भाजप सरकार - दिल्ली ते गल्ली. प्रतिमा आणि वस्तुस्थिती .

Primary tabs

अभिजित - १'s picture
अभिजित - १ in राजकारण
17 Sep 2018 - 1:15 pm

2019
मोदी भाजप सरकारचा कारभार अतिशय उत्तम चालू आहे असे इथल्या बहुसंख्य जनतेचे मत आहे. आनंद आहे. मी आता एक नवीन धागा काढत आहे. जिथे फक्त सरकारची उलट सुलट नीती / बनवा बनवी / जनतेची पिळवणूक कशी चालते याच्या "फक्त बातम्या" टाकणार आहे. अर्थात लिंक्स. सर्व तटस्थ जनतेला आमंत्रण आहे इथे !! इथे कोणतीही चर्चा अपेक्षित नाही. मोदी प्रेमी जनतेने याला उलट उत्तर म्हणुन कारभार कसा उत्तम चालू आहे यावर नवीन धागा काढावाच. तिकडे जरूर लिंक्स द्या. आता ४/५ महिन्यात परीक्षा आलेली आहे. त्या मुळे हे होणे जरुरीचे आहे.
अजून एक - पूर्वानुलोकन म्हणून हि हा धागा उपयोगी पडेल.
भक्तांनी सुरुवात करावी GST / रेरा / UPI पेमेंट इ इ पासून . आगे बढो !!

प्रतिक्रिया

सुबोध खरे's picture

22 Nov 2018 - 12:43 pm | सुबोध खरे

बिरुटे सर

नमो यांनी मतांसाठी

हिन्दू राष्ट्र नावाची एक कल्पना उभी केली.

निदान हा एक( पहिलाच) मुद्दा सिद्ध करून दाखवा.

अन्यथा "आपण फेकू आहोत" हे मान्य करा.

अणुबॉम्ब आणला तरी तुम्हाला तो फुसकाच वाटेल . बाकी खरे फटाके २०१९ मध्ये ऐकू येतील तुम्हाला. १०० चा आकडा गाठला तरी कमाल असे होणार आहे.

सायेब, हिटलर्ला वाईट्ट म्हनत आसताना त्येच्या मागून त्येचीच गोबेल्स निति वापर्नार्याकडं "संतुलित विचार आणि तुलना" हेंची आपेक्शा, आँ ?! ह्ये ह्ये ह्ये ह्ये ह्ये ह्ये

गोबेल्स म्हनायचा, पुरावे कायबी जरून न्हाय, निस्तं खोटं ब्वोला पन ठासून ब्वोला आनि त्येच त्येच हजारदा ब्वोलत र्‍हा... येक दिवस येडी लोकं तुम्च्यावर ईश्वास ठ्येवतील बगा ! सत्तरैशी वर्षानन्तर्बी रागा आनि त्येंच्या पाटिराक्यांचं त्येच्यासरकच वागनं बगून गोबेल्स आनि मुसोलिनी खो खो हासत आमच्या सपनात आले व्हते बर्का ! ;) =))

सर टोबी's picture

21 Nov 2018 - 11:32 pm | सर टोबी

इथे कुणाला रामराज्यच अवतरले आहे असे वाटते तर भाजप अजून १०० वर्षे तरी देशावर राज्य करेल असा भास होत आहे. त्यांना कोणी पुरावे मागत नाही. आणि माझे हे ढोबळ निरीक्षण आहे अशा अर्थाचे लिहिल्यानंतर देखील दाखले लागतात!

मामाजी's picture

21 Nov 2018 - 8:08 pm | मामाजी

प्रा. डॉ. सर, धन्यवाद
मी खेदाने नमूद करू ईच्छीतो की आपण मांडलेले सर्व मुद्दे खूपच उथळ स्वरूपाचे आहेत. आपणच तयार केलेल्या आपल्या मानसिक प्रतिमेतील हिटलर व आपल्याच मानसिक प्रतिमेतील मोदी यांच्यातील साधर्म्य दाखवण्याचा ओढूनताणून केलेला एक केविलवाणा प्रयत्न वाटला. आपण मांडलेले हे सात ही मूद्दे माझ्या दृष्टीने अतिरंजीत आहेत त्यामुळे प्रतिसाद देण्याची ईच्छा नाही.. क्षमस्व..

परंतू मूद्दा क्र ५ हा “पूराव्यानी शाबीत ” या श्रेणीत घेता येत असल्यामुळे त्याच्यावर प्रतिसाद देत आहे..

५)हिटलरला शाळा, कॉलेजेस, वर्तमानपत्र त्याला जशी वाटतील तशी चालली पाहिजे असे वाटायचे. ५) फेकू नमोंचा प्रवास पाहिल्यावर लक्षात येते की त्यांचाही व्यवस्थेवर तसाच प्रभाव आहे.

मोदींना सर्व शाळा, कॉलेजेस, वर्तमानपत्र आपल्याला जशी वाटतील तशी चालली पाहिजेत याला काही पुरावा आहे का? नसल्यास आपणच फेकू आहोत हे मान्य कराल काय?
असो, २००४ ते २०१४ या कालावधीत आपल्याला पंतप्रधान पद मिळु न शकल्याने भारताच्या राज्यघटनेनुसार सर्वोच्च असलेले केंद्रीय मंत्रीमंडळ व पंतप्रधान कार्यालय हे आपल्याला वाटतील तसेच चालले पाहिजेत या अट्टाहासापयी सोनिया गांधीनी आपल्या अध्यक्षते खाली राष्ट्रीय सल्लागार समिती स्थापन केली व अप्रत्यक्षरीत्या भारताचा संपूर्ण राज्यकारभारच आपल्या नियंत्रणाखाली आणला होता ही वास्तवीकता आपण मान्य कराल अशी आशा करतो.
सर्व शाळा, कॉलेजेस, वर्तमानपत्रांवर मोदींनी न आणलेले (आपल्या सारख्यांचे काल्पनीक) नियंत्रण व केंद्रीय मंत्रीमंडळ व पंतप्रधान कार्यालय यांच्यावर प्रत्यक्ष असलेले असलेले सोनिया गांधींचे संपूर्ण नियंत्रण या दोन गोष्टींमधला फरक आपल्या सारख्या प्राध्यापकांना मी सांगण्याची गरज नाही.
याच्याही पुढे, पंतप्रधानांच्या अध्यक्षते खाली केंद्रिय मंत्रीमंडळाच्या बैठकीत सर्वसंमतीने घतलेला व तथाकथीत राष्ट्रीय सल्लागार समिती ने सुद्धा सहमती दर्शवलेला एक अध्यादेश स्वीकृती साठी राष्ट्रपतिंकडे पाठवण्यात आला होता. परंतू साधे खासदार असलेले राहूल गांधी यांनी भर पत्रकार परिषदेत "अत्यंत मूर्खपणाचा व केराची टोपली दाखवण्याच्या लायकीचा निर्णय " अशी हेटाळणी करत राणा भीमदेवी थाटात फाडून टाकला. राज्यघटनेनुसार सर्वोच्च पदी असलेल्या माननीय पंतप्रधानांनी तो अध्यादेश निमुटपणे मागे घेउन आपली आगतीकता (व ना/लायकी) दर्शवली.
साधे खासदार असलेले राहूल गांधी यांची ही कृती व तीला राष्ट्रीय सल्लागार समितीची अध्यक्षा व पंतप्रधानांसकट सर्वांनी दिलेले अनुमोदन याची तुलना आपणच आपल्या या वाक्या बरोबर करावी
५) फेकू नमोंचा प्रवास पाहिल्यावर लक्षात येते की त्यांचाही व्यवस्थेवर तसाच प्रभाव आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Nov 2018 - 8:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रा. डॉ. सर, धन्यवाद
मी खेदाने नमूद करू ईच्छीतो की आपण मांडलेले सर्व मुद्दे खूपच उथळ स्वरूपाचे आहेत. आपणच तयार केलेल्या आपल्या मानसिक प्रतिमेतील हिटलर व आपल्याच मानसिक प्रतिमेतील मोदी यांच्यातील साधर्म्य दाखवण्याचा ओढूनताणून केलेला एक केविलवाणा प्रयत्न वाटला.

आभार. आपल्या मताचा मी आदर करतो.

आपण मांडलेले हे सात ही मूद्दे माझ्या दृष्टीने अतिरंजीत आहेत त्यामुळे प्रतिसाद देण्याची ईच्छा नाही.. क्षमस्व..

आभार. असे असूनही आपण विनाकारण प्रतिसाद लांबवला. स्पष्टीकरण लिहित बसलात. आपणास झाल्या तसदीबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.

-दिलीप बिरुटे

विशुमित's picture

21 Nov 2018 - 8:47 pm | विशुमित

आभार. असे असूनही आपण विनाकारण प्रतिसाद लांबवला. स्पष्टीकरण लिहित बसलात. आपणास झाल्या तसदीबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.
....
'क्लास'ची काय फी आकारता तुम्ही??

मामाजी's picture

22 Nov 2018 - 9:55 am | मामाजी

प्रा. डॉ. सर, धन्यवाद,
बाकी अजुन बरेच लिहिता येईल तुर्तास इतके पुरे आहे.
हे वाक्य आपणच मांडलेल्या सात मुद्द्यांच्या शेवटी लिहीले आहे. त्यामुळे माझी अपेक्षा होती आता आपण काही खास राखीव ठेवणीतले मुद्दे काढाल. परंतू "गीरे तो भी टांग ऊपर" ही ऊक्ती सार्थ करत आपण नुसती सपशेल माघारच नाही घेतलीत व तर माझा प्रतिसाद देखिल साभार स्वीकारलात. त्यामुळे मी मांडलेल्या १) आपण स्वत: फेकु श्रेणीत आहात व २) "हिटलरी हुकूमशाही" ही मोदीं कार्यशैली नसून गांधी घराण्याची आहे या दोन्ही मुद्द्यांना आपली सहमती आहे असे तुर्तास गृहीत धरतो.
आपली ही माघार घेण्याची पद्धत काही सदस्यांना मार्गदर्शक ठरणार आहे असे काही प्रतिसादांवरुन दिसत आहे. अशा "क्लास" पद्धती ने माघार कशी घ्यावी हे शिकण्यासाठी क्लास सुरु करण्याची मागणी ही पुढे येत आहे. या भविष्यातील वाटचाली साठी आपल्यला शुभेच्छा..

ट्रम्प's picture

21 Nov 2018 - 10:58 am | ट्रम्प

हिटलर चा राष्ट्रवाद योग्यच होता , त्यामळे जर्मन जनतेच्या मनात राष्ट्रप्रेम वाढीस लागून दुसऱ्या महायुद्धाच्या अगोदर जर्मनी ची औद्योगिक प्रगती भरपूर झाली व त्याचे परिणाम जागतिक बाजारात अजून सुद्धा दिसत आहेत . त्यामुळे तुम्ही उपस्थित केलेले मुद्दया पैकी बऱ्याचशा मुद्द्यावर कोणीही सामान्य माणूस मोदींना समर्थन देऊ शकतो .
हिटलरने दरिद्री गरीब जर्मन जनतेला प्रगतीची स्वप्ने दाखवली ( अपवाद दुसरे महायुद्ध व ज्यु हत्याकांड ) व ती खरी करून दाखवली म्हणूनच आज जर्मनी एक महासत्ता आहे .
त्याच प्रमाणे मोदीं सुद्धा भारताला जागतिक महासत्ता बनवू शकतात ते सुद्धा 20 / 25 लाख लोक न मारता कारण आपल्या इथे लोकशाही आहे व आतेरिक्या नां वाचवायला आपण रात्री 12 वाजता न्यायालय उघडवू शकतो .
राहिला प्रश्न मोदींच्या हिंदुवादाचा !!!!
मला तरी मोदी हिंदू धर्माचा अधिकृत पणे पुरस्कार करताना दिसले नाही . त्यांच्या स्वभावात , पोशाख , आहार व विचारा मध्ये हिंदू धर्म ओतप्रोत भरलेला आहे म्हणून त्यांच्या वर्तुनिकित दिसत .
' हिंदूच रक्षण हिंदू नीं करावं हा मोदींचा हेतू ' या बद्दल एक तरी उदाहरण द्या की राव ? बर ते सुद्धा खरे मानले तर हिंदूच रक्षण मग मुस्लिम करणार होते का ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Nov 2018 - 11:56 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

व्यक्तिगत न होता चर्चा चालू ठेवा.....! :)

-दिलीप बिरुटे

अभिजित - १'s picture

21 Nov 2018 - 5:32 pm | अभिजित - १

पहिल्या आठवड्यात ( बहुतेक ) रस्त्यावर कचरा करून स्वच्छ भारत घोषणा दिली. तिचे पुढे काय झालं ? शुन्य !! अजुनही देशातील हजारो मनपा कचरा जाळून / दूरवरच्या गावात लोटुन / जमिनीत दाबुन पूर्वीचाच कारभार चालवत आहेत. मग हि घोषणा मुळात दिलीच कशाला होती ? अजून मुख्य ठाण्यातील कचरा प्रश्न सुटला नाहीए. सोसायट्यावर कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारायची जबरदस्ती .. सध्या थंड बस्त्यात आहे. पण मग नवीन ठाणे खाडी पल्याड उभारून बिल्डर मित्रांची धन करायची धंदे कशाला हवेत ? शिवसेना आहे ना अजून मित्र ?
देशाला नवीन दिशा दाखवायचं काय झालं ? देश का चौकीदार !! आपल्याच धुंदीत आहे !!
https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/kalyan-dumping-...

सुबोध खरे's picture

21 Nov 2018 - 6:30 pm | सुबोध खरे

आपण दिलेले दुवे आपण स्वतः वाचत नाही असंच दिसतंय
किंवा आपला निष्कर्ष "आपल्याला हवा" तसाच काढताय असंही असेल.
(एकंदर प्रशासन काम करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याला स्थानिक विरोध का आहे याची राजकीय कारणेहि खोलात जाऊन शोधा)
एकंदर कडोमपाची स्थिती काय आहे हे आपल्याला माहिती असतं तर हा दुवा पाठवला नसता.
असो.

डँबिस००७'s picture

21 Nov 2018 - 8:49 pm | डँबिस००७

देश का चौकीदार !! आपल्याच धुंदीत आहे !!
म्हणुन पं प्र श्री मोदीजींची हत्त्या करण्यासाठी देशातली डावे पक्ष कम्युनिस्ट , कॉंग्रेस पक्ष , अर्बन नक्षल गॅग एकत्र येउन कट रचत होते ! बर झाल पं प्रधाना सकट सर्व सुरक्षा यंत्रणा डोळ्यात तेल घालुन जागृृृृत होती म्हणुन गुन्ह्याचे धागे दोरे हाती लागले !!

राष्ट्रवादाच्या नावाखाली फेक न्यूजचा प्रसार
https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/nationalis...

भारतीय नागरिक 'राष्ट्र उभारणी'च्या हेतूने राष्ट्रवादासंदर्भातील बातम्या शेअर करतात. राष्ट्रवादासंदर्भातील संदेश पाठवणे त्यांना कर्तव्य वाटते. भारताची प्रगती, हिंदुशक्ती, हिंदू गतवैभवाला झळाळी अशा विषयांबद्दलची प्रसंगी खोटी माहिती सरसकट मोठ्या प्रमाणावर पुढे पाठवली जाते. असे संदेश पाठवून राष्ट्र उभारणीच्या कार्यात आपण योगदान देत आहोत, अशी भावना लोकांच्या मनात असते,' असे ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने (बीबीसी) केलेल्या अभ्यासात आढळून आले आहे. 'भारतात खोट्या बातम्या (फेक न्यूज) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूच्या राजकीय घडामोडी यांच्यात काही वेळा परस्परसंबंध असल्याचा निष्कर्ष नोंदविण्यात आला आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Nov 2018 - 6:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मा.फेक सम्राट सत्तेवर आल्यापासून स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा असं घडतय की सत्य काय आणि असत्य काय यात सामान्य माणसाच्या मनात संभ्रम निर्माण करण्यात सध्याचं सरकार यशस्वी झालंय. माध्यमं फेक, मंत्री फेक, आश्वासने बोगस, डिग्र्या बोगस तरी सर्वत्र अलबेल चालू आहे, अशी एक फेक व्यवस्था इथे निर्माण झाली आहे. लोक सत्य काय आहे हे समजून घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. गोंधळलेली अवस्था सरकारने करून टाकली आहे. लोक जेव्हा जागृत होतील, तेव्हाच सरकारच्या सत्तेची एकेक वीट ढासाळायला लागेल.

एकच मार्ग सत्ता बदल. हळू हळू सत्तांतर होईल. फक्त काही काळ जाऊ द्यावा लागेल.

-दिलीप बिरुटे

डँबिस००७'s picture

21 Nov 2018 - 7:25 pm | डँबिस००७

प्रो डॉ बिरुटे,

तुमच्या मिपावरच्या आता पर्यंतच्या प्रतिक्रीये वरुन हे कळुन आलेल आहे की तुम्ही ह्या सरकारच्या बाबतीत खुप क्रीटीकल आहात. खास करुन श्री मोदींबाबत. तुमच्या प्रदिर्घ अनुभवावर, बौद्ध्दीक क्षमतेवर आम्हाला विश्वास आहे. तुम्हाला ह्या भारतासमोरचे प्रश्न, जन सामान्या समोरच्या प्रश्नांची बरोबर सखोल जाण आहे आणी हे प्रश्न सोडवण्यासाठी काय काय योग्य पाऊले उचलली पाहीजेत ह्यावर
तुमच्याकडे खरोखर खुप चांगली उपाय योजना असेलच.

ईतक्या प्रश्नातुन फक्त एखाद दुसरा प्रश्न विचारात घेऊन त्या प्रश्नाची बॅक ग्रॉऊंड , त्याचा एफेक्ट झालेला समाजाचा वर्ग, त्यावरचा प्रभावी उपाय व उपाय लागु करण्यासाठीची योजना व त्याचे पुर्नवहन , त्यासाठी लागणारा पैसा कसा व कुठुन उभा करणार हे सर्व समजावुन सांगाव ! त्यासाठी तुम्ही एक स्वतंत्र लेख लिहुन आम्हाला उपकृत करुन टाकावे.

विशुमित's picture

21 Nov 2018 - 8:49 pm | विशुमित

बाकी सगळं ठीक आहे पण फेकाफेकी कमी करावी, एवढीच माफक अपेक्षा..!!

माहितगार's picture

21 Nov 2018 - 7:18 pm | माहितगार

अगदी बरोबर आहे फेक सेक्युलरांबद्दलच्या न्यूज फेकच असणार . आज मध्यप्रदेशातील कमलनाथांची मतपेटी लांगूलचालनाची व्हिडीओ व्हायरल झाली आहे फेकच असणार. काल मी कोण त्यागी का कुणाला लाईव्ह इंडिया टुडेवर काँग्रेस प्रणित हिंदुत्वावर (सेक्युलॅरीझम) वर बोलताना स्वतःच्या कानाने ऐकले ते फेकच असणार.

डँबिस००७'s picture

21 Nov 2018 - 5:48 pm | डँबिस००७

भाजप सरकार - दिल्ली ते गल्ली. प्रतिमा आणि वस्तुस्थिती उत्तम आहे ! .

अभिजित - १'s picture

21 Nov 2018 - 5:53 pm | अभिजित - १

दिसेलच .. घोडामैदान फार लांब नाहीए आता !!

विशुमित's picture

21 Nov 2018 - 8:53 pm | विशुमित

कृपया असे प्रतिसाद (वल्गना) टाळावेत. अपेक्षाभंग होतो. आणि समर्थकांना चेव चढतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Nov 2018 - 11:09 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

IMG-20181122-WA0007

अहो, असा कोणताही काहीही परिणाम झालेला नाही, मा. मोदींना हे सर्व माहिती आहे. हे पेप्रावाले काहीही लिहितात. बहुतेक हा पेपर काँग्रेस आणि इतर पक्षांचा दिसतो. ही सगळी धागा लेखकाची चाल आहे, दुसरं काही नाही. ;)

-दिलीप बिरुटे

डँबिस००७'s picture

22 Nov 2018 - 12:12 pm | डँबिस००७

प्रो डॉ बिरुटे,

तुमच्या मिपावरच्या आता पर्यंतच्या प्रतिक्रीये वरुन हे कळुन आलेल आहे की तुम्ही ह्या सरकारच्या बाबतीत खुप क्रीटीकल आहात. खास करुन श्री मोदींबाबत. तुमच्या प्रदिर्घ अनुभवावर, बौद्ध्दीक क्षमतेवर आम्हाला विश्वास आहे. तुम्हाला ह्या भारतासमोरचे प्रश्न, जन सामान्या समोरच्या प्रश्नांची बरोबर सखोल जाण आहे आणी हे प्रश्न सोडवण्यासाठी काय काय योग्य पाऊले उचलली पाहीजेत ह्यावर
तुमच्याकडे खरोखर खुप चांगली उपाय योजना असेलच.

ईतक्या प्रश्नातुन फक्त एखाद दुसरा प्रश्न विचारात घेऊन त्या प्रश्नाची बॅक ग्रॉऊंड , त्याचा एफेक्ट झालेला समाजाचा वर्ग, त्यावरचा प्रभावी उपाय व उपाय लागु करण्यासाठीची योजना व त्याचे पुर्नवहन , त्यासाठी लागणारा पैसा कसा व कुठुन उभा करणार हे सर्व समजावुन सांगाव ! त्यासाठी तुम्ही एक स्वतंत्र लेख लिहुन आम्हाला उपकृत करुन टाकावे.

त्यासाठी अध्यक्षीय निवडणूक घेऊन मा. प्र सेवकांविरूद्ध उभे करून निवडून आणून, डाॅ.प्रा. ना पंतप्रधान करावे लागेल.
...
शक्य आहे का हे??

प्रा.डॉ . ंना पंतप्रधान होणे नक्कीच शक्य असावे. ते कुणाचे समर्थक अथवा विरोधक असोत कमीत कमी बिरुटे आडनावाचे कुणि मागच्या पिढीतील राजकारणी आमच्या ऐकिवात नाहीत तो पर्यंत पहिल्या पिढीतील राजकारणी म्हणून ते भारताच्या पंतप्रधानपदापर्यंत पोहोचले तर आम्हाला प्रा.डॉ. सरांचा निखळ आभिमानच असेल असे नव्हे तर त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी, भारतातील विभाजीत विवीध जनतादले म्हणजे ज्यात मुलायम,लालू,पटनायक, ते गौडा, ते शिवसेना , मनसे, आंबेडकर वंशीय पक्ष ते एम क्यु एम ते डि एम के,, ते तेलंगाणा राष्ट्र समिती कुठल्याही पक्षातील घराणेशाही संपवून प्रा.डॉ.सर त्या पक्षाचे सर्वेसर्वा होऊन पंतप्रधान पदी पोहोचोत हि आमची त्यांना सदिच्छाच आहे. फक्त त्यांनी राजकीय घराणेशाहीचा उघड निषेध नि:संकोचपणे करुन दाखवावा असे त्यांना आवाहन आहे.

माहितगार's picture

22 Nov 2018 - 12:36 pm | माहितगार

अजून तीनचार म्हणजे लोकदल, अकाली, नॅशनल काँन्फरन्स, मुफ्ती, मिझोराम कि मेघालयातील काही घराणेशाही पक्षांची नावे सुटली असल्यास त्यांनाही विचरात घ्यावे अशी नम्र विनंती

सुबोध खरे's picture

22 Nov 2018 - 12:38 pm | सुबोध खरे

उगाच काहींच्या काही
त्यांना नुसती योजना मांडण्यास सांगितलॆले आहे त्यावर कार्यवाही नव्हे.
योजना खरोखरच उत्तम असेल तर त्याच्या कार्यवाहीसाठी ती पुढे पाठवता येईल.

मिपावर नक्की योजना देण्याची हिम्मत/ तयारी कोणीही दाखवलेली नाही.

जे चालले आहे ते सर्व भंपक आहे अशी नुसती टीका करायची. मग चांगले काय करता येईल ते विचारले तर ते माहिती नाही म्हणून हात वर करायचे हि वृत्ती.

(नुसती टीका तर शेम्बडे पोर पण करू शकेल)

फुकाचे बुडबुडे सोडण्यात काय हशील आहे?

माहितगार's picture

22 Nov 2018 - 1:04 pm | माहितगार

उगाच काहींच्या काही
त्यांना नुसती योजना मांडण्यास सांगितलॆले आहे त्यावर कार्यवाही नव्हे.

हातात योजना असलेले राजकारणत यशस्वी होत नाहीत याची प्रा डॉ. सरांना खात्री असणार, त्यामुळे विद्यार्थ्यांप्रमाणे मतदारांसाठी रिकाम्या जागा ठेऊन रिझल्ट देण्या बाबत सरांचे मत विचारण्यास हरकत नसावी :) सरांना प्रत्यक्ष राजकारणातच रस असावा असा आमचा समज होत चालला आहे (चूक की बरोबर ते सरच सांगू शकतील ) -नाहीतर मोदींनी हिंदू राष्ट्राचा शोध लावल्याचा शोध सरांनीही लावला नसता- म्हणून आम्ही त्यांना राजकीय प्रवासासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेतच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Nov 2018 - 2:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रामराज्य यावं यासाठी त्यांच्या पहिल्या पाच पिढ्यांमधे काम झालं तेव्हा कुठे राम राज्य आलं. दिलीप (मी नै हो) रघु, अज, दशरथ आणि मग राम. कोणत्याही कामाची सुरुवात करायला सामाजिक सांस्कृतिक निष्ठेतेची गरज असते तेव्हा कुठे एक उच्चतम समाज दिसायला लागतो. आदरणीय, माननिय यांच्या पाच पिढ्या जरी यापुढे कामाला लागल्या तरी हिंदुराष्ट्र बनविण्याचं स्वप्न त्यांचं कधी पूर्ण होऊ शकत नाही, कारण भारत विविध परंपरा जाती जमातींचा संस्कृतीचा देश आज आहे आणि पुढेही राहील. पण स्वप्न तसे दाखवत राहीले की मतांचा गठ्ठा एका बाजूला झुकतो या अर्थाने फेकूंचं हिदुराष्ट्र आणि हिंदुत्वाची मांडामांड आणि फेकाफेक चाललेली असते. गावांची नावं बदलून देशाची संस्कृती बदलत नसते हे आदरणीय कॉमेडी मॅनला कोण सांगणार. पण लोकांच्या मानसिकतेशी खेळायचं हा नाद नव्या व्यवस्थेला लागलेला आहे. लोक भूलतात, फ़सतात, आणि पालख्या उचलतात हे आपलं दुर्दैव आहे.

बाकी आपल्याला राजकारण, समाजकारण, तंत्र, साहित्य, या सर्व विषयांची आवड आहे, म्हणून बोलावं लागतं हो. उद्या बोलण्यावर नियंत्रण आणलं तुमच्या आदरणीय साहेबांनी तर कुठे बोलणार आम्ही. ;)

-दिलीप बिरुटे

अभ्या..'s picture

22 Nov 2018 - 2:22 pm | अभ्या..

मानलं तुमच्या स्वनियंत्रणाला प्रा डॉ सर, साक्षात पिठाच्या गोळ्यात प्राण फुंकून त्याला साहेब करायचे धन्वंतरी कौशल्य असणार्‍या माणसाला कुणा बाह्य नियंत्रणाखाली वाकवू शकेल असे वाटत नाही.
बाकी राजकीय मतांबाबत काय बोलणार.
लढा....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Nov 2018 - 2:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नोटेड.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Nov 2018 - 2:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नुसतं लढा म्हणून थांबू नका. आपल्या सर्वांना एका मोठ्या शक्तीला उलथवून लावायचं असेल तर सर्वांनी खांद्याला खांदा लावून लढलं पाहिजे, बोललं पाहिजे. आता उद्या मार्च मधे अर्धेअधिक एटीम बंद होणार आहेत, अशी बातमी ऐकली. दोन कोटी रोजगार सोडा आहे तो रोजगार जाण्याच्या मार्गावर आहे. एकीकडे कॅशलेशची मोहीम आणि दुसरीकडे बँकात चकरा वाढणार असे दिसते. एक तर एटीमवाले पैसे उकळायच्या मागे आहेत किंवा आपले हाल होणार असे दिसते. आत्ताच नोटबंदीमुळे एटीएमवर झालेले हाल विसरत चाललो होतो. त्या जखमा अजून बर्‍या झाल्या नव्ह्ते की हे नवे ओरखडे. अवघड. आहे. आबा तोबा करुन घेतलं पाहिजे ज्यांनी मागच्या वेळी मोदीसरकारला मतं केली असतील त्यांनी. ;)

बँकात आता पुन्हा त्या वयस्कर महिलांचे कामकाज निरखणे आले. अर्धा वेळ त्यांचा डबा खाण्यात जातो आणि आपला तासभर त्यांच्या डबा पाहण्याकडे भोगा फळं. :)

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

22 Nov 2018 - 2:54 pm | प्रचेतस

राहुल गांधी पंप्र झलेच पाहिजेत.

अभ्या..'s picture

22 Nov 2018 - 2:57 pm | अभ्या..

अक्षर राहिले की काना? ;)
.
त्याआधी सगळ्या लग्नाळूंचे लग्न झालेच पाहिजे.

प्रचेतस's picture

22 Nov 2018 - 2:58 pm | प्रचेतस

=))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Nov 2018 - 3:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

त्याआधी सगळ्या लग्नाळूंचे लग्न झालेच पाहिजे.

असा फिसकन हसलो की विचारु नका. =))

-दिलीप बिरुटे

डँबिस००७'s picture

22 Nov 2018 - 3:09 pm | डँबिस००७

मार्च मधे अर्धेअधिक एटीम बंद होणार आहेत, अशी बातमी ऐकली

प्रो डॉ, वरची बातमीच घ्या उदाहरणा दाखल !! ह्या बातमी विषयी आपले उथळ मत नकोय कारण ते तर ते बातमीवाले ही सांगतच असतात !

अशी परिस्थीती तुमच्या म्हणण्या प्रमाणे सरकारने आणलेली आहे ! ती कशी ? सरकार ह्या एटीम बंद करण्या मागे कशी काय आहे ?
एटीम बंद करण्याऐवजी दुसरी काय सोय करता आली असती. एकुणच ह्या व त्याच्या अनुशंगाने ईतर प्रॉब्लेम्सचा विचार विस्तार व त्यावरचे उपाय ह्यावर तुमचे सविस्तर मत मांडा ! त्यावरुन आम्हाला कळेल की आताचे सरकार का फेल आहे.

माहितगार's picture

22 Nov 2018 - 6:00 pm | माहितगार

प्रा.डॉ. सर परिवाराचे कपडे सांभाळण्याच्या लढाईसाठी आमची हि कविता आपणास सादर उपयोगी पडो. आणि परिवार निवडून आल्यावर हि कविता आणि परिवारातील व्यक्तीपूजेतून परत बाहेर पडण्यासाठी हि कविता

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Nov 2018 - 6:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अँड व्हॉट दे सेड. हे वाचलं नव्हतं. बाकी, दोन्हीही कविता छानच होत्या.
लिहिते राहा तुम्ही....

-दिलीप बिरुटे

डँबिस००७'s picture

22 Nov 2018 - 2:57 pm | डँबिस००७

प्रो डॉ बिरुटे,

फक्त आणि फक्त,

ईतक्या प्रश्नातुन फक्त एखाद दुसरा प्रश्न विचारात घेऊन त्या प्रश्नाची बॅक ग्रॉऊंड , त्याचा एफेक्ट झालेला समाजाचा वर्ग, त्यावरचा प्रभावी उपाय व उपाय लागु करण्यासाठीची योजना व त्याचे पुर्नवहन , त्यासाठी लागणारा पैसा कसा व कुठुन उभा करणार हे सर्व समजावुन सांगाव ! त्यासाठी तुम्ही एक स्वतंत्र लेख लिहुन आम्हाला उपकृत करुन टाकावे.

ईतकीच माफक ईच्छा प्रकट केलेली आहे. कधी करताय पुर्ण ?

सुबोध खरे's picture

23 Nov 2018 - 12:04 pm | सुबोध खरे

बिरुटे सर

नमो यांनी मतांसाठी

हिन्दू राष्ट्र नावाची एक कल्पना उभी केली.

निदान हा एक( पहिलाच) मुद्दा सिद्ध करून दाखवा.

अन्यथा "आपण फेकू आहोत" हे मान्य करा.

गणामास्तर's picture

23 Nov 2018 - 2:09 pm | गणामास्तर

असल्या धाग्यांवर आधी मोदी समर्थकांचे प्रतिसाद वाचून निदान करमणूक तरी व्हायची म्हणून येथे येणे व्हायचे.
परंतु दिवसेंदिवस वाढत चाललेला त्यांचा आक्रस्ताळेपणा किंवा प्रत्युत्तराची भाषा वगैरे पाहून मोदी समर्थकांची काळजी वाटायला लागलीये.

ट्रम्प's picture

23 Nov 2018 - 4:08 pm | ट्रम्प

मास्तर !!!
मोदी समर्थकांचे प्रतिसाद करमणूकप्रधान आहेत अस जर तुम्हाला वाटतयं तर नमोरुग्णांचे प्रतिसाद वाचताना हसून हसून गडबडा लोळत असाल , आणि राहुल शेठ चे वक्तृत्वकौशल्य बघून डोळे पाणवत असतील .

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Nov 2018 - 11:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सरकार समर्थक पक्षांनी राममंदिराच्या बाबतीत प्रश्न उचलायचा आणि वातावरण एका अजिबात महत्वाच्या नसलेल्या पण लोकांच्या भावनेशी खेळवणारा विषय २०१९ पर्यन्त चघळायला लावून निवडणुका जिंकायचा फंडा मात्र गाजत राहणार आहे.

जय हो....!

-दिलीप बिरुटे

१)

मंदिर वही बनायेंगे लेकिन तारीख नही बतायेंगे.

हि उद्घोषणा अंशतः प्रतिपक्षास आव्हान देत असली भांडणार्‍या सासूने उखाण्यातून सूनेला अप्रत्यक्ष मान्यता दिल्यासारखे 'सेल्फ गोल' नाही का ? चष्मा काढून बघणे सोपे जावे म्हणून उपरोक्त वाक्यातील काही शब्द बदलतो

शादी वही करेंगे तारीख नही बताएंगे

या वाक्यातील तक्रार केवळ तरीख न सांगण्याबद्दल आहे लग्नास मान्यता आहे लग्न लौकर का करत नाही ? सिमीलर प्रश्न नवपरिणीत विवाहीतेस सासूने ' काय पाळणा अजून किती लांबवणार ?' हा प्रश्न विचारण्यासारखे नाही का ? सासूचे सुनेशी पटत नाही म्हणून ' काय पाळणा अजून किती लांबवणार ?' आता तुम्हाला बाळ होऊ दे हा ह्या वाक्यातील लक्ष्यार्थ कसा बदलणार ?

२ ) क्रमांक १ चा प्रश्न लक्षात आला असेल तर तुमचाही या खेळात अप्रत्यक्ष पण महत्वपूर्ण सहभाग नाही का ?

......पण लोकांच्या भावनेशी खेळवणारा विषय....

अ) क्रमांक १ मध्ये नमूद आव्हान वाक्य वापरुन मान्यता आणि प्रोत्साहनच दिले जात नाहीए का ?
ब) तिथे खरोखरही मंदिर होऊन जाऊ दिले की प्रश्नातील हवा निघून जाते ती निघून न जाऊ देण्यात प्रतिपक्ष सहभागी नाही असे कसे म्हणावे ?

विषया संबंधीत आपल्यासाठी अजून प्रश्न आहेत पण ते या प्रश्नांची उत्तरे आल्यावर विचारतो.

माहितगार's picture

27 Nov 2018 - 1:13 pm | माहितगार

प्रा.डॉ. सरांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Nov 2018 - 10:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लिहितो...वेळ द्या.. खरंच बिझी आहे. वाचतोय मी तुम्हाला सर्वत्र.

-दिलीप बिरुटे

सुबोध खरे's picture

26 Nov 2018 - 9:03 am | सुबोध खरे

Kapil Sibal Wants Ayodhya Hearing After 2019 Polls
https://www.youtube.com/watch?v=HbLYpzTFDv8

https://www.hindustantimes.com/assembly-elections/congress-asked-supreme...

आपण xx खायचं आणि दुसर्याचं तोंड हुंगायचं असा प्रकार आहे.
२०१७ ,मध्ये सर्वोच्च न्यायालयात स्वतःच अर्ज द्यायचा कि २०१९ पर्यंत सुनावणी करू नये.

सुनावणी करणाऱ्या सरन्यायाधीशाना महाभियोगाची धमकी द्यायची आणि वर उलट कांगावा

बढिया है

अभिजित - १'s picture

27 Nov 2018 - 12:55 pm | अभिजित - १

https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/free-serv...

Bank Services: बँकांच्या मोफत सेवा धोक्यात

थकित कर्जांच्या ओझ्याखाली दबलेल्या बँकांनी केंद्र सरकारसमोर नवा पेच उभा केला आहे. जर केंद्र सरकारने बँकांना देण्यात आलेली ४०,००० कोटी रुपयांची सेवाकराची नोटीस मागे घेतली नाही, तर ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सर्वप्रकारच्या मोफत सेवांवर गंडांतर आणण्याचा इशारा बँकांनी दिला आहे.
मटा ऑनलाइन | Updated:Nov 27, 2018, 10:38AM IST

https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/governmen...

सरकार बँकांना देणार बेचाळीस हजार कोटी

वृत्तसंस्था, नवी दिल्लीआर्थिक संकटात सापडलेल्या सरकारी बँकांना आवश्यक भांडवलाचे प्रमाण राखता यावे यासाठी सरकारकडून भांडवल पुरवठा केला जाणार आहे...
मटा ऑनलाइन | Updated:Nov 27, 2018, 04:00AM IST
-----------------------------------------------------------------------------------------
वरील दोन बातम्या ची सांगड घातली कि दिसते - जनते च्या खिशात हात घालून पैसे काढायचा. आणि कर्ज वसूल करू शकत नसलेल्या बँकांना मदत करायची.
NPA वसुल करण्यात सरकारची काहीच भूमिका नाही ? मग चोरांना पळून जाऊन देण्यात, मदत करायची भुमिका मात्र आहे !!