आजवर मिपाच्या मुख्य फलकावर वेगवेगळ्या प्रकारचे धागे काढायची संधी मिळाली ( थ्यांक यू मिपा!) पण राजकारणाशी संबंधित धागा मात्र कधी काढला नव्हता. तेव्हा, आज राजकारणाशी संबंधित एक धागा. होऊ द्या खर्च.. वगैरे, वगैरे! आणि इतकी वर्षं मिपावर असून एकही राजकारण विषयक धागा काढला नाही, ह्याची एक मिपाकर म्हणून... वगैरे, वगैरे सुद्धा.
स्वतःची राजकारण विषयक मतं मिपावर मांडली नसली (मत असलं तरी ते मांडण्याइतका माझा अभ्यास नाही ) तरी मिपावरील राजकारण विषयक धागे वाचायला - त्यातले वितंडवाद टाळून - मला प्रचंड आवडतं. ह्या धाग्यांची वाचनसंख्या पाहता, बरेच जण हे धागे वाचत असावेत. मिपावर राजकारणाचा अभ्यास असणारे जाणकार आहेत -(त्यांची मते जाणून घ्यायची उत्सुकता आहेच)- तरी, अजून यंदाच्या निवडणुकांबाबत अंदाज वर्तवणारा धागा आला नाही बघता, म्हटलं, असा एक धागा काढावा. निवडणुकीच्या वातावरणात, कुठे कोण निवडून येईल? राज्य पातळीवर, देश पातळीवर कोणता पक्ष आपलं अस्तित्व पुराव्यानिशी शाबीत करेल, असं तुम्हांला वाटतं?
बोला, बोला! आपापले अंदाज, अपेक्षा, आकडेवारी मांडा मिपाकर मंडळी. फक्त नो वितंडवाद आणि नो तू तू मी मी. ओके? धन्यवाद!
माझा लिंबूटिंबू अंदाज आणि अपेक्षा: मागील वेळी भाजपची जशी लाट होती, तशी ह्या वेळी नसेल, तरीही बरेच ठिकाणी निसटते का होईना, भाजपाच्या पदरात विजय पडतील. काँग्रेसची टक्केवारी वाढेल पण दिल्ली का दरबार दूर होगा. काही प्रादेशिक पक्ष आणि त्यांची स्वतःच्या फायद्याची आणि देशाला रसातळाला नेणारी राजकारणं थांबली, संपली तर बरं होईल.
शेवटी, देशाची भरभराट व्हावी, सामान्य माणूस सुखी व्हावा, भ्रष्टाचार कमी व्हावा, अशा आपल्या माझ्या माफक अपेक्षा.
तेव्हा, सुरू हौद्यात चर्चा.
मिसळपाव
प्रतिक्रिया
खरडफळ्यावरील चर्चा चिकटवतोय.
खरडफळ्यावरील चर्चा चिकटवतोय.
==========================================================================
पैलवान — 18 Apr 2019 - 13:01
माझी अपेक्षा
एनडीए बहुमत ३०० . भाजप२००. युपीए २२०. काँग्रेस १७०. इतर प्रादेशिक पक्ष जे दोन्ही आघाड्यात नाहीत - २०-२५
अंदाज
एनडीए बहुमत - २९०. भाजप २२०. युपीए १८० . काँग्रेस १२०. इतर प्रादेशिक पक्ष जे दोन्ही आघाड्यात नाहीत - ६०-७०
==========================================================================
18 Apr 2019 - 7:26 pm | शाम भागवत
पैलवान साहेब,
काॅंग्रेस १७० हे खूप वाटतंय. त्यासाठी मतदान टक्केवारी खूप चांगली पाहिजे. २०१४ ला १९% होती.
भाजपाची ३१% होती.
गुजराथ,कर्नाटक,राजस्थान व मध्यप्रदेश मधील विधानसभा निवडणुकांत भाजपाची टक्केवारी कमी झालेली नाहीये. कर्नाटकांत तर चक्क वाढलीय.
रागा पंतप्रधान होण्याची शक्यता जर जाणवली असती तरच १० ते १२ टक्के किंवा जास्त मते त्यांच्या बाजूने फिरली असती. मग मात्र १५० चा पुढचा आकडा गाठता आला असता.
माझ्या मते या निवडणुकीत काॅंग्रेस व भाजपाला सोडून लढणारे महागठंधनवाले प्रादेशिक पक्ष संपतील. त्यांचे मतदार काॅंग्रेस व भाजपकडे जातील.
थोडक्यात भाजप व काॅंग्रेस दोधांची टक्केवारी सुधारणार आहे. पण भाजपला कमी टक्के वाढूनही जागा जास्त मिळतील. कारण ती वाढ ३१% मधे मिळवायची आहे.
काॅंग्रेसची टक्केवारी लक्षणीय दृष्ट्या सुधारणार असली तरी ती टक्केवारी १९% मधे मिळवायची आहे.
मला वाटते काॅंग्रेसला मिळणाऱ्या जागा दुप्पट होतील किंवा १०० च्या आत असतील.
तर भाजप मागीलप्रमाणे स्वबळावर बहुमत मिळवेल.
==========================================================================
ज्ञानव — 18 Apr 2019 - 14:48
@श्याम भागवत
हा अनालीसीस कसा केला?
==========================================================================
शाम भागवत — 18 Apr 2019 - 15:52
@ज्ञानव
डोंबलाचा अॅनालिसीस.
मी फक्त कोणाला किती जागा मिळाल्या त्या ऐवजी मतदानाच्या टक्केवारीवर लक्ष देतोय. बाकी काही नाही.
गुजराथ निवडणुकी पासून मोदी विरोधक जरा आश्वस्त झाले. प्रत्यक्षात त्या निवडणुकांत भाजपाला ४९% मते आहेत. पण आपल्यावर असा परिणाम झालाय की मोदींची पार वाट लागलीय. प्रत्यक्षात मोदीं नंतर कोणी मुख्यमंत्री व्हायचे हा वाद तिथे नडलाय. पण गुजराथची लोकं मोदींवर रागावली असाच निष्कर्ष काढला जातोय.
कर्नाटक विधानसभेत तर भाजपाची टक्केवारी भलतीच सुधारलीय. जागा पण वाढल्याहेत. पण तरीही लोकभावना अशीच आहे की तिथे मोदींचे काही चालले नाही.
राजस्थान व मध्यप्रदेशात भाजपाने सरकार गमावलं. इथेमात्र जास्त खोलांच जायला पाहिजे असं वाटंत.
लोकांना वाटतंय की या निवडणुकीत मोदी सपशेल आडवे झाले. त्यांचा करिश्मा संपला. २०१९ ला २००४ ची पुनर्रावृत्ती होणार अस मानलं जायला लागलं. प्रत्यक्षांत भाजपाची मतांची टक्केवारी कमी झालेली नाही. काॅंग्रेसची टक्केवारी नक्कीच सुधारलीय पण ती निर्विवाद नाहीये.
अनेक जागी खूपच कमी मतांनी भाजप उमेदवार हरलाय. नोटा मतांनी भाजप हरलाय. जे भुकेले आहेत ते अन्नपदार्थात दोष शोधत बसत नाहीत. त्याप्रमाणे जिंकण्याची आशा नसलेल्या काॅंग्रेसवाल्यांनी नोटा पर्याय वापरला असेल अस वाटतं नाही. जर नोटा भाजपाच्या लोकांनी वापरला नसता तर ही दोन्ही राज्यांचे निकाल वेगळे लागले असते.
मला वाटते हा राग वसुंधराराजे व चौहानांवर असावा. पण तो मोदींवर असल्याचे मानले गेले आहे.
आता निवडणुक प्रचारांत मोदी स्वत:साठी मतं मागायला येणार आहेत. पक्षासाठी अथवा कोणीतरी मुख्यमंत्री बनावा यासाठी ते मतं मागायला येणार नाहीयेत. तो फरक पडणारच आहे.
विरोधकांकडे पंतप्रधान पदासाठी सर्वमान्य चेहरा नाहीये. नितीशकुमारांशी भाजपाने मिळते जुळते घेतल्याने तो धोका आता मोदींना नाहीये.
कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचे वेळेस मोदींविरूध्द सर्व एकत्र आले होते. दुरंगी लढती झाल्यास त्याचा फटका मोदींना नक्कीच बसला असता. पण अनेक ठिकाणी दुरंगीच्या ऐवजी तिरंगी लढती होताहेत. अशावेळेस ३१% जनाधार हा खूपच आश्वासक मानला पाहिजे अशी माझी समजूत आहे.
विशेषकरून उत्तरप्रदेशमधे प्रियांका गांधींचे कार्ड जेवढे चालेल तेवढ्या प्रमाणांत मत विभागणी झाल्याने २०१४ सारखेच यश भाजपा मिळवेल. मग मात्र विरोधकांचे सगळीच गणिते विस्कळीत होतील.
मी तज्ञ वगैरे बिलकूल नाही. मी फक्त विचार कसा करतो आहे एवढेच लिहिले आहे.
ते सुध्दा हिरवा झेंडा फडकवत, यशोधरा ताईंनी खरडपट्टीवर येऊ द्या अंदाज असं सुचवल्यामुळे धाडस करतोय.
_/\_
==========================================================================
यशोधरा — 18 Apr 2019 - 16:03
राष्ट्रवादी बद्दल काय मतप्रवाह आहे? काकासाहेब ह्यावेळी नको इतका चपळपणा करत कोलांटून राहिलेत का?
==========================================================================
शाम भागवत — 18 Apr 2019 - 16:10
मला वाटते काॅंग्रेस राष्ट्रवादीची मते पळवणार. म्हणजे मतांच्या टक्केवारीत काॅंग्रेस पुढे जाईल. राष्ट्रवादीची टक्केवारी २०१४ च्या तुलनेत घसरेल.
==========================================================================
शाम भागवत — 18 Apr 2019 - 16:26
ही चपळाई गुजराथ निवडणुकांपासून सुरू झाली
राजस्थान व मध्यप्रदेश निवडणुकांनंतर खूप जण अति अति चपळ झाले होते. (देवेगौडांनी पंप्र बनून खूप जणांना स्वप्ने पहायचे व्यसन लावलंय) भाजपा येतच नाहीत अशी खात्रीच झाली होती. शिवाय आधारासाठी २००४ चे उदाहरण होतेच. फिल्डिंग कसं लावलं पाहिजे याबद्दल काका भरभरून बोलत होते.
पण एअर स्ट्राईक नंतर सगळेच विरोधक बॅकफूट वर गेले. आता काका म्हणताहेत भाजप येईल पण मोदी पंप्र नसतील. गडकरी झाले पंप्र तर बरं होईल. त्यांच्या मार्फतच देवेंद्र मॅनेज होऊ शकतील. पण जर मोदी आले तर देवेंद्रांना हात लावण्याची कुणाचीच हिम्मत होणार नाही.
आता फक्त मतदान टक्केवारी बघायची. जर ती कमीकमी व्हायला लागली तर मग वेगळा विचार करायला लागेल. सध्यातरी फेझ १ ची मतदान टक्केवारी मोदींच्या बाजूची वाटतेय.
१-२ % कमी झालीय काही ठिकाणी. पण मतदार वाढल्याने
संख्या तीच राहणार आहे. शिवाय त्याचा दुसरा अर्थ असा होतोय की, म्हातारे कमी झाले आहेत व तरूण वाढले आहेत.
==========================================================================
शाम भागवत — 18 Apr 2019 - 17:48
निवडणुक आयोगाच्या ५ च्या रिपोर्ट प्रमाणे मतदान २०१४ सारखेच होतंय असं वाटतंय.
मात्र बिहार व युपी मधे टक्केवारी वाढायची लक्षणे दिसताहेत.
==========================================================================
शाम भागवत — 18 Apr 2019 - 18:01
ओरिसामधे निरूत्साह चांगलाच जाणवतोय.
व्येश्ट. राहिलं होतं हे
In reply to खरडफळ्यावरील चर्चा चिकटवतोय. by शाम भागवत
व्येश्ट. राहिलं होतं हे करायचं. धन्यवाद!
अपडेट
In reply to खरडफळ्यावरील चर्चा चिकटवतोय. by शाम भागवत
अपडेटेड अंदाज
भाजप 200, मित्रपक्ष 40, रालोआ 240-250
काँग्रेस 120, मित्रपक्ष 30, संपुआ 150-170
इतर प्रादेशिक पक्ष 120-140
साधारण १९९६-२००४ सारखी परिस्थिती असू शकते.
काँग्रेसच्या पाठिंब्याने छोट्या पक्षाचा पंतप्रधान
किंवा
प्रादेशिक पक्षांच्या पाठिंब्याने भाजपचा पंतप्रधान
मोदी शहा जोडीला दुसरा पर्याय पसंत पडणार नाही, त्यापेक्षा कदाचित ते विरोधात बसणे प्रेफर करतील.
राहुल गांधींची पहिली टर्म अशी अस्थिर होणं काँग्रेसला परवडणार नाही, त्यामुळे देवेगौडांसारखं कुणालातरी पाठिंबा दिला जाऊ शकतो.
ता.क.: कालची पत्रकार परिषद. पंतप्रधान यांची पहिली आणि (या टर्म मधली) शेवटची.
१. मोदींची देहबोली खूप निराश वाटली. कदाचित शारीरिक थकवाही असू शकतो.
२. पत्रकार परिषद पंतप्रधानांची नसून भाजपची होती. आणि त्यात अमित शहा सर्वेसर्वा होते.
३. मोदींना प्रश्न विचारल्यावर मी साधा शिपाई आहे, अध्यक्ष काय ते सांगतील असं त्यांनी उत्तर दिलं.
४. भाजपला कदाचित कमी जागा मिळण्याची शक्यता दिसत असेल आणि त्यामुळे मोदींची प्रतिमा वाचवायला शहा पुढे येत आले असतील.
५. किंवा दुसऱ्या टर्मसाठी मोदींऐवजी शहांचा विचार सुरू झाला असेल.
भाजपा - 250-260
भाजपा - 250-260
NDA - 300-310
UPA - 100-110
काँग्रेस - 60-80
इतर - 120-130
तीन टक्के पेक्षा जास्त मतदान
तीन टक्के पेक्षा जास्त मतदान वाढलं तर त्याला स्विंग म्हणतात. म्हणजे मतदार नक्की काहीतरी विचार करून काहीतरी घडवण्यासाठी घराबाहेर पडलाय असं समजल जातं
६% च्या पुढे मात्र कोणती तरी लाट आलीय असं समजल जातं.
युपी व बिहारमधे मतदान अजूनही चालू असल्याच दिसतंय.
युपीमधे आत्ताच मागील सरासरीच्या ४% मतदान जास्त झाल्याचं आयोग सांगतोय.
तर बिहारमधे ६% पेक्षा जास्त मतदान झालंय.
ओरिसामधे २०१४ च्या सरासरीच्या
ओरिसामधे २०१४ च्या सरासरीच्या १५% मतदान कमी झालंय. काय भानगड आहे कळंत नाहीये.
लोकसभा २०१४ (निकाल) माहितीसाठी.
माझा अंदाज.
Bharatiya Janata Party (BJP) = 198 ते 212.
Indian National Congress (INC) = 90 ते 114
Shivsena (SS) = 10 ते 13
बाकी, अंदाज भरत राहीन.
-दिलीप बिरुटे
बिरूटे सर,
In reply to माझा अंदाज. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिरूटे सर,
शिवसेनेला मागच्या वेळेपेक्षा ८-१० जागा कमी मिळतील, असे तुम्हाला का वाटते? ते कळू शकेल काय?
मी तुमच्या इतका जाणकार नाही. तरी मी त्यावर खालील ३ मुद्यांवर विचार करतोय. अर्थात ते निव्वळ तर्क आहेत.
पण मागच्या वेळेस शिवसेनेच्या विरोधात मनसेने उमेदवार उभे केले होते. यावेळेस ते नाहीत.
मुख्य म्हणजे भाजप व शिवसेना यांनी पाडापाडीचे राजकारण खेळले असते तर टक्केवारी घसरायला पाहिजे होती. तसं फारसं घडलाय का?
शिवाय शिवसेनेला यावेळेस मागच्यापेक्षा एक जागा जास्त मिळालीय.
काही मतदार संघात.
In reply to बिरूटे सर, by शाम भागवत
काही मतदार संघात भाजप-सेना खासदार यांच्या सलग चार टर्म झाल्या. अशा वेळी काही बदल होऊ शकतात. मागच्या वेळी मोदी लाटेत काही बुड़त्या नावा 'नमो नमो' च्या नामाने तरल्या. आता ती परिस्थिती वाटत नाही म्हणून काही जागा कमी धरल्या. जसे.
औरंगाबाद, परभणी, बुलढाणा,अ.नगर इथे बदल होऊ शकतात.
-दिलीप बिरुटे
महाराष्ट्रातली परिस्थिती २०१४.
आता काय बदल होतील, त्याबद्दल आपापल्या जिल्ह्यात किंवा माहितीत असेल तर समजून घ्यायला आवडेल.
आमच्या औरंगाबाद मधे चार पंचवार्षिक शिवसेना निवडून आलेली आहे.
- दिलीप बिरुटे
माझ्या समजूतीप्रमाणे, २०१४ ची
माझ्या समजूतीप्रमाणे, २०१४ ची निवडणूकीचा मूड पुढे चालू राहिलाय. मागच्या पानावरून पुढे असे आपण म्हणतो तसे. हे थोडेसं पहिल्या टप्यात जाणवलं होतं. पण अजूनही पहिल्या टप्याची पूर्ण माहिती मिळत नाहीये. त्यामुळे मतदार संघ निहाय विचार करता येत नाहीये. पण हा दुसरा टप्पा झाल्यावर मतदानाची आकडेवारी पहाता, मोदी लाट तयार व्हायला लागली आहे असे वाटते.
भाजप स्वबळावर ३०० च्या पुढे जाईल असं आता मला वाटायला लागलं आहे.
९ वाजताच्या आयोगाच्या
९ वाजताच्या आयोगाच्या अहवालाप्रमाणे सरासरी ६६.८०% मतदान झाले असून अजूनही हा आकडा वाढण्याची चिन्हे दिसत आहेत !!!
ही निवडणूक भल्या भल्यांची झोप उडवणार हे नक्की.
एकटा भाजप = ३५०
एकटा भाजप = ३५०
इतर एनडीए घटकपक्ष = ५० ते १००
बाकीचे = उरलेल्या जागा
(आता आम्ही बाजूला बसून मजा बघायला मोकळे झालो ! ;) :) )
सद्या तरी ३०० च्या पुढे.
In reply to एकटा भाजप = ३५० by डॉ सुहास म्हात्रे
सद्या तरी ३०० च्या पुढे.
नंतरच्या फेर्यात मतदान टक्केवारी बघून ठरवता येईल.
:)
लाट आहे? का त्सुनामी ते ठरायचयं.
त्सुनामी असेल तर राजीव गांधींचा विक्रम मोडला जाऊ शकतो.
:))
एक्काकाका, तुम्हांला भाजप ची
In reply to एकटा भाजप = ३५० by डॉ सुहास म्हात्रे
एक्काकाका, तुम्हांला भाजप ची खूप खात्री दिसत्ये.
अवांतर: नांदेड मध्ये बोळसा गावामध्ये अजूनही मतदान सुरूच आहे म्हणे. आत्ता टीव्हीवर बातमीमध्ये सांगताहेत. रात्रौ 10 च्या बातम्या.
११ वाजेपर्यंत सुरू राहणार. तांत्रिक अडचणी.
Apr 18, 08:15 PM (IST)
Apr 18, 08:15 PM (IST)
Final percentage for Srinagar Lok Sabha polls:
Srinagar: 7.9%
Ganderbal: 17.5%
Budgam: 21.60%
Voter turnout in 2nd phase of #LokSabhaElections2019:
Assam-76.22%
Bihar-62.38%
Jammu and Kashmir-45.5%
Karnataka-67.67%
Maharashtra-61.22%
Manipur-67.15%
Odisha-57.97%
Tamil Nadu-66.36%
Uttar Pradesh-66.06%
West Bengal-76.42%
Chhattisgarh-71.40%
Puducherry-76.19%
8:41 PM - Apr 18, 2019
******
State-wise first phase voter turnout
Andaman & Nicobar Islands 70.67%
Andhra Pradesh 56%
ArunachalPradesh 66%
Assam 68%
Chhattisgarh 56%
Lakshadweep 66%
Manipur 78.2%
Mizoram 61.29%
Nagaland 78%
Odisha 68%
Sikkim 69%
Telangana 60%
Tripura 81.8%
Uttar Pradesh 64%
Uttarakhand 57.85%
West Bengal 81%
वरच्या आकड्यात जिथे मोठा बदल
In reply to Apr 18, 08:15 PM (IST) by यशोधरा
वरच्या आकड्यात जिथे मोठा बदल झालाय तेवढेच नोंदवतोय.
श्रीनगर १४.०५% मतदान
उधमपूर ७०.१९% मतदान
म्हणून जम्मू काश्मीर ४५.६४%
आसाम ७८.५३%
छत्तीसगड ७४.२०%
मणिपूर ८१.०९%
ओरिसा ७१.६८%
युपी ६२.१२%
फेज २ सरासरी मतदान ६८.९८%
आजचा सकाळी ११ वाजता नि.आ. अहवालाप्रमाणे
१० वाजताचा आयोगाचा
१० वाजताचा आयोगाचा अहवालानुसार फेज २ ची सरासरी ६७.५९%
अजूनही ही आकडेवारी बदलतच आहे.
ज्यांना कुणाला ही आकडेवारी उपयोगाची असेल त्यांचे साठी
महाराष्ट्रातील स्थिती ६१.७६%
2014 ची % मतदार संघ 2019 ची %
61.35 Buldhana 57.95
58.51 Akola 59.76
62.29 Amravati 63.08
66.29 Hingoli 63.37
60.11 0ded 63.02
64.44 Parbhani 62.47
68.75 Beed 64.34
63.65 Osmanabad 62.75
62.69 Latur 62.02
55.88 Solapur 56.65
माझे मत
पाहिलं म्हणजे यशोधराताईंना धन्यवाद. असं खरडफळ्यावर टाकत राहिलात तर आमच्यासारख्यांना कळत नाही. आधीच गॅरीभाऊ, श्रीगुरुजी वगैरेंची कमी जाणवतीये आणि त्यात निवडणुकीवर एकही धागा नाही म्हणजे अगदीच निरस वाटत होतं.
गॅरीभाऊ, श्रीगुरुजी आणि इतर मान्यवरांनी परत मिपावर येऊन आपले अभ्यासपूर्ण प्रतिसाद द्यावेत अशी विनंती. त्यांना कोणी वैयक्तिकरित्या ओळखत असेल तर कृपया विनंती करावी.
मला आकडेवारी वगैरे सांगता यायची नाही. पण मला वाटतंय की जर भाजप/ एनडीए ला बहुमत मिळालं नाही तर त्यांनी सरकार स्थापन करू नये. काँग्रेस/ तिसरी/ चौथी... वगैरे आघाड्यांना जे काही करायचं असेल ते करू द्यावं.
+१
In reply to माझे मत by ट्रेड मार्क
+१
अगदी अगदी, मला पण खरंच वाचायला आवडेल. हे लोक अजून कुठे लिहितात का हे पण माहित नाही. मागे गॅरी दादांना विनंती केली होती कि ते अजून कुठे लिहीत असतील किंवा त्यांचा ब्लॉग असेल तर त्याची माहिती द्यावी, पण ब्लॉग नाही म्हणाले.
खासकरून ह्या निवडणुकीच्या वेळी मला सगळ्याच बाजूची मत ऐकलं आवडली असती
अजूनही ओरिसाचा मतदानाचा आकडा
अजूनही ओरिसाचा मतदानाचा आकडा बदलतोय. काल रात्रीपर्यंत ५८% च्या आसपास असलेला आकडा आता (म्हणजे सकाळी ९ वाजता) ७०.७८% पर्यंत पोहोचलाय. मागच्या वेळेपेक्षा फक्त ३% कमी.
थोडक्यात, ओरिसामधे निरूत्साह वगैरे काही दिसत नाहीये.
Happy
त्यामुळे फेज २ ची सरासरी ६८.७८% पर्यंत पोहोचलीय
माझा अन्दाज़
माझा अन्दाज़
एनडीऐ = २०० (भाजप १७०)
युपीऐ = १८० (कॉग्रेस १४०)
न बीजेपीमित्र - न कॉग्रेसमित्र = १६० (तेलंगाना समिति वैग्रे....)
यहीच
In reply to माझा अन्दाज़ by mrcoolguynice
माझा अंदाज जवळपास असाच.
पण कहो दिलसे
मोदीकाका फिरसे
“फिरसे” का म्हनून भौ ?
In reply to यहीच by अभ्या..
“फिरसे” का म्हनून भौ ?
न बीजेपीमित्र - न
In reply to यहीच by अभ्या..
यांच्या मतदारने भावनिक मुद्द्यावर मतदान न करता, स्ट्रेटेजीक़ मतदान केल तर यूपीए चाच अजुन फ़ायदा होवु शकतो....
अभ्याजी, तुमच्या
In reply to यहीच by अभ्या..
अभ्याजी, तुमच्या सोलापूराबद्दल बोला की. ५% मतदान जास्त झालंय हो. म्हणजे अंदाजे १ लाख मतदार जास्तीचे आले जे मागच्या निवडणूकीत निरूत्साही होते.
कोण असतील?
लिंगायत समाजाचे असतील?
का प्रकाश आंबेडकरांच्यामुळे? सोलापूरात खूप मोठी सभा झाली होती म्हणे.
.
In reply to अभ्याजी, तुमच्या by शाम भागवत
सोलापुरात आंबेडकर आणि शिंदे यांमुळे ब-याच जणांचे सोलापुरच्या निवडणूकीत लक्ष आहे.
इथली लढत जातीय वळणार जाणारी आहे. वाढलेले मतदार समोरच्याचा पराभव करण्याच्याच हेतूने बाहेर पडले आहेत. पण यातही आंबेडकर उभे असल्याने त्यांना मानणारा समाज मोठ्या प्रमाणात बाहेर पडलेला असू शकतो जो इतरवेळी तितका उत्साह दाखवत नाही (कारण त्यास प्रतिनिधित्व मिळत नाही.)
सोलापुरात आंबेडकरांना मानणारा समाज खुप मोठा असला आणि जरी तो बाहेर पडलेला असला तरी त्यांचे संख्याबळ बहुमतात जाणारे नाही. बाकी मध्यमवर्ग हा वंचितला मतदान करेल असे वाटत नाही.
मागील वेळेस शिंदेंचा पराभव मुख्यतः नवमतदारांमुळे झाला होता. तरूणांची एकगट्ठा मते भाजपाला मिळाली होती.आत्ता ही ते भाजपाच्या मागेच उभे राहण्याची शक्यता बरीच आहे. एकंदरीत भाजपाचे पारडे मला तरी जड वाटते.
शिंदे यांना मानणारा मतदार हा पारंपारिक , ठरलेला आहे. नवीन पिढीची मते मिळवण्यात ते कमी पडतील. जर खुपच मोठी मते मिळवण्यात यश आले तर भाजपाची मते खाल्ली जातील आणि त्याचा फायदा आंबेडकरांना होईल. केवळ तेव्हाच मतविभागणीचा फायदा घेऊन आंबेडकर जिंकू शकतील.
भाजप , वंचित आघाडी आणि शेवटी कांग्रेस असा मिळणारा मतांचा उतरता क्रम ठरण्याची शक्यता आहे.
(हे वैयक्तिक मत आहे. आमचा राजकारणाचा अभ्यास शुन्य आहे. )
सोलापूर...
In reply to . by शब्दानुज
सोलापूराचे राजकारण पहिल्यापासून विचित्र आहे. इथल्या दोन भाजपा आमदारात सुध्दा सतत कुरघोड्या चाललेल्या असतात. अशा राजकारणात भाजपाने सेपरेट गेम खेळली. पहिल्यांदा मराठा आरक्षणावेळी धनगरांना(त्यांची टक्केवारी लक्षणीय आहे) आरक्षण देउ म्हणून आशेला लावले. मराठा आरक्षण होताच धनगरांची आंदोलने सुरु झाली. ऐनवेळी सोलापूर विद्यापीठाचेया नामांतराचा प्रश्न उभाकेला. अहिल्यादेवी की सिध्देश्वर अशी लिंगायत धनगरात फूट पाडून शेवटी अहिल्यादेवी नाव दिले. आता लिंगायत खवळतील म्हणून महाराजांचे उमेदवार म्हणून नाव पुढे केले. एक महाराज म्हनले की सर्व लिंगायत एकमताने पाठीशी उभे राहतील असा होरा पण लिंगायत एकच एक महाराजांना मानणारा समाज नाही. सोलापूर आणि सीमाभाग धरला तर कमीतकमी १०-१२ अधिकारी लिंगायत महाराज आहेत. प्रत्येकांना मानणारे वेगवेगळे लिंगायत समाज आहेत. आमदार विजयकुमार देशमुख हे स्वतः लिंगायत समाजाचे आहेत पण ऐनवेळी शरद बनसोडेंची काटलेली उमेदवारी ही बौध्द आणि शहराबाहेरील मते फिरवू शकते. त्यात पुन्हा प्रकाशराव आले आहेत रिंगणात. भीमा कोरेगांव प्रकरणापासूनच प्रकाश आंबेडकरांचा सोलापूरात वावर वाढला आहे. त्यामुळे ते इथे गेम चेंजर ठरु शकतात. शिंदेसाहेब पट्टीचे राजकारणी आहेत. एकदा झालेला पराभव त्यांच्या जिव्हारी लागलेला आहे. निवडणुकीच्या आधीच ३ महिन्यापासून त्याणी विविध समाजगटात कॅम्पेनिंग सुरु केले आहे. व्हाटसप ग्रुप, फेस्बुक आदी मिडीयातून प्रचंड बीजेपीविरोधी पोस्टस फिरवल्या जात आहेत. मोदी नकोत कुणीही चालेल इतपत ती हवा आहे. बाकी सोशल मिडीयात नुसतं चांगभलं करणारी तरुणाई मात्र मोदी मोदी करण्यात जरी गुंतली असली तरी मतदानात त्याचे रुपांतर कसे होते हे पाहणे रोचक ठरेल. सोलापूर हे मध्यमवर्गीयाचे नसून कामगारांचे शहर आहे. बंद पडलेल्या कापड मिल्स, अवैध धंदे, अल्पसंख्याकांचे लांगूलचालन आदी बिले शिंदेसाहेबांच्या नावाने फाडली गेली तरी आता ती पिढी नामशेष झाली आहे. गेल्या पाच वर्षात एकही नवीन उद्योग अथवा प्रकल्प सोलापूरात आलेला नाही. एक एनटीपीसी आला पण त्याचे श्रेय शिंदेसाहेबांना गेलेय. कम्युनिस्ट आमदार आडम मास्तरांना शिंदे हवे तसे वळवू शकतात. जरी आडम मास्तरांनी गेल्या वर्षी मोदींच्या हस्ते कामगार घरकुले आदी प्रोजेक्ट आरंभले असले तरी सर्व कामगार वर्गाची मोट बांधून ती हवी तशी वळ्वण्यात मास्तर वाकबगार आहेत. गेल्या वर्षभरात सेनेशी भांडत भांडत केलेला भाजपाचा संसार आता दाखवायच्या गोडीत असला तरी महाराज हे सेनेसाठी अनपेक्षित उमेदवार आहेत. त्यांचा काय प्रचार करायचा हे सेनेने ठरवलेच नाही तर करणार तरी काय. राज ठाकरेही एक सभा गाजवून गेले. आता भाजपाकडे हक्काची व्होट बँक नाही, दोन आमदार आहेत पण ते पट्टीचे राजकारणी असले तरी उमेदवार हा राजकारणी नाही आणि फक्त लिंगायत इतकीच आशा ठेवली शिंदेसाहेबांचे विश्वासातील काँग्रेस शहरप्रमुखापासून बरेच कार्यकर्ते लिंगायत आहेत. तर बौध्द, मातंग, कैकाडी, पारधी ह्यासह अनेक मागासवर्गीयाची मते फिरवायला आंबेडकर आले आहेत. शिंदे साहेबांची हक्काची व्होट बँक मुस्लीम, धनगर आणि संख्येने अल्पसंख्य असणारा उच्च्वर्णीय समाज ऐनवेळी काय निर्णय घेते त्यावरच सोलापूर लोकसभेचा निर्णय अवलंबून आहे.
सोलापूरात
In reply to सोलापूर... by अभ्या..
वर एक मुद्दा दिसला नाही तो म्हणजे स्मार्ट सिटी. सोलापूरात स्मार्ट सिटी मधुन बरीच कामे झाली/चालू आहेत.
उमेदवार बदलून भाजपानी कोणताही उमेदवार दिला असता तरी त्यांचाच विजय निश्चित वाटतोय. शिंदे आणी आंबेड्कर यांच्यात मतविभागणी होउन भाजपा सरळ विजयी होइल वाट्टय.
पण ऐनवेळी शरद बनसोडेंची काटलेली उमेदवारी ही बौध्द आणि शहराबाहेरील मते फिरवू शकते => उमेदवारी ऐनवेळी कापली नाही, साधारण २-२.५ महिन्यापासुन महाराजांचे नाव फिक्स असल्याचा विडीओ वॉट्सअॅप वर फिरत होता ...
नांदेडला अंदाजे १लाख मतदान
नांदेडला अंदाजे १लाख मतदान जास्त झालंय. ही मते कुठे जातील? काही अंदाज?
२०१४ च्या मोदी लाटेतही टिकलेले अशोक चव्हाणसाहेबांचे काय होईल?
अपडेट : काँग्रेस पक्षाच्या
अपडेट : काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या आणि रिशतो के भी रूप बदलते है या गाण्याच्या नवगायिका प्रियांका चतुर्वेदी यांचा शिवसेनेत प्रवेश.
प्रियांका चतुर्वेदीयांच्या रूपाने शिवसेनेने भाजपाच्या गायिकांना जोरदार टक्कर देण्याची तयारी केलीये
मुख्य विषयावर फोकस प्लीज.
In reply to अपडेट : काँग्रेस पक्षाच्या by महासंग्राम
लोकसभा निवडणूक २०१९. अंदाज अपना अपना.
-दिलीप बिरुटे
मागल्या वेळेस ८१००० मतांनी
मागल्या वेळेस ८१००० मतांनी जिंकले होते. बसपाची जवळपास ६०००० मते त्यांच्याकडे सरकली होती. यावेळेस ही मते कुठे जातील? बसपा व वंचित आघाडीने एकत्रीत १ लाख मते मिळवल्यास चव्हाणांना पराभवाचा सामना करायला लागेल.
२००९ साली बसपा व आंबेडकरवादी यांनी जवळपास १ लाख मते एकत्रीत मिळवली होती.
कुणाला काही अचूक माहिती?
क्लिंटनशिवाय निवडणूकीच्या
क्लिंटनशिवाय निवडणूकीच्या धाग्याला मजा नाही
ते कुठे लिहीतात?
In reply to क्लिंटनशिवाय निवडणूकीच्या by आनन्दा
ते कुठे लिहीतात?
ते कळले तर तिथे जाता येईल.
काय काय माहिती त्यांनी डोक्यात साठवलेली असते. बापरे.
_/\_
मी यावेळेस निवडणूक फॉलो करत
मी यावेळेस निवडणूक फॉलो करत नाहीये.. अमच्याकडे प्रचाराने पण जोर पकडला नाहीये.. भाजपावाले एकदा येऊन गेले, काँग्रेसवाले फिरकले पन नाहीयेत. बापट उभे राहिले म्हणून दोघेही थंडावले की काय कळेना.
पण ही सीट भाजपाची कन्फर्म वाटतेय.. शिरोळेंबद्दल थोडा असंतोष होता लोकांमध्ये, त्यापेक्शा बापट चालतील असे म्हणत होते..
हो, ह्यावेळी म्हणावा तसा
In reply to मी यावेळेस निवडणूक फॉलो करत by आनन्दा
हो, ह्यावेळी म्हणावा तसा अटीतटीचा प्रचार होतोय, असं वाटत नाही. आमच्या इथेही फारशी हालचाल दिसत नाही. म्हणायला, 2-3 दिवस वंचित आघाडीची रिक्षा फिरली.
राज ठाकरेंच्या सभांमुळे
राज ठाकरेंच्या सभांमुळे बारामतीच्या काकांची मते किती वाढतात याचे औत्सुक्य आहे
ते फक्त भारतातच नव्हे तर
In reply to राज ठाकरेंच्या सभांमुळे by विजुभाऊ
अमेरिकेतून निवडूण येणार आहेत आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होणार आहेत याबद्दल आव्हाडांनी खात्री दिली आहे
आकडेवारीचा अंदाज करत नाही पण
आकडेवारीचा अंदाज करत नाही पण
भाजप / रालोआला स्पष्ट बहूमत न मिळाल्याने काही इतर पक्षांचा पाठिंबा घ्यावा लागेल आणि अशा पक्षांची अट असेल की नितीन गडकरी हे पंतप्रधान व्हावेत.
मलाही असंच वाटत होतं. पण अशी
In reply to आकडेवारीचा अंदाज करत नाही पण by मराठी कथालेखक
मलाही असंच वाटत होतं. पण अशी गोंधळाची स्थिती जेव्हा होते तेव्हा मतदानाची टक्केवारी घसरते. कोणाला मत द्यायचे? हे न समजल्याने मतदार घरीच बसायचे प्रयत्न करतो.
२०१४ ला सुरवातीला कमी व नंतर जास्त असं मतदान झाले. त्याची जी सरासरी होती तिथूनच या वर्षी सुरवात झालीय. त्यामुळे आघाड्यांचे किंवा कडबोळी सरकार नक्कीच नसणारेय असं वाटतंय.
जनादेश निश्चीत स्वरूपाचा किंवा कोणत्यातरी एका पक्षाला हुकमी बहुमत देणारा असावा.
माझा अंदाज
रालोआ : ३७५ ते ३९०
(भाजपा ३००+, शिवसेना : १६ ते १९)
संपुआ : ९० ते ११०
(काँग्रेस : ५० ते ६०)
इतर : ५० ते ६५
एकूण : ५४३
माझा अंदाज
एनडीए-170-190 (पैकी भाजप 130-150)
युपीए- 270-290 (पैकी काँग्रेस 200-220)
आतापर्यंत जे वातावरण आहे त्यानुसार हा अंदाज.
भाजप हिंदी पट्ट्यात आणि महाराष्ट्रात खूप जागा गमावेल.
काँग्रेससोबत त्याच्या मित्रपक्षांची कामगिरी उंचावेल.
मतदान टक्केवारी
वामन देशमुख,
माझाही अंदाज तुमच्या जवळपास आहे. माझ्या मते मोदी ४००+ मारताहेत. भाजप कुठवर जाईल याची उत्सुकता आहे.
मोदींनी उदासीन मतदार घराबाहेर काढला हे स्पष्ट आहे. मतांची टक्केवारी पाहता मोदीशहांची व्यूहरचना चांगलीच फलदायी ठरली आहे.
आ.न.,
-गा.पै.
.
माझा अंदाज
एकटा भाजप बहुमत मिळवण्यापासुन बराच दुर. मित्रपक्षांसोबत सर्वात मोठा पक्ष , पण बहुमतासाठी इतरांचा पाठिंबा आवश्यक. युपीमद्धे जागा मोठ्या प्रमाणात गमावणार. महाराष्ट्रात मात्र बहुमत मिळणार
एनडीए २४३ (२२३+२० , भाजप+ मित्रपक्ष)
युपीए १९१ (१५८+३३ , कांग्रेस + मित्रपक्ष)
इतर १०९
एनडीए इतर पक्षांसोबत सत्तास्थान ग्रहण करणार. मोदीच पंतप्रधान , गडकरींची संधी हुकणार.
माझा अंदाज
भाजपा 230 ते 240
शिवसेना 12 ते 13
कोंग्रेस 60 ते 70
बाकी वंचित वेगेरे अंधश्रद्धा आहेत असे मानतो मी
बारामतीच्या काकाचा सूपड़ा साफ झाला पाहिजे या वेळी
बाकी इतर पक्षाच्या कामगिरीबद्दल काही अंदाज नाही व्यक्त करु शकत.
रागा वायनाडमधे काठावर पास होतील बहुतेक
उत्तरप्रदेशमधे कोंग्रेसचे पानीपत होईल कदाचित, तसे ते झालेच होते. पण टक्केवारी वाढूंन देखील कोंग्रेसला काही फायदा होणार नाही. हिंदू मताच्या ध्रुवीकरणाचा भाजपला नक्कीच फायदा होईल. उत्तरप्रदेशमधे मात्र यादव स्वतःला हिंदू समजतात की नाही हा मोठा प्रश्न आहे. पण तसे ते दलितानाही जवळ करत नाहीत. याचा फटका मायावतीला बसेल व फायदा अखिलेशला होईल. दिल्लीत अजूनही बोलणी चालू आहेत. कॉंग्रेस व आप मिळाले तर दिल्लीत निवडणूक जड जाईल भाजपला
बारामतीकर काका, पुतण्या आणि
In reply to माझा अंदाज by भंकस बाबा
बारामतीकर काका, पुतण्या आणि कंपनीबद्दल अगदी सहमत.
त्रिशंकू निकाल लागतील असे वाटते
सध्या देशात मिक्स सेंटिमेंट दिसते आहे. रा गांचे मोदींवरचे सततचे बेछूट आरोप आणि 72000 ची भुरळ जर ग्रामीण भागात पडली तर काँग्रेसच्या सीट वाढण्याची शक्यता आहे.
आत्ता तरी हंग पार्लमेंटची दाट शक्यता आहे असे वाटते.
Hung Parliament असेल असं वाटत
In reply to त्रिशंकू निकाल लागतील असे वाटते by बबन ताम्बे
Hung Parliament असेल असं वाटत नाही. कारण यावेळी विरोधी पक्षांची अस्तित्वाची लढाई सुरू आहे.
१) काँग्रेसच्या जागा वाढतील परंतु काँग्रेस प्रमुख पक्ष म्हणून स्वतःचा पंतप्रधान देऊ शकणार नाही. Congress जागा जास्त येऊनही अजूनच कमजोर झालेली दिसेल.
२) भाजपच्या जागा कमी होतील. वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या भाजपविरोधी युत्या यावेळी भाजपला सरकार बनवता येणार नाही इतपत यश मिळवतील.
३) निकाल जाहीर झाल्यानंतर सर्व भाजपविरोधी पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करतील. ते पाच वर्ष टिकेल. २०२४ मध्ये भाजप पूर्ण बहुमत मिळवेल.
नको निवडणूक नको मतदान
आत्ता च नगरपालिका च्या निवडणूका झाल्या व त्या आधी विद्यमान खासदार वारले म्हणून निवडणूक झाली व लोकसभा निवडणूक नंतर विधानसभा निवडणूक होणार मग लोकशाही म्हणजे केवळ निवडणूकच का? प्रतेक पक्ष मतदारांना पैसे वाटतो. ह्या काळात सरकारची संपूर्ण यंत्रणा व कर्मचारी गुंतलेले असतात. मग हे योग्य की अयोग्य?
अंदाज आणि अपेक्षा
In reply to नको निवडणूक नको मतदान by स्वामि १
अंदाज आणि अपेक्षा ह्यासंदर्भात काही लिहाल का?
अंदाज म्हणजे तुम्हांला काय वाटते आहे, ते.
अपेक्षा म्हणजे स्वप्नरंजन.
नको निवडणूक नको मतदान
आत्ता च नगरपालिका च्या निवडणूका झाल्या व त्या आधी विद्यमान खासदार वारले म्हणून निवडणूक झाली व लोकसभा निवडणूक नंतर विधानसभा निवडणूक होणार मग लोकशाही म्हणजे केवळ निवडणूकच का? प्रतेक पक्ष मतदारांना पैसे वाटतो. ह्या काळात सरकारची संपूर्ण यंत्रणा व कर्मचारी गुंतलेले असतात. मग हे योग्य की अयोग्य?
नको निवडणूक नको मतदान
In reply to नको निवडणूक नको मतदान by स्वामि १
+१
तीव्र सहमत.
अगदी बरोबर आहे.
राहुल गांधी आणि अमित शहा यांनी एकत्र बसून प्रत्येकी २७२ संसद सदस्य निवडावेत. एकूण ५७४. ५७५वे नरेंद्र मोदी.
राज्यस्तरावर त्यांनी प्रदेशाध्यक्ष यांना अधिकार द्यावेत. मग रावसाहेब दानवे, अशोक चव्हाण, शरद पवार आणि उद्धव ठाकरे बसून २८८ सदस्य ठरवतील.
त्यांनी जिल्हास्तरावर पक्षाच्या जिल्हाध्यक्ष यांना अधिकार द्यावेत, ते सर्व जिप सदस्य, पंस सदस्य, ग्रापं सदस्य, नपा सदस्य, मनपा सदस्य निवडतील.
दरवर्षी हजारो कोटी वाचतील.
तटस्थपणे निवड हवी असेल तर -
अमेरिका+ब्रिटन+फ्रांस+रशिया+चीन यांची पंचसदस्य समिती स्थापित करून त्यांना आपल्या जिप सदस्य, पंस सदस्य, ग्रापं सदस्य, नपा सदस्य, मनपा सदस्य , विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य निवडीचा अधिकार द्यावा. म्हणजे ट्रम्प, शी झिनपिंग, पुतिन वगैरे मिळून खासदार निवडतील.
हजार कोटी वाचतील जे सर्व सामान्य, वंचित यांच्या भल्यासाठी वापरता येतील.
आमचा अंदाज
राष्ट्रवादी १५० राहुल काँग्रेस १५० बहेनजी, अखिलेश, केजरीवाल यांचा समूह १५०, कम्युनिस्ट आदि सकट प्रादेशिक पक्ष ९०, भाजपा ३.
एकूण ५४३
पंतप्रधान
सोमवारी, मायावती*मंगळवारी केजरीवाल*बुधवारी अखिलेश*गुरुवारी सिताराम येचुरी*शुक्रवारी तेजस्वी यादव*शनिवारी राहुल गांधी*रविवारी शरद पवार.
अंधभक्तीची डझनभर प्रमाणपत्रे मिळालेला ( महामहोपाध्याय मिपाकरांनी दिलेली किमानपक्षी दहा) वाचकांची पत्रेवाला नाखु
राष्ट्रवादी१५०???????
राष्ट्रवादी१५०???????
बारामतीच्या काकांना असे स्वप्न ही पडत नाही.
त्यांनी त्यांची काही
In reply to राष्ट्रवादी१५०??????? by विजुभाऊ
खास
मनसेमाणसे ईतर पक्षांमध्ये ठेवली आहेत , चिन्ह त्यात्या पक्षांचे आहे इतकेच काय ते!!आणि वारांबाबत काही आक्षेप असेल तर कळविणे,म्हणजे शिफ्टवर विभागणी करण्यासाठी प्रयत्न केला जाईल.
माझ्या मते
माझ्या मते
भाजपा - ३०० किंवा जवळ्पास
भाजपा मित्रपक्श - ३०-४०
खांग्रेस - ६०-८० च्या आसपास
ईतर अतिउपद्रवी पक्श - १००-१२०
अंदाज अगदीच बरोबर
In reply to माझ्या मते by ढब्ब्या
अंदाज अगदीच बरोबर आल्याने स्वतःचेच अभिनंदन ;)
स्वत:च का ?
In reply to अंदाज अगदीच बरोबर by ढब्ब्या
स्वत:च का ? आम्हीही करतो की तुमचे अभिनंदन !
:) धन्यवाद
In reply to स्वत:च का ? by धर्मराजमुटके
:) धन्यवाद
अपेक्षा: भाजपनं एकट्याच्या
अपेक्षा: भाजपनं एकट्याच्या भरवशावर २/३ बहुमत घ्यावं. बाकीच्यांचं काय व्हायचं ते होवो. ;-)
अंदाजः रालोआ २/३ बहुमत घेईल. भाजप २९०+
फेज १ व २ मधे झालेल्या
फेज १ व २ मधे झालेल्या मतदानाचा आढावा
उत्साही उणे मते निरूत्साह दर्शवतो. म्हणजे हा निरूत्साह नसता तर ५ व्या रकान्यातील फरकाचा आकडा तेवढा वाढला असता.
उत्साही घन मते उत्साह दाखवतात. म्हणजे ५ व्या रकान्यात दाखवलेल्या मतांमधे उत्साहामुळे किती वाढ झालेली आहे ते कळते.
उदा. बुलढाण्यामधे या वर्षीच्या जास्त मिळालेल्या 138552 मतांमधे 24306 मते उत्साह वाढल्यामुळे आलेली आहेत.
औरंगाबाद व जालना
In reply to फेज १ व २ मधे झालेल्या by शाम भागवत
औरंगाबाद जालना यांची पण माहिती भरा. रावसाहेब दानवे जालन्यात निवडून येतात. औरंगाबाद मधे काटेकी टक्कर सेना, अपक्ष आणि एम् आय एम्.
-दिलीप बिरुटे
नक्की भरणार आहे डाॅक्टरसाहेब.
In reply to औरंगाबाद व जालना by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नक्की भरणार आहे डाॅक्टरसाहेब.
पण आयोग अजूनही आकडे बदलतोय.
:)
इंटरेस्टींग डेटा! यातली
In reply to फेज १ व २ मधे झालेल्या by शाम भागवत
इंटरेस्टींग डेटा! यातली उत्साही मतांची संख्या कशी काढतात? म्हणजे फॉर्म्युला वगैरे काही?
फेज ३ चे आकडे अजूनही बदलताहेत
फेज ३ चे आकडे अजूनही बदलताहेत!
पुणे ४९.१५
जळगांव ५६.१८
बाकी सगळे ६० च्या पुढे
बारामती ६१.५६
महाराष्ट्रातील सरासरी ६२.१७
माझ्या मते मागील वर्षीच्या
माझ्या मते मागील वर्षीच्या आकड्यांच्या आसपास मतदान होत असल्याने अजूनही लोकांचा कल मोदींकडेच आहे.
मागच्या वर्षी आलेली मोदी लाट अजूनही ओसरलेली नाही कारण मतदान ६४% ते ६९% च्या दरम्यान आहे.
फेज १ = ६९.५०% अंतीम
फेज २ = ६९.४४% अंतीम
फेज ३ = ६२.१७% संभाव्य
थोडक्यात त्रिशंकू अवस्था येणार नाहीये. मोदींना बहुमत मिळेल.
+१
In reply to माझ्या मते मागील वर्षीच्या by शाम भागवत
संख्याबळ किती कमी जास्त होते तीच उत्सुकता. अजुन पाचवर्ष देशाला हेच पंतप्रधान लाभतील असे दिसते. ज्योतिष दृष्टीने पाहता अजुनही संधी दिसते.
ज्योतिष दृष्टीकड़े वळुया. सर्वप्रथम भाजपचा जन्म 6 एप्रिल 1980 त्या दृष्टीने कुंडलीचा विचार केला तर मिथुन लग्न वृश्चिक राशीची कुंडली. भाजपच्या कुंडलीत 2012 सूर्यची महादशा सुरु झाली. त्यामुळे 'अच्छे दिनाची' सुरुवात झाली. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याची महादशा सहा वर्ष असते त्यामुळे नमोंचा प्रगतीचा चाढ़ता आलेख आपणास गुजरात ते दिल्ली असा दिसतो. 2017 पासून सूर्याच्या महादशेत शुक्राची महादशा सुरु झाली आणि याचं फळ चांगलं नसतं, त्यामुळे भाजप समोर यापुढे अनेक संकटे असतील. ही स्थीती पुढे दहा वर्ष असेल.
नमो यांची कुंडलीवरुन असे निदर्शनास येते की वृश्चिक लग्न वृश्चिक राशीचे असलेले नमो यांना चंद्राची महादशा सुरु आहे जी 2021 पर्यन्त आहे, चंद्राच्या महादशेत
बुध पण असल्यामुळे ही स्थिती मार्च पर्यन्त होती. या नंतर केतुच्या आगमनामुळे नमो यांचं भाग्य फळफळणार आहे, वृश्चिक लग्नात केतु असला की नुसती भरभराट होते त्यामुळे नमो यांना पं प्र पद अवघड नाही, असे वाटते.
आता वळुया प्राडॉ यांच्या मताकडे. 2014 च्या लाटेची परिस्थिती आता नसली तरी विद्यमान पंतप्रधान यांना अजुन एक संधी मिळावी असे अनेकाचं मत असल्यामुळे एकीकड़े त्यांच्या सरकारवर होणारे खोटे बोल पण रेटून बोल असे होणारे आरोप आणि एकीकड़े परंपरावादी मतदारांच्यावरच प्रभाव पाहता एक संधी मिळेल पण हुकमशाही पद्धतीचा आणि मनमानी स्वभाव पाहता खासदार बंड करतील 2022 मधे पक्षात अराजकता माजून मध्यावधीची शक्यता नाकारता येत नाही.
अवांतर : सदरील भविष्यवाणी इकडे तिकडे पेस्टवतांना मिपावरुन प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांच्या नावाचा उल्लेख करावा. धन्यवाद.:)
-प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
(कुडमुड्या ज्योतिषी)
हे तुमचे अंदाज झाले.
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हे तुमचे अंदाज झाले.
व्हॉट अबाऊट अपेक्षा?
तुम्ही ( सुद्धा) भविष्य बघता? मज्जाच की!
फेज ३ चे सरासरी मतदान कालच्या
फेज ३ चे सरासरी मतदान कालच्या ६२% वरून ६७.९८% पर्यंत सुधारले आहे. अजूनही त्यात बदल होतच आहेत. आयोग सर्व आकडे अंतीम स्वरूपात कधी जाहीर करतोय याची वाट पहातोय.
अंदाज बांधताना
निवडणुकीपूर्वीचे अंदाज हे त्यावेळेस चाललेल्या चर्चांवरून ठरत असतात. मात्र निवडणूकीचे मतदान करताना मतदाराची मानसिकता खूप वेगळी असते. त्यामुळेच त्यावेळची मानसिकता ओळखता आल्यास अचूक अंदाज बांधता येत असतो. एक्झिट पोलची हीच खासियत आहे.
आपल्या घरात एखादा कार्यक्रम असतो. काही त्रुटी असतात. त्यावर चर्चा होताना बरीच खडाजंगी होत असते. एकमेकांना जबाबदार धरणे चालू असते. पण मग कोणीतरी वडिलधारी माणूस मधे पडते.
"जे काही झाले ते झाले. आता काय करायचे ते सांगा" असं म्हणायला लागते. मग मात्र यापुढे काय करायचे याचा वस्तुनिष्ठ विचार सुरू होतो.
निवडणूकीपूर्वी हा कसा बरोबर किंवा चूक याचा खूप धुरळा उडतो. आरोपांची राळ उडवली जाते. पण जेव्हा मतदानाचा दिवस उगवतो तेव्हा मात्र आरोप प्र्त्यारोप बाजूला ठेऊन "आता काय करायचे?" हाच विचार बलवत्तर होतो.
थोडक्यात यापुढे
१. नोकर्या नाहियेत. रोजगार नाहियेत. हा प्रश्न कोण सोडवेल?
२. सैन्याचे प्रश्न कोण सोडवू शकेल?
३. पाकिस्तानवर / चीनवर कोण जरब ठेऊ शकेल?
४. काश्मीर प्रश्न कोण सोडवू शकेल?
५. रेल्वेत सुधारणा कोण करू शकेल?
६. महागाई कोणाच्या काळात वाढणार नाही?
७. कोण कमीत कमी भ्रष्टाचार करेल?
८. देशाची इज्जत जगात कोण वाढवेल?
९. युध्द जिंकतो व तहात हरतो ही भारताची प्रतीमा कोण बदलेल?
अशाच प्रकारचे प्रश्न मतदार विचारत मतदान करत असतो. या दिवशी पूर्वीचे फारसे उगाळले जात नाही. यावेळेस चालू सरकारबद्दल पूर्वीइतका भरवसा वाटत नसेल तसेच दुसरा कोणताही पर्याय नसेल तर जनता निरूत्साही बनते व मतदान कमी होते.
पण सरकार प्रयत्न करतंय अस वाटत असेल तर मात्र जनता त्याला प्रोत्साहनात्मक डोस देते. म्हणजे टक्केवारी फारशी बदलत नाही. पण तरता मतदार जो साधारणतः ३% असतो असे समजले जाते, तो यात परिणामकारक भूमिका बजावतो. (२००९ साली असे झाले. काँग्रेसची मते फार वाढली नाहीत. २६.५३% वरून २८.५५% पण जागा मात्र खूपच वाढल्या. १४५ वरून २०६ आणि यात कोणते तरी छोटे किंवा प्रादेशिक पक्ष बळी पडतात.)
याला अपवाद म्हणजे
१. प्रचलीत सरकार बद्दल प्रचंड राग असेल तर मात्र, आमचे काहीही झाले तरी चालेल पण हे सरकार नको अशा परिस्थीतीत जनता येते. (१९७७ साल आणिबाणी नंतरची निवडणूक)
२. एखादा चांगला पर्याय दिसायला लागला तर त्याकडे जनता आकृष्ट होते. (२०१४ साली हेच झाले.)
३. सहानभूतीची लाट. (राजीव गांधी १९८४)
या दोन प्रकारात मात्र मतदानाची टक्केवारी जाणवेल इतकी वाढत असते.
थोडक्यात आपले राग लोभ विसरून जो विश्लेषण करू शकेल त्याचे निर्णय बरोबर येतात.
अंदाज बांधल्यावर
In reply to अंदाज बांधताना by शाम भागवत
त्यामुळे मला असं वाटतंय की, यावेळेस मतदानाची टक्केवारी फारशी बदलत नाहीये. त्याचा अर्थ मतदार मोदींना पुन्हा संधी देतोय. त्याच बरोबर ३% तरते मतदार मोलाची भूमिका बजावणार आहेत. त्यामुळे भाजपाची मागील ३१% मतदार आणखी एक दोन टक्यांनीच वाढतील पण त्यामुळे जागा मात्र त्यामानाने जास्त वाढतील. पण याचा फटका प्रादेशिक पक्षांना बसेल.
आसाम मधे बर्याच जणांचे लक्ष
आसाम मधे बर्याच जणांचे लक्ष आहे. आसामची आत्ताची १३:०० ची स्थिती पुढील प्रमाणे आहे.
त्यानुसार वध घट ३% च्या आतच आहे.
तरीही १४ पैकी दोनच ठिकाणी घट आहे.
बाकी १२ ठिकाणी मतदान वाढल्याचे दिसत आहे.
म्हणजेच मतदार काहीतरी निश्चित असे काहीतरी ठरवून घराबाहेर पडला आहे हे जाणवतंय.
पहिल्यापेक्षा दुसर्या फेरीतील मतदान वाढलंय म्हणजे जे काही ठरवलंय त्याचं प्रमाण वाढतंच चाललंय हे नक्की.
फेज-मतदार संघ : ट्क्केवारीतील बदल या प्रमाणे
2--Karimganj:2.94
2--Silchar:3.94
2--Autonomous District:0.04
3--Dhubri:1.61
3--Kokrajhar:0.57
3--Barpeta:1.43
3--Gauhati:2.14
2--Mangaldoi:2.22
1--Tezpur:1.27
2--Nowgong:2.49
1--Kaliabor:1.98
1--Jorhat:-0.83
1--Dibrugarh:-2
1--Lakhimpur:-2.7
टीपः फेज १ व २ चे आकडे आता बदलणार नाहीत. पण फेज ३ चे मात्र बदलू शकतील.
फेज ३ चे आकडे अजूनही बदलत
फेज ३ चे आकडे अजूनही बदलत आहेत. सरासरी मतदान ६७.९८% वरून ६८.०३% झालंय.
अंतीम मतदान टक्केवारी ६८.४०%
In reply to फेज ३ चे आकडे अजूनही बदलत by शाम भागवत
अंतीम मतदान टक्केवारी ६८.४०%
उत्तर प्रदेश मधे धमाल चाललीय.
उत्तर प्रदेश मधे धमाल चाललीय.
पहिल्या फेरीत सगळीकडे म्हणजे आठही मतदार संघात निरूत्साह आहे. सरासरी २.५% मतदान कमी झालंय.
प्रियांका गांधी कार्ड फारसं चाललेलं दिसून येत नाहीये.
तर दुस र्या फेरीत फक्त दोनच मतदार संघात मतदान कमी झालंय. उरलेल्या सहा मतदार संघात वाढलंय. त्यामुळे अर्घा टक्का मतदान जास्त झालंय. म्हणजे एकूण ३% चा फरकाने मतदान वाढलंय. हे कोणामुळे? प्रियांका? का स्वाध्वी प्रज्ञासिंग?
त्यामुळे तिसर्या ट्प्यातील बरेलीला काय होतंय याची उत्सुकता होती. पण बरेलीला अजूनही १.५% मतदान कमी झालंय. म्हणजे प्रियांकामुले उत्तर प्रदेशात फारसा फरक पडत नाहीये असं वाटतंय. मायावती व अखिलेष यांना मात्र प्रियांकाचा त्रास होणार असं दिसतंय.
तेलंगणाचा निकाल फारच भारी
तेलंगणाचा निकाल फारच भारी लागणार आहे. सरासरी ७% मतदान कमी होणार आहे. ९लाख सतरा हजार येवढ मतदान कमी झालेलं असून, निरूत्साहामुळे १२ लाख साठ हजार कमी झालेलं आहे. म्हणजे २०१४ ची तुलना करता १७ मतदार संघात एकूण मिळून २१ लाख ८० हजार मतदान कमी झालेलं आहे.
मलकाजगिरी मतदार संघात मागच्या वर्षी पेक्षा ३३ हजारांनी लोकसंख्याच कमी झालीय. मला वाटते हा मतदारसंघ सर्वात मोठा म्हणजे ३१,४९,७१० लोकसंख्येचा आहे. हा मतदारसंघ सर्वात तरूण लोकांचा असल्याने, तरूणांची दिशा समजून घेण्याच्या दृष्टीने सर्व देशाचे या मतदार संघाकडे लक्ष असते. बाकी सर्व मतदारसंघात ७५ हजार ते १ लाखापर्यंत लोकसंख्या वाढलेली असल्यामुळे ही घट प्रकर्षाने लक्षात येते.
फेज १ मधेच येथील निवडणूक संपलेली आहे.
या उलट आंध्र प्रदेश मधे मात्र
या उलट आंध्र प्रदेश मधे मात्र निवडणूकीत निरूत्साह दिसून येत नाहीये. २६ मतदार संघात मिळून १% पेक्षा जास्त उत्साही मतदान झालेले आहे. अगदी खोलात जाऊन सांगायचे झाल्यास ७ मतदार संघात पाऊण टक्के मतदान कमी झालंय तर उरलेल्या १९ मतदार संघात १.७५% मतदान जास्त झालंय.
फेज १ मधेच इथली मतदान प्र्क्रिया पूर्ण झालेली आहे.
वा
In reply to या उलट आंध्र प्रदेश मधे मात्र by शाम भागवत
क्लिंटनची कमी तुम्ही थोडी का होईना भरुन काढली बघा.
बादवे वाढलेल्या उत्साहाचे कारण लाट असे असले तरी निगेटिव्ह उत्साह असायची शक्यता किती?
म्हणजे 'चला ह्यांना घरिच बसवू आता' अशा स्टाइलमध्ये.
म्हणजे 'चला ह्यांना घरिच बसवू
In reply to वा by अभ्या..
म्हणजे 'चला ह्यांना घरिच बसवू आता' अशा स्टाइलमध्ये.या स्टाईलबद्दल फार काही बोलणार नाहीये.
:)
पण मतदानाचा टक्का जास्त घसरला तर काय होतं ते पहायला हरकत नाही.
३% पर्यंत अनुत्साह म्हणजे जे चाललंय ते बर चाललंय. पण ही टक्केवारी त्यापेक्षा जास्त व्हायला लागले तर समीकरणे बिघडायला लागू शकतात. जे चाललंय त्या बाजूची लोकं पण आता मतदान करत नाहीयेत असाही अर्थ निघायला लागतो.
पण तरीही नापसंती व निरूत्साह ह्या दोन्ही वेगवेगळ्या प्रेरणा आहेत. निरूत्साह हा आळस आहे. तर नापसंती हा राग आहे.
नापसंतीसाठी हल्ली मतदार नोटाचा वापर करू लागली आहेत.
मला वाटते राजस्थान व मध्यप्रदेशमधे लोकांनी नोटा वापरला. ती नापसंती होती. जर ती सुविधा नसती तर ती लोकं घरीच बसली असती व टक्केवारी खाली आली असती. पण हा निरूत्साह होता की नापसंती ह्याबाबत मग ठामपणे बोलता आले नसते. शेवटी हे सारे तर्क असतात. कोट्यावधी लोकांना असं साचेबंद नियमात कोणीच बसवू शकत नाही.
निरूत्साहामुळे ( म्हणजे आळसामुळे) टक्केवारी खूप कमी झाल्यावर काय होते? यासाठी योगी आदित्यनाथ यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजिनामा दिल्यावर काय झाले ते पहायला मजा येते.
गोरखपूरमधे २०१४ ला ५४.६६% मतदान झालेले होते. त्यावेळेस योगी आदित्यनाथ यांनी ३ लाख मतांच्या फरकाने निवडणूक जिंकली होती. पण २०१८ च्या मार्च मधे झालेल्या पोटनिवडणूकीत हेच मतदान अवघे ४३% झाले. ११.६६% मतदान निरूत्साहामुळे झाले नाही.
परिणाम असा झाला की ३ लाखांची पिछाडी भरून काढून प्रविणकुमार निषाद २२००० मतांनी निवडून आले.
याचा खूप मोठा गवगवा झाला. हा निरूत्साह नसून नापसंती असल्याचे भासवण्याचा खूप प्रयास झाला. त्यासाठी मायावतींनी पाठींबा दिल्यामुळे हे यश मिळाले वगैरे वगैरे बरेच काही म्हटले गेले.
प्रत्यक्षात मायावती कधी पोटनिवडणूक लढवत नाहीत.
:)
पण आकडेवारी असं सांगते की भाजपाला मत देणारी दोन लाख सत्तावीस हजार लोकं घराबाहेरच पडली नाहीत. याच कारण फक्त आळस. लोकांचाही व नेते मंडळींचाही. योगी आदित्यनाथांनीही ते नंतर कबूल केले. योगी आदित्यनाथ फक्त देव देव करणारा, पूजा पाठ करणारा माणूस नाहीये. इंजिनीअर आहे तो. असो.
एवढा आळस असूनही भाजप सपा+बसपा विरूध्द जिंकला असता.
पण प्रविण कुमार निषाद हे समाजवादी पार्टीचे नाहीयेत. त्यांची निषाद पार्टी आहे व ती त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेली आहे. उत्तरप्रदेशात यादवांच्या नंतर निषाद ही सर्वात मोठी जमात आहे. त्यामुळे त्यांची स्वत:ची अशी हक्काची मते आहेत. हे निषाद यावेळेस समाजवादी पार्टी तर्फे उभे राहिले त्यामुळे यादव + निषाद अशी मतांची बेरीज होऊन ते निवडून आले. पण श्रेय मात्र मिडियाने सपा+बसपा ला देऊन टाकले.
प्रत्यक्षात निषाद हे आयात उमेदवार होते हे मिडियाने बाहेर येऊच दिले नाही. तर असे हे निषाद सपा बरोबर किती राहतील?
:)
असो.
निषाद हे कधीच बी जे पी मध्ये
In reply to म्हणजे 'चला ह्यांना घरिच बसवू by शाम भागवत
निषाद हे कधीच बी जे पी मध्ये येउन गेलेत,आणी त्यांना तेथुन नव्हे तर दुसरी कडुन उमेदवारी देखील मिळाली...
हो.
In reply to निषाद हे कधीच बी जे पी मध्ये by श्री गावसेना प्रमुख
हो.
पण तो उल्लेख मुद्दामहून टाळला होता.
मायबोलीवर सुध्दा.
:)
क्लिंटन साहेब असते तर आम्ही
In reply to वा by अभ्या..
क्लिंटन साहेब असते तर आम्ही दोघांनी मिळून बरेच काही केले असते. मुख्य म्हणजे मला त्यांच्याकडून खूप काही शिकता आले असते. त्यांच्या डोक्यात बरच काही भरलेले असायचे व मुख्य म्हणजे ते त्यांना वेळेवर आठवायचेही. त्याच्या जोडीला माझी तपशीलवार आकडेवारी असती तर त्यांचे डोके आणखीनच भन्नाट चालले असते.
_/\_
कोणाला ते कुठे आहेत? हे माहीत असेल तर बोलवा त्यांना
ह्या सगळ्या माहितीबद्दल अतिशय
In reply to क्लिंटन साहेब असते तर आम्ही by शाम भागवत
ह्या सगळ्या माहितीबद्दल अतिशय धन्यवाद!!! माझा स्वतःचा काय अंदाज नाही, राहुल चे एकूण पराक्रम बघता काँग्रेस नको एवढंच नक्की वाटतं. मोदींबद्दल मिक्स मत आहे, काही काम चांगली तर काही तेवढी पटलेली नाहीयेत. ह्या धाग्यावर लक्ष ठेवून आहे, चांगली माहिती मिळत्ये.
शिवसेनेने रडून रडून वेळ काढला
शिवसेनेने रडून रडून वेळ काढला आणि ते आता पुन्हा भाजप च्याच जोडीला येवून लोकाना सामोरे जात आहेत.
सेनेने पाच वर्षात काय केले याचा काहीच लेखाजोखा ते माम्डू शकत नाहीत.
भाजप ने साथ नाही दिली तर सेनेच्या उमेदवारांची अवस्था बीकट होणार आहे हे नक्की
अवांतर : अमेथीचा विकास ....
अवांतर :
सहज म्हणून गुग्गुळाचार्यांच्या मापनसेवेस विचारून अमेथी वर शोध घेतला, तर हे चित्रं पुढे आलं :
डाव्या वरच्या कोपऱ्यात दिसणारा विकास राहुल गांधींनी केलेला नसून स्मृती इराणी बाईंनी केलेला आहे. एकंदरीत अमेथीत पप्पूचं काही खरं नाही.
-गा.पै.
मतदारसंघातील २०१९ ची
मतदारसंघातील २०१९ ची मतदारांची संख्यापण मी नव्याने भरतो आहे. २०१४ ची भरलेली आहेच. त्यामुळे नवमतदार असा कॉलम तयार करता येणार आहे. त्यामुळे उत्साही मतदारांची माहितीमधे जास्त अचूकता येईल.
नवमतदार असा कॉलम तयार करता
In reply to मतदारसंघातील २०१९ ची by शाम भागवत
२०१९ ची फिगर - २०१४ ची फिगर = नवमतदार ???
२०१४ नंतर २०१९ ची फिगर काढण्यापूर्वीच्या कालावधित जे गचकले त्यांचं काय ???
फेज १ ची अंतीम यादी
फेज १ ची अंतीम यादी
उत्साही मते हा काय प्रकार आहे
उत्साही मते हा काय प्रकार आहे ? त्याचे गणन कसे करतात ?
उत्साही मते ही एक ढोबळ कल्पना
उत्साही मते ही एक ढोबळ कल्पना आहे. टक्केवारीतील फरक गुणिले मागील निवडणुकीच्या वेळची मतदारांची संख्या.
यांना उत्साही मतदार म्हटले जाते कारण मागच्या निवडणूकीत ते निरूत्साही असतात. बाकी काही नाही.
:)
मात्र उत्साह/निरूत्साह ला किती महत्व द्यायचे हे ठरविण्यासाठी नवमतदारांची संख्यापण लक्षात घ्यायला लागते.
त्यासाठी नव्याने आलेले मतदार किती हेही कळणे आवश्यक असते. त्या आकड्याशिवाय या उत्साही मतांना किती महत्व द्यायचे ते कळू शकत नाही.
जर ही टक्केवारी ३% टक्याच्या आत असेल तर कुढल्याच पक्षाला अथवा विचारसरणीला बांधलेले नसलेले "तरते" मतदार निवडणूक निकालावर परिणाम घडवणार असे म्हणता येते.
याउलट ही टक्केवारी उणे असेल तर "जैसे थे" प्रवृत्तीचा जोर आहे असे मानले जाते.
पण मानवी स्वभाव व त्यानुसार होणारी वागणूक कोणत्याही गणीती प्रक्रियेने मोजता येत नाही हे भान कायम ठेवणे महत्वाचे.
:)
धन्यवाद
In reply to उत्साही मते ही एक ढोबळ कल्पना by शाम भागवत
धन्यवाद
फेज १ व २ चा एकत्रीत तक्ता
शीर्षावली
In reply to फेज १ व २ चा एकत्रीत तक्ता by शाम भागवत
शाम भागवत,
माहिती तालिकेत भरून उपयोजल्याबद्दल आभार! फक्त एक विनंती आहे. दर दहा ओळींनंतर कृपया शीर्षावली टाका. तालिका लांबलचक असल्याने स्तंभांची शीर्षके गुंडाळीमुळे गडप होतात ( = Column headers disappear in scrolling ).
धन्यवाद! :-)
आ.न.,
-गा.पै.
मध्यरचित शीर्षावली
In reply to शीर्षावली by गामा पैलवान
अशी दिसेल मध्यरचित शीर्षावली : https://imgur.com/xCPATu7
-गा.पै.
हे तुम्ही कसं केले? हातानी
In reply to मध्यरचित शीर्षावली by गामा पैलवान
हे तुम्ही कसं केले? हातानी कॉपी पेस्ट?
@ शाम भागवत, तुमचे अनेक आभार.
@ शाम भागवत, तुमचे अनेक आभार.
ह्या धाग्यावर तुम्ही खूप माहिती संकलित केली आहे, त्यासाठी.
अगदी अगदी
In reply to @ शाम भागवत, तुमचे अनेक आभार. by यशोधरा
अगदी हेच म्हणतो.
-गा.पै.
असेच म्हणतो.
In reply to @ शाम भागवत, तुमचे अनेक आभार. by यशोधरा
भागवत साहेब, आभार.
-दिलीप बिरुटे
_/\_
_/\_
महाराष्ट्र
बहुजन वंचित आघाडीचा भाजपा सेनेला फायदा होतांना दिसतोय. एक सोलापूरची जागा सोडली तर तीही आली तर आली नाही तर नाही. असे दिसते. निवडणूक निकालानंतर ही आकडेवारी समजून घेतांना मजा येणार आहे.
भाजपसेनेच्या विरोधात ज्या जागा जातील ते संभाव्य मतदारसंघ असे. माझा हा केवळ एक अंदाज.
परभणी, बुलढाणा, रामटेक, गडचिरोली. वर्धा, अमरावती, मुंबईच्या दोन-(देवरा आणि दत्त)सोलापूर, नंदुरबार, धुळे. जळगाव. औरंगाबाद.
अंदाजे भाजपसेनेच्या पाच-सहा जागा कमी होतील असे दिसते. म्हणजे हा फार मोठा फरक नाही. यातही कमी अधिक होणारच.
-दिलीप बिरुटे
सुधारीत तक्ता
गा.पै.,
मी एक्सेलमधे मॅक्रो बनवून केलंय. तरीपण तुम्ही हे कसं साधलंत ते शिकायची इच्छा आहे.
एकदम मस्तं
In reply to सुधारीत तक्ता by शाम भागवत
शाम भागवत,
सूचनेची सत्वर दखल घेतल्याबद्दल आभार व कौतुक आहे.
मी केवळ फायरफॉक्स मध्ये जराशी मोडतोड केली. तुम्ही हाच परिचालक ( = browser ) वापरता का? मला अन्य परिचालकांचा फारसा अनुभव नाही! :-(
आ.न.,
-गा.पै.
मी गुगल ड्राईव्हवर डाटा बेस
In reply to एकदम मस्तं by गामा पैलवान
मी गुगल ड्राईव्हवर डाटा बेस बनवलाय. नंतर तो एक्सेलमधे चिकटवायचा व व्हीबीए किंवा फाॅक्सप्रो वापरून सगळे एचटीएमएल टॅग बनवून ते एका फाईलमधे साठवतो व मग मिसळपावमधे चिकटवतो. त्यामुळे या प्रक्रियेत माझा कोणत्याच परिचालकाशी (ब्राउसर्शी) काहीच संबंध येत नाही.
पण फाॅक्सप्रो व व्हीबीए युनिकोडला सपोर्ट करत नाहीत. त्यामुळे आता गुगलशिट मधेच मॅक्रो बनवले पाहिजेत असं वाटायला लागलंय. हम्म्. आता ते शिकायला लागेल.
कसं शिकायचं तेही शिकायला लागेल.
:)
बापरे हे तर ....
In reply to मी गुगल ड्राईव्हवर डाटा बेस by शाम भागवत
शाम भागवत,
अहो तुम्ही आयुर्वेदिक पंचकर्म + व्यायाम + आहारसंवर्धन केलंय. याउलट मी जे केलंय तो राजमार्ग नव्हे. मी फक्त निकटछबी (क्लोज अप) करिता कामचलाऊ प्रसाधन फासलंय.
आ.न.,
-गा.पै.
तातपुरत्या फायद्यासाठी इतका
In reply to मी गुगल ड्राईव्हवर डाटा बेस by शाम भागवत
तात्पुरत्या फायद्यासाठी इतका जास्त त्रास घेण्याऐवजी...
१. तुमच्या स्प्रेडशीटवर काम करताना MS Excel मध्ये, टेबल हेडर सतत दिसण्यासाठी (स्क्रोल केल्यावर वर जात जात गायब होऊ नये यासाठी): "Freeze panes" किंवा "Freeze Top Row" पर्याय वापरा.
आणि
२. टेबल मिपावर पेस्ट करताना : दर अकराव्या Row नंतर एकदा "Insert Row" करून तेथे हेडर कॉपी करा.
हाकानाका :)
टेबल मिपावर जसं च्या तसं
In reply to तातपुरत्या फायद्यासाठी इतका by डॉ सुहास म्हात्रे
टेबल मिपावर जसं च्या तसं चिकटवल तर आकडे एकाखाली एक येत नाहीत. चौकटीपण (बॉर्डरस्स) तयार होत नाहीत. आणि १० ओळी मोजून हीडर घुसवायला खूप वेळ लागतो. त्यावर उपाय म्हणून सगळं केलंय.
मला खरा वेळ डाटा फीड करायला लागतो.
:)
असो.
टेबल मिपावर जसं च्या तसं
In reply to तातपुरत्या फायद्यासाठी इतका by डॉ सुहास म्हात्रे
टेबल मिपावर जसं च्या तसं चिकटवल तर आकडे एकाखाली एक येत नाहीत. चौकटीपण (बॉर्डरस्स) तयार होत नाहीत. आणि १० ओळी मोजून हीडर घुसवायला खूप वेळ लागतो. त्यावर उपाय म्हणून सगळं केलंय.
मला खरा वेळ डाटा फीड करायला लागतो.
:)
असो.
टेबल जसेच्या तसे दिसायला हवे
In reply to टेबल मिपावर जसं च्या तसं by शाम भागवत
टेबल जसेच्या तसे दिसायला हवे असेल तर, टेबल सिलेक्ट करुन MS Paint मध्ये ग्राफिक म्हणून साठवा आणि मग ते इतर कोणत्याही चित्राप्रमाणे मिपावर टाका. सगळ्या फॉर्मॅटिंगसह जसेच्या तसे दिसेल.
तुमच्या पध्दतीत या सगळ्याला
In reply to टेबल जसेच्या तसे दिसायला हवे by डॉ सुहास म्हात्रे
तुमच्या पध्दतीत या सगळ्याला खूपच वेळ लागतो हो.
माझा डाटा अपडेट झाला की तो सिलेक्ट करून, एक्सेल मधे चिकटवायला ४-५ सेकंद. मॅक्रोच्या सहाय्याने १० ओळीनंतर हेडर घुसवून टेबलासाठी आवश्यक असलेले सर्व एचटीएमएल टॅग बनवायला अर्धा सेकंद. व हे सगळे सिलेक्ट करून मिपा मधे चिकटवायला आणखी ४-५ सेकंद. सगळे मिळून १५-२० सेकंदात संपलेले असते हो.
असे पण काही मतदार असतात
असे पण काही मतदार असतात ते ऐनवेळी निर्णय बदलून दुसऱ्याच
पार्टी ल मत देतात त्यांचे प्रमाण किती पकडलं जाते अंदाज व्यक्त करताना
हेच ते तरते मतदार. हे
In reply to असे पण काही मतदार असतात by Rajesh188
हेच ते तरते मतदार. हे साधारणतः ३% पर्यंत असतात असे समजले जाते. हे मतदार कोणत्याच पक्षाला अथवा विचारसरणीला बांधलेले नसतात. तात्कालीन परिस्थितीप्रमाणे कोणाला मत द्यायचे ते ठरवतात व निकालावर परिणाम करतात. तुल्यबळ उमेदवारांच्या लढाईत नेहमीच ह्यांचा कल निर्णायक असतो. अपवाद फक्त लाटेचा.
शंभरी पार केल्याबद्दल अभिनंदन.
धाग्याने शांततेत शंभरी पार केल्याबद्दल धागाकर्त्यांचे आणि शाम भागवतांचे आभार.
-दिलीप बिरुटे
(धाग्यावर लक्ष ठेवून असलेला वाचक)
भाजपा
भाजपा 340+ नक्की. आणि बहुतेक 360 च्या आसपास.
काँग्रेस 50 च्या आत नक्की गारद.
अपप्रचाराची जोड नसती, तर कदाचित 25 च्या आतच बाजार उठला असता.
मावळ, मुंबई काय म्हणतायत?
मावळ, मुंबई काय म्हणतायत?
धागा आणि त्यावरील प्रतिसाद दोन्ही आवडले.
धागा आणि त्यावरील प्रतिसाद दोन्ही आवडले. विशेषतः शाम भागवत साहेबांचे सांख्यिकीयुक्त प्रतिसाद.
माझा अंदाज आणि अपेक्षा :
अंदाज - NDA ३५० +
अपेक्षा - फिर एक बार, मोदी सरकार.
आपण निवडणूक निकाल ऐकताना बर्
आपण निवडणूक निकाल ऐकताना बर्याच वेळेस एखादा उमेदवार मोठ्या फरकाने किंवा कमी फरकाने जिंकला किंवा पडला असे ऐकतो.
टक्केवारीच्या पध्दतीने अभ्यास करताना याचा अर्थ कसा लावायचा हा प्रश्न पडतो. हे तरते उमेदवार ३% टक्के असतील असे समजल्यास व या तरत्या मतदारांचे महत्व पुढील निवडणुकीत असणार आहे किंवा नाही हे पहायचे असेल तर गेल्या निवडणूकीत जिंकलेला उमेदवार एकूण मतदारांच्या संख्येच्या ३% पेक्षा कमी मतांनी जिंकलेला असायला हवा.
याला तीन अपवाद आहेत असे समजले जाते.
पहिला अपवाद म्हणजे नवीन मतदारांची वध घट मोठ्या प्रमाणात म्हणजे ३% पेक्षा जास्त प्रमाणात झाली असेल तर ही गणिते कोसळतात.
दुसरा अपवाद अर्थात लाटेचा. मतदानच ६% पेक्षा जास्त होणे.
तिसरा अपवाद म्हणजे निरूत्साहामुळे मतदानच ६% पेक्षा कमी होणे.
उदा. एखाद्या मतदार संघात जर मतदारांची संख्या गेल्या निवडणूकीत २० लाख असेल आणि जिंकलेला उमेदवार जर २० लाखाच्या ३% पेक्षा कमी म्हणजे ६०००० मतांपेक्षा कमी मतांनी जिंकला असेल तर हे तरते मतदार निवडणूकीवर आपला प्रभाव ठेवून आहेत असे म्हणता येते.
पण जिंकलेला उमेदवार जर यापेक्षा मोठ्या फरकाने म्हणजे ६०००० पेक्षा जास्त फरकाने जिंकला असेल तर मात्र तरत्या मतदारांचा प्रभाव त्याप्रमाणात शिल्लक राहिलेला नाही असे म्हणता येते.
थोडक्यात,
१. मागील निवडणूकीत जिंकलेला उमेदवार किती टक्के मतांच्या फरकाने जिंकला.
२. या वर्षीचे नवमतदार किती आहेत? टक्केवारीच्या दृष्टीने?
३. या वर्षीच्या निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीतील वध घट किती आहे?
वगैरे पध्दतीने आपण ज्या मतदारसंघात मतदान केले त्याविषयी काही ठोबळ अंदाज बांधू शकतो.
असे अंदाज व त्याची कारणे लिहून ठेवायची. निकाल आल्यावर मग काय चुकले? काय बरोबर आले ते तपासायचे व आपली दृष्टी आणखी परिपक्व करायची असा हा सगळा खेळ आहे.
शेअर बाजारात आलेखाच्या सहाय्याने मोठे गुंतवणूकदार काय हालचाल करत आहेत याचा तर्क जसा केला जातो अगदी तसेच मतदानाच्या टक्केवारीच्या दृष्टीने तर्क करण्यात मजा येते.
हा तर्काचा खेळ कसा करायचा यासाठी मी एक नमूना येथे देण्याचा विचार आहे. त्यामधे फक्त ट्क्केवारी मला माहित असेल. मी
त्या मतदारसंघात कधीही गेलेलो नसेन. तसेच त्या मतदारसंघाचा माझा फारसा अभ्यासही नसेल.
तुम्ही पण तुमचे अंदाज असा अभ्यास करून नोंदवू शकता. निदान तुम्ही ज्या मतदारसंघात मतदान केले त्या मतदारसंघाचा अभ्यास करून मत मांडायला काय हरकत आहे.?
तुम्ही जुन्या निवडणूक निकालांची माहिती मिळवण्यासाठी हे संकेतस्थळ वापरू शकता.
एकदा का या स्थळावर गेलात की मत तुम्ही भारतातील कोणतेही पीसी निवडू शकता व त्यानंतर १९५२ पासूनचे को णतेही वर्ष.
असो.
फेज ३ ची अंतीम माहिती भरण्याचा काम सुरू करतोय. प्रथम महाराष्ट्रातील माहिती भरून ती पोस्ट करेन. त्यानंतर उर्वरीत भारत.
(अवांतर: आता चौथा प्रकार अस्तित्वात येऊ घातलाय. हा प्रकार फारच भारी आहे. या प्रकारात टक्केवारीचा उपयोग कसा करायचा? हे भल्या भल्यांनाही कळलेले नाहीये.
या प्रकाराचे नाव आहे नोटाला मतदान)
:)
फेज ३ नंतरची परिस्थिती
फेज ३ नंतरची परिस्थिती
प्रथम फक्त महाराष्ट्रातील लिहितोय.
महाराष्ट्र फेज ४ दुपारी २ वाजता
फेज ४ दुपारी ३:३० वाजता
मतदानाने वेग घेतलाय. आकडे फार भराभरा बदलत आहेत.
फेज १,२,३ एकत्रीत मतदान टक्केवारी
केरळमधे सगळीकडे मतदान
केरळमधे सगळीकडे मतदान टक्केवारी सुधारली आहे. अजिबातच अनुत्साह दिसत नाहीये.
वायनाड ७.०५% जास्त मतदान झालंय.
तर Pathanamthitta 8.35% जास्त झालंय.
एकूण २० मतदारसंघापैकी १२ मतदारसंघात (वरील दोन मतदारसंघ धरून) ३% पेक्षा जास्त मतदान झालंय
मागच्या वेळेस युपीए ला ४ जागा कमी होऊन त्या १२ झाल्या होत्या तर सीपीआय ला त्या चार जागा मिळून त्यांच्या ८ झाल्या होत्या.
ज्याप्रमाणे वाराणसीमधून उभे राहिल्याने भाजपाला उत्तर प्रदेशमधे फायदा झाला होता. तसाच फायदा रागा वायनाडमधून उभे राहिल्याने काँग्रेसला केरळमधे होईल का?
:)
भागवत सायेब,
In reply to केरळमधे सगळीकडे मतदान by शाम भागवत
भागवत सायेब,
जाउदे ते सगळे आकडे आणि टेबलं बारा गडगड्याच्या हिरीत. नुसतं बघून डोळे फिरायले. त्याचे कौतुक आपण शेपरेट हार्गुच्च देऊन करु. स्ध्याच्याला फकस्त कोण किती कुठं ते शिंपल भाषेत सांगा. लागला आकडा उन्नीस बीस वरखाली तर तुम्हाला पार्टी. नाही बसला तर हार्गुच्च कॅन्सल.
काय म्हंताव?
कोण किती कुठ?
In reply to भागवत सायेब, by अभ्या..
कोण किती कुठ?
:)
अभ्याभाऊ, येवढ सोप्प अस्तय का हो?
प्रत्येक मतदारसंघाची दोन चार निवडणूकांची आकडेवारी घ्यायची. त्यातून मत इकडून तिकडे कशी फिरतात ते शोधायचे. जोडीला सध्याचे ट्रेंड काय आहेत ते लक्षात घ्यायचे. मग एक मतदार संघ पुरा होतो.
मला तसलं काहीएक करायचे नाहीये. मी फक्त व्यापक प्रमाणात जे घडतंय त्याचा अंदाज घ्यायचा प्रयत्न करतोय.
या निवडणुकीत सर्वात महत्वाचा मुद्दा शोधण्याचा प्रयत्न करतोय.
३ ते ४ टक्के एनडीएचे वाढले तर एनडीए एकदम ४०० पर्यंत झेप घेईल. मग हा आला, तो आला याला फारसे महत्वच राहत नाही हो. विरोधामधे जेमतेम १५० पण राहत नाहीत.
मी या टक्केवारीतून तेच शोधतोय. भाजप किंवा एनडीए आपली टक्केवारी सुधारणार? किंवा नाही व कशी?
माझा अंदाज...
एनडीए - २९०-३१०
पुन्हा मोदी पंतप्रधान होणार यात शंकाच नाही. आणि अजूनही मोदी लाट जशी २०१४ मध्ये होती तशीच आहे. काँग्रेसच्या लोकांनी 'लाट ओसरली'ची हाकाटी सुरु केली पण मागच्या एक-दीड महिन्यात मी बर्याच लोकांशी अनौपचारिकपणे बोललो. त्यात कॅब ड्रायव्हर, रिक्शाचालक, चहा टपरीवर येणारे ग्राहक वगैरे यांचा समावेश होतो. अजूनही मोदी लाट आहेच हे मला त्यांच्याशी बोलण्यावरून दिसून आले. ही सँम्पल साईझ फार मोठी नाही पण थोडीफार कल्पना नक्कीच येते.
त्यात कॅब ड्रायव्हर,
In reply to माझा अंदाज... by समीरसूर
ग्रामीण भागातले लोक .. खासकरुन शेतकरी काय विचार करतात त्यावर निकाल अवलंबून असतील..
अंदाज खरा ठरलाय...
In reply to माझा अंदाज... by समीरसूर
अंदाज खरा ठरलाय. मोदी पंतप्रधान होणार...आपले राजकीय निरीक्षक तद्दन फालतू आहेत. एकदम भाकड! :-)
फेज ४ रात्री ८:३० वाजता
एकत्रीत महाराष्ट्र ५५.८६%
एकत्रीत फेज ४ ६२.९३%
राजस्थान, मध्यप्रदेश व
राजस्थान, मध्यप्रदेश व बिहारमधे मतदानाची टक्केवारी २०१४ पेक्षाही वाढतेय. बर्याच ठिकाणी ३% टक्के पेक्षाही मतदान जास्त झालंय.
केरळ, तामिळनाडू, कर्नाटका,
केरळ, तामिळनाडू, कर्नाटका, आंध्रप्रदेश, तेलंगणा व महाराष्ट्र येथील निवडणूका संपल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही.
म्हणजेच मागच्या निवडूकीप्रमाणे द्क्षीण भारतातील निवडणूक संपली व नंतर हिंदी पट्यातील मतदान वाढायला लागल. त्यावेळेस जातपात, हिंदू कार्ड वगैरेला महत्व दिले गेले होते.
यावेळी तसंच काहीस होताना दिसत आहे.
मध्यप्रदेशमधे मोठी लाट निर्माण होतेय. भोपाळ त्याचा केंद्र बिंदू असावा की काय असं वाटतय. साध्वी प्रज्ञासिंह प्रकरण फार मोठी उलथापालथ करणार अशी चिन्हे दिसताहेत. नेहमीप्रमाणे त्यांचे एकच वाक्य संदर्भ सोडून मिडियाने वापरले की काय अशीही शंका यायला लागलीय. असो.
मध्यप्रदेशमधे चौथ्या फेरीत मतदानाला सुरवात झाली. त्या पहिल्या सहा मतदारसंघात झालेला मतदानाचा उत्साह आश्चर्यचकीत करणारा आहे.
याचाच परिणाम राजस्थानवर झालेला दिसून येतोय. पण तो परिणाम त्यामानाने कमी असल्याने मी मध्यप्रदेशला लाटेचा केंद्रबिंदू समजतोय.
हे सर्व तर्क मी टक्केवारीच्या गणितांवर करतोय. :)
असो.
मध्य प्रदेशः- ३० एप्रील २०१९ दुपारी १ वाजताची स्थिती. ( मतदान आकडे अजूनही वाढताहेत. पण आता जोर कमी झालाय.)
.
राजस्थान :- ३० एप्रील २०१९ दुपारी १ वाजताची स्थिती. ( मतदान आकडे अजूनही वाढताहेत. पण आता जोर कमी झालाय.)
विधानसभा आणि लोकसभा
In reply to केरळ, तामिळनाडू, कर्नाटका, by शाम भागवत
शाम भागवत,
अंतरिम आकड्यांबद्दल धन्यवाद. एकंदरीत राजस्थान व मप्र येथे विधानसभा आणि लोकसभा मतदान यांचे आकृतिबंध बरेच वेगळे आहेत. विरोधी पक्षांना विधानसभा निवडणुकांत मिळालेलं किरकोळ यश लोकसभेच्या वेळेस वाहून जाणार असं दिसतंय.
आ.न.,
-गा.पै.
फिर एक बार, मोदी सरकार.
अंदाज - NDA ३५०+ अपेक्षा - फिर एक बार, मोदी सरकार.
अंदाज - UPA - 80 to 90 अपेक्षा - मजबुत विरोधी पक्ष (INC - 100+)
माझा अंदाज आणि अपेक्षा :
अंदाज - NDA ३२०+ (BJP २६०)
अपेक्षा - फिर एक बार, मोदी सरकार.
अंदाज : NDA २६०+
अंदाज : NDA २६०+
अपेक्षा : फिर एक बार,
मोदीभाजप सरकार :)(भाजप चालेल.. मोदी नको)
सुप्त लाट
एकूण मतदानाची परिस्थिती बघता बऱ्याच चर्चांना उधाण आलेलं आहे. आधीच्या निवडणुकांमधील आकडेवारी बघितली तर मागच्या निवडणुकीपेक्षा कमी किंवा साधारण तेवढेच मतदान झाले तर आहे तेच सरकार कायम राहणार असा कल असतो. याचे कारण असे सांगितले जाते की लोक निवांत असतात, सरकार ठीक काम करत आहे त्यामुळे बदलायची गरज नाही आणि मतदान करण्याचा फार उत्साह काही दिसत नाही.
हे जर मतदान आधीच्या निवडणुकीपेक्षा ४-५% पेक्षा जास्त झाले तर ती लाट आहे असे समजले जाते. जसे २०१४ च्या निवडणुकांमध्ये ८% जास्त मतदान झाले ज्याचा परिणाम म्हणून सरकार बदलले.
इथे मात्र हे जरा बारकाईने बघायला पाहिजे. २०१४ च्या आधी तत्कालीन सरकारबद्दल बराच असंतोष निर्मण झाला होता. सतत बाहेर येणारी भ्रष्टाचाराची प्रकरणे, लोकांना जाणवणारा पॉलिसी पॅरालीसीस, महागाई, असरदार नसलेले पंतप्रधान हे लोकांना प्रकर्षाने दिसत होते. त्यात अण्णा हजारेंनी केलेले आंदोलन पण महत्वाचे ठरले. या आंदोलनाने तरुण लोकांना जागृत केले. भ्रष्टाचाराविरुद्ध काहीतरी केले पाहिजे ही जाणीव केवळ तरुणाचं नव्हे तर सगळ्याच वयोगटातील लोकांना झाली. यात सरकार बदलणार हे तर नक्की होतं पण पर्याय कोण हा प्रश्न तर होताच. केजरीवाल पंप्र होतील अशी स्वप्ने बऱ्याच लोकांनी बघितली पण केजरीवालांनी त्यांच्या करणीने समर्थकांना तोंडघशी पाडले. भाजपने मोदींचे नाव पुढे केल्यावर मोदींची सरशी होणार हे जवळपास नक्की होतं.
आता २०१९ च्या निवडणुकीत सरकारच्या विरुद्ध जातील असे फारसे कुठले मुद्दे नाहीयेत. राफेल प्रकरणाला हवा देण्याचा बराच प्रयत्न काँग्रेसने केला पण त्याचा फार काही उपयोग होतोय असे वाटत नाही. उलट देशाच्या प्रगतीसाठी बाकी कुठले मुद्दे न मांडता फक्त मोदींना हटवायला पाहिजे अशी हाकाटी करून विरोधकांनी त्यांच्याच पायावर कुर्हाड मारून घेतली आहे असं वाटतं.
जर २०१४च्या तुलनेत या निवडणुकीत मतदानाचा टक्का फारसा बदलला नाही तर आहे तेच सरकार कायम राहणार. जर मतदानाचा टक्का बऱ्यापकी घटला (जे आत्तातरी दिसत नाही) तर भाजपाला बहुमत मिळणार नाही पण एनडीएला मिळेल. आणि जर मतदानाचा टक्का वाढला तर भाजप कदाचित जास्त जागा मिळवून विजयी होईल.
संपूर्ण महाराष्ट्र मतदान टक्केवारी
महाराष्ट्रात एकूण नवीन मतदार ७७,६६,१६६
२०१४ च्या निवडणूकीशी तुलना करता झालेले जास्तीचे मतदान ५१,०२,२६७
टक्केवारीतील वधघट लक्षात घेऊन, तसेच २०१४ ची मतदारसंख्या आधारभूत धरून, फक्त टक्केवारीनुसार विचार करता झालेले जास्तीचे मतदान १,८०,९१३
यातून एक ढोबळ अर्थ असा निघतो की,
१. २०१४ मधील कल फारसा बदललेला नाही. मात्र
२. नवमतदारांनी केलेले मतदान ह्याही निवडणुकीत मोलाची भूमिका बजावणार आहेत. मागच्या वेळेस हे नवमतदार मोठ्या संख्येने भाजपाकडे गेले होते. भाजपाची टक्केवारी २००९ च्या तुलनेत २०१४ मधे खूपच वाढली होती. अनेक मतदार संघामधे १०% इतकी भाजपाची टक्केवारी सुधारली होती. या मतदारांकडे झालेले दुर्लक्ष काँग्रेसला खूप महागात गेले होते.
३. ह्या वर्षी हेच नवमतदार (जे १८ ते २३ वर्षे वयोगटाचे असतील) आकर्षून घेण्यासाठी भाजपा व काँग्रेसमधे स्पर्धा आहे. ह्याच मतदारांना ७२००० ची योजना आकर्षीत करून घेईल असे काँग्रेसला वाटत आहे. (पैसे कोठून आणणार वगैरे सर्व मुद्दे सध्यातरी गौण आहेत. कृपया ते मुद्दे इथे काढू नयेत.) हे मतदार अंदाजे १०% असल्याने खूप मोठी उलथापालथ होऊ शकते. मात्र यासाठी काँग्रेस्+राष्ट्रवादीचे उमेदवार मागच्या वेळेस ३% टक्के कमी मतांनी हरलेले असले पाहिजेत.
बारामतीचा गड राखणार की जाणार ?
In reply to संपूर्ण महाराष्ट्र मतदान टक्केवारी by शाम भागवत
२०१४ ला रासपचे महादेव जानकर केवळ ६९ हजार ७१९ मतांनी पराभूत झाले होते, मागच्याच वेळी जर मोदींनी त्या मतदार संघात एखादी सभा घेतली असती तर महादेव जानकर निवडून आले असं म्हणतात. आता यावेळी नवं मतदार सुप्रिया सुळे यांना किती तारतात हे पाहणे रोचक ठरणार आहे. सुप्रिया सुळे आणि कांचन कुल यांच्यातील लढतीत नवमतदारांवर ही सर्व भिस्तअसेल, कोण जिंकेल हे पाहणे रोचक ठरणार आहे.
-दिलीप बिरुटॅ
बारामतीची मतदार संख्या २१
In reply to बारामतीचा गड राखणार की जाणार ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बारामतीची मतदार संख्या २१ लाखाच्या आसपास आहे. त्यामुळे टक्केवारीप्रमाणे ६९००० हजारांची आघाडी फार मोठी म्हणता येत नाही.
तसेच मागल्यावेळचा कल पुढे चालू राहणार अस टक्केवारीप्रमाणे दिसतंय. म्हणजे प्रादेशिक पक्ष आणखीन कमकुवत होणार हे नक्की.
तसं असेल तर राष्ट्रवादी आणखीन कमकुवत बनणार हे नक्की. २०१४ पेक्षा कमकुवत म्हणजे काय?
ते मी सांगणार नाही.
:)
एक महत्वाचा मुद्दा सांगायचा
In reply to बारामतीची मतदार संख्या २१ by शाम भागवत
एक महत्वाचा मुद्दा सांगायचा राहिलाच. संपूर्ण महाराष्ट्रात यावेळी सर्वात जास्त वाढलेले मतदान बारामतीमधे झालेले आहे. २३२८२९ एवढं जास्त मतदान झालेले आहे. पण टक्केवारी मात्र कमी दिसतीय. कारण या मतदार संघातील नवमतदार चक्क १४.१४ टक्यांनी वाढले आहेत. त्यामुळे टक्केवारीच्या भाषेत बोलताना सातारा प्रथम क्र्मांकावर व बारामती दुसर्या स्थानावर आहे. नांदेड टक्केवारीत बारामतीच्या पुढे आहे असं जरी वाटलं तरी नांदेड मधे नवमतदार फक्त १ टक्यांनीच वाढले आहेत.
जास्ती खोलात गेले तर
टक्केवारीच्या दृष्टीने विचार करता, प्रथमदर्शनी मुंबईत मतदान जास्त झाल्यासारखे वाटतयं. पण त्याच बरोबर मुंबईत मतदारांची संख्या चक्क कमी झाली आहे. थोडक्यात मुंबईची वाढलेली टक्केवारी चक्क एक गुगली आहे असं जाणवतंय.
पालघर व शिरूर मधे नवमतदार १६ टक्यांनी वाढले आहेत पण मतदान टक्केवारी मात्र वाढलेली नाही. शिरूर मधे तर ती उणे म्हणजे -०.३५% आहे.
पण मग या वेळी महदेव
In reply to बारामतीचा गड राखणार की जाणार ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पण मग या वेळी महदेव जानकरांनाच सुप्रिया सुळेच्या विरोधात का उभे केले नाही ? कांचन कुल यांच्याबद्दल मला फारशी माहिती नाही.. त्यांची लोकप्रियता आहे का तिकडे ?
जानकर कमळ चिन्ह वापरत नाहीत.
In reply to पण मग या वेळी महदेव by मराठी कथालेखक
जानकर कमळ चिन्ह वापरत नाहीत. वापरणारही नाहीत.
कांचन कुल बारामतीच्या माहेरवाशीण आहेत. महिला आहेत. तरूणपण आहेत. ह्या गोष्टी सारख्या आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे या तीन गोष्टींचा भावनिक वापर करू शकणार नाहीत. असाही अर्थ निघू शकतो. पण तो माझा तर्क आहे.
मुख्य म्हणजे कमळ चिन्ह वापरणार आहेत.
यापेक्षा मला फारशी माहिती नाही.
पण मतदान २.७०% नी वाढलंय. ते भाजपाला अनुकूल ठरू शकते ही भीतीच सगळ्यांना सतावतेय.
मध्यप्रदेशमध्ये ७ जागांवर
मध्यप्रदेशमध्ये ७ जागांवर मतदान आहे. सातही ठिकाणी जबरदस्त जोर दिसून येतोय. १२ वाजेपर्यंत निम्यापेक्षा जास्त मतदान झालंय. लोकं पेटून उठलीयेत व मतदान करताहेत असं वाटतंय.
रायबरेली मागच्या वेळचे मतदान
रायबरेली मागच्या वेळचे मतदान 51.73% एक वाजेपर्यंत मतदान 32.57%
अमेठी मागच्या वेळचे मतदान ५२.३९% एक वाजेपर्यंत मतदान ३२.१०%
थोडक्यात मतदान वाढायची शक्यता
५ व्या टप्यातही मध्यप्रदेशमधे
५ व्या टप्यातही मध्यप्रदेशमधे मतदान टक्केवारी सुधारलीय. खजुराहो मधे सर्वाधिक म्हणजे १५% मतदान वाढलंय. राजस्थान व झारखंड मधेही मतदान वाढलंय.
रात्रीच्या १० च्या अहवालानुसार ५ व्या फेजमधे ६३.२२% मतदान झालंय. अजून २-४% वाढू शकेलही.
रायबरेलीमधे व अमेठीमधे
रायबरेलीमधे व अमेठीमधे आत्तापर्यंत १.८७% व १.०९% जास्त मतदान झाले आहे.
प. बंगालमधे अजूनही
प. बंगालमधे अजूनही गेल्यावेळेपेक्षा ५ ते ६% मतदान कमी झालेलं दिसतंय. वादळामुळे असेल तर माहीत नाही. काही ठिकाणी १०% कमी झालंय.
अपडेट
In reply to प. बंगालमधे अजूनही by शाम भागवत
सात राज्यांतील सरासरी आकडेवारी
बिहार 57.76 %
जम्मू आणि काश्मीर 17.07 %
झारखंड 64.60 %
मध्य प्रदेश 64.61 %
राजस्थान 63.69 %
उत्तर प्रदेश 57.06 %
पश्चिम बंगाल 74.42 %
जम्मू काश्मिर...
In reply to अपडेट by तुषार काळभोर
जम्मू काश्मिर मधे २०१४ ला विक्रमी मतदान म्हणजे ५० % मतदान झालं होतं, ते आता १७ % वर आलंय. लोकांचा निरुत्साह आणि तेथील लोकांची सरकारबाद्लची काही एक भूमिका त्याला जवाबदार आहे असे दिसते.
-दिलीप बिरुटे
काश्मीर खोर्यात निचांकी
In reply to जम्मू काश्मिर... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काश्मीर खोर्यात निचांकी झाल्य. पहाडी भागात व्यवस्थीत झालंय.
.