महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक टक्केवारीच्या साहाय्याने मी काही मते बनवायचा विचार करतोय. मात्र "हा म्हणाला", "तो म्हणाला" वगैरे सारखी राजकारणी लोकांची मते मी आधार म्हणून घेणार नाहीये. तर्क करताना कोणतेतरी सांख्यकीय गणित त्यामागे असावे असा उद्देश आहे. राजकीय धाग्यांवर बरीच हुशार लोक भरपूर लिखाण करतात. पण त्यासाठी टिव्ही, वर्तमानपत्रे यातील बातम्या यांचा आधार घेतात. मला वाटते हा आधार घ्यावाच पण तो कोणत्यातरी सांख्यकीय विश्लेषणाच्या साहाय्याने तपासून घ्यायला हवा. आपोआपच बिटवीन द लाईन्स वाचायची कला साध्य होऊ शकेल. तसेच ही माध्यमे आपल्याला शेंडी लावायची शक्यता कमी होऊ शकेल.
विधानसभा निवडणूकी बरोबरच टक्केवारीच्या आधारे आपली लोकशाही कुढे चालली आहे त्याबाबत माझे मत मांडायचाही विचार आहे. पण ते कधी जमेल माहीत नाही. किंवा प्रतिसादामध्येच मी त्याबाबत लिहीन.
मी एका धाग्यावर माझी मते मांडली होती. तीच परत देत आहे. त्यानंतर काही मतदारसंघांची उदाहरणे देत आहे. यासाठी अल्फाबेटीकली पहिल्या १० मतदारसंघांचा नमुना म्हणून मी अभ्यास केला व त्यातून वेगळे काहीतरी घडत असल्याचे जाणवणारे चार मतदार संघ निवडून त्याचे तक्ते जोडत आहे. याच पध्दतीने इतर जणं पण यात भर घालू शकतील. पण मतदान टक्केवारी व त्यातून निघणारा अन्वयार्थ असे त्याचे स्वरूप असेल तर बर होईल. सगळ्यांनाच एका वेगळया पध्दतीने विचार करायला किंवा शिकायला मिळू शकेल. इतकेच नव्हे तर बातम्यांवर विसंबून न राहता आपणही थोडेफार विश्लेषण करू शकू.
राजकारणावरील धागा म्हणजे निव्वळ लाथाळ्या, हे मत बदलले तर अशा प्रकारच्या धाग्यावर अनेक हुशार लोकं भाग घ्यायला लागावीत हा या धाग्या मागचा मुख्य उद्देश आहे.
---------------------------------------------
मी 13 Nov 2019 - 11:55 am ला मांडलेली मते पुढे देत आहे.
१. मला तरी असेच वाटतेय की, राकाँ व काँग्रेसच्या साहाय्याने मुख्यमंत्री पद मिळवायचे शिवसेनेने अगोदरच ठरवलेले असावे. अन्यथा निवडणूक निकाल लागण्याची प्रक्रिया चालू असतानाच, सर्व पर्याय खुले असण्याची घोषणा झाली नसती. ती घोषणा, एका प्रदीर्घ घटनेतील एक टप्पा असावी असेच माझे मत बनले. शिवसेनेच्या हातात कोणतीच हुकमाची पाने नव्हती हे आता कळल्यावर, शिवसेनेचा आक्रमकपणा पाहून माझे हे मत जास्त पक्का झालंय. मनसे शिवसेनेचा कट्टर शत्रू. त्यालापण शिवसेनेची मते जाताहेत हे जाणवल्यावर माझा हा संशय जास्तच बळावला. हे तपासायला पुण्याचे उदाहरण पुरेसे आहे.
अजून लढवलेल्या जागांवरची टक्केवारी जाहीर झाली नाहीये. ती मिळाली असती तर जास्त पुराव्यानिशी माझे मत मांडता आले असते. असो.
२. त्यामुळे जिथे भाजपाचा उमेदवार उभा होता तिथे शिवसेनेची बरीच मते राकाँ व काँग्रेसला गेली आहेत. कारण या दोघांचा निवडणूक निकालानंतर पाठिंबा मिळवायचा असेल तर त्यांचे आमदार निवडून आले पाहिजेत ही तर शिवसेनेचीच गरज बनते व भाजपाचे १४४ आमदार होऊ नयेत ही जबाबदारी ठरते. ह्या दोन्ही गोष्टी पवारसाहेबांच्या फायद्याच्या असल्याने त्यांनीही तोंडभरून आश्वासने दिली असणे शक्य आहे.
३. १९६७ पर्यंत काँग्रेसला विरोधकांची भिती वाटत नव्हती. पण लोहियांची विरोधी पक्षांची युती बनवून काँग्रेस विरोधात एकास एक उमेदवार देण्याची नीती यशस्वी होते म्हणाल्यावर, विरोधकांची एकजूट होऊ नये यासाठी डावपेच आखणे हे काँग्रेसचे मुख्य धोरण बनले.
त्यानुसारच पवारसाहेब राजकारण करतात व त्यात ते सद्या तरी सर्वात पाराविना आहेत असे वाटते. यावरून महाराष्ट्रात युती भारी पडतेय म्हणाल्यावर त्यात फूट पाडणे हेच आघाडीचे दिर्घकालीनधोरण असणार यात काही संशय नाही.
थोडक्यात महाराष्ट्रातील निवडणुकांत काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्रित लढणे व शिवसेना व भाजपाने वेगवेगळे लढणे हा एक मार्ग आहे जो आघाडीला सत्तेपर्यंत नेऊ शकतो.
जर युती तुटली असेल तर ती फक्त ताणली जात राहील एवढेच फक्त पाहावयाचे आहे व परत जोडली जाऊ नये यासाठी प्रयत्न करावयाचे आहेत. त्यासाठी शिवसेनेचे सरकार यावयाची जरूरी नाही.
४. परत निवडणुका झाल्या तर त्या शिवसेना व भाजपाने एकत्रित लढवू नयेत एवढीच आघाडीची इच्छा किंवा ध्येय असावे असे वाटतेय. यासाठी प्रथम राज्य यांना बाजूला केले. या राज्यच त्रासातून शिवसेना खूप मागे खेचली गेली. बाळासाहेबांची पुण्याईही कामी येऊ शकली नाही. त्याचा फायदा त्यांना २०१४ पर्यंत झाला. फोडा व झोडा पध्दतीत नेहमी रागीट माणसाला हाताशी धरले जाते. कारण रागाच्या भरात त्याच्यावर कब्जा मिळवणे सोपे असते. त्यामुळे यावेळी राऊतांद्वारे शिवसेनेला जाळ्यात पकडण्यात आलेय. राऊतांवरचा ऊध्वजींचा विश्वास हे हत्यार वापरले गेलंय.
५. पण मोदी उदयानंतर सगळंच गणित फिसकटायला लागलेय. शिवसेनेच्या बळावर मोठे होण्याची अगतिकता भाजपाची राहिलेली नाही. भाजपचे वाढते बळ त्याचा पुरावा आहे. त्यामुळे परत निवडणुका झाल्या व शिवसेना वेगळी लढली तर त्यांची आघाडीला गेलेली मते परत फिरतील.
भाजपकडे या वेळेस इच्छुक जास्त झाले होते व जागा २०१४ पेक्षा कमी झाल्या होत्या. पण परत निवडणुका झाल्यास, लढायच्या जागा १५६ वरून २८८ झाल्यामुळे बंडखोरांचा प्रश्न सुटेल. भाजपातील लाॅयल कार्यकर्ते त्यामुळे खूश झाल्याने पुढच्या निवडणुकीत मतदान टक्केवारी वाढेल, जी शहांची नेहमीचीच रणनीती आहे.
६. जर शिवसेनेने पुढील निवडणुकीत आघाडीशी हात मिळवणी केली तर भाजपाला ते हवेच असेल. धृवीकरण भाजपाला नेहमीच फायद्याचे ठरत आले आहे.
काँग्रेस विरोधातील आपला अवकाश शिवसेना आपणहून सोडून देत असेल तर भाजपा नक्कीच खूश होईल. भाजपा यापध्दतीनेच मोठी होत आली आहे. मात्र यासाठी संधीची वाट बघत बसायला लागते व त्यासाठी खूप पेशन्स लागतो. तो मोदी शहांकडे नक्कीच आहे असे वाटते.
७. थोडक्यात, भाजपा, काँग्रेस व राकाँ यांचे पुढील धोरण निव्वळ वेळकाढूपणाचे असेल असे वाटते. यासाठी एखादी कोर्टकेस वगैरे सारखा उपाय योजणे हा मार्ग मस्त. जो काँग्रेस नेहमीच अवलंबते. फक्त कोणाकडे तरी बोट दाखवता आले की झाले.
राऊतांनी बोलणी पवारांशी केली. ते आता पवारांकडे बोट दाखवत असतील. पवार बोट दाखवताहेत काँग्रेसकडे. काँग्रेस बोट दाखवतीय केरळ काँग्रेसकडे.
८. पण
जास्तीचं काहीही न देता शिवसेना जवळ येत असेल तर भाजपा ही संधी साधेल असं वाटते.
दीड दोन महिने फडवणीस संपले संपले असं वाटत असताना परत उभे राहतात, असं बऱ्याच वेळेस झालंय. या वेळेसही हे होऊ शकते.
या वेळेसही फडणवीस यांनी समारोपाच्या वेळी युतीच सरकार बनवेल असं म्हणूनच ते थांबले आहेत.
९. असंच होणं योग्य असेल. कारण राजकारणात डाव ओळखून प्रतिडाव टाकावा लागतो. बाकी सगळे गौण याचे भान राखावे लागते. जर युती तुटावी हा डाव असेल तर युती टिकवणे हाच प्रतिडाव असतो. शिवसेना कशी वागली याबाबत सर्वसामान्य भाजपा कार्यकर्त्यांना येणारा राग नेत्यांना पोटात ठेवावा लागतो.
भाजप पुढेमागे युती तोडेलही. पण ती सोयीची वेळ ते ठरवतील. पवार साहेबांनी त्यांच्या सोयीने निवडलेली वेळ भाजपाने साधणे शहाणपणाचे ठरणार नाही.
अर्थात हे सर्व राजकारणी माझ्यापेक्षा नक्कीच हुशार असणार म्हणा. :)
---------------------------------------------------
२०१९ विधानसभेच्या टक्केवारीच्या गमतीजमती
१. अक्कलकुवा (1)
आघाडी
| पक्ष |
२०१४ |
२०१९ |
| राष्ट्रवादी |
२७.७८ |
|
| काँग्रेस |
३६.७९ |
४१.२६ |
| एकूण |
६४.५७ |
४१.२६ |
युती
| पक्ष |
२०१४ |
२०१९ |
| शिवसेना |
५.९१ |
४०.२१ |
| भाजप |
१८.६८ |
|
| एकूण |
२४.५९ |
|
इतर दखलपात्र पक्ष
| पक्ष |
२०१४ |
२०१९ |
| अपक्ष |
४.५१ |
१२.६९ |
| आप |
|
२.०२ |
| एकूण |
४.५१ |
१४.७१ |
२०१४ ला नागेश पडवी यांनी भाजपातर्फे उभे राहून १८.६८% मते मिळवली होती. तर आमश्या पडवी यांना ५.९१% मते मिळाली होती. खरं तर या जागेवर भाजपाने जास्त मते मिळवली असूनही ही जागा शिवसेनेला सोडायला लागली. मागच्या वेळेचा भाजपा उमेदवाराला ऐनवेळी माघार घ्यायला लावल्यावर त्याने चिडून जाऊन बंडखोरी केली. तरीही या वेळेस शिवसेनेला ४०.२१ टक्के मते मिळाली. मतांची ही वाढ आश्चर्यकारकच आहे.
खरे तर २०१४ ला राष्ट्रवादी काँग्रेस२७.७८ टक्के व काँग्रेसला ३६.७९ टक्के मते मिळाली होती. म्हणजे आघाडीला एकूण ६४.५७ टक्के मते मिळाली होती. ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आली होती व काँग्रेस जिंकणार हे नक्की होते. त्यात परत युतीमध्ये बंडखोरी झालेली. म्हणजे अगदीच एकतर्फी अशी ही लढत होती. पण या वेळेस काँग्रेसला ६४.५७ टक्क्यांच्या ऐवजी फक्त ४१.२६ टक्केच मते मिळाली. म्हणजे युतीकरूनही मागच्या वेळेपेक्षा फक्त ४.४७ टक्के एवढीच वाढ?
मग राष्ट्रवादीची २७.७८ टक्कें पैकी ४.४७ काँग्रेसला मिळाली असतील तर राष्ट्रवादीची उरलेली २३.३१ कुढे गेली ?????
२०१४ साली शिवसेना व भाजप यांना एकत्रित २४.५९ टक्के मते मिळाली होती. त्यात परत भाजपाचा बंडखोर उभा होता. म्हणजे मते मागल्यावेळेपेक्षा कमी व्ह्यायला पाहिजे होती. पण शिवसेनेला मिळाली चक्क ४०.२१ टक्के. काँग्रेसपेक्षा फक्त १.०५ टक्के कमी. अगदी नशीब बलवत्तर म्हणून ही जागा कॉग्रेसला मिळालेली आहे.
निवडणूक निकालानंतरच शिवसेना राष्ट्रवादीजवळ आली असं का समजायचे?
-----------------------------------------------------------------------
२. अहमदनगर शहर (225)
आघाडी
| पक्ष |
२०१४ |
२०१९ |
| राष्ट्रवादी |
२९.७९ |
४७.३३ |
| काँग्रेस |
१६.३३ |
|
| एकूण |
४६.१२ |
४७.३३ |
युती
| पक्ष |
२०१४ |
२०१९ |
| शिवसेना |
२७.७९ |
४१.१९ |
| भाजप |
२४.०८ |
|
| एकूण |
५१.८७ |
४१.१९ |
इतर पक्ष
| पक्ष |
२०१४ |
२०१९ |
| aimim |
|
४.०४ |
| वंचित |
|
१.६९ |
| बसप |
०.३५ |
१.७२ |
| एकूण |
०.३५ |
७.४६ |
इथे राष्ट्रवादीचा उमेदवार उभा होता. २०१४ ला आघाडीला एकत्रित ४६.१२ टक्के मते होती या वेळेस ती ४७.३३ टक्के झाली. म्हणजे आघाडीचा धर्म काँग्रेसने पाळला असे म्हणावे लागेल.
मात्र २०१४ ला युतीला एकत्रित मते ५१.८७ टक्के असताना शिवसेनेला ४१.१९ टक्के मतेच मिळाली आहेत. शिवसेनेला अपेक्षेपेक्षा१०.६८ टक्के मते कमी मिळालेली आहेत. याचा अर्थ भाजपाची २४.०८ टक्के पैकी १०.६८ टक्के मते फुटली आहेत. पण त्याचा दुसरा अर्थ असा की, भाजपाच्या अंदाजे १४ टक्के लोकांनी युती धर्म पाळलेला असावा.
२०१४ साली चारही प्रमुख पक्ष एकत्र लढल्यामुळे या चौघांनीच ९७.९९ टक्के मते मिळवली होती. बाकीचे सगळे मिळून २ टक्के होते. त्यात बसपा ५व्या क्रमांकावर होती व तिला ०.३५ टक्के मते होती. मात्र २०१९ साली या सर्व पक्षांना पालवी फुटलेली दिसून येते. याला कारण भाजपाची फुटलेली मते आहेत हे निश्चित होते.
याचाच दुसरा अर्थ असा की, भाजपाची मते राष्ट्रवादीकडे गेलेली नाहीत.
------------------------------------------------
३. अकोला पश्चिम (३०)
इथे प्रथमदर्शनी असं वाटतं की काँग्रेसने वंचितशी आघाडी केली असती तर काँग्रेस जिंकली असती. त्यामुळे वंचितचा फायदा भाजपाला झाला अशीच सर्वसाधारण समजूत असते. पण २०१४ ची टक्केवारी पाहिली तर चित्र वेगळेच दिसते.
युती
| पक्ष |
२०१४ |
२०१९ |
वध/घट |
| भाजपा |
४६.७७ |
४३.२३ |
| शिवसेना |
७.३९ |
|
| एकूण |
५४.१६ |
४३.२३ |
-१०.९३ |
आघाडी
| पक्ष |
२०१४ |
२०१९ |
वध/घट |
| काँग्रेस |
६.४० |
४१.७० |
| राष्ट्रवादी |
१८.८५ |
|
| एकूण |
५४.१६ |
४३.२३ |
+१६.४१ |
बीबीएम व वंचित
| पक्ष |
२०१४ |
२०१९ |
वध/घट |
| बीबीएम |
१६.७२ |
|
| वंचीत |
|
१२.२१ |
| एकूण |
१६.७२ |
१२.२१ |
-४.४९ |
शिवसेनेची मते भाजपाला मिळालेली नाहीत तर ती चक्क काँग्रेसला गेलेली दिसत आहेत. (काँग्रेसचा पण पाठिंबा मिळेल असे तोंडी आश्वासन राष्ट्रवादीकडून शिवसेनेला मिळाले होते की काय?) तसेच भाजपाची मतेही ३ टक्के कमी झालेली दिसत आहेत. ही का कमी झाली याचा विचार भाजपाला करावाच लागेल.
तर वंचितच्या समावेशामुळे पूर्वीच्या बीबीएमची काही मते (मुख्यत्वेकरून मुस्लिम मते असावीत) काँग्रेसकडे वळलेली दिसत आहेत. याचा अर्थ वंचितमुळे काँग्रेसच फायदाच झालेला दिसून येतो. अन्यथा काँग्रेसची मते ४.४९ टक्क्याने कमी झाली असती.
त्यामुळे वंचीत व ओवेसी एकत्र आले तर भाजपाचा फायदा होतो तर वंचीतने ओवेसींची साथ सोडली तर काँग्रेस व राष्ट्रवादीचा फायदा होतो. असाही अर्थ काढता येऊ शकतो. २०१९ ला तरी वंचितमुळे लोकसभेला भाजपाचा व विधानसभेला काँग्रेसचा फायदा झालेला दिसून येतो. काँग्रेसच्या वाढलेल्या १६.४१ टक्के मतांचा असा हिशोब लावता येतो.
-------------------------------------
टक्केवारीच्या आधारावरील हायपोथेसीसची उभारणी
येथे आणखी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. याच टक्केवारीच्या आधारे बातम्यांचा अर्थ लावता येऊ शकतो. उदाहरणासाठी एका बातमीचा अर्थ लावायचा प्रयत्न करू.
लोकसभा निवडणुकांचा निकाल आल्यावर वंचितची आघाडीशी बोलणी चालू असल्याची बातमी आली होती. तसेच वंचितनी ओवेसींचा संबंध सोडल्याचे पण जाहीर केले होते. वंचितने ओवेसींशी संबंध तोडले तरच जागावाटपाबद्दल बोलणी करता येतील अशी एखादी अट आघाडीने वंचितला घातली होती की काय अशी दाट शंका येतीय. त्यानुसार वंचितने ओवेसींशी संबंध तोडल्यावर आघाडीचे काम झाले होते. आता वंचितशी आघाडी करायची जरूरी नव्हती यास्तव त्यानंतर वंचितला फक्त आशेवर ठेवण्यात आले, जेणेकरून वंचितने परत ओवेसींशी संगनमत करू नये.
ही फक्त शंका आहे. पण तशीच एखादी गोष्ट परत घडली की दाट शंका येणारच ना?
एनडीएशी संबंध तोडले तरच पुढची बोलणी करता येतील अशी अट शिवसेनेला घातली गेली होती. शिवसेनेने पण ती अट पाळण्यासाठी सावंतांना परत बोलावून घेतले. त्यानंतर चर्चेचा घोळ चालू ठेवून शिवसेनेला आशेवर ठेवले. आता भाजपानेच युती तुटली असल्याच जाहीर केल्यावर मात्र सगळंच बदललं आहे. शरद पवारांनी तर स्पष्टच सांगून टाकलंय की, शिवसेनेला सरकार बनवायला पाठिंबा देण्याबाबत त्यांची व सोनियांची अजून चर्चाच झालेली नाही.
एक अंदाज असाही आहे की, राष्ट्रवादीला सरकार व्हावं असं वाटतंय. तसे झाले तर राष्ट्रवादी पुढील निवडणुकीपर्यंत आपली ताकद आणखी वाढवू शकेल.
तर काँग्रेसला राष्ट्रवादीचा संशय येतोय. निवडणुकी अगोदरच शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये काहीतरी संगनमत झालेले आहे. संगनमत असायला हरकत नाही पण ते संगनमत काँग्रेसच्या मुळावर येत असेल तर काँग्रेसला कसे चालेल. तसे पुरावे मतदान टक्केवारीतून काँग्रेसला मिळाले असावेत. सरकार स्थापन झाले तर आणखी काय काय होईल काय माहीत? मला वाटते यामुळेच युती तुटेपर्यंत सोनियाजी शरदरावांच्या नाटकात काम करत राहिल्या. नंतर मात्र त्यांनी त्यांच्याबाजूने नाटकावर पडदा टाकला.
टक्केवारीच्या आधारावरील हायपोथेसीस समाप्त. :)
विश्लेषण पटते आहे.
अप्रतीम विश्लेषण !
छान विश्लेषण केलेत..
In reply to छान विश्लेषण केलेत.. by आनन्दा
राज यांनी फार चुका केल्या
In reply to छान विश्लेषण केलेत.. by आनन्दा
अवांतर, आपण मिपाकर वाटत नाही.
In reply to अवांतर, आपण मिपाकर वाटत नाही. by जॉनविक्क
आम्ही जुने नाही हो.. आम्ही पण
In reply to आम्ही जुने नाही हो.. आम्ही पण by आनन्दा
9+ वर्षे दिसली म्हणून जुने म्हटले हो
In reply to छान विश्लेषण केलेत.. by आनन्दा
भाजपाला ८०च्या आत ठेवायचे
मस्त विश्लेषण.
मायबोलीवरील माझी पोस्ट इथे
तुमचे विष्लेषण आणि त्यामगिल
In reply to तुमचे विष्लेषण आणि त्यामगिल by गणेशा
शिवसेना के दो नेताओं की हत्या
In reply to तुमचे विष्लेषण आणि त्यामगिल by गणेशा
अहो, मी केलेलं विश्लेषणच
In reply to अहो, मी केलेलं विश्लेषणच by शाम भागवत
मुळात नवा आणि जरा भरोस्याचा
In reply to अहो, मी केलेलं विश्लेषणच by शाम भागवत
बरोबर
बरेचदा राजकीय विषयावर सामान्य लोक व्यक्त होत नाहीत
In reply to बरेचदा राजकीय विषयावर सामान्य लोक व्यक्त होत नाहीत by जॉनविक्क
अगगोबाई :)
राज ठाकरेंच्या त्रासातून मुक्तता
वंचितची मते कमी झाली का?
मतदानाच्या टक्केवरीबद्दल
In reply to मतदानाच्या टक्केवरीबद्दल by सचिन
नक्कीच , माझ्या ओळखतील्या
हे बघा काही उपयोग होतो आहे का ..........
येथले सगळे अंदाज चुकले.
In reply to येथले सगळे अंदाज चुकले. by पाषाणभेद
अर्थात हे सर्व राजकारणी
Wait & Watch
Wait & Watch
Wait & Watch
अजितदादा बोल्डनेस साठी प्रसिद्ध आहेत (थोडा तोल जातो)
मी अजित पवारांच्या संदर्भात
In reply to मी अजित पवारांच्या संदर्भात by शाम भागवत
नक्कीच, आणी नेमका हाच वर्ग आत्ता राजकारणी जसं वागत आहेत
In reply to मी अजित पवारांच्या संदर्भात by शाम भागवत
ह्या ध्रुविकरणाचे
छान विश्लेषण. .....
छान विश्लेषण केलेले आहे ..
https://youtu.be/CLUzgIURz24
जुने नाटक नव्या संचात?
In reply to जुने नाटक नव्या संचात? by शाम भागवत
चला कोणीतरी उद्धव ठाकरे या
आपण सगळयांनी ऐकावे असे
जबरदस्त ध्रुविकरण झालय.
In reply to जबरदस्त ध्रुविकरण झालय. by शाम भागवत
+1
In reply to जबरदस्त ध्रुविकरण झालय. by शाम भागवत
मला
In reply to मला by जॉनविक्क
रोजगार निर्मिती ही म्हटलं तर
In reply to मला by जॉनविक्क
जानराव
In reply to मला by जॉनविक्क
रोजगार निर्मिती यावर उत्तर
In reply to रोजगार निर्मिती यावर उत्तर by शाम भागवत
म्हणजे आज रोजच्यासारखं दुपारी
In reply to रोजगार निर्मिती यावर उत्तर by शाम भागवत
मि सुध्दा ह्या प्रकाराला
In reply to जबरदस्त ध्रुविकरण झालय. by शाम भागवत
उद्धव ठाकरे मला पाहिजे होते
In reply to उद्धव ठाकरे मला पाहिजे होते by शाम भागवत
मागच्या ७.५ वर्षे सत्ता होती.
In reply to मागच्या ७.५ वर्षे सत्ता होती. by अमरेंद्र बाहुबली
२०२९ च्या लोकसभा निकालापर्यंत
In reply to मागच्या ७.५ वर्षे सत्ता होती. by अमरेंद्र बाहुबली
फडणवीसांच्या निवडणूक
In reply to फडणवीसांच्या निवडणूक by टीपीके
माहिती बद्दल धन्यवाद
In reply to माहिती बद्दल धन्यवाद by मुक्त विहारि
असू दे हो.
In reply to फडणवीसांच्या निवडणूक by टीपीके
@टीपीके,
In reply to @टीपीके, by शाम भागवत
म्हणजे एकूणच
In reply to म्हणजे एकूणच by टीपीके
२-४ उद्योग नक्कीच गेले. कारण
In reply to २-४ उद्योग नक्कीच गेले. कारण by शाम भागवत
अच्छा, म्हणजे हे गुजराथला
In reply to अच्छा, म्हणजे हे गुजराथला by टीपीके
हे सगळे मुद्दे मविआच्या
In reply to २-४ उद्योग नक्कीच गेले. कारण by शाम भागवत
कारण मविआ सरकारने काही
कारण मविआ सरकारने काही हालचालच केली नाही.सहमत, वेदांता फॉक्सकॉन पळवल्यावर मविआ चे मामू एकनाथ शिंदेनी सांगितले होते ना? मोदीजी ह्याहून मोठा देणार आहेत म्हणे प्रकल्प?In reply to कारण मविआ सरकारने काही by अमरेंद्र बाहुबली
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to मनोरंजक प्रतिसाद.... by मुक्त विहारि
म्हणजे प्रकल्प पळवला असे का?
In reply to म्हणजे प्रकल्प पळवला असे का? by अमरेंद्र बाहुबली
लोकं स्थलांतर का करतात?
In reply to मनोरंजक प्रतिसाद.... by मुक्त विहारि
टाटा चा एवढा मोठा उद्योग
In reply to टाटा चा एवढा मोठा उद्योग by सुबोध खरे
विश्लेषण करणे,
In reply to २-४ उद्योग नक्कीच गेले. कारण by शाम भागवत
उद्योग
"आमच दिया" ऐवजी आमचा दसरा असे
@जॉनविक्क
शाम सर उत्तम _/\_
व्यवसाय सुलभतेचा निर्देशांक
सर टोबी,
In reply to सर टोबी, by शाम भागवत
हा धागा महाराष्ट्राच्या
In reply to सर टोबी, by शाम भागवत
@ शाम भागवत
सर्वात महत्वाचे म्हणजे अ
In reply to सर्वात महत्वाचे म्हणजे अ by ऋतुराज चित्रे
ही बातमी ४ महिने जुनी आहे..
In reply to ही बातमी ४ महिने जुनी आहे.. by आनन्दा
एव्हाना संपूर्ण वाहन उद्योगचे
In reply to एव्हाना संपूर्ण वाहन उद्योगचे by ऋतुराज चित्रे
वाहने जप्त करणे बँकांना परवडत
In reply to वाहने जप्त करणे बँकांना परवडत by शाम भागवत
आपण आपला मुद्दा संयत शब्दांत
In reply to आपण आपला मुद्दा संयत शब्दांत by ऋतुराज चित्रे
ते वाक्य टाईप केले तेव्हांच
In reply to सर्वात महत्वाचे म्हणजे अ by ऋतुराज चित्रे
हम्म्.
In reply to हम्म्. by शाम भागवत
करारावरील सही न केल्याने इथले
In reply to करारावरील सही न केल्याने इथले by शाम भागवत
शाम सर
In reply to शाम सर by गोंधळी
नोटाबंदी बद्दल मला काहीच
In reply to नोटाबंदी बद्दल मला काहीच by आनन्दा
नोटाबंदी
In reply to नोटाबंदी by गोंधळी
खरे आहे, मी काही प्रमाणात
In reply to खरे आहे, मी काही प्रमाणात by आनन्दा
कांदा
In reply to कांदा by गोंधळी
कदाचित हेच कारण असेल
In reply to कदाचित हेच कारण असेल by आनन्दा
माफ करा
In reply to माफ करा by गोंधळी
पाच ट्रेलिअन च गणित मला यायची
In reply to पाच ट्रेलिअन च गणित मला यायची by आनन्दा
तुम्हाला भक्त आहोत हे सांगायचे आहे
In reply to कांदा by गोंधळी
मी तर्कस्तानकडून घेतलेल्या
आपण बोलणी करत आलोय, पण
In reply to आपण बोलणी करत आलोय, पण by शाम भागवत
नोटबंदी, ३७०, जीएसटी, काश्मिर
In reply to आपण बोलणी करत आलोय, पण by शाम भागवत
अमेरिका - जपान वगैरे देश
In reply to अमेरिका - जपान वगैरे देश by आनन्दा
पण आता चीनचा विधिनिषेधशून्य
पण आता चीनचा विधिनिषेधशून्य भस्मासुर होउन त्यांच्यावर उलटलाय.हे विधान us व china ट्रेड वॉर च्यानु शनगाने आहे की इतर विदा उपलब्ध आहे म्हणून केले आहे ? ट्रेड वॉर हे वेगळं प्रकरण आहे असे वाटतेIn reply to पण आता चीनचा विधिनिषेधशून्य by जॉनविक्क
केवळ ट्रेड वॉर हा विषय
In reply to केवळ ट्रेड वॉर हा विषय by आनन्दा
माझं मत थोडं वेगळं आहे. १९७७
थोडक्यात १९८० पासून काँग्रेसचा जनाधार कमी होत असून त्याला अपवाद १९९९ चा आहे. पण त्यानंतरही काँग्रेस व राष्ट्रवादी यांचा जनाधार घसरत चाललेला असून तो ट्रेंड याही निवडणूकीत कायम आहे. भाजप बंडखोरांची मते लक्षात घेतली तर भाजपाचा जनाधार घटलेला नसून तो वाढलाय असं दिसतयं. यावेळचे सत्तांतर पाहिल्यावर मला तरी प्लासीची लढाईच आठवतेय.
In reply to माझं मत थोडं वेगळं आहे. १९७७ by शाम भागवत
माझं याबाबतीतील एक गृहीतक
In reply to माझं याबाबतीतील एक गृहीतक by आनन्दा
"राष्ट्रवादीचा मुळात विचारच वेगळा आहे"
In reply to माझं मत थोडं वेगळं आहे. १९७७ by शाम भागवत
एक वेळ राष्ट्रवादीचा जनाधार
In reply to एक वेळ राष्ट्रवादीचा जनाधार by यशोधरा
जाॅनविक्क साहेब,
In reply to जाॅनविक्क साहेब, by शाम भागवत
__/\__
In reply to जाॅनविक्क साहेब, by शाम भागवत
आपल्या धाग्यावरुन रजा घ्यावी
In reply to आपल्या धाग्यावरुन रजा घ्यावी by यशोधरा
तुमच्यासारख्यांनी यावं हीच तर
In reply to आपल्या धाग्यावरुन रजा घ्यावी by यशोधरा
नको नको हवं तर मी प्रेमळ
In reply to आपल्या धाग्यावरुन रजा घ्यावी by यशोधरा
यशोधरा ताई, तुम्ही बोलत रहा.
In reply to यशोधरा ताई, तुम्ही बोलत रहा. by गणेशा
गणेशा, मला जिथे मत मांडावेसे
In reply to गणेशा, मला जिथे मत मांडावेसे by यशोधरा
हायला
In reply to हायला by जॉनविक्क
:)
In reply to माझं मत थोडं वेगळं आहे. १९७७ by शाम भागवत
शेखर गुप्ता
इतरांप्रमाणे मी ही मोदींचा थोडाभोत पंखा आहे
In reply to इतरांप्रमाणे मी ही मोदींचा थोडाभोत पंखा आहे by जॉनविक्क
हे आज वाचलं. त्यावेळेसही
मस्त चर्चा चाललेली आहे आवडले.
In reply to मस्त चर्चा चाललेली आहे आवडले. by गणेशा
मला अजूनही confusion आहेच
In reply to मला अजूनही confusion आहेच by जॉनविक्क
भाजपा नेहमीच आपल्या चुकी साठी
In reply to भाजपा नेहमीच आपल्या चुकी साठी by गणेशा
:D
In reply to मला अजूनही confusion आहेच by जॉनविक्क
८० तास सरकार ही नेम्कि काय
In reply to ८० तास सरकार ही नेम्कि काय by आनन्दा
अतिआत्मविश्वासाने दिल्लीत राष्ट्रपती शासनाचा उद्योग केला आणी
In reply to अतिआत्मविश्वासाने दिल्लीत राष्ट्रपती शासनाचा उद्योग केला आणी by जॉनविक्क
नशीब त्या निवडणुकीत भाजपाला तिथे आघाडी करण्याएव्हड्या
In reply to नशीब त्या निवडणुकीत भाजपाला तिथे आघाडी करण्याएव्हड्या by जॉनविक्क
जम्मू मध्ये नेहमीच भाजप येतो.
In reply to जम्मू मध्ये नेहमीच भाजप येतो. by आनन्दा
विषय जम्मू काश्मीरचा होता, फक्त जम्मूचा नाही.
In reply to विषय जम्मू काश्मीरचा होता, फक्त जम्मूचा नाही. by जॉनविक्क
भाजपाने राष्ट्रपती राजवट लागू
In reply to ८० तास सरकार ही नेम्कि काय by आनन्दा
कदाचित हेगडेंनी मुद्दामच ही
कदाचित हेगडेंनी मुद्दामच ही बाईट दिलेली असू शकते, की पवाराना दाखवण्यासाठी, की त्यांच्या बुडाखाली टाइम बाँब आहे. परंतु ती झाकली मूठच राहणार कायम. आपल्यालाबाईट दिली म्हणजे हमखास हे घडलं नाहीये. मला तरी यादोन दिवसात कोणाचा कोणापासून ससेमीरा 80 तासात चुकला याबाबत कसलीच अधिकृत बाईट वाचनात आली नाहीIn reply to कदाचित हेगडेंनी मुद्दामच ही by जॉनविक्क
ते कधीच बाहेर येणार नाही.
In reply to ते कधीच बाहेर येणार नाही. by आनन्दा
आता बाहेर काही येणारच नाही म्हटल्यावर
नवीन राज्य सरकारवर सगळेच दबाव
In reply to नवीन राज्य सरकारवर सगळेच दबाव by यशोधरा
मूड आलाकी
In reply to नवीन राज्य सरकारवर सगळेच दबाव by यशोधरा
तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी परिस्थिती होणार का?
In reply to तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी परिस्थिती होणार का? by धर्मराजमुटके
कठीण आहे.
मी मुंबई महानगर पालिकेच्या
In reply to मी मुंबई महानगर पालिकेच्या by शाम भागवत
थोडक्यात ताकदवान आमदार
In reply to थोडक्यात ताकदवान आमदार by गणेशा
राजकारण हा माझा प्रांत नाही.
In reply to थोडक्यात ताकदवान आमदार by गणेशा
घोडेबाजार पध्दतीमधील ह्या
In reply to मी मुंबई महानगर पालिकेच्या by शाम भागवत
अजितदादांना तर नवसंजीवनी
अजितदादांना तर नवसंजीवनी मिळण्याची संधी आहे.अजितदादांना नवसंजिवनी मिळाली.शरदरावांनाही याची जाणीव झाली असेलच.हे जरा थोडे उशिराने झाले.मुद्दे मस्त आहेत
'मी राजीनामा द्यायला तयार',
In reply to 'मी राजीनामा द्यायला तयार', by अमरेंद्र बाहुबली
बिनधास्त झोपा....
In reply to बिनधास्त झोपा.... by मुक्त विहारि
आयोगाने अशी साक्ष डीने म्हणजे
In reply to आयोगाने अशी साक्ष डीने म्हणजे by अमरेंद्र बाहुबली
मनोरंजक प्रतिसाद....
खरच राजीनामे द्यायला पाहिजेत.
खरच राजीनामे द्यायला पाहिजेत.
In reply to खरच राजीनामे द्यायला पाहिजेत. by मुक्त विहारि
आता सेटिंग करणाऱ्यांना जास्त
In reply to आता सेटिंग करणाऱ्यांना जास्त by अमरेंद्र बाहुबली
मनोरंजक प्रतिसाद....
In reply to आता सेटिंग करणाऱ्यांना जास्त by अमरेंद्र बाहुबली
मनोरंजक प्रतिसाद....
इव्हीएम वर विश्वास नाही,
In reply to इव्हीएम वर विश्वास नाही, by अमरेंद्र बाहुबली
आनंद आहे....
आदित्य ठाकरेंनी राजीनामा
इंडिया ब्लॉक सुप्रीम कोर्टात
In reply to इंडिया ब्लॉक सुप्रीम कोर्टात by अमरेंद्र बाहुबली
आनंद आहे....
In reply to इंडिया ब्लॉक सुप्रीम कोर्टात by अमरेंद्र बाहुबली
स्वागतार्ह निर्णय
In reply to स्वागतार्ह निर्णय by चंद्रसूर्यकुमार
तोंड कायमच बंद होणार नाही.
In reply to तोंड कायमच बंद होणार नाही. by रात्रीचे चांदणे
अजून काही गोष्टी राहिल्या...
In reply to स्वागतार्ह निर्णय by चंद्रसूर्यकुमार
निवडणुक लढवायलाच बंदी घालण्यात यावी... नको....