वजनाचा काटा --भाग १०
लेखनप्रकार
वजनाचा काटा --भाग १०
झटपट चरबी कमी करण्याचे लोकप्रिय उपाय आता पर्यंतच्या एकंदर चर्चेवरून बऱ्याच जणांना एक गोष्ट लक्षात आलेली आहे कि वजन कमी करणे हि अतिशय सोपी गोष्ट आहे आणि बऱ्याच लोकांनी आपले वजन अनेक वेळेस कमी केलेले आहे. दुर्दैवाने ते काही महिन्यात परत येतेच यामुळे काटा हलेना काटा चालेना (अशी कुणाची तरी सुंदर कविता मिपावर प्रसिद्ध झाली होती) हि स्थिती येते. म्हणजेच एकंदर वजनाचा काटा-- ९ भाग होऊन आपण जेथे आहात तेथेच आहोत. कारण मिताहार (तो आम्ही करतोच) आणि व्यायाम ( तोहि आम्ही करतोच) याचे गणित कुठेतरी चुकतंय हे लक्षात येतंय पण कळतंय पण वळत नाही हि स्थिती आहे. असो आता आपण झटपट चरबी कमी करण्याचे लोकप्रिय उपाय ( ज्यात मिताहार --डाएट आणि व्यायाम-- एक्झरसाईझ याची गरज नाही असा दावा केला जातो) पाहणार आहोत. या उपायांच्या जाहिराती आणि सवलतींचा आपल्या डोळ्या आणि कानावर सतत मारा होत असतो. या जाहिराती पाहून आपल्याला आपण पडवळ(पुरुषांसाठी) किंवा चवळीची शेंग (स्त्रियांसाठी) झाल्याची स्वप्ने पडत असतात. हे उपाय ३ तर्हेचे आहेत १) शल्यक्रिया विरहित २) लायपो सक्शन (नळीने चरबी शोषून काढणे) ३) शल्यक्रिया. १) शल्यक्रिया रहित उपाय हे आपल्या शरीरातील चरबी प्रत्यक्षात कमी करत नाहीत तर ती इकडची तिकडे हलवली जाते. (म्हणजे हि चरबी व्यायामाने जाळणे आणि परत येऊ नये म्हणून मिताहार करणे आवश्यकच राहते.) मग हे उपाय का करायचे? याचे फायदे असे आहेत १) याचा परिणाम तात्काळ चालू होऊ लागतो. २) त्वचेचे किंवा शरीराचे बधिरीकरण(anesthesia) करावे लागत नाही ३) दुष्परिणाम (साईड इफेक्ट्स) अत्यल्प आहेत ४) परिणाम हळूहळू दृगोच्चर झाल्यामुळे आपण असे उपचार घेतो आहोत हे लोकांपासून लपवणे शक्य होते ५)आणि आपण आपले वजन प्रमाणात ठेवले तर हे परिणाम दीर्घ कालपर्यंत टिकून राहतात या उपचारांच्या मर्यादा अशा आहेत. १) चरबी मोठ्याप्रमाणावर कमी होत नाही २)किती चरबी कमी होईल यावर पूर्ण नियंत्रण नसते ३) उपचार बऱ्याच वेळेस किंवा कालावधीने करावे लागतात ४) फक्त चरबीत फरक पडतो त्वचेत नाही. हे उपाय कुणाला आणि कोणत्या भागावर करता येतात a ) आपल्याला दुहेरी हनुवटी (DOUBLE CHIN) आहे बाकी सूटाबुटात आपले पुरोगामी पोट लपून जातंय पण हनुवटीमुळे चेहरा अनाकर्षक आहे. b ) आपल्या पोटावर वळकट्या आहेत त्यामुळे अद्ययावत फॅशनची साडी नेसता येत नाही c ) पोटापायावर सेल्युलाइट चढलंय त्यामुळे त्वचा गोळीबंद दिसते आहे. d ) स्तन बेढब झाले आहेत e ) मांड्यांवर गाठी (love handles) आल्या आहेत f) स्थूलपणामुळे पुरुषांचे स्तन वाढल्यामुळे ओंगळ दिसत असेल तर तेथील चरबी काढून टाकणे याचे प्रकार १) अतिशीत चरबी नाश -- Cryolipolysis २) लेसर चरबी नाश --Laser Treatment ३) पित्त इंजेक्शन-- Injectable Deoxycholic Acid ४) कर्णातीत ध्वनी चरबी नाश --Ultrasound Fat Reduction ५) Red Light Therapy लाल प्रकाश उपचार या सर्व उपायांमध्ये आपल्या चरबीच्या पेशीची भिंत फोडून त्यातील चरबी प्रवाही केली जाते जी रक्ताद्वारे आपल्या यकृतात ऊर्जा निर्मितीसाठी वापरली जाते. या सर्व उपचारांमध्ये आपल्याला पाहिजे तो परिणाम साधेपर्यंत तीन ते चार वेळेस हि प्रक्रिया परत परत करून साधला जातो. यांचा परिणाम १ महिन्यात दिसू लागतो आणि ३ महिन्यात कायम टिकणारा परिणाम होतो. जर आपण आपले वजन वाढवले नाहीत ता या सर्व उपचारांमध्ये कायम स्वरूपी परिणाम दिसतो. १) अतिशीत चरबी नाश -- Cryolipolysis -- यात यंत्राचा हात आपल्या त्वचेवर लावला वाजतो आणि त्वचा अशा तापमानापर्यंत थंड केली जाते कि त्यातील चरबीच्या पेशी फुटतात परंतु इतर स्नायू, मज्जा किंवा रक्तवाहिन्याच्या पेशींना इजा पोचत नाही.( या पेशींचे गोठण्याची तापमान चरबीच्या पेशींपेक्षा बरेच कमी असते म्हणून त्यांना इजा होत नाही). बाकी पेशींवर दुष्परिणाम होऊ नये म्हणून एका वेळेस साधारण २५ % चरबी कमी केली जाते. त्यामुळे हा उपचार ३-४ वेळेस करावा लागतो २) LASER लेसर उपचार-- यात विशिष्ट तरंगलांबीच्या लेसरचा वापर केला जातो ज्याचा सर्वात जास्त परिणाम चरबीच्या पेशींवर होतो. यामुळे चरबीच्या पेशी गरम होऊन फुटतात आणि चरबी रक्ताद्वारे शरीरभर नेली जाते. त्वचेला इजा होऊ नये म्हणून त्वचा इतर उपायांनी थंड ठेवली जाते ३) Deoxycholic Acid हे पित्तामध्ये असलेले साबणासारखे द्रव्य असते हे बधिर करण्याच्या द्रव्य (LOCAL ANESTHETIC) बरोबर चरबी असलेल्या भागात इंजेक्शन ने दिले जाते. यामध्ये चरबीच्या पेशी विरघळतात आणि कायमच्या नष्ट होतात. आपल्या हवा तसा परिणाम साधेपर्यंत एक एक महिन्याच्या अंतराने हि प्रक्रिया तीन चार वेळेस केली जाते. ४) कर्णातीत ध्वनी चरबी नाश --Ultrasound Fat Reduction --- सोनोग्राफी करताना अंतर्गोल भिंग वापरले जाते ज्यामुळे कर्णातीत ध्वनीचा शरीरावर परिणाम होत नाही याउलट आपण बहिर्गोल भिंग वापरून सूर्याचा प्रकाश एकत्र करून कागद जाळू शकजा, तसेच बहिर्गोल भिंग वापरून कर्णातीत ध्वनी चरबीच्या एका बिंदूवर एकाग्र करून चरबी वितळवता येते. हि चरबी मग शरीरात इतरत्र नेली जाते. यामध्ये चरबीच्या पेशी विरघळतात आणि कायमच्या नष्ट होतात. आपल्या हवा तसा परिणाम साधेपर्यंत एक एक महिन्याच्या अंतराने हि प्रक्रिया तीन चार वेळेस केली जाते. ५) Red Light Therapy लाल प्रकाश उपचार -- यात लेसर ऐवजी चरबीच्या पेशी जास्तीत जास्त शोषण घेतील असा लाल प्रकाश वापरला जातो. बाकी सर्व प्रक्रिया तीच आहे. या सर्व उपचारांमध्ये वजन कमी होत नाही तर पाहुणे येणार म्हणून आपण दर्शनी खोलीतील अडगळ आतल्या खोलीत नेऊन ठेवतो तशी चरबी शरीराच्या इतर भागात आणि यकृतात नेली जाते. या उपचारांबरोबर आपण मिताहार आणि व्यायाम चालू ठेवला तर हि वितळलेली चरबी ऊर्जानिर्मितीसाठी खर्च होऊन कायमची बाहेर जाऊ शकते. अर्थात मिताहार आणि व्यायाम चालू ठेवला नाही तर याचा इच्छित परिणाम दिसणार नाहीच. २) LIPOSUCTION --लायपो सक्शन अर्थात चरबी शोषण. यात चरबी प्रथम वितळवली जाते आणि नंतर एक नळी टाकून ती द्रव स्वरूपातील चरबी शोषून शहरीराबाहेर काढून टाकली जाते. चरबी शरीराबाहेर काढण्यासाठी त्वचेला बधिर करून तेथे छोटेसे भोक पडून त्यातून एक नळी आत खुपसली जाते आणि या नळीला मोटार लावून हि द्रवरूप चरबी शोषून बाहेर काढली जाते. चरबी वितळवण्यासाठी अल्ट्रासाऊंड किंवा लेसर किंवा लाल प्रकाश वापरला जातो. किंवा इंजेक्शनने चरबी वितळवणारे विकर(ENZYME) बधिर करणाऱ्या औषधाबरोबर शरीरात टाकले जातात. शक्तिवान मोटारीने बलपूर्वक शोषून सुद्धा ( वितळवून किंवा न वितळवता) चरबी काढता येते. हि चरबी काढल्यानंतर एक घट्ट बसणारे रबरी वस्त्र त्या ठिकाणी ४ - ६ आठवडे पर्यंत घालावे लागते अन्यथा चरबी काढलेल्या जागी असलेली त्वचा, फुगवून हवा काढलेल्या फुग्यासारखी सुरकुतलेली राहते आणि जास्तच खराब दिसते. याचा अर्थ असा कि मी आज LIPOSUCTION करून घेईन आणि लगेच शनिवारी बिकिनी घालून गोव्याला मजा करायला जाईन असे नाही. आमच्या रुग्णालयात (२००९) १८ -२० वर्षाच्या पोरी पोटावर वाढलेली थोडीशी चरबी काढण्यासाठी येत असत. या मुली "आय पी एल" मध्ये चीअर लीडर्स म्हणून नाचत असत. एका सामन्यात नाचण्याचे त्यांना तेन्व्हा रुपये १०,०००/- मिळत असत त्यामुळे पोटावर एक जरी वळकटी आली तरी "पोटावर पाय येईल" या भीतीने त्या हे करायला येत असत. बाकी लग्न ठरलेल्या मुली शरीराला सुडौल आकार देण्यासाठी येत असताना हि मी पाहिले आहे. या प्रकारात एका वेळेस जास्तीत जास्त १ ते २ किलो चरबी काढता येते. या शिवाय जर आपल्या त्वचेचे स्थितिस्थापकत्व (ELASTICITY) कमी झाले असेल तर केवळ चरबी काढली तर त्वचा पूर्णपणे आकुंचन पावणार नाही आणि जास्त सुरकुतलेली दिसेल. अशा वेळेस हि अतिरिक्त लोम्बणारी त्वचा प्लॅस्टिक शल्यक्रियेने कापून टाकावी लागते. याचा अर्थ हि उपचार पद्धती सुद्धा लाव पावडर हो गोरी सारखी एकदम वजन कमी करून देणारी नाही. परंतु चरबीचे गोळे आले असतील तर तेथील चरबी काढून त्वचा जास्त नितळ करता येऊ शकते. ३) शल्यक्रिया हा प्रकार आपण पुढच्या भागात पाहू क्रमशः
वाचने
7850
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
दहावा भाग!!!
e ) मांड्यांवर गाठी (love
वाचते आहे..
love handles म्हणजे कमरेवर
छान लेख माला
सोप्या शब्दांत लोकोपयोगी
वरील सर्व प्रकारच्या
In reply to वरील सर्व प्रकारच्या by उगा काहितरीच
सदा सर्वत्र जाहिराती उपलब्ध
In reply to सदा सर्वत्र जाहिराती उपलब्ध by सुबोध खरे
तेच ना ! इतक्या वेगवेगळ्या
In reply to तेच ना ! इतक्या वेगवेगळ्या by उगा काहितरीच
दुर्दैवने मला या खर्चाबद्दल
In reply to दुर्दैवने मला या खर्चाबद्दल by सुबोध खरे
सेवेच्या बाबतीत असं होतंय खरं
In reply to सेवेच्या बाबतीत असं होतंय खरं by उगा काहितरीच
आपण म्हणताय हे सत्य असलं तरी
शल्यक्रिया विरहीत पध्दतीत वितळलेली चरबी शरीराबाहेर कशी पडते
In reply to शल्यक्रिया विरहीत पध्दतीत वितळलेली चरबी शरीराबाहेर कशी पडते by रीडर
शल्यक्रिया विरहीत पध्दतीत
नवीन माहिती अतिशय सोप्या
छान माहीती.
खूपच छान माहिती.
In reply to खूपच छान माहिती. by डोके.डी.डी.
(No subject)
In reply to खूपच छान माहिती. by डोके.डी.डी.
डोके साहेब
चांगली माहिती