[कविता' २०२०] - क्या उखाड़ लिया?
क्या उखाड़ लिया?

वेळ मिळाला आहे अनायसे, तर संपवूया
कितीतरी वाचायची राहिलेली पुस्तकं,
अर्धवट लिहिलेल्या कविता, काही लेख.
असंच खूप काही, मनापासून ठरवलं.
धावपळीत रोजच्या, बरंच काही हरवलं.
डायरीच्या पानांनी मग हक्काने खडसावलं,
क्या उखाड़ लिया?
अपूरी स्वप्नं दूरुनच खुणावत राहिली
दिवस उलटले, कॅलेंडरची पानं बदलली
वसंत सरला, ग्रीष्मधग माथ्यावर आली
झाडांची पानं गळून गेली,
धुंदावणारी स्वप्नगंधा कोमेजून गेली.
दग्ध पळस, रक्तवर्णी जिव्हांनी फुत्कारला,
क्या उखाड़ लिया?
ज्यांच्या अंगा-खांद्यांवर खेळलो,
त्यांनाच खांदा देऊन आलो.
सरणावर थोडा, मीही जळून गेलो.
पोरकेपण नि पोक्तपण सोबत राहिले.
नकळत अशीच कित्येक सरलेली,
अन् थोडीफार उरलेली वर्षं खिजवतात,
क्या उखाड़ लिया?
क्या उखाड़ लिया?

वाचने
31575
वाचनखूण
प्रतिक्रिया
25
छान लिहिलंय. +१
+1
In reply to +1 by गणेशा
दिवस उलटले, कॅलेंडरची पानं
वा निव्वळ अप्रतिमदिवस उलटले, कॅलेंडरची पानं बदलली वसंत सरला, ग्रीष्मधग माथ्यावर आली झाडांची पानं गळून गेली, धुंदावणारी स्वप्नगंधा कोमेजून गेली. दग्ध पळस, रक्तवर्णी जिव्हांनी फुत्कारला,जबरदस्त!
+1
बेहतरीन +१
+1
+१ चांगली कविता
In reply to +१ चांगली कविता by सौन्दर्य
नाही,
In reply to नाही, by गणेशा
बरोबर
+१
लेखकाडून आलेला संदेश:
In reply to लेखकाडून आलेला संदेश: by साहित्य संपादक
अशीच वाचली आहे कविता -:))
In reply to लेखकाडून आलेला संदेश: by साहित्य संपादक
कौनसे झण्डे गाड लिये ?.... "कोणती मोठी तलवार गाजवली ?"
+१
+१
+१
शीर्षक
हातातून वाळू सरकून गेली की मग
In reply to हातातून वाळू सरकून गेली की मग by पाषाणभेद
नेमके!
कविता छान +१
प्रतिसाद देणार्या सगळ्यांचेच
एक हात फिरवलेली कविता
अंतरीचा भाव
+१