मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(सूरनळीचे उपयोग)

ज्ञानोबाचे पैजार · · जे न देखे रवी...
एका कोपर्‍यात अंग फुगवून बसली होती सूरनळी टोकावरल्या डोळ्यांनी मला पाहत होती || माझ्याशी बोलायला लागली ती जेव्हा खरे नाही वाटले मला तेव्हा तुम्हालाही माहित आहे ही आहे थापेची गोळी || " अनेक गोष्टीं मधे उपयोग माझे जळी स्थ्ळी तरी तुम्ही का बोलतात घालून घे रे सूरनळी हेअर पीन ने कान कोराल तर त्याने सूजेल कानाची पळी || पूर्वी आदेशांना होता मोठा बाजार भाव साहेबांच्या मागे धावायचे सगळे रंक आणि राव आता मात्र न्याय आहे बळी तो कान पिळी || कधीही मी कामी येई सुटता कानी खाज कोणत्याही कागदाचा तुकडा शोधा सोडून लाज मोठ्या निगुतीने मग त्याची गुंडाळी वळी || उपयोग संपल्यावर तुम्ही मला कचर्‍यात टाकता चोळामोळा करता आणि कुठेही भिरकावता क्षणार्धात माझा उपयोग तुम्ही विसरुन जाता मी मात्र तुडवली जाते कोणाच्याही पायदळी || कानात फिरवा बघा कशी झोप उडते नाकात फिरवलेत तर फटाफट शिंक येते नाक मोकळे होताच चेहर्‍याला येईल झळाळी || इतक्यात घाईने गुरुजी आले वर्गात काय कचरा केला आहे? ओरडले मला जोरात त्यांच्या ओरडण्याची मी केली मग सुरनळी आणि विचारले घालू का ती योग्य स्थळी || पैजारबुवा,

वाचने 6239 वाचनखूण प्रतिक्रिया 8

In reply to by पाषाणभेद

पाभे क्षमा करा पेरणा लिवायची राहिली. कच्चा माल उत्तम प्रतिचा असेल तरच उत्तम दर्जाचे विडंबनारिष्ट बनवता येते. पैजारबुवा,

खिलजि गुरुवार, 12/12/2019 - 14:51
काल वाचायचं राहूनच गेलं .. झक्कास झालंय ,, फक्कड