✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

बोध कथा – Revisited

श
शेर भाई यांनी
Fri, 05/01/2020 - 18:07  ·  लेख
लेख
फार फार वर्षांपूर्वी इसापनीती का पंचतंत्र आता नक्की आठवत नाही, पण एक गोष्ट ऐकली होती. त्याच हे एक remix. एका राज्यात एक राजा असतो आणि त्याला अचानक एक दिवस दोन शिंग येतात. त्याच ते गुपित कोणालाच माहित नसते कारण शिंग तो आपल्या मुकुटाखाली दडवत असतो. मग थोड्या दिवसानी जेव्हा राजाचे केस वाढतात तेव्हा शाही हजामाला बोलावले जाते. आता त्या शाही हजामाला आपण नाव देऊ “बंडू”. कारण शाही हजाम पेक्षा बंडू छोटुस बर. तर बंडू राजाचे केस कापायला येतो, आणि बघतो तर काय......................... ते आपल्या सगळ्यांना आधीच माहित आहे त्यामुळे ते नक्की काय त्यावर आता परत Copy – paste न करता आपण पुढे जाऊया. तर राजाचे केस कापल्यावर राजा बंडूला तम्बी देतो, (दम देतो. डोसा इडली नाही) कि बाबा माझ शिक्रेट कुणालाच कळले नाही पाहिजे वगैरे आणि वर त्याला १०, नको आपण ५० करू, कारण तो राजा आहे. तर ४० सोन्याची नाणी पण extra देतो. (Deducting Taxes and all). आता नाणी घेतल्यामुळे बंडू त्याचा शब्द पाळायचा ठरवतो. पण त्या दिवसापासून बंडूच्या पोटात खूप दुखायला लागते, एव्हढे कि सगळी नाणी खर्च होणार कि काय अशी परिस्थिती येते. मग आधी बंडूची बायको त्याला विचारते कि “अहो, तुम्ही गाडीवाल्याचा वडापाव खायच्या ऐवजी Jumbo वडापाव नाही ना खाल्लात?” तर बंडू म्हणतो कि “अग, तु घरात KFC चिकन करायला लागल्यापासून मैने वडापाव छोड दिया है.” मग नंतर बंडूची आई त्याला म्हणते “बंड्या, तुझ्या पोटात कोणाच तरी गुपित दडवले आहेस ना. तर दाट जंगलात जा आणि एखाद्या झाडासमोर ते गुपित ओकून टाक.” तर बंडू जंगलात जातो आणि अस झाड निवडतो कि ज्यापासून संगीताची वाद्ये बनवितात. (आता संगीताच का? कळल असेलच) आणि जोरात ओरडतो कि........................ आता तो काय ओरडला असेल ते आपल्या सगळ्यांना माहित आहेच. आणि अहो आश्चर्यम पोटदुखी गायब. मग बंडू प्रशांत कॉर्नर मधून कॉर्न पकोडे घेतो, पण मग त्याला आठवते कि तो बुधवार आहे मग तो लगेच कोरम मध्ये जाऊन दीड किलो बोनलेस कोंबडी घेतो (आता बोनलेसच का? तुम्ही फारच हुश्शार) आणि आनंदाने घरी जातो. मग लगेच थोड्या दिवसांनी Rio 2 मधले जंगल के दुष्मन राजाच्या विनंतीमुळे / आदेशामुळे (ज्याला जे आवडेल ते ठेवून घ्याल) त्या जंगलात येतात. आणि तेच झाड बरोब्बर तोडतात ज्याच्या समोर बंडू ओरडला असतो. आणि राजाच्या आज्ञेनुसार त्याचा एक Piano बनवतात. आता Piano च का? कारण राजा अदनान समीचा नंबर १ शिष्य असतो. मग राजा त्या Piano च्या उद्घाटनाला एक मोठा समारंभ करायचा ठरवतो. बरेच नामांकित पाहुण्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावलेली असते. समारंभ सुरू होतो, आणि तो जंगली झाडवाला Piano अचानक वाजायला लागतो आणि चक्क आवाज येऊ लागतो “राजाच्या डोक्यावर शिंग दोन, सांगा बघणार कोण?” आणि अशा पद्धतीने राजाचे गुपित शेवटी सगळ्यांना कळते. या गोष्टीचे तात्पर्य काय असावे? कारण काय होत ते आता नक्की आठवत नाही.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
बालकथा

प्रतिक्रिया द्या
6255 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

बोध कथा – Revisited

शेर भाई
Fri, 05/01/2020 - 18:08 नवीन
बोध कथा – Revisited
  • Log in or register to post comments

जाम भारी रंगवलीय हो... =)))

जव्हेरगंज
Fri, 05/01/2020 - 18:30 नवीन
जाम भारी रंगवलीय हो... =))) कडक!!
  • Log in or register to post comments

.

चांदणे संदीप
Fri, 05/01/2020 - 19:35 नवीन
ही कथा वेगळ्या स्वरूपात माहिती आहे. बोधही घ्यायचा तो घेतलाच आहे पण इथे ज्या पद्धतीने मांडली आहे त्यातून लेखकाला तात्पर्य हवे आहे की आणखी काही? नक्की कसला डोस द्यायचाय का घ्यायचाय? जरा इस्कटून सांगावे ही विनंती. सं - दी - प
  • Log in or register to post comments

भारी आभारी

शेर भाई
Fri, 05/01/2020 - 22:11 नवीन
@ जव्हेरगंज G धन्यवाद @ चांदणे संदीप G तात्पर्य खरच आठवत नाही आहे. आणि तात्पर्य is not equal to बोध अस काही आहे का ? तुम्हाला जे काही देईन अस वाटत ते खुश्शाल द्या. फक्त घेण्यासाठी पोत घेऊन येऊ का झोळीत मावेल ते सांगा.
  • Log in or register to post comments

तात्पर्य = बोध

चांदणे संदीप
Sat, 05/02/2020 - 07:14 नवीन
दोन्हीमध्ये तुम्ही शिकणे अभिप्रेत असते. असो, कथेचे तात्पर्य हेच आहे की, सत्य हे लपून राहू शकत नाही. कुठल्या ना कुठल्या प्रकारे ते जगासमोर येणारच! मी ही गोष्ट माझ्या मुलींना नेहमी सांगतो त्यात राजाला शिंगाऐवजी गाढवासारखे कान असतात. सं - दी - प
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेर भाई

काय बोध घ्यायचा कथेवरुन ??

अर्धवटराव
Fri, 05/01/2020 - 22:18 नवीन
मिपावर अजुन एक आयटम सदस्य अ‍ॅडवला :ड वेलकम टु मिपा :)
  • Log in or register to post comments

दूरदर्शनवर रामायण

कानडाऊ योगेशु
Fri, 05/01/2020 - 22:21 नवीन
दूरदर्शनवर रामायण महाभारताच्या मधल्या काळात काही मालिका होत्या त्यातील एकात ह्या कथेवर आधारित एक भाग होता. बहुदा "पोटली बाबा कि" ही ती मालिका असावी. (ती मालिका ही दाखवतील लॉकडाऊन अजुन वाढवला गेला तर.. राम चाहे लिला चाहे ह्या गाण्याची चाल ह्या मालिकेच्या शीर्षक गीताच्या चालीशी तंतोतंत जुळते.) त्यात ही कथा पाहिल्याचे आठवते आहे. म्हणजे बाकिचे काही आठवत नाही पण त्या न्हाव्याच्या पात्राचे जंगलात गेल्यानंतरचे "राजा के सर पे सिंग राजा के सर पे सिंग" हे रिपिटेड वाक्य आणि त्याच्या चेहर्यावरचे प्रत्येक वाक्यानंतरचे हलके होणारे हावभाव अजुन लक्षात आहेत.
  • Log in or register to post comments

आताच तुमचा बेचव बकवास लेख

आंबट चिंच
Tue, 06/02/2020 - 10:17 नवीन
आताच तुमचा बेचव बकवास लेख वाचला अणि इकडे आलो. तुमची लेखनशैली खरच खुशखुशीत आहे. बाकी प्रशांत कोर्नरचा उल्लेख केला म्हणजे तुम्ही ठाण्याचे असणार.
  • Log in or register to post comments

ठाण्यात नाही

शेर भाई
Wed, 06/03/2020 - 14:39 नवीन
ठाण्यात नाही, पण ठाण्याजवळच्याच मुंबईत. (मुलुंड नाही) तस बघाल तर चांगल्या आणि चवदार पदार्थांसाठी कुठेही, कितीही लांब जायची आपली तयारी असते. मागे एकदा असच "आगरी काळ्या मसाल्यातील कोंबडी" अर्नाळयाच्या जवळ कुठल्या तरी धाब्यावर मिळते अस कळले तेव्हा लगेच आमचा रणगाडा काढून अर्नाळयाला गेलो होतो, पण तेव्हा आमची स्वारी वाया गेली. नाही म्हणायला तिथे अर्नाळयाचे पक्षी अभयारण्य बघण्यात वेळ मात्र छान गेला तुमच्या प्रतिसादासाठी दिल से धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंबट चिंच

कर्नाळा पक्षी अभयारण्य

सोत्रि
Wed, 06/03/2020 - 15:04 नवीन
पक्षी अभयारण्य कर्नाळ्याला आहे हो अर्नाळयाला नाही. २७ वर्ष अर्नाळ्याजवळ राहून पक्षी अभयारण्य कसं माहिती नाही म्हणून गंडलो ना दोन मिनीटं! - (आगास्कर) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेर भाई

ध चा मा असा पण

शेर भाई
Wed, 06/03/2020 - 15:45 नवीन
मला नेरूळ आणि नेरळ पण असच फसवत असत. पण खरच थांकू, आता लक्षात राहील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

तुम्ही चुकुन अर्नाळ्याऐवजी कर्नाळ्याला गेलात का ?

अर्धवटराव
Wed, 06/03/2020 - 20:06 नवीन
तसं असल्यास तो ढाबा खरच असावा अर्नाळ्याला... ट्राय करा. तुमची कोंबडी मिस् होऊ नये हिच सदिच्छा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेर भाई

नाही तो कर्नाळाच होता

शेर भाई
Wed, 06/03/2020 - 23:34 नवीन
नाही तो कर्नाळाच होता, लिहताना चुकून अर्नाळा झाला. पण कोंबडी नंतर मिळाली कारण पुढच्या वेळेस स्थानिक जाणकारांना घेऊन गेलो होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

ऑस्सम

अर्धवटराव
गुरुवार, 06/04/2020 - 00:04 नवीन
वॉज इट वर्थ ? असल्यास कृपया ढाब्याचा पत्ता द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेर भाई

होती भन्नाट

शेर भाई
गुरुवार, 06/04/2020 - 17:45 नवीन
पण आता ढाब्याचे नाव नाही आठवत कारण तेव्हा आम्ही single होतो. नंतर आमच्या Better-half ने तिच्या खास आगरी मैत्रिणीकडून तो आगरी काळामसाला घरातच मागवून "घरगुती काळ्या मसाल्यातील कोंबडी-भाकरी" खिलवली. तसंपण आता तिथले बरेच ढाबे रस्ते रुंदीकरणात इतिहास जमा झालेत.
  • Log in or register to post comments

हि गोष्ट खूप खूप वर्षांपूर्वी

वीणा३
Fri, 06/05/2020 - 21:54 नवीन
हि गोष्ट खूप खूप वर्षांपूर्वी चांदोबा मध्ये वाचल्यासारखी वाटत्ये. परत वाचून मजा अली :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा