निष्काळजीपणा
१) एक २३ वर्षाची मुलगी आली होती. पोटात दुखतंय म्हणून. हि माझी जुनीच रुग्ण आहे. तिला गेली काही वर्षे मुतखडा होण्याचा त्रास आहे. एकदा दुर्बिणीतून शल्यक्रिया करून झाली आहे. तिला अनेक वेळेस सांगून झाले आहे कि तुझे पाण्याचे प्रमाण कमी झाले तर लघवी जास्त संतृप्त (घट्ट) झाल्यामुळे त्यात मुतखडा होतो आहे तेंव्हा दिवसात किमान ३ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. कितीही कळकळीने सांगितले तरी हि मुलगी पाणी पीतच नाही.आई म्हणते कि कितीही सांगितले तरी मुलगी ऐकतच नाही.
२) एक ५० वर्षांच्या स्थूल बाई आहेत. मधुमेहामुळे त्यांची मूत्रपिंडे खराब होण्याच्या मार्गावर आहेत.त्यांना तीन वर्षांपासून सांगतो आहे कि काहीही करा पण मधुमेह नियंत्रणात ठेवा अन्यथा मूत्रपिंडे खराब होतील. बहुधा एका कानाने ऐकून घेतात आणि दुसऱ्या कानाने सोडून देतात. मला आश्चर्य वाटते कि इतके परखड शब्दात सांगितले अगदी काही वेळेस कठोर शब्दात सांगितले तरी परत परत माझ्याकडे कसे काय येतात.
३) हीच स्थिती असलेले एक "अहं" असलेले गृहस्थ मोटर सायकलने आले होते. त्यांना पण सांगितले कि "काहीही करा पण आपला मधुमेह नियंत्रणात ठेवा". त्यावर ते मलाच म्हणाले कि डॉक्टर मी काही माझी साखर सहा आठ महिने वर्षभर सुद्धा तपासत नाही. मी शांत पणे त्यांना म्हणालो साहेब तुम्ही वर्षभर चाकात हवा न भरता मोटर सायकल चालवता का? का-ही होणार नाही फार तर एखादे वेळेस पंक्चर होईल. पहिल्यांदाच हे गृहस्थ विचारात पडलेले दिसले.
४) श्री जठार (नाव बदलले आहे) याना त्यांची बहीण घेऊन आली होती. पोट बिघडलंय म्हणून. यकृत पाहिल्यावर त्यांना विचारले, "साहेब दारू पिता का?" त्यावर बहीण म्हणाली ते रोजच दारू पितात. श्री जठार यांचे लग्न झालेले नाही. वडिलोपार्जित घरात एकटे राहतात. नोकरी आनो, ती झाल्यावर रोज संध्याकाळी गुत्त्याकडे जातात. मी त्यांना माझ्या दवाखान्यात असलेला श्री गणपतीचा २ फुटाचा फोटो दाखवून म्हणालो, साहेब "एवढा मोठा फोटो" काढून ठेवा. कारण तुम्ही असेच दारू पीत राहिलात तर तीन चार वर्षात फोटो घरी भिंतीवर टांगायला लागेल. यानंतर त्यांचे दारू या विषयावर प्रबोधन केले. आपला अहवाल घेऊन ते गेले.
दोन महिन्यांनी श्री जठार बहिणीबरोबर परत हजर. आल्या आल्या बहीण माझ्या पाया पडू लागली. मला अतिशय कानकोंडे झाले. मी फार ओशाळून म्हणालो आहि माझ्या पाया कसले पडताय? त्यावर ती बहीण साश्रू नयनांनी म्हणाली डॉक्टर तुम्ही सांगितल्यावर गेल्या दोन महिन्यात त्याने दारूला हातही लावलेला नाही. आजपर्यंत एवढे उपाय केले पण ते फोल ठरले. मला अर्थातच आनंद झाला. "कुणाच्या का कोंबड्याने पण उजाडल्याशी मतलब" या न्यायाने. नंतर सहा महिन्याने श्री जठार परत आले होते सध्या ते संपूर्ण व्यसनमुक्त आहेत आणि त्यांचे यकृत जवळ जवळ उत्तम स्थितीत आले आहे.
५) असेच एक "अहं" ६५ वर्षाचे खाऊन पिऊन सुखी असलेले गृहस्थ( श्री माने --नाव बदलले आहे) पोट बिघडल्यामुळे माझ्याकडे आले होते. वजन १०८ किलो. सोनोग्राफी करताना यकृतात भरपूर चरबी भरलेली दिसत होती. मी त्यांना सांगत होतो कि साहेब तुमचे वजन, रक्तदाब आणि यकृतात चरबी हे हृदय विकाराला आमंत्रण देणारे आहेत.तुम्हाला मधुमेह आहे का? ते माझ्याकडे तुच्छपणे पाहत म्हणाले "मी असलं काही तपासून पाहत नाही आणि माझं कसं छान चाललं आहे".
मी त्यांना कळकळीने म्हणालो साहेब तुमच्यासारखे लोक पटकन हृदय विकाराला बळी पडतात तेंव्हा काळजी घ्या.
ते म्हणाले, मला "सध्या काय आहे" ते सांगा. अर्थात त्यांना अन्न विषबाधा झाली होती. ते सांगितले, अहवाल दिला आणि ते गेले. त्याच वेळेस( ते बाहेर जाताना) त्यांच्या शेजारी असलेली एक मुलगी ( हि माझ्याकडे मूल होण्यासाठी सोनोग्राफीसाठी येत असे) तिचे आणि त्यांचे बोलणे झाले.
हीच मुलगी पुढच्या महिन्यात परत तपासणी साठी आली असताना म्हणाली डॉक्टर, ते माने काका आले होते ना? मागच्या महिन्यात ते १५ दिवसापूर्वी हृदय विकाराने वारले.
मला धक्काच बसला. मला "बत्तीशी वठली" म्हणतात तशी भावना आली.
आजही हा विचार मनात आला कि मला कसं तरी होतं. कितीही कावळा बसायला आणि फांदी तुटायला गाठ पड्ली म्हणावं तरी असं परखड बोलावं कि नाही या संभ्रमात मी आहे.
वाचन संख्या
28872
प्रतिक्रिया
50
मिसळपाव
प्रतिक्रिया
कधी कधी पेशंटच्या मनात डॉक्टर
आपण सांगून मोकळे व्हावे......
हतबुद्ध
तुम्हीसुद्धा परखड, स्पष्ट
सहमत.
In reply to तुम्हीसुद्धा परखड, स्पष्ट by गवि
अहो, तुमचे नाव तुम्ही खरे करायलाच हवे!
डॉक्टर हे परखडच हवेत. फक्त
६५ वर्षाच्या मनुष्याची
> ६५ वर्षाच्या मनुष्याची
In reply to ६५ वर्षाच्या मनुष्याची by मराठी कथालेखक
माझी स्थिती
In reply to > ६५ वर्षाच्या मनुष्याची by एमी
उत्तम लेख
सत्य घटना १ :
१) मी कोणत्याही रुग्णाला
In reply to सत्य घटना १ : by सरळमार्गी
उत्तम लेख
In reply to १) मी कोणत्याही रुग्णाला by सुबोध खरे
डाॅक्टरांच्या बोलण्यात
या बाबतीत मी नशिबवान होतो
उत्तम लेख,
सहमत
In reply to उत्तम लेख, by उपेक्षित
तुम्ही स्पष्ट बोललंच पाहिजे
निष्काळजीपणा
परखडपणा ठेवलाच पाहिजे. पेशंट
लेख आवडला आणि
टिपिकल अनुभव !
आणि हो,
In reply to टिपिकल अनुभव ! by सस्नेह
इतके
In reply to आणि हो, by सस्नेह
हृदयाशी संबंधित अनुभव
In reply to आणि हो, by सस्नेह
माझ्या सासऱयांच्या बायपासला
In reply to आणि हो, by सस्नेह
बोका साहेब
In reply to माझ्या सासऱयांच्या बायपासला by उपाशी बोका
अशी स्थिती झाली आहे हे
सुबोध खरे व इतर ..
हव्यासाच माहित नाही.
In reply to सुबोध खरे व इतर .. by चौकटराजा
विषय थोडा भरकटतोय पण....
इन्शुरन्स
आरोग्य विमा असेल तर मोठ्या
आता विषय भरकटला आहे तर ..
चौ रा साहेब
In reply to आता विषय भरकटला आहे तर .. by चौकटराजा
परखड बोलायला हुशारी लागत नाही
माझ्या बद्दल फारशी माहिती
In reply to परखड बोलायला हुशारी लागत नाही by युयुत्सु
तुमची मनोवृत्ती दिसून येते
In reply to माझ्या बद्दल फारशी माहिती by सुबोध खरे
तेच सांगतोय
In reply to तुमची मनोवृत्ती दिसून येते by युयुत्सु
@ युयुत्सु अनावश्यक टिप्पणी,
In reply to परखड बोलायला हुशारी लागत नाही by युयुत्सु
त्यांनी माझ्या मनोवृत्तीवर
In reply to @ युयुत्सु अनावश्यक टिप्पणी, by उपेक्षित
डॉ० असुन तुम्हाला हे समजु नये
In reply to त्यांनी माझ्या मनोवृत्तीवर by युयुत्सु
जी काय ओळख झाली आहे, त्यातुन
In reply to डॉ० असुन तुम्हाला हे समजु नये by सुबोध खरे
बढिया है !
In reply to जी काय ओळख झाली आहे, त्यातुन by युयुत्सु
@ युयुत्सु मी फ़क़्त विनंती करू
In reply to त्यांनी माझ्या मनोवृत्तीवर by युयुत्सु
डॉक, तुम्ही जे योग्य तेच
राघव साहेब
In reply to डॉक, तुम्ही जे योग्य तेच by राघव
स्त्रियांचे आजार आणि इलाज हा
In reply to राघव साहेब by सुबोध खरे
खरंय डॉक. आपण सगळेच
In reply to राघव साहेब by सुबोध खरे