर by बाजीगर
:) धन्यवाद!पण इंदिरा संत???
In reply to :) धन्यवाद!पण इंदिरा संत??? by प्राची अश्विनी
साधी पण सुंदर कविता.
In reply to साधी पण सुंदर कविता. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आहा!
व्वाह
कविता बिविता यांच्या
कविता खूप आवडली..!
मस्तच ...खूप सुंदर लिहिता
सगळ्यांंना मनापासून धन्यवाद!
मस्त कविता
वाह !
अतिशय भारी.
सहज, सुंदर..
अनंतयात्री आणि जयंतक्षनाईक...