भुतंखेतं
महिन्यातून एकदा ऑफिस संपल्यानंतर ऑफिसच्याच टेरेस वर रात्री जमून भोजनाचा आनंद घेत उशिरा पर्यंत गप्पा मारणे हा आमचा त्या वेळचा प्रघात होता. आमचा 4 मित्रांचा चमू होता. त्यातलाच एक मुस्लिम मित्र घरून सामिष पदार्थ घेऊन यायचा आणि त्याचा आस्वाद घेत आमच्या गप्पा रंगायच्या. एका रात्री असाच तो मित्र याखनी पुलाव घेऊन आला होता. टेरेस कडे जातच होतो तेवढ्यात मी पाहिले की आमच्याच ऑफिसचा एक सीनियर डेव्हलपर एकटाच काम करत बसला होता. मी त्याला आमच्या सोबत यायचा आग्रह केला. तो आधी तयार नव्हता पण नंतर तयार झाला. त्या रात्री गप्पा अचानक भुतांच्या विषयावर आल्या. अर्थातच आम्ही ऐकीव कथा मीठ मसाला लावून एकमेकांना सांगत होतो. आमचा तो सीनियर डेव्हलपर बाजूला शांत बसून आमच्या गप्पा ऐकत होता. रात्र जशी वाढली तसं आम्ही आवरायला घेतलं आणि खाली निघणार तेवढ्यात तो मित्र म्हणाला की त्याला एक अनुभव सांगायचं आहे. त्याच्या अनुभव कथनानंतर आम्ही परत कधीच टेरेसवर रात्री जेवण करायचं धाडस केलं नाही.
अभयची (सीनियर डेव्हलपर) काम करायची पद्धत अजब होती. तो दुपारी 1 वाजता ऑफिसला यायचा आणि रात्री उशिरा पर्यंत काम करत बसायचा. तो एकलकोंडा होता आणि प्रोजेक्टवर एकटाच काम करणं पसंत करायचा. एका रात्री तो असाच उशिरा पर्यंत काम करत बसला होता. रात्री 1 वाजता तो घरी जाण्यास निघाला. तो एका अवघड प्रोजेक्ट वर काम करत होता आणि निघतानी पण एका क्लिष्ट लॉजिक बद्दल विचार करत होता. आमचं ऑफिस 8व्या मजल्यावर आहे. लिफ्ट मधून खाली येत होता तेवढ्यात लिफ्ट चौथ्या मजल्यावर थांबली. लिफ्टचा दरवाजा उघडला. समोरच्या पोर्च मध्ये अंधुक प्रकाश होता आणि एक लहान मुलगा फुटबॉल लाथेने भिंतीवर मारायचा खेळ खेळत होता. मुलगा पाठमोरा होता. थोड्यावेळाने लिफ्टचं दार बंद झालं आणि लिफ्ट बेसमेंटच्या पार्किंग मध्ये आली. तो त्याच्या गाडीकडे निघालाच होता की त्याला अचानक धक्का बसला. त्याने थोड्यावेळ पूर्वी पाहिलेले दृश्य तो परत आठवू लागला. रात्रीच्या एक वाजता एक कमर्शियल बिल्डिंग मध्ये लहान मुलगा कसा असू शकतो. ते पण अशा मजल्यावर जो खूप वर्षे बंद आहे. होय, इमारतीतले बाकी मजले इतर कंपनीच्या ऑफिसेसनी व्यापले होते. एकच चौथा मजला रिकामा होता. बरीच वर्षे तो असाच रिकामा पडला होता. इमारतीची लिफ्ट मध्ये पण 4 आकडा डिझेबल केला होता. म्हणजे लिफ्ट कधीच चौथ्या मजल्यावर थांबत नसे. अभयला पार्किंग मध्येच दरदरून घाम फुटला. एवढ्या रात्री पूर्ण पार्किंग रिकामे होते आणि त्याची गाडी बरीच आत होती. तो घाबरला होता आणि गाडीकडे जाण्याची त्याची हिंमत नव्हती. तो गाडी कडे न जाता धावत बिल्डिंगच्या security gate कडे गेला. तिथे एक security guard कडे बघून त्याला जरा बरे वाटले. तिथे जाऊन तो थोडा वेळ बसला. गार्डला वाटले की त्याची तब्येत ठीक नाहीये. गार्डनी त्याची विचारपूस केली. तो काही बोलण्याच्या अवस्थेत नव्हता. त्याने गार्ड कडे पिण्यास पाणी मागितले. त्याचा आणि गार्डचा संवाद पुढे देत आहे,
गार्ड - ' सर आपकी तब्येत ठीक है ना? हॉस्पिटल जाना है क्या? मै लेके जा सकता हु'
अभय - 'नही'
मधला काही काळ शांत गेला. केवळ आजूबाजूला माणसाच अस्तित्वच त्याला समाधान देत होतं. गार्ड त्याच्या हालचाली न्याहाळत होता. त्याच्या अस्वस्थ हालचालीवरून गार्डला काही शंका आली. थोड्यावेळाने गार्डनी त्याला विचारले,
गार्ड - 'सर आपने कुछ देखा क्या? '
ह्यावर अभय शांत बसला. त्याला सांगावे की नाही ह्या विचारात तो होता.
गार्ड - ' चौथा माला? '
अभय आ वासून त्याला पाहताच राहिला. गार्डच्या लक्षात आले की ' चौथे माले' ची केस आहे. त्याने पुढे सांगायास सुरू केले की बिल्डिंग मध्ये काम करत असलेल्या हाउस किपिंग, security सगळ्यांना चौथ्या माजल्या बद्दल माहिती आहे आणि सगळे तिथून दूर राहतात. बिल्डिंग administration कडून त्यांना सक्त ताकीद होती की काम करत असलेल्या कामाचार्यांसोबत ह्या बाबतीत कोणी काही अफवा(? ) नाही पसरवणार.
ह्या नंतर अभय गार्ड सोबत पार्किंग मध्ये गेला आणि नंतर घरी. त्या नंतर तो बरेच दिवस ऑफिसला नाही आला. ह्या घटने बद्दल तो कंपनीच्या काही सीनियर लोकांशी बोलला. त्याला काही दिवस घरून काम करायची सूट मिळाली. नंतर तो ऑफिसला येऊ लागला पण एकटं थांबणं टाळू लागला. सर्वात उशिरा ऑफिस मधून बाहेर पडणारा आमचाच ग्रुप असायचा म्हणून तो एवढ्यात थांबू लागला होता.
त्याचा हा अनुभव ऐकून अर्थातच आम्ही सगळे खूप घाबरलो होतो. त्या रात्री लिफ्ट मधून खाली जातांनी हृदयाची धडधड प्रमाणा बाहेर वाढली होती. चुकून जरी लिफ्ट चौथ्या मजल्यावर थांबली असती तर एक दोघांचे तरी हृदय बंद पडले असते.
तुमचे पण असे काही अमानवीय अनुभव असतील तर इथे टाकावेत.
वाचने
24442
वाचनखूण
प्रतिक्रिया
51
आमच्या कंपनीत कामाच्या अती
In reply to आमच्या कंपनीत कामाच्या अती by भीमराव
हसून मेलो !
छान...
कधी काळी चौथ्या मजल्यावरिल
In reply to कधी काळी चौथ्या मजल्यावरिल by प्रकाश घाटपांडे
शर्ट पँट घातलेले भुत
In reply to शर्ट पँट घातलेले भुत by विजुभाऊ
काळानुरुप लोकांनी भूताच्या
In reply to कधी काळी चौथ्या मजल्यावरिल by प्रकाश घाटपांडे
ह्याच मसणवाटांमुळे
आमचं जुन घर अगदी नदीला लागून
In reply to आमचं जुन घर अगदी नदीला लागून by बोलघेवडा
माझीही अशीच एक आठवंण
थरारक किस्सा आहे
तोरणा
In reply to तोरणा by स्वतन्त्र
तोरणाचे बरेच किस्से आहेत
In reply to तोरणाचे बरेच किस्से आहेत by विखि
तोरण्याला अमावस्येच्या रात्री
मस्त लिहीलंय
थरारक!!
भुताचा नाहीये.खरतर अवांतरच.
लौंग स्टोरी
In reply to लौंग स्टोरी by हणमंतअण्णा शंक…
लैच ड्यांजर!!
In reply to लौंग स्टोरी by हणमंतअण्णा शंक…
बापरे !
In reply to लौंग स्टोरी by हणमंतअण्णा शंक…
लई डेंजरस
कृपया मार्गदर्शन करावे
In reply to कृपया मार्गदर्शन करावे by Prajakta२१
ह्म्म
In reply to कृपया मार्गदर्शन करावे by Prajakta२१
खटकलेल्या बंद खोलीमुळे हे
काही बाधित घरे राहणार्याला
आत्ता कुठे चांगला धागा आला.
In reply to आत्ता कुठे चांगला धागा आला. by कंजूस
4 ) दाढी वाढवुन ट्रेनमधे चढु
मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद
मला एक प्रश्न पडतो नेहेमी.
In reply to मला एक प्रश्न पडतो नेहेमी. by कानडाऊ योगेशु
अज्ञाताचे भय व पुर्वग्रहाचा
आमच्या गल्लीत २ प्रसिद्ध भूते होती
In reply to आमच्या गल्लीत २ प्रसिद्ध भूते होती by श्वेता२४
अमावस्या-पौर्णिमेला त्यांच्या
In reply to अमावस्या-पौर्णिमेला त्यांच्या by mrcoolguynice
सेक्युलर?
In reply to सेक्युलर? by नेत्रेश
भुताला पण धर्म चिकटवला जातोय,
In reply to भुताला पण धर्म चिकटवला जातोय, by mrcoolguynice
लॉजिकली
उत्तरदायित्त्वास नकार लागू!
In reply to लॉजिकली by तुषार काळभोर
नकार कायमच
In reply to नकार कायमच by अभ्या..
कसे?
In reply to लॉजिकली by तुषार काळभोर
बाकी "लसूण" ला घाबरणे हे,
इथे सुध्दा आहेत ना
In reply to इथे सुध्दा आहेत ना by अभ्या..
आपल्यामागे कसे चाललेय मिपा हे.
In reply to इथे सुध्दा आहेत ना by अभ्या..
एक मस्तानी तुम्हाला लागू...
+१ अभ्याशेठ .... ! :-)))
ज्यांना भुतंखेतं दिसतात
In reply to ज्यांना भुतंखेतं दिसतात by एस
अजून एक शंका
In reply to अजून एक शंका by ज्ञानोबाचे पैजार
बरोबर आहे
In reply to ज्यांना भुतंखेतं दिसतात by एस
९११ च्या वेळेस ....
In reply to ९११ च्या वेळेस .... by गामा पैलवान
गा. पै.,
In reply to गा. पै., by एस
फारंच सरसकटीकरण होतंय
बाकी काय नाही माहित,
प्रसिद्ध वन्यजीव अभ्यासक आणि
भुतंखेतं आजिबात नसतात
चल माझ्या बरोबर